हायडेलबर्ग धर्मशिक्षण प्रश्नोत्तरावली, आमचे दुसऱ्या क्रमांकावरचे सैद्धांतिक मानक, सर्वाधिक प्रभावी जर्मन प्रांत, पॅलेटिनेटचा राज्यकर्ता एलेक्टॉर फ्रेडरिक ३, ह्याच्या विनंतीवरून हायडेलबर्ग येथे १५५९ ते १५७६ दरम्यान लिहिले गेले होते.
ह्या धार्मिक राजपुत्राने अठ्ठावीस वर्षे वयाचा, हायडेलबर्ग विद्यापीठात ईश्वरी विद्या शास्त्राचा प्राध्यापक असलेला झकारियस उरसीनस, आणि सव्वीस वर्षे वयाचा, फ्रेडेरिकचा दरबारी धर्मोपदेशक कॅस्पर ओलिव्हिएनस ह्यांच्यावर तरुणांना शिक्षण देण्यासाठी आणि पाळक वर्ग व शिक्षकांच्या मार्गदर्शनासाठी प्रश्नोत्तरांद्वारे धर्म शिक्षण पाठ्यक्रम तयार करण्याची कामगिरी सोपवली. ह्या पाठयक्रमासाठी फ्रेडेरिकने समग्र ईश्वर विद्या शिकवणाऱ्या विद्वानांची मते, सल्ला आणि सहकार्य मिळवले. हायडेलबर्गमधील सिनडने हायडेलबर्ग कॅटिकीझमला स्वीकृती दिली आणि तिला फ्रेडेरिकने दिनांक १९ जानेवारी, १५६३, रोजी लिहिलेल्या प्रस्तावनेसहित जर्मन भाषेत प्रकाशित करण्यात आले.
त्याच वर्षी, काही किरकोळ गोष्टींची भर घालून एक दुसरी आणि तिसरी जर्मन आवृत्ती आणि तसेच एक लॅटिन भाषांतर, हायडेलबर्गमध्ये प्रकाशित करण्यात आले. लवकरच, कॅटिकीझम विभागून तिचे बावन्न भाग करण्यात आले यासाठी की वर्षाच्या प्रत्येक रविवारी कॅटिकीझमचा एक भाग चर्चेसमध्ये समजावून सांगता यावा.
नेदरलँड्स (हॉलंड) मध्ये ज्याने हायडेलबर्ग कॅटिकीझमचे डच भाषेत भाषांतर केले आणि त्यानेच शब्दांकित केलेली आणि १५६६मध्ये प्रकाशित झालेली जिनेव्हन सौल्टर (भक्ती गीतें)यांमध्ये ते डच भाषांतर घातले, मुख्यतः त्या पेत्रस देठेनुसच्या प्रयत्नांमुळे हायडेलबर्ग कॅटिकीझम लोकप्रीय बनले आणि छापून बाहेर आल्या आल्या लोक मोठ्या आवडीने ते घेऊ लागले. त्याच वर्षी, पीटर गॅब्रिएलने ऍमस्टरडॅम येथील चर्चच्या भक्तगणापुढे आपल्या रविवार दुपारच्या प्रवचनांतून ह्या धर्मशिक्षणाचे स्पष्टीकरण देऊन एक चांगला कित्ता घालून दिला. सोळाव्या शतकातील नॅशनल सिनड्सनी ह्या धर्मशिक्षणाला ऐक्याच्या तीन रूपांपैकी एक मानून स्वीकृती दिली आणि पदाधिकाऱ्यांनी सहमती दाखवावी आणि चर्च सेवकांनी (पास्टर्सनी) ते चर्चेसमध्ये शिकवावे असे सांगितले. डॉर्टच्या १६१८-१९च्या महान सिनडमध्ये ह्या गोष्टींवर फार जोर देण्यात आला. हायडेलबर्ग कॅटिकीझमचे पुष्कळ भाषांत भाषांतर करण्यात आले आणि ते रेफर्मेशन (धर्म जागृती) समयांतील अनेक धर्मशिक्षणांपैकी सर्वाधिक स्वीकृती पावलेले असे धर्मशिक्षण ठरले.
प्रभूचा दिवस १
१. प्रश्न: तुमच्या हयातीत व मृत्यूसमयी तुम्हां ला दिलासा देणारी एकमेव गोष्ट कोणती?
उत्तर : माझ्या हयातीत व मृत्यूसमयी मला दि लासा देणारी एकमेव गोष्ट ही आहे की, मी माझ्या स्व तःचा नाही (१करि.६:१९,२०), पण जि वंत असताना व मृतावस्थे त माझे शरीर व प्रा ण ह्यां सह मी माझा वि श्वा सू तारक ये शू ख्रिस्त (रोम.१४:७-९२) ह्या च्या मालकीचा आहे (१करि.३:२३; तीत.२:१४). त्या ने त्या च्या मोलवान रक्ता ने माझ्या सर्व पापांचा दंड पूर्ण पणे भरला आहे (१पेत्र.१:१८, १९; १योहान.१:७; २:२). आणि सैतानाच्या सर्व अधि कार-सामर्थ्या पासून मला बंधमुक्त केले आहे (योहान.८:३४-३६; इब्री .२:१४,१५; १योहान.३:८). तो माझा सांभाळदेखील अशा रीतीने करतो की, माझ्या स्वर्गीय पि त्या च्या इच्छेशि वाय माझ्या डोक्या चा एक केससुद्धा (मत्तय.१०:२९-३१; लूक.२१:१६-१८) पडू शकत नाही (योहान.६:३९,४०; १०:२७-३०; २थेस्स ल.३:३; १पेत्र.१:५६;). खरेच, माझ्या तारणाकरि ता सर्व गोष्टी समन्वय पूर्व क एकत्रि तपणे घडून ये णारच आहेत (रोम.८:२८). म्ह णून त्या च्या पवि त्र आत्म द्वा रे तो मला सार्व कालि क जीवनाचा भरवसा देतो (रोम.८:१५, १६; २करि.१:२१,२२; ५:५; इफि स.१:१३,१४) आणि ये थून पुढे मी मोठ्या आवडीने, स्वे च्छेने त्या च्या करि ता जीवन कंठावे म्ह णून माझी तयारी करतो (रोम.८:१४).
२. प्रश्न: सुखावणाऱ्या ह्या आनंदात जीवन कंठून संपवण्या साठी तुम्ही कोणत्या गोष्टी जाणणे गरजेचे आहे?
उत्तर :
- पहिली गोष्ट, माझी पापे आणि माझी दैन्या वस्था किती भयंकर स्व रूपाच्या आहेत (रोम.३:९.१०; १योहान.१:१०);
- दुसरी गोष्ट, ह्या सर्व भयंकर परिस्थितीतून मला कसे सोडवण्यात आले? (योहान १७:३; प्रेषित ४:१२; १०:४३)
- तिसरी गोष्ट, माझ्या ह्या बंधमुक्तीकरिता मी देवाप्रत माझी कृतज्ञता कशी बाळगली पाहिजे. (मत्तय ५:१६;रोम ६:१३; इफिस ५:८-१०;
पहिला भाग
आमचे पाप आणि दैन्यावस्था
प्रभूचा दिवस २
३. प्रश्न: तुम्हां ला तुमच्या दुर्द शेची जाणीव कोठून होते?
उत्तर : आम्हां ला आमच्या दुर्द शेची जाणीव देवाच्या निय मशास्त्रा तून होते (रोम.३:२०, ७:७-२५).
४. प्रश्न: देवाचे नियमशास्त्र आपल्याला काय करायला भाग पाडते?
उत्तर : (देवाचे नियमशास्त्र आपल्याला काय करावयास सांगते ते) मत्तय २२मध्ये ख्रिस्त आपल्याला हे सारांशरूपाने शिकवतो:
तू आपला देव ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती कर (अनुवाद ६:५)
हीच पहिली व सर्वात मोठी आज्ञा आहे. आणि दुसरी आज्ञा तशीच आहे:
तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतासारखी प्रीती कर. ह्या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व
संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत. (लेवीय १९:१८.)
५. प्रश्न: तुम्ही परिपूर्णरीतीने हे आज्ञापालन करू शकता का?
उत्तर- (आम्ही परिपूर्णरीतीने हे आज्ञापालन करू शकत) नाही, (रोम ३:१०, २३; १ योहान १:८, १०) निसर्गतःच, देव आणि माझा शेजारी यांचा तिरस्कार करण्याची माझी प्रवृत्ती आहे. (उत्पत्ती ६:५; ८:२१; यिर्मया १७:९; रोम ७:२३; ८:७; इफिस २:३; तीत ३:३).
प्रभूचा दिवस ३
६. प्रश्न: तर मग, देवाने मनुष्याला इतके दुष्ट आणि विकृत असे उत्पन्न केले का?
उत्तर- (देवाने मनुष्याला इतके दुष्ट आणि विकृत असे उत्पन्न केले) नाही, उलट देवाने मनुष्याला चांगले (उत्पत्ती १:३१) आणि त्याच्या प्रतिमेसारखे बनवले (उत्पत्ती १:२६, २७), म्हणजे खरे नीतिमत्व व पावित्र्य ह्यांत त्याला निर्माण केले (इफिस ४:२४), यासाठी की त्याने त्याच्या उत्पन्नकर्त्याला यथायोग्यपणे जाणून घ्यावे (कलसे ३:१०) आणि त्याच्यावर मनापासून प्रीती करावी, आणि त्याची स्तुती व गौरव करण्यासाठी त्याच्यासोबत अनंतकालिक गौरवात राहावे. (स्तोत्र ८)
७. प्रश्न: मग मनुष्याचा नीतिभ्रष्ट स्वभाव कोठून आला?
उत्तर- (मनुष्याचा नीतिभ्रष्ट स्वभाव) आपले मूळ माता-पिता, आदाम व हवा, ह्यांचे सुखलोकात (एदेन बागेत) (उत्पत्ती ३) आज्ञाभंगातून झालेल्या त्यांच्या पतनापासून आला आहे , कारण तेथे आपला स्वभाव एवढा भ्रष्ट (रोम ५:१२,१८, १९) झाला की पापामध्येच आपल्या सर्वांची गर्भधारणा व जन्म झाला. (स्तोत्र ५१:५)
८. प्रश्न: पण कोणतेही सत्कृत्य करण्यास संपूर्णतया असमर्थ आणि सर्व कुकर्म करण्याची ओढ असण्याइतपत आपण भ्रष्ट आहोत का?
उत्तर– (याचे उत्तर) होय असेच आहे (उत्पत्ती ६:५; ८:२१; ईयोब १४:४; यशया ५३:६१) आपण देवाच्या आत्म्याद्वारे (योहान ३:३-५) अध्यात्मिक पुनर्जन्म पावत नाही तोवर आपण तसे आहोत. होय,१.
प्रभूचा दिवस ४
९. प्रश्न: पण मनुष्य जे करूच शकत नाही त्या देवाच्या नियमशास्त्रात सांगितलेल्या गोष्टीं मनुष्याला करायला लावून देव मनुष्यावर अन्याय करत नाहीत का?
उत्तर- नाही, कारण देवाने मनुष्य असा उत्पन्न केला की त्याच्याकडे त्या गोष्टीं करण्याची क्षमता होती. (उत्पत्ती १:३१). पण सैतानाच्या चिथावणीने मनुष्याने (उत्पत्ती ३:१३; योहान ८:४४; १ तिमथ्य २:१३, १४) समजून उमजून देवाची आज्ञा मोडली (उत्पत्ती ३:६) आणि स्वतःपासून आणि त्याच्या सर्व वंशजांपासून ही दानें हिरावून नेली.(रोम ५:१२, १८, १९).
१०. प्रश्न: असा आज्ञाभंग आणि धर्मभ्रष्टता यांना शिक्षा न करता देव जाऊ देईल का?
उत्तर- निश्चितच नाही. पण आपल्या जन्मजात, अंगभूत पापांमुळे आणि आपण प्रत्यक्षपणे केलेल्या पापांमुळे (उत्पत्ति २:१७; निर्गम ३४:७; स्तोत्र ५:४-६; ७:११; नहुम १:२;रोम १:१८; ५:१२; इफिस ५:६; इब्री ९:२७) तो अत्यंत दुखावला गेला आहे, आणि त्या पापांबद्दल तो न्याय्य निवाड्याद्वारे उचित वेळी आणि सार्वकालिक अशी शिक्षा करील, कारण त्याने हे घोषित (अनुवाद २७:२६) केले आहे की जो कोणी ह्या नियमशास्त्राची वचने मान्य करून ती आचरणात आणत नाही तो प्रत्येक जण शापित असो. गलती ३:१०
११. प्रश्न: पण देव दयाळू देखील नाही का?
उत्तर- देव खरोखरच दयाळू आहे, (निर्गम २०:६, ३४:६, ७, स्तोत्र १०३:८, ९) पण तो न्याय्य देखील आहे. (निर्गम २०:५, ३४:७; अनुवाद ७:९-११; स्तोत्र ५४-६; इब्री १०:३०, ३१.) त्याचा न्यायादेश हे फर्मावतो की सवोच्च, वैभवशाली देवाविरुद्ध केलेल्या पापासाठी शरीर व प्राण ह्या दोहोंसाठी सार्वकालिक अशी अत्यंत जहाल, कठोर शिक्षा झालीच पाहिजे. (मत्तय २५:४५, ४६)
दुसरा भाग
आमची मुक्तता
प्रभूचा दिवस ५
१२. प्रश्न: जर देवाच्या नीतिमान न्यायानुसार आपण ऐहिक आणि सार्वकालिक शिक्षेस पात्र आहोत तर ह्या शिक्षेपासून वाचून आपण देवाची मर्जी पुन्हा कशी संपादन करू शकतो ?
उत्तर- त्याच्या न्यायाची समाधानकारक अंमलबजावणी झाली पाहिजे असे देव बजावतो. (निर्गम २०:५; २३:७; रोम २:१-११ ) म्हणून आपण स्वतः परिपूर्ण दंड भरला पाहिजे किंवा दुसऱ्या कोणाच्याद्वारे तरी हे केलेच पाहिजे. (यशया ५३:११, रोम ८:३,४)
१३. प्रश्न: आपण स्वतः ही किंमत भरू शकतो का?
उत्तर- निश्चितच नाही; उलट, आपण दर रोज आपल्या अपराधाचा बोजा वाढवत असतो. (स्तोत्र १३०:३; मत्तय ६:१२; रोम २:४,५)
१४. प्रश्न: कोणी जीवधारी प्राणी आपल्यासाठी ही किंमत मोजू शकते का?
उत्तर- नाही. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, मनुष्याने केलेल्या पापासाठी (यहेज १८:४, २०: इब्री २:१४-18) देव दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला शिक्षा करणार नाही; आणि शिवाय, कोणताही केवळ प्राणिमात्र पापाविरुद्ध देवाच्या अनंतकालीन क्रोधाचे ओझे पेलू शकत नाही आणि पापापासून इतरांचे विमोचन करू शकत नाही. (स्तोत्र १३०:३; नहुम १:६.)
१५. प्रश्न: आपण कोणत्या प्रकारचा मध्यस्थ आणि मुक्तिदाता शोधला पाहिजे?
जो खरा (१ करिंथ १५:२१; इब्री २:१७)आणि नीतिमान(यशया ५३:९; २ करिंथ ५:२१; इब्री ७:२६) मनुष्य आहे, आणि तरीही सर्व प्राण्यांपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे; म्हणजे, जो एकाच वेळी खरा देव आहे(यशया ७:१४; ९:६; यिर्मया २३:६; योहान १:१; रोम ८:३,४)
प्रभूचा दिवस ६
१६. प्रश्न: तो एक खरा आणि धार्मिक/नीतिमान मनुष्य असणे का आवश्यक आहे?
उत्तर- तो एक खरा मनुष्य असला पाहिजे कारण ज्या मानवाने त्याच्या देह स्वभावानुरूप पाप केले आहे त्यामध्येच पापाबद्दल शिक्षा भोगली पाहिजे ही देवाची इच्छा आहे. (रोम ५:१२, १५; १ करिंथ १५:२१; इब्री २:१४-१६) तो एक नीतिमान मनुष्य असला पाहिजे कारण जो स्वतःच पापी आहे तो इतरांसाठी किंमत मोजू शकत नाही.(इब्री ७:२६, २७; १ पेत्र ३:१८.)
१७. प्रश्न: त्याचवेळी तो खरा देव देखील का असलाच पाहिजे?
उत्तर – तो खरा देव असला पाहिजे यासाठी की त्याच्या पवित्र स्वभावगुणांच्या सामर्थ्याने (यशया ९:६.) त्याने त्याच्या मानवी स्वभावानुसार देवाच्या क्रोधाचे ओझे (अनुवाद ४:२४; नहूम १:६; स्तोत्र १३०:३) वाहून आमच्यासाठी नीतिमत्व आणि जीवन मिळवून ते आम्हाला पुन्हा प्रदान करावे. (यशया ५३:५, ११; योहान ३:१६; २ करिंथ ५:२१.)
१८. प्रश्न: पण जो खरा देव आहे आणि त्याच वेळी एक खरा आणि नीतिमान मनुष्य आहे असा तो मध्यस्थ कोण आहे?
उत्तर- जो आपल्याकरिता देवापासून येणारी सुज्ञता – म्हणजे आपले नीतिमत्व, पावित्र्य आणि मुक्ती असा आपल्यासाठी झालेला आपला प्रभू येशू ख्रिस्त. (मत्तय १:२१-२३; लूक २:११; १ तिमथ्य २:५; ३:१६)
१९. प्रश्न: तुमच्या ह्या माहितीचा मूळ स्रोत काय आहे?
उत्तर- जी पवित्र सुवार्ता देवाने स्वतः प्रथम एदेन बागेत प्रकट केली (उत्पत्ती ३:१५). नंतर जी त्याने आद्य चर्च पितें (उत्पत्ती १२:३; २२:१८; ४९:१०). व संदेष्ट्यांद्वारे (यशया ५३; यिर्मया २३:५, ६; मीखा ७:१८-२०; प्रेषित १०:४३;इब्री १:१७) घोषित केली, आणि यज्ञार्पणे व नियमशास्त्राचे इतर विधी संस्कार (लेवीय १:७; योहान ५:४६; इब्री १०:१-१०.) यांतून जी अगोदरच दर्शवली गेली. आणि सरतेशेवटी देवाने त्याच्या एकुलत्या एका पुत्राद्वारे (रोम १०:४; गलती ४:४, ५; कलसे २:१७) त्या सुवार्तेची परिपूर्ती केली.
प्रभूचा दिवस ७
२०. प्रश्न: तर मग जसे सर्व लोक आदामामध्ये नाश पावले तसेच ते ख्रिस्ताकडून तारले जातात का?
उत्तर- नाही. केवळ जे लोक खऱ्या विश्वासाने ख्रिस्तामध्ये कलमरूपे लावले गेले आहेत आणि जे त्याचे सर्व लाभ स्वीकारतात तेच तारले जातात. (मत्तय ७:१७ योहान १:१२; ३:१६, १८, ३६; रोम ११:१६-२१.)
२१. प्रश्न: खरा विश्वास म्हणजे काय?
उत्तर- देवाने त्याच्या वचनाद्वारे जे सर्व काही आपल्याला प्रकट केले ते सत्य आहे याचे खात्रीशीर ज्ञान म्हणजे खरा विश्वास. (१ योहान १७:३, १७; इब्री ११:१-३; याकोब २:१९) त्याच वेळी, केवळ इतरांनाच नव्हे तर मला देखील (गलती २:२०) पापांची क्षमा, सार्वकालिक नीतिमत्व, आणि तारण (रोम १:१७; इब्री १०:१०) देवाने केवळ त्याच्या कृपेने ख्रिस्ताने पूर्ण केलेल्या कार्याप्रित्यर्थ (रोम ३:२०-२६; गलती २:१६; इफिस २:८-१०.) बहाल केली आहेत हा पक्का भरवसा (रोम ४:१८-२१; ५:१; १०:१०; इब्री ४:१६) आणि सुवार्तेच्या द्वारे पवित्र आत्मा हा विश्वास माझ्या अंतःकरणात सक्रीय ठेवतो. (प्रेषित १६:१४; १०:१७; १ करिंथ १:२१)
२२. प्रश्न: मग, ख्रिस्ती व्यक्तीने कशावर विश्वास ठेवला पाहिजे?
उत्तर- सुवार्तेमध्ये ज्या सर्व गोष्टींबाबत अभिवचन दिले आहे, (मत्तय २८:१९; योहान २०:३०, ३१.), आणि आपल्या सर्वंकष निःसंशयपणे स्वीकारलेल्या विश्वास अंगीकार लेख आपल्याला सारांशरूपाने शिकवतात त्यावर विश्वास ठेवला पाहिजे.
I १. मी सर्वसमर्थ देव जो पिता स्वर्ग व पृथ्वीचा उत्पन्नकर्ता त्यावर विश्वास ठेवतो,
II २. त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्यावर मी विश्वास ठेवतो.
३. पवित्र आत्म्याद्वारे त्याची गर्भधारणा झाली, कुमारी मरीयेच्या कुशीत त्याने जन्म घेतला;
२३. प्रश्न: हे विश्वास अंगीकार लेख काय आहेत?
उत्तर- I १. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता, त्यावर मी विश्वास ठेवितो
II २. आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू,
३. जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मारिया हिजपासून जन्मला.
४. ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुख: भोगीले, ज्याला क्रुसी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले. जो अधोलोकात उतरला
५. तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन: उठला;
६. स्वर्गात चढला, आणि सर्वशक्तिमान देव जो पिता, त्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला आहे
७. तेथून जीवंताचा व मेलेल्यांचा न्याय करावयाला जो पुन्हायेणार आहे त्यावर मी विश्वास ठेवितो.
III ८. पवित्र आत्म्या:
९. पवित्र सार्वत्रिक ख्रिस्ती मंडळी, संतांची सहभागिता;
१०. पापांची क्षमा;
११. देहाचे पुनरुत्थान;
१२ आणि अनंतकालिक जीवन ह्यांवर मी विश्वास ठेवतो.
प्रभूचा दिवस ८
२४. प्रश्न: ह्या विश्वास अंगीकाराची विभागणी कशी करण्यात आली आहे?
उत्तर- तीन भागात:
पहिला भाग देव जो पिता आणि आपली उत्पत्ती ह्यांविषयी आहे;
दुसरा भाग देव जो पुत्र आणि आपली मुक्ती ह्यांविषयी आहे;
तिसरा भाग देव जो पवित्र आत्मा आणि आपले पवित्रीकरण ह्यांविषयी आहे.
२५. प्रश्न: देव केवळ एकच आहे असे असून देखील, पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्या तीन
व्यक्तींविषयी तुम्ही का बोलता?
उत्तर- कारण देवाने त्याच्या वचनात स्वतःला असे प्रकट केले आहे की ह्या तीन भिन्न
व्यक्ती ह्याच एक, सत्य, अनंतकालिक देव आहेत.
देव जो पिता आणि आपली उत्पत्ती
प्रभूचा दिवस ९
२६. प्रश्न: जेव्हा तुम्ही म्हणता,” सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता, त्यावर मी विश्वास ठेवितो”. तेव्हा तुम्ही कशावर विश्वास ठेवत असतां?
उत्तर- हा विश्वास की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा अनंतकालीन पिता, ज्याने शून्यातून आकाश आणि पृथ्वी आणि त्यांमध्ये जे आहे ते सर्व उत्पन्न केले, (उत्पत्ती १ आणि २; निर्गम २०:११; ईयोब ३८ आणि ३९; स्तोत्र ३३:६; यशया ४४:२४; प्रेषित ४:२४; १४:१५.) आणि त्याच्या सार्वकालिक योजनेप्रमाणे आणि दैवी पुरवठ्यानुसार(स्तोत्र १०४:२७-३०; मत्तय ६:३०; १०:२९; इफिस १:११.) जो अजूनही त्यांना शाबूत ठेवतो व सत्ता चालवत त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो, तो त्याचा पुत्र ख्रिस्त याच्या प्रित्यर्थ माझा देव आणि माझा पिता आहे. . (योहान १:१२, १३; रोम ८:१५, १६; गलती ४:४-७; इफिस १:५) मी त्याच्यावर एवढा पूर्णपणे विश्वास ठेवतो की तो माझे शरीर व जीवासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टीं मला पुरवील, (स्तोत्र ५५:२२; मत्तय ६:२५, २६; लूक १२:२२-३१.) आणि ज्या सर्व आपत्ती तो माझ्या ह्या दुःखाने भरलेल्या जीवनात पाठवतो त्यातून तो माझे भलेच करील (रोम ८:२८) ह्याविषयी मला यत्किंचितही शंका नाही. सर्वसमर्थ देव म्हणून तो असे करू शकतो,(उत्पत्ती १८:१४; रोम ८:३१-३९) आणि एक विश्वासू पिता ह्या नात्याने (मत्तय ६:३२, ३३; ७:९-११.) तो असे करण्यास सदैव सिद्ध देखील असतो.
प्रभूचा दिवस १०
२७. प्रश्न: ईश्वरी कृपा ह्या शब्दांतून तुम्हाला काय अर्थबोध होतो?
उत्तर- ईश्वरी कृपा म्हणजे देवाचे सर्वसमर्थ आणि निरंतर विद्यमान सामर्थ्य, (यिर्मया २३:२३, २४; प्रेषित १७:२४-२८.) ज्यामुळे, त्याच्या हाताच्या आधारानेच, तो अजूनही आकाश आणि पृथ्वी आणि सर्व प्राणिमात्रांना उचलून धरतो, (इब्री १:३.) आणि अशा रीतीने त्यांना नियंत्रित करून चालवतो की झाडाचे पान आणि गवताचे पाते, वृष्टी आणि अवर्षण, फलदायी आणि नापिकीची वर्षें, अन्न आणि पेय, स्वास्थ्य आणि आजार, धन दौलत आणि दारिद्र्य, (यिर्मया ५:२४; प्रेषित १४:१५-१७; योहान ९:३; नीती २२:२.) खरे म्हणजे सर्व गोष्टीं आपल्याला योगायोगाने लाभत नाहीत (नीती १६:३३.) पण त्याच्या पितृवत हस्ताद्वारे(मत्तय १०:२९.)आपल्या पर्यन्त येतात.
२८. प्रश्न: देवाने सर्व गोष्टीं उत्पन्न केल्या आहेत आणि तो अजूनही आपल्या दैवी पुरवठ्याने त्यांना शाबूत, सुस्थितीत राखतो हे जाणून आपल्याला काय लाभ होतो?
उत्तर- ( यामुळे ) संकटे, आपत्तींमध्ये आपण सबुरी, धीर राखू शकतो (ईयोब १:२१, २२; स्तोत्र ३९:१०; याकोब १:३.) सुबत्तेच्या काळात आपण देवाला कृतज्ञ असू शकतो, (अनुवाद ८:१०; १ थेस ५:१८.) आणि भावी काळाकडे दृष्टी टाकल्यास, आपण आपला विश्वासू देव व पिता ह्याच्या प्रीतीपासून आपल्याला कोणीही विभक्त करणार नाही असा ठाम आत्मविश्वास बाळगू शकतो. (स्तोत्र ५५:२२; रोम ५:३-५; ८:३८, ३९.) कारण सर्व प्राणिमात्र त्याच्या हातामध्ये इतके पूर्णपणे असतात की त्याच्या इच्छेशिवाय ते काही हालचाल देखील करू शकत नाहीत. (ईयोब १:१२; २:६; नीतिसूत्रे २१:१; प्रेषित १७:२४-२८.
देव जो पुत्र आणि आमची मुक्ती
प्रभूचा दिवस ११
२९. प्रश्न: देवाच्या पुत्राला येशू म्हणजे तारक का म्हणतात?
उत्तर- कारण तो आपल्याला आपल्या सर्व पापापासून तारतो,(मत्तय १:२१; इब्री ७:२५.) आणि दुसऱ्या कोणाकडूनही
तारणाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही किंवा तारण लाभू शकत नाही. (यशया ४३:११; योहान १५:४, ५; प्रेषित ४:११, १२; १ तिमथ्य २:५.)
३०. प्रश्न: जे लोक त्यांचे तारण किंवा सुखसमाधान संतगणांत, आपल्या स्वतःमध्ये किंवा दुसरीकडे कोठे तरी शोधतात, ते देखील एकमेव तारक येशूवर विश्वास ठेवतात का?
उत्तर- नाही. जरी ते येशूविषयी अभिमानाने बोलतात तरी प्रत्यक्षांत मात्र ते त्या एकमेव तारक येशूला नाकारतात. (१ करिंथ १:१२, १३; गलती ५:४.) कारण या दोनपैकी एक गोष्ट सत्य असलीच पाहिजे: एकतर येशू हा सर्वार्थाने पूर्ण तारक नाही, ही गोष्ट किंवा जे लोक खऱ्या विश्वासाने ह्या तारकाचा स्वीकार करतात त्यांना त्यांच्या तारणासाठी जे सर्व काही जरुरीचे आहे ते येशूमध्ये लाभलेच असले पाहिजे. (कलसे १:१९, २०; २:१०; १ योहान १:७)
प्रभूचा दिवस १२
३१. प्रश्न: त्याला ख्रिस्त, म्हणजे अभिषिक्त, का म्हटले जाते?
उत्तर- कारण आपला मुख्य संदेष्टा आणि शिक्षक, (अनुवाद १८:१५ (प्रेषित ३:२२). होण्यासाठी देव जो पिता त्याच्याद्वारे त्याला नेमण्यात आले आहे आणि आणि पवित्र आत्म्याद्वारे अभिषेक करण्यात आला आहे.(स्तोत्र ४५:७ (इब्री १:९); यशया ६१:१ (लूक ४:१८); लूक ३:२१, २२.) त्याने आम्हाला आमच्या मुक्तीबाबत ( योहान १:१८; १५:१५.) ३ देवाचा गुप्त हेतू व इच्छा पूर्णपणे प्रकट केली आहेत, आमच्या या एकमेव मुख्य याजकाने, (स्तोत्र ११०:४ (इब्री ७:१७). त्याच्या शरीराच्या एकाच यज्ञार्पणाने आम्हाला सोडवले आहे, (इब्री ९:१२;१०:११-१४.) आणि तो आमचा पिता व अनंतकालीन राजापुढे (जखऱ्या ९:९ (मत्तय २१:५); लूक १:३३.) आमची निरंतर मध्यस्थी करतो; (रोम ८:३४; इब्री ९:२४; १ योहान २:१.) व त्याचे वचन व आत्म्याद्वारे आमच्यासाठी मिळवलेल्या मुक्तीमधे. (मत्तय २८:१८-२०; योहान१०:२८; प्रकटी १२:१०,११) ८ आमचे रक्षण करतो आणि आम्हाला सांभाळतो.
३२. प्रश्न: तुम्हाला ख्रिस्ती का म्हणण्यात येते?
उत्तर- कारण मी विश्वासाने ख्रिस्ताचा अवयव आहे (१ करिंथ १२:१२-२७.)आणि अशा रीतीने त्याच्या अभिषिक्ततेचा भागीदार आहे, (योएल २:२८ (प्रेषित २:१७); १ योहान २:२७.) यासाठी की एक संदेष्टा म्हणून मी त्याचे नाव कबूल करावे, (मत्तय १०:३२; रोम १०:९,१०; इब्री १३:१५) एक याजक म्हणून मला स्वतःला एक कृतज्ञतापूर्ण जिवंत यज्ञ असे अर्पावे, (रोम १२:१; १ पेत्र २:५, ९.) आणि एक राजा म्हणून ह्या आयुष्यात एका मोकळ्या व निर्मळ मनाने पाप आणि सैतान ह्यांच्याविरुद्ध लढा द्यावा, (गलती ५:१६, १७; इफिस ६:११; १ तिमथ्य १:१८,१९.) आणि ह्यापश्चात त्याच्यासोबत सर्व प्राणिमात्रांवर अनंतकाळ राज्य करावे.(मत्तय २५:३४; २ तिमथ्य २:१२.)
प्रभूचा दिवस १३
३३. प्रश्न: आम्ही देखील देवाची मुलें आहोत तरी त्याला देवाचा एकुलता एक पुत्र का म्हणतात?
उत्तर- कारण एकटा ख्रिस्तच देवाचा अनंतकालीन (सनातन), नैसर्गिक पुत्र आहे. (योहान १:१-३,१४, १८; ३:१६;रोम ८:३२; इब्री १; १ योहान ४:९.) तथापि ख्रिस्ताप्रीत्यर्थ आपण कृपेने, दत्तकपणाद्वारे देवाची मुलें आहोत. (योहान १:१२; रोम ८:१४-१७; गलती ४:६; इफिस १:५, ६.)
३४. प्रश्न: तुम्ही त्याला आपला प्रभू का म्हणता?
उत्तर- कारण त्याने ( प्रभूने) , आमचे शरीर आणि प्राण मुक्त व्हावे (१ करिंथ ६:२०; १ तिमथ्य २:५, ६.), तसेच आमचे सर्व पाप क्षमा व्हावे यासाठी (ख्रिस्ताने), सोने रूपे देऊन नव्हे तर त्याच्या मोलवान रक्ताने(१ पेत्र १:१८, १९.) खंडणी भरून आमची सैतानाच्या सर्व सत्तेपासून सुटका केली आणि आम्हाला त्याच्या मालकीचे (कलसे १:१३, १४; इब्री २:१४, १५.) असे बनवले.
प्रभूचा दिवस १४
३५. प्रश्न: जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मारिया हिजपासून जन्मला असे जेव्हा तुम्ही म्हणता, तेव्हा तुम्ही काय कबूल करत असतां?
उत्तर- देवाचा अनंतकालीन पुत्र, जो खरा आणि अनंतकालीन देव आहे आणि राहणार, (योहान १:१; १०:३०-३६; रोम १:३, ९:५; कलसे १:१५-१७; १ योहान ५:२०.) त्याने पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे (लूक १:३५) कुमारी मरियेचा देह व रक्त यांमधून आपल्यास्वतःवर खरे मानवी स्वभावगुण धारण केले, (मत्तय १:१८-२३; योहान १:१४; गलती ४:४; इब्री २:१४.). ह्याप्रमाणे तो दाविदाचे खरे बीज देखील आहे, (२ शमू ७:१२-१६; स्तोत्र १३२:११; मत्तय १:१; लूक १:३२; रोम १:३.)तो प्रत्येक बाबतीत (फिलिप २:७; इब्री २:१७.) त्याच्या बंधुंसारखाच आहे तरी पापविरहित आहे (इब्री ४:१५; ७:२६, २७.).
३६. प्रश्न: ख्रिस्ताची पवित्र गर्भधारणा व जन्म ह्यांपासून तुम्हाला कोणता लाभ होतो?
उत्तर- तो आमचा मध्यस्थ आहे, (१ तिमथ्य २:५, ६; इब्री ९:१३-१५.) आणि तो त्याच्या निष्कलंक आणि परिपूर्ण पावित्र्याने, देवाच्या दृष्टीने ज्यांत माझी गर्भधारणा आणि जन्म झाला होता (रोम ८:३, ४; २ करिंथ ५:२१; गलती ४:४, ५; १ पेत्र १:१८,१९). त्या पापावर आच्छादन घालतो.
प्रभूचा दिवस १५
३७. प्रश्न: त्याने दुःख भोगले असे जेव्हा तुम्ही म्हणता, तेव्हा तुम्ही काय कबूल करता?
उत्तर- तो ह्या पृथ्वीवर राहात होता त्या सर्व काळात, पण विशेषेकरून शेवटी शेवटी, ख्रिस्ताने त्याच्या शरीरात व प्राणात, संपूर्ण मानव जातीच्या पापाविरुद्ध देवाचा क्रोध धारण केला.(यशया ५३; १ तिमथ्य २:६; १पेत्र २:२४; ३:१८.) ह्याप्रमाणे, एकमेव प्रायश्चित यज्ञार्पण असलेल्या त्याच्या दुःखसहनाने, (रोम ३:२५; १ करिंथ ५:७; इफिस ५:२; इब्री १०:१४; १योहान २:२; ४:१०.) त्याने आमचे शरीर व प्राण ह्यांना सार्वकालिक विनाशापासून, (रोम ८:१-४; गलती.३:१३; कलसे १:१३; इब्री ९:१२; १ पेत्र १:१८, १९.) सोडवले आहे आणि आम्हाला देवाची कृपा, नीतिमानता आणि अनंतकालीन जीवन मिळवून दिले. (योहान ३:१६; रोम ३:२४-२६; २ करिंथ ५:२१; इब्री ९:१५.)
३८. प्रश्न: पंतय पिलात न्यायाधीश असतांना त्याला दुःखसहन का भोगावे लागले?
उत्तर- निरपराध असूनही, ख्रिस्ताला एका जगीक न्यायाधिशाकडून शिक्षा ठोठावण्यात आली, (लूक २३:१३-२४; योहान १९:४, १२-१६). आणि ह्या द्वारे त्याने आम्हावर येणाऱ्या देवाच्या कठोर शिक्षेपासून आम्हाला मुक्त केले. (यशया ५३:४, ५; २ करिंथ ५:२१; गलती ३:१३.)
३९. प्रश्न: ख्रिस्ताला क्रुसावर खिळले आणि तो दुसऱ्या रीतीने मेला नाही ह्याला काही विशेष अर्थ
आहे का?
उत्तर- होय. त्यामुळेच माझी खात्री पटते की जो शाप माझ्यावर होता तो त्याने आपणा स्वतःवर
घेतला, कारण जो क्रुसावर खिळला जातो त्याला देवाने शाप दिलेला असतो. (अनुवाद २१:२३; गलती ३:१३.)
प्रभूचा दिवस १६
४०. प्रश्न: मरण आले तरी ख्रिस्ताने स्वतःला लीन करावे अशी गरज का होती?
उत्तर- देवाचा न्याय आणि सत्य ह्यांच्या कारणामुळे (उत्पत्ती २:१७.) आमच्या पापांच्या शिक्षेची भरपाई
देवाच्या पुत्राच्या मरणाऐवजी इतर कोणत्याही मार्गाने होऊ शकली नसती. (रोम ८:३; फिलिप. २:८; इब्री २:९, १४, १५.)
४१. प्रश्न: त्याला का पुरण्यात आले?
उत्तर- त्याच्या दफनाने तो खरोखरच मेला होता ह्या गोष्टीची पुष्टी केली. (यशया ५३:९; योहान १९:३८-४२; प्रेषित १३:२९; १ करिंथ १५:३, ४.)
४२. प्रश्न: ख्रिस्त आमच्यासाठी मेला असे आहे तरीही आम्हाला का मरावे लागते?
उत्तर- आमचे मरण म्हणजे आमच्या पापांची भरपाई नसते, पण त्यामुळे पाप थांबवले जाते आणि ते अनंतकालीन जीवनाचे प्रवेशद्वार बनते. ( योहान ५:२४; फिलिप १:२१-२३; १ थेस ५:९, १०.)
४३. प्रश्न: क्रुसावर ख्रिस्ताचे अर्पण आणि मरण ह्यांतून आपल्याला आणखी कोणते लाभ प्राप्त
होतात?
उत्तर- ख्रिस्ताच्या मरणाद्वारे, आपला जुना स्वभाव क्रुसावर खिळला जातो, त्याला ठार करण्यात येते, आणि त्याच्यासोबत पुरले (रोम ६:५-११; कलसे २:११, १२) जाते. यासाठी की आपल्यावर दैहिक वासनांनी सत्ता गाजवू नये,( रोम.६:१२-१४) पण आपण कृतज्ञतेचे एक यज्ञार्पण म्हणून स्वतःचे अर्पण करावे. (रोम १२:१; इफिस ५:१,२)
४४. प्रश्न: तो खाली उतरून नरकात गेला असे का लिहिले आहे?
उत्तर- माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या दुःखसहनात विशेषेकरून क्रुसावर असताना भोगलेली शब्दातीत मनोवेदना, यातना, दहशत आणि क्लेश (स्तोत्र १८:५,६; ११६:३; मत्तय २६:३६-४६ ; २७:४५, ४६; इब्री ५:७-१०.) यांच्याद्वारे नरकाच्या वेदना आणि छळ ह्यांपासून मला सोडवले आहे हा भरवसा आणि दिलासा मला माझ्या आत्यंतिक दुःखात व कसोट्यांत मिळावा ह्यासाठी (तो खाली उतरून नरकात गेला असे का लिहिले आहे) (यशया ५३)
प्रभूचा दिवस १७
४५. प्रश्न: ख्रिस्ताच्या पुनरुत्थानापासून आपल्याला कोणते लाभ प्राप्त होतात?
उत्तर- पहिला लाभ, त्याच्या पुनरुत्थानाद्वारे त्याने मरणावर मात केली आहे, यासाठी की त्याच्या मरणाने (रोम ४:२५; १ करिंथ १५:१६-२०; १ पेत्र १:३-५.)त्याने आपल्यासाठी जी नीतिमानता मिळवली होती तिच्यात आपण सहभागी व्हावे,
दुसरा लाभ, त्याच्या सामर्थ्याने आपण देखील जीवंत होवून एका नवीन जीवनात प्रविष्ट होणार
आहोत (रोम ६:५-११; इफिस २:४-६; कलसे ३:१-४.)
तिसरा लाभ, ख्रिस्ताचे पुनरुत्थान आपल्या गौरवी पुनरुत्थानाबाबत एक खात्रीशीर
आश्वासन आहे.(रोम ८:११; १ करिंथ १५:१२-२३; फिलिपै ३:२०, २१.)
प्रभूचा दिवस १८
४६. प्रश्न: तो वर स्वर्गात गेला असे तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा तुम्ही कशाची कबुली देता?
उत्तर- अशी कबुली की ख्रिस्त, त्याच्या शिष्यांच्या देखत, पृथ्वीवरून स्वर्गात घेतला गेला, (मार्क १६:१९; लूक २४:५०, ५१; प्रेषित १:९-११) तो तेथे आमच्या चांगल्यासाठीच आहे (रोम ८:३४; इब्री ४:१४; ७:२३-२५; ९:२४.) आणि जिवंत व मेलेल्यांच्या न्यायनिवाड्यासाठी तो पुन्हा परत येईपर्यंत तो तेथे स्वर्गात आहे. (मत्तय २४:३०; प्रेषित १:११.)
४७. प्रश्न: तर मग, ख्रिस्ताने वचन दिल्यानुसार तो जगाच्या अंतापर्यंत आपल्यासोबत नाही का? (मत्तय २८:३०.)
उत्तर- ख्रिस्त खरा मनुष्य आणि खरा देव आहे. त्याच्या मानवी स्वभावांतर्गत तो यापुढे पृथ्वीवर नाही,(मत्तय २६:११; योहान १६:२८; १७:११; प्रेषित ३:१९-२१; इब्री ८:४.) परंतु त्याचे देवत्व, वैभव, कृपा आणि आत्मा ह्यानुसार तो आपल्यापासून कधीही दूर असा नाही. (मत्तय २८:१८-२०; योहान १४:१६-१९; १६:१३.)
४८. प्रश्न: पण जर ख्रिस्ताचा मानवी स्वभाव जेथे कोठे त्याचे देवत्व उपस्थित आहे तेथे नसेल तर मग ख्रिस्ताचे हे दोन स्वभाव एकमेकांपासून अलग असे नाहीत का?
उत्तर- मुळीच नाही, कारण त्याच्या देवत्वाला कोणत्याही मर्यादा नाहीत आणि ते सर्वत्र उपस्थित आहे. (यिर्मया २३:२३, २४; प्रेषित ७:४८, ४९.) म्हणून त्याचे देवत्व हे खरेच त्याने अंगिकारलेल्या मानवी स्वभावाच्या आवाक्याबाहेर असले तरी ते ह्या मानवी स्वभावांतर्गत असून ते त्याच्याशी व्यक्तिगत रीतीने संयुक्त झालेले असे आहे (योहान १:१४; ३:१३; कलसे २:९.) हे ओघाने येतेच.
४९. प्रश्न: ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाने आपल्याला काय लाभ होतो?
उत्तर- पहिला लाभ, तो त्याच्या पित्यासमोर आपला वकील आहे. (रोम ८:३४; १ योहान २:१.)
दुसरा लाभ, ख्रिस्त आपले मस्तक आणि आपण त्याचे अवयव असल्यामुळे तो आपल्याला त्याच्याशी जोडून घेईल ह्याची एक खात्रीशीर हमी म्हणून आपला देह स्वर्गात आहे (योहान १४:२; १७:२४; इफिस २:४-६.).
तिसरा लाभ, तो त्याचा आत्मा एक विसार (प्रति हमी) म्हणून आपल्याला देतो, (योहान १४:१६; प्रेषित २:३३; २ करिंथ १:२१, २२; ५:५.) आणि त्याच्या सामर्थ्याने पृथ्वीवर असलेल्या गोष्टीं नव्हे तर जेथे ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताला बसला आहे तेथील वरील गोष्टीं आपण शोधतो. (कलसे ३:१-४)
प्रभूचा दिवस १९
५०. प्रश्न: आणि देवाच्या उजव्या हाताला बसतो हे विधान का घातले आहे?
उत्तर- ज्याद्वारे पिता सर्व गोष्टीं नियंत्रित करतो (मत्तय २८:१८; योहान ५:२२, २३.) त्या त्याच्या चर्चचे मस्तक असे स्वतःला तेथे प्रकट करण्यासाठी ख्रिस्त स्वर्गात गेला, (इफिस १:२०-२३; कलसे १:१८.)
५१. प्रश्न: आपले मस्तक जो ख्रिस्त याच्या गौरवाने आपल्याला कोणता लाभ होतो?
उत्तर- पहिला लाभ, त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे तो आपण, त्याचे अवयव, यांच्यावर स्वर्गीय दानांची ओतणी करतो. (प्रेषित २:३३; इफिस ४:७-१२.) दुसरा लाभ, त्याच्या सामर्थ्याने तो सर्व शत्रूंपासून आपले रक्षण करतो, सांभाळतो. (स्तोत्र २:९; ११०:१, २; योहान १०:२७-३०; प्रकटी १९:११-१६.)
५२. प्रश्न: ख्रिस्त जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायनिवाडा करण्यासाठी येणार आहे ह्यातून तुम्हाला
काय दिलासा आहे?
उत्तर- माझ्या सर्व दुःखात व छळांत मी माझे मस्तक वर करतो आणि ज्या एकाच व्यक्तीने आधीच माझ्याकरिता स्वतःला देवाच्या न्यायाच्या अधीन केले आणि माझ्यावरील सर्व शाप काढून टाकला त्या स्वर्गातून येणाऱ्या न्यायाधीशाची उत्कंठेने वाट पाहतो. (लूक २१:२८; रोम ८:२२-२५; फिलिपै ३:२०,२१; तीत २:१३, १४.) तो त्याच्या आणि माझ्या सर्व शत्रूंना सार्वकालिक नरकात फेकून टाकील, पण तो मला आणि त्याच्या सर्व निवडलेल्यांना त्याच्या स्वतःकडे स्वर्गीय आनंद व गौरवात घेऊन जाईल. (मत्तय २५:३१-४६; १ थेस ४:१६, १७; २ थेस १:६-१०.)
देव जो पवित्र आत्मा आणि आमचे पवित्रीकरण
प्रभूचा दिवस २०
५३. प्रश्न: पवित्र आत्म्याबाबत तुमच्या विश्वास काय आहे?
उत्तर- पहिला मुद्दा, तो, पिता आणि पुत्र यांच्यासमवेत, खरा आणि अनंतकालिक देव आहे. (उत्पत्ती १:१, २; मत्तय २८:१९; प्रेषित ५:३, ४; १ करिंथ ३:१६.) दुसरा मुद्दा, खऱ्या विश्वासाने ख्रिस्त आणि त्याचे सर्व लाभ, (गलती ३:१४;१ पेत्र १:२.) यात सहभागी होण्यासाठी, मला दिलासा (योहान १५:२६; प्रेषित ९:३१.) देण्यासाठी आणि माझ्यासोबत सर्वकाळ राहण्यासाठी (योहान १४:१६, १७; १ पेत्र ४:१४.) तो (पवित्र आत्मा) मला देखील देण्यात आला आहे, (१ करिंथ ६:१९;२ करिंथ १:२१, २२; गलती ४:६; इफिस १:१३.)
प्रभूचा दिवस २१
५४. प्रश्न: सार्वत्रिक (कॅथॉलिक) पवित्र ख्रिस्ती मंडळीबाबत तुमचा विश्वास काय आहे?
उत्तर- जगाच्या सुरुवातीपासून ते त्याच्या अंतापर्यंत, (यशया ५९:२१; १ करिंथ ११:२६.) सर्व मानवजातीपैकी, (उत्पत्ती २६:४; प्रकटी ५:९.) देवाचा पुत्र (योहान १०:११; प्रेषित २०:२८; इफिस ४:११-१३; कलसे १:१८.) खऱ्या विश्वासाच्या (प्रेषित २:४२-४७; इफिस ४:१-६.) ऐक्यामध्ये त्याच्या आत्म्याने आणि वचनाने रोम १:१६; १०:१४-१७; इफिस ५:२६) सार्वकालिक जीवनाकरिता (रोम ८:२९; इफिस १:३-१४.) निवडलेले एक चर्च (मंडळी) गोळा करतो, त्याचे रक्षण करतो आणि आपणास्वतःसाठी त्याची जोपासना करतो (स्तोत्र १२९:१-५; मत्तय १६:१८; योहान १०:२८-३०.) आणि मी त्या चर्चचा सभासद आहे (१ योहान ३:१४; १९-२१.) आणि सर्वदा राहणार आहे असा माझा विश्वास आहे. (स्तोत्र २३:६; योहान १०:२७-२८; १ करिंथ १:४-९; १ पेत्र १:३-५.)
५५. प्रश्न: संतगणाची सहभागिता ह्यापासून तुम्हाला काय अर्थबोध होतो?
उत्तर- एक. हे की विश्वासणारे सर्व आणि प्रत्येक जण, ख्रिस्ताचे अवयव या नात्याने त्याच्याशी सहभागिता राखतात आणि त्याचे सर्व बहुमूल्य ठेवे आणि दानांमध्ये सहभागी असतात. (१ रोम ८:३२; १ करिंथ ६:१७; १२:४-७, १२, १३; १ योहान १:३.) दोन. इतर सभासदांस लाभ आणि निकोप वाढ ह्यांसाठी, प्रत्येक जण आपली दानें तत्परतेने आणि प्रसन्नपणे वापरण्याकरिता कर्तव्यबध्द आहे. (रोम १२:४-८; १ करिंथ १२:२०-२७; १३१-७; फिलिप २:४-८.)
५६. प्रश्न: पापांच्या क्षमेबाबत तुमचा विश्वास काय आहे?
उत्तर- मी हा विश्वास धरतो की ख्रिस्ताने पापक्षमेबाबत देवाचे समाधान केले ह्या कारणाने, देव यापुढे माझी पापे(स्तोत्र १०३:३,४,१०,१२; मिखा ७:१८,१९; २करिंथ ५:१८-२१; १योहान १:७; २:२.) आणि आयुष्यभर ज्याविरुद्ध मला झगडावे लागते (रोम ७:२१-२५)तो माझा पापी स्वभावही आठवणार नाही तर तो कृपाळूपणे ख्रिस्ताचे नीतिमत्व मला बहाल करील यासाठी की मला कधीही दंडाज्ञा होऊ नये. (योहान ३:१७, १८; ५:२४; रोम ८:१,२.)
प्रभूचा दिवस २२
५७. प्रश्न: शरीराचे पुनरुत्थान तुम्हाला कोणता दिलासा देते?
उत्तर- हे आयुष्य संपल्यावर माझा प्राण ताबडतोब माझे मस्तक (लूक १६:२२; २३:४३; फिल १:२१-२३.) जो ख्रिस्त त्याकडे नेण्यात येईल एवढेच नव्हे तर ख्रिस्ताच्या सामर्थ्याने उठवलेल्या माझ्या ह्या शरीराचे माझ्या प्राणाशी पुनर्मीलन होईल आणि ते ख्रिस्ताच्या गौरवी शरीरासारखे होईल. (ईयोब १९:२५, २६; १ करिंथ १५:२०, ४२-४६, ५४; फिलपै ३:२१; १ योहान ३:२)
५८. प्रश्न: सार्वकालिक जीवनावरील लिखानाद्वारे तुम्हाला कोणता दिलासा मिळतो?
उत्तर –ज्याअर्थी मला आधीच सार्वकालिक आनंदाचा (योहान १७:३; रोम १४:१७; २ करिंथ ५:२, ३.) अनुभव माझ्या हृदयात होणे सुरु झाले आहे, त्याअर्थी हे आयुष्य संपल्यानंतर कोणत्याही नेत्राने कधी पाहिले नाही, कोणत्याही कानाने कधी ऐकले नाही आणि मनुष्याच्या मनाने कधी कल्पना केली नसेल अशा कृपाप्रसादाने मी आशीर्वादित होईन आणि देवाची स्तुती सदा सर्वकाळ करीन (योहान १७:२४; २ करिंथ २:९.) ही माझी खात्री आहे.
आपले न्यायीकरण
प्रभूचा दिवस २३
५९. प्रश्न: तुम्ही आता ह्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवता आहात तर त्याचा तुम्हाला आत्ता काय फायदा होतो?
उत्तर- ख्रिस्तामध्ये मी देवापुढे नीतिमान आणि सार्वकालिक जीवनाचा वारस आहे
(हबकूक २:४; योहान ३:३६; रोम १:१७; ५:१, २)
६०. प्रश्न: तुम्ही देवासमोर नीतिमान कसे ठरता?
उत्तर- येशू ख्रिस्तावर खरा विश्वास ठेवण्यानेच.१ जरी माझी सद्सद्विवेकबुद्धी असा दोष लावते की (रोम ३:२१-२८; गलती २:१६; इफिस २:८, ९; फिलिपै ३:८-११.) मी देवाच्या सर्व आज्ञांविरुद्ध घोर पापे केली आहेत, त्यांपैकी कोणतीही आज्ञा कधीही पाळली नाही, (रोम ३:९, १०.) आणि अजूनही दुष्टपणा करण्याकडे माझा कल आहे, (रोम ७:२३) तरी, माझेकडे काहीही चांगले गुण नसतांना देखील (अनुवाद ९:६; यहेज ३६:२२; तीत ३:४, ५.) केवळ कृपा वर्षावाने (रोम ३:२४; इफिस २:८.) ख्रिस्ताने केलेले परिपूर्ण समाधान, त्याची नीतिमत्ता आणि पावित्र्य(रोम ४:३-५; २ करिंथ ५:१७-१९; १ योहान २:१, २) देव मला प्रदान करतो. (योहान ३:१८; प्रेषित १६:३०, ३१; रोम ३:२२.) ही त्याची देणगी खऱ्या विश्वासणाऱ्या अंतःकरणाने जर मी केवळ स्वीकारतो तर, जणू काही माझ्यामध्ये कधीही पाप नव्हते किंवा मी कधी पाप केलेच नाही आणि जणू काही ख्रिस्ताने माझ्यासाठी केलेले सर्व आज्ञापालन (रोम ४:२४, २५; २ करिंथ ५:२१.) ७ मी स्वतःच केले आहे अशासारखे तो मला ह्या गोष्टी बहाल करतो.
६१. प्रश्न: तुम्ही केवळ विश्वासाद्वारे नीतिमान आहात असे तुम्ही का म्हणता?
उत्तर- माझ्या विश्वासाच्या योग्यतेमुळे मी देवाला स्वीकारार्ह आहे असे मुळीच नाही, कारण केवळ ख्रिस्ताने केलेले देवाचे समाधान, त्याची नीतिमत्ता आणि पावित्र्य ह्याच गोष्टीं देवापुढे माझे नीतिमत्व होतात. (१ करिंथ १:३०,३१; २:२.). केवळ विश्वासानेच मी त्याचे नीतिमत्व माझे म्हणून आत्मसात करू शकतो. (रोम १०:१०; १ योहान ५:१०-१२.)
प्रभूचा दिवस २४
६२. प्रश्न: पण आपली सत्कृत्यें किंवा किमान त्यांचा काही भाग, देवासमोर आपले नीतिमत्व का होऊ शकत नाहीत?
उत्तर- कारण देवाच्या न्यायापुढे उभे ठाकू शकणारे नीतिमत्व संपूर्णतः परिपूर्ण आणि देवाच्या नियमांशी पूर्णपणे जुळलेले असे असलेच पाहिजे. (अनुवाद २७:२६; गलती ३:१०.), याउलट, या आयुष्यातील आपली सर्वोत्कृष्ट कृत्यें देखील सारी अपरिपूर्ण आणि पापाने बरबटलेली असतात. (यशया ६४:६.)
६३. प्रश्न: पण जरी देव आपल्या चांगल्या कृत्यांसाठी ह्या जीवनात आणि पुढील जीवनात बक्षीस देण्याचे वचन देतो, तरी ती कृत्यें काही न मिळवता व्यर्थच जातात का? (मत्तय ५:१२; इब्री ११:६.)
उत्तर- हे सत्कृत्ये करून मिळवलेले बक्षीस नसते. हे कृपेने दिलेले एक दान आहे. (लूक १७:१०; २ तिमथ्य ४:७, ८.)
६४. प्रश्न: ह्या शिकवणुकीने लोक बेफिकीर आणि दुष्ट बनत नाहीत का?
उत्तर- नाही. खऱ्या विश्वासाने जे लोक ख्रिस्तामध्ये कलम केले गेले आहेत ते कृतज्ञतेची फळे देणार नाही हे अशक्य आहे. (मत्तय ७:१८; लूक ६:४३; योहान ५:१५.)
देववचन आणि विधी संस्कार
प्रभूचा दिवस २५
६५. प्रश्न: तर मग, जर केवळ विश्वासामुळेच आपण ख्रिस्त व त्याच्या सर्व लाभांचे भागीदार होतो,
तर हा विश्वास कोठून येतो?
उत्तर- जो सुवार्तेच्या (रोम १०:१७; १पेत्र १:२३-२५.) घोषणेने आपल्या अंतःकरणात विश्वास घडवून कार्यान्वित करतो आणि विधी संस्कारांच्या आचरणाने (मत्तय २८:१९,२०; १ करिंथ १०:१६.) त्याला पुष्टी देतो त्या पवित्र आत्म्यापासून (योहान ३:५; १ करिंथ २:१०-१४; इफिस २:८; फिलपै १:२९.) हा विश्वास येतो.
६६. प्रश्न: विधी संस्कार काय आहेत?
उत्तर- विधी पवित्र, दृश्यमान आणि मोहोरबंद करणारे शिक्के आहेत. ते देवाने स्थापन केलेले आहेत यासाठी की सुवार्तेचे अभिवचन आपल्याला अधिक पूर्णपणे घोषित केले जावे आणि त्यावर शिक्का मोर्तब केले जावे. (उत्पत्ती १७:११; अनुवाद ३०:६; रोम ४:११.) आणि ते अभिवचन हे आहे : की ख्रिस्ताने क्रुसावर केलेल्या त्याच्या एकमेव अर्पणामुळे, देव कृपाळूपणे आपल्याला पापांची क्षमा करून आपल्याला सार्वकालिक जीवन बहाल करतो. (मत्तय २६:२७, २८; प्रेषित २:३८; इब्री १०:१०.)
६७. प्रश्न: मग आपल्या तारणाचा एकमेव आधार म्हणून येशू ख्रिस्ताने क्रुसावर केलेल्या समर्पणावर आपण आपला विश्वास केंद्रीभूत करावा हा देवाचे वचन आणि विधी संस्कार ह्यांचा उद्द आहे का?
उत्तर- अगदी खरोखर, होय. सुवार्तासंदेशामध्ये पवित्र आत्मा आपल्याला शिकवतो आणि विधिसंस्कारांद्वारे आपल्याला हमी देतो की आपले संपूर्ण तारण ख्रिस्ताने आपल्यासाठी क्रुसावर केलेल्या एकमेव अर्पणावर उभारलेले आहे. (रोम ६:३; १ करिंथ ११:२६; गलती ३:२७.)
६८. प्रश्न: नव्या करारात ख्रिस्ताने किती विधी संस्कार स्थापले आहेत?
उत्तर- दोन. पवित्र बाप्तिस्मा आणि पवित्र भोजन. (मत्तय २८:१९, २०;१ करिंथ ११:२३-२६.)
पवित्र बाप्तिस्मा
प्रभूचा दिवस २६
६९. प्रश्न: क्रुसावर ख्रिस्ताच्या एका अर्पणाने तुमचा लाभ होतो हे पवित्र बाप्तिस्मा तुम्हाला कसे दर्शवतो आणि शिक्कामोर्तब करतो?
उत्तर- ह्या रीतीने: हा बाह्यतकारी रीतीने धुतले जाण्याचा हा विधी ख्रिस्ताने लावून दिल (मत्तय २८:१९.) आणि त्यासोबत हे अभिवचन दिले की, जशी शरीरावरची घाण पाण्याने हमखास स्वच्छ धुतली जाते तेवढ्याच खात्रीशीरपणे, त्याचे रक्त आणि त्याचा आत्मा माझ्या आत्म्याची अशुद्धता म्हणजे माझी सर्व पापे, धुवून काढील. (मत्तय ३:११; मार्क १६:१६; योहान १:३३; प्रेषित २:३८; रोम ६:३, ४; १ पेत्र ३:२१.)
७०. प्रश्न: ख्रिस्ताच्या रक्ताने आणि आत्म्याने धुतले जाणे ह्याचा अर्थ काय आहे?
उत्तर- ख्रिस्ताच्या रक्ताने धुतले जाणे म्हणजे ख्रिस्ताने क्रुसावर आपल्यासाठी दिलेल्या अर्पणात जे रक्त सांडिले त्या कारणाने, कृपेद्वारे देवापासून पापांची क्षमा पावणे. (यहेज.३६:२५; जखऱ्या १३:१; इफिस १:७; इब्री १२:२४; १ पेत्र १:२; प्रकटी १:५; ७:१४.) त्याच्या आत्म्याने धुतले जाणे म्हणजे पवित्र आत्म्याद्वारे आपले नूतनीकरण होणे आणि ख्रिस्ताचे अवयव होण्यासाठी पवित्रीकरण होणे यासाठी की अधिकाधिक प्रमाणात आपण पापसंबंधात मृत व्हावे आणि एक पवित्र आणि निर्दोष जीवन जगावे. (योहान ३:५-८; रोम ६:४; १करिंथ ६:११; कलसे २:११,१२.)
७१. प्रश्न: आपण बाप्तिस्म्याच्या पाण्याने जसे धुतले जातो तितक्याच निश्चितपणे आपल्या रक्ताने आणि आत्म्याने ख्रिस्त आपल्याला धुवून काढील असे अभिवचन त्याने कोठे दिले आहे?
उत्तर- बाप्तिस्म्याचा विधीच्या स्थापनेत, जेथे तो म्हणतो : तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; (मत्तय २८:१९). जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल; जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. (मार्क १६:१६). जेथे पवित्र शास्त्र बाप्तिस्म्याला नव्या जन्माचे स्नान आणि पातकांचे क्षालन असे संबोधते तेथे हे वचन पुन्हा दिले गेले आहे. (तीत ३:५; प्रेषित २२:१६).
प्रभूचा दिवस २७
७२. प्रश्न: हे बाहेरून पाण्याने धुणेच पापे धुवून काढते का?
उत्तर- नाही, केवळ येशू ख्रिस्ताचे रक्त आणि पवित्र आत्मा आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतात. (मत्तय ३:११; १ पेत्र ३:२१; १ योहान १:७)
७३. प्रश्न: मग पवित्र आत्मा बाप्तिस्म्याला नव्याजन्माचे स्नान आणि पातकाचे क्षालन असे का म्हणतो?
उत्तर- अशा रीतीने बोलण्यासाठी देवाजवळ एक चांगले कारण आहे. जसे पाणी आपल्या शरीराची घाण काढून टाकते अगदी तसेच ख्रिस्ताचे रक्त आणि त्मा आपली पापे काढून टाकतात. (१ करिंथ ६:११; प्रकटी १:५, ७:१४.) पण ह्याहून अधिक महत्वाचे असे की ही ईश्वरी प्रतिज्ञा आणि चिन्ह यांद्वारे तो आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो की आपण जसे पाण्याने शारीरिक दृष्टीने धुतले जातो त्याच रीतीने आपण खरोखर आपल्या पापांपासून आत्मिक रीतीने शुद्ध केले जातो. (मार्क १६:१६, प्रेषित २:३८, रोम ६:३, ४, गलती ३:२७)
७४. प्रश्न: तान्ह्या बालकांचा देखील बाप्तिस्मा केला पाहिजे का?
उत्तर – होय. लहान मुले तसेच प्रौढ हे देवाच्या कराराचे आणि मंडळीचे आहेत. (उत्पत्ति १७:७; मत्त १९:१४) ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे पापापासून मुक्ती आणि पवित्र आत्म्या, जो विश्वासाने कार्य करतो, प्रौढांपेक्षा बालकांना कमी प्रमाणात वचन दिले आहे असे नाही. ( स्त्रोत २२:१०; यशया ४४:१-३; प्रेषितांची कृत्ये २:३८, ३९; १६:३१.) म्हणून, बाप्तिस्म्याद्वारे, चिन्ह म्हणून करारानुसार, ते ख्रिस्ती मंडळीमध्ये समाविष्ट केले पाहिजेत आणि अविश्वासूंच्या मुलांपासून हे वेगळे आहेत असे दिसले पाहिजे. (प्रेषितांची कृत्ये १०:४७; १ करिंथ ७:१४.) हे जुन्या करारात सुंता करून केले गेले होते, (उत्पत्ति १७:९-१४.) त्याऐवजी नवीन करारात बाप्तिस्मा सुरू करण्यात आला होता. ( कलसे २:११-१३)
प्रभूचे भोजन
प्रभूचा दिवस २८
७५. प्रश्न: क्रुसावर ख्रिस्ताने केलेल्या एका अर्पणात आणि त्याच्या सर्व दानांमध्ये तुम्ही वाटेकरी आहात हे प्रभूचे भोजन कसे दर्शवते आणि शिक्कामोर्तब करते?
उत्तर- ह्या रीतीने: ख्रिस्ताने मी त्याच्या स्मरणार्थ ह्या मोडलेल्या भाकरीतून खावे आणि ह्या पेल्यातून प्यावे अशी मला आणि सर्व विश्वासणाऱ्यांना आज्ञा दिली आहे. ह्या आज्ञेसोबत त्याने ही अभिवचनें दिली: (मत्तय २६:२६-२८; मार्क १४:२२-२४; लूक २२:१९, २०; १ करिंथ ११:२३-२५.)
पहिले,
जसे मी माझ्या डोळ्यांनी निःशंकपणे प्रभूची भाकर माझ्यासाठी मोडलेली पाहातो आणि
तो पेला मला दिलेला पाहातो, तेवढ्याच खात्रीलायकपणे त्याचे शरीर माझ्यासाठी देण्यात
आले होते आणि क्रुसावर त्याचे रक्त माझ्यासाठी ओतण्यात आले होते.
दुसरे,
जितक्या निश्चितपणे मी पास्टरच्या हातून ख्रिस्ताचे शरीर व रक्ताचे निश्चित
प्रतीक म्हणून ती भाकर व प्रभूचा पेला घेऊन माझ्या मुखाने ती चाखतो, तितक्याच
निश्चितपणे तो स्वतः त्याचे क्रुसावर खिळलेले शरीर व ओतलेल्या रक्ताने सार्वकालिक
जीवनासाठी माझ्या प्राणाचे पोषण करतो आणि ताजेतवाने करतो
७६. प्रश्न: ख्रिस्ताचे क्रुसावर खिळलेले शरीर खाणे आणि त्याने ओतलेले रक्त पिणे ह्याचा अर्थ काय आहे?
उत्तर-पहिला, (अर्थ)
विश्वास ठेवत असलेल्या अंतःकरणाने ख्रिस्ताचे सर्व दुःखसहन आणि त्याचे मरण स्वीकारणे आणि त्यातून पापांची क्षमा आणि अनंतकालीन जीवन प्राप्त करणे. (योहान ६:३५, ४०, ५०-५४.)
दुसरा,
जो ख्रिस्त आणि आपण ह्या दोहोंमध्ये वस्ती करतो त्या पवित्र आत्म्याद्वारे ख्रिस्ताच्या पवित्र शरीराशी अधिकाधिक संयुक्त होणे (योहान ६:५५, ५६; १ करिंथ १२:१३.) म्हणून जरी ख्रिस्त स्वर्गात आहे (प्रेषित १:९-११; ३:२१; १ करिंथ ११:२६; कलसे ३:१.) आणि आपण पृथ्वीवर आहोत तरी आपण त्याच्या मांसाचे मांस आणि त्याच्या हाडांचे हाड आहोत, (१ करिंथ ६:१५, १७; इफिस ५:२९, ३०; १ योहान ४:१३.)आणि जसे आपल्या शरीराचे अवयव एका प्राणाने चालवले जातात तसेच आपण सदा सर्वकाळ एका पवित्र आत्म्याने चालवले जातो (योहान ६:५६-५८; १५:१-६; इफिस ४:१५, १६; १ योहान ३:२४.)
७७ . प्रश्न: ख्रिस्ताने हे अभिवचन कोठे दिलेले आहे की ते जसे निश्चितपणे ह्या मोडलेल्या भाकरीचे सेवन करतात आणि ह्या पेल्यातून पितात, त्याच निश्चितपणाने तो त्याचे शरीर आणि रक्ताने विश्वासणाऱ्यांचे पोषण करील आणि त्यांना ताजेतवाने ठेवील?
उत्तर- प्रभू भोजनाच्या विधीच्या स्थापनेद्वारे : ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली; आभार मानून ती मोडली, आणि म्हटले, १ हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा.
त्याच रीतीने भोजन झालयावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा.
कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता.(१ करिंथ ११:२३-२६).
पौल जेव्हा हे म्हणतो तेव्हा हे अभिवचन पुन्हा देण्यात आले आहे : जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? आपण पुष्कळ जण असून एक भाकर, एक शरीर असे आहोत, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत. (१करिंथ १०:१६, १७).
प्रभूचा दिवस २९
७८ . प्रश्न: मग ती भाकर आणि द्राक्षरस ख्रिस्ताच्या खऱ्याखुऱ्या शरीरात आणि रक्तात परिवर्तित होतात का?
उत्तर- नाही. जसे बाप्तिस्म्याचे पाणी ख्रिस्ताच्या रक्तात परिवर्तित होत नाही आणि ती पाप क्षालनाची कृती बनत नाही, तरी पण ती देवाने दिलेले केवळ एक चिन्ह आणि एक प्रतिज्ञा (इफिस ५;२६; तीत ३:५.) अशी आहे, त्याप्रमाणेच प्रभूच्या भोजनातील भाकर, जरी तिला विधिसंस्कारांचा गुणस्वभाव व वहिवाट शाबूत (उत्पत्ती १७:१०, ११; निर्गम १२:११, १३; १ करिंथ १०:३, ४; १ पेत्र ३:२१.) ख्रिस्ताचे शरीर असे (१ करिंथ १०:१६, १७: ११:२६-२८.) म्हटले जाते तरी राखण्यासाठी, ख्रिस्ताचे शरीर (मत्तय २६:२६-२९) बनत नाही
७९ . प्रश्न: मग ख्रिस्त त्या भाकरीला त्याचे शरीर आणि त्या पेल्याला त्याचे रक्त किंवा त्याच्या रक्तात नवा करार का म्हणतो, आणि पौल ख्रिस्ताचे शरीर व रक्त यांत भागीदारीविषयी का बोलतो?
उत्तर- अशा रीतीने बोलण्यासाठी ख्रिस्ताकडे एक चांगले कारण आहे: त्याच्या भोजनाद्वारे तो आपल्याला हे शिकवू इच्छितो की जसे भाकर व द्राक्षरस ह्या ऐहिक जीवनात आपल्याला जगवते, तसेच त्याचे क्रुसावर खिळलेले शरीर आणि सांडलेले रक्त आपल्या आत्म्याच्या सार्वकालिक जीवनाकरिता (योहान ६:५१,५५.) खरे अन्न आणि पेय आहेत. पण, ह्या दृश्य चिन्ह आणि प्रतिज्ञांतून ह्याहुनही अधिक महत्वाचे असे हे आश्वासन तो आपल्याला देऊ इच्छितो, प्रथम, की पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे आपण त्याचे खरे शरीर आणि रक्त यांमध्ये भाग घेतो आणि ते आपण आपल्या मुखाने त्याच्या स्मरणार्थ (१ करिंथ १०:१६, १७;११:२६.) ही पवित्र चिन्हे ग्रहण करण्याइतकेच निश्चित आणि अस्सल, खात्रीशीर आहे. आणि दुसरे, हे की त्याचे सर्व दुःखसहन आणि आज्ञापालन जणू काही आपणच व्यक्तिगत रीतीने ती भोगली होती आणि आपल्या पापांची किंमत भरली होती (रोम ६:५-११.) अशासारखी ती आपलीच आहेत.
प्रभूचा दिवस ३०
८०. प्रश्न: प्रभूचे भोजन आणि पोपचा मास (कॅथॉलिक यूखरिस्ट विधी) ह्यांत काय फरक आहे?
उत्तर- प्रभूचे भोजन आपल्याला निक्षून सांगते, सर्वप्रथम, की येशू ख्रिस्ताने क्रुसावर सर्व काळासाठी एकदाच स्वतःचे जे अर्पण केले त्याद्वारे आम्हाला आमच्या सर्व पापांची क्षमा मिळाली आहे; (मत्तय २६:२८; योहान १९:३०; इब्री ७:२७; ९:१२, २५, २६; १०:१०-१८.), आणि दुसरे, पवित्र आत्म्याद्वारे जो त्याच्या खऱ्या शरीरासह आता स्वर्गात पित्याच्या (योहान २०:१७; प्रेषित ७:५५, ५६; इब्री १:३; ८:१) उजव्या हाताशी बसला आहे आपण त्या ख्रिस्तामध्ये कलम (१ करिंथ ६:१७; १०:१६,१७.) केले गेले आहोत. आणि ह्या ठिकाणी त्याची उपासना केली जावी ही त्याची इच्छा आहे. (योहान ४:२१-२४; फिल ३:२०; कलसे ३:१; १ थेस १:१०.)
पण मास ची (कॅथॉलिक यूखरिस्ट विधी) शिकवण ही आहे : पहिली, की जोवर ख्रिस्त अद्यापही त्यांच्यासाठी याजकांद्वारे (प्रीस्ट्स) दररोज अर्पिला जात नाही तोवर ख्रिस्ताने भोगलेल्या दुःखसहनाद्वारे जिवंत आणि मृतांना पापांची क्षमा नाही; आणि दुसरी, की ख्रिस्त शरीराने भाकर आणि द्राक्षरस रूपाने उपस्थित आहे, आणि तेथे त्याची उपासना केली जायची आहे. म्हणून, मास हे दुसरे तिसरे काही नसून मूलभूतपणे येशू ख्रिस्ताच्या एका अर्पणाचा आणि दुःखसहनाचा नकार आहे, आणि एक शापित मूर्तिपूजा आहे.
८१ . प्रश्न: प्रभूच्या मेजावर कोणते लोक यायचे आहेत?
उत्तर- जे लोक त्यांच्या पापांमुळे स्वतःवर खरोखर नाखूष आहेत आणि तरी त्यांच्या पापांची क्षमा झाली आहे असा विश्वास धरतात आणि त्यांचे उर्वरित दुबळेपण ख्रिस्ताचे दुःखसहन व मरण यांनी झाकलेले आहे असा विश्वास धरतात, आणि जे त्यांचा विश्वास अधिकाधिक बळकट करून त्यांची जीवने सुधारण्याचा प्रयत्न करतात ते लोक प्रभूच्या मेजावर कोणते लोक यायचे आहेत. पण ढोंगी लोक आणि जे पश्चाताप करत नाहीत आणि ही भाकर सेवन करतात व हा प्याला पितात ते स्वतःवर न्यायदंड आणतात.(१ करिंथ १०:१९-२२; ११:२६-३२.)
८५. प्रश्न: जे लोक त्यांची अपराध कबुली आणि जीवन यांतून ते अविश्वासणारे आणि अधार्मिक आहेत हे दाखवतात त्यांना देखील प्रभूच्या भोजनात भाग घेऊ द्यावा का?
उत्तर- नाही, कारण मग देवाच्या कराराचा पावित्र्यभंग होईल आणि विश्वासणाऱ्यांच्या त्या संपूर्ण समुदायाविरुद्ध त्याचा क्रोध पेटून उठेल.१ म्हणून ख्रिस्त आणि त्याचे प्रेषित ह्यांच्या आज्ञेप्रमाणे जोपर्यंत असे लोक त्यांची जीवने सुधारत नाहीत तोपर्यंत, स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या वापरून, त्यांना मज्जाव करण्यासाठी ख्रिस्ती चर्च कर्तव्यबध्द आहे. (स्तोत्र ५०:१६; यशया १:११-१७; १ करिंथ ११:१७-३४.)
प्रभूचा दिवस ३१
८३. प्रश्न: स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या काय आहेत?
उत्तर- पवित्र सुवार्ता घोषित करणे आणि चर्च शिस्त राखणे. ह्या दोन किल्ल्यांनी स्वर्गाचे राज्य विश्वासणाऱ्यांसाठी उघडले जाते आणि अविश्वासणाऱ्यांसाठी बंद केले जाते. (मत्तय १६:१९; योहान २०:२१-२३.)
८४. प्रश्न: सुवार्ता घोषणेने स्वर्गाचे राज्य कसे काय उघडले जाते आणि बंद केले जाते?
उत्तर- ख्रिस्ताच्या आज्ञेप्रमाणे, जेव्हा एकूण एक विश्वासणाऱ्याला जाहीरपणे हे पुकारले जाते आणि जाहीरपणे साक्ष दिली जाते की जितक्यांदा ते ख्रिस्ताच्या स्तुत्य गुणवत्तेमुळे देवाने खरोखरच त्यांच्या सर्व पापांची क्षमा केली आहे हे सुवार्तेचे अभिवचन खऱ्या विश्वासाने स्वीकारतात त्यावेळी स्वर्गाचे दार उघडले जाते. जेव्हा सर्व अविश्वासणाऱ्यांना आणि ढोंगी लोकांना हे जाहीरपणे सांगण्यात येते आणि तशी साक्ष देण्यात येते की जोपर्यंत ते पश्चाताप करत नाहीत तोपर्यंत देवाचा क्रोध आणि अनंतकालीन दण्डाज्ञा त्यांच्यावर पडेल तेव्हा स्वर्गाचे राज्य बंद केले जाते. सुवार्तेच्या ह्या साक्षीनुसार, देव ह्या जीवनात आणि येणाऱ्या जीवनात दोन्ही ठिकाणी न्याय करील. (मत्तय १६:१९; योहान ३:३१-३६; २०:२१-२३.)
८५. प्रश्न: स्वर्गाचे राज्य चर्च शिस्तीनुसार कसे बंद केले जाते व उघडले जाते?
उत्तर- ख्रिस्ताच्या आज्ञेनुसार, जे लोक स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात पण धर्मसिद्धांत किंवा जीवनचर्येत ते अख्रिस्ती आहेत असे दाखवतात, त्यांना प्रथम वारंवार ख्रिस्ती बंधुत्व भावनेतून ताकीद दिली जाते. जर ते त्यांच्या चुका किंवा दुष्टपणा सोडत नाहीत, तर त्यांच्याविषयी चर्चला, म्हणजे चर्चमधील वडिलांना कळवण्यात येते. त्यांची कानउघाडणी जर ते मानत नाहीत तर त्यांना पवित्र विधिसंस्कारांबाबत प्रतिबंध केला जातो, आणि वडिलांद्वारे त्यांना ख्रिस्ती समुदायातून वगळण्यात येते खुद्द देव त्यांना ख्रिस्ताच्या राज्यातून काढून टाकतो. (मत्तय १८:१५-२०; १ करिंथ ५:३-५; ११-१३; २ थेस ३:१४,१५.)जेव्हा ते लोक खऱ्या सुधारणूकीचे वचन देतात आणि ती दाखवतात, तेव्हा ख्रिस्ताचे अवयव आणि चर्चचे सदस्य म्हणून त्यांना पुन्हा स्वीकारले जाते. (लूक १५:२०-२४; २ करिंथ २:६-११)
तिसरा भाग
आपली कृतज्ञता
प्रभूचा दिवस ३२
८६. प्रश्न: ज्याअर्थी ख्रिस्ताद्वारे केवळ कृपेने, आमची स्वतःची काहीही गुणवत्ता किंवा लायकी नसतांना, दैन्यावस्थेतून आमची सुटका करण्यात आलेली आहे, तरीही आम्ही सत्कृत्यें का केली पाहिजेत?
उत्तर- कारण ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने आम्हाला सोडवले आहे आणि आपण त्याची प्रतिमा बनण्यासाठी, तो त्याच्या पवित्र आत्म्याने आमचे नूतनीकरण करतो, यासाठी की आम्ही आपल्या संपूर्ण जीवनानें देवापासून मिळणाऱ्या लाभांकरिता (रोम ६:१३; १२:१, २; १ पेत्र २:५-१०.) देवाप्रत कृतद्न्य आहोत हे दाखवावे आणि आम्हाकडून त्याची स्तुती व्हावी. (मत्तय ५:१६; १ करिंथ ६:१९, २०.) शिवाय, आपल्या विश्वासाच्या फळांनी आपल्या विश्वासाची खात्री आम्हास होत राहावी (मत्तय ७:१७, १८; गलती ५:२२-२४; २ पेत्र १:१०,११.) आणि आमच्या धार्मिक जीवनक्रमाने आमच्या शेजाऱ्यांना आम्ही ख्रिस्तासाठी जिंकून (मत्तय ५:१४-१६; रोम १४:१७-१९; १ पेत्र २:१२; ३:१.,२.) घ्यावे.
८७ . प्रश्न: जे लोक त्यांचा कृतघ्न व पश्चातापहीन जीवन क्रम त्यागून देवाकडे वळत नाहीत त्यांचे तारण होऊ शकेल का?
उत्तर- अजिबात नाही. पवित्र शास्त्र म्हणते की अनीतिमान, मूर्तिपूजक, व्यभिचारी, चोर, लोभी, मद्यपी, चहाड, लुटारू व्यक्ती किंवा तशा इतर लोकांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. (१ करिंथ ६;९, १०; गलती ५:१९-२१; इफिस ५:५-६; १ योहान ३:१४.)
प्रभूचा दिवस ३३
८८ . प्रश्न: मनुष्याचा खरा पश्चाताप किंवा परिवर्तन म्हणजे काय?
उत्तर- जुन्या स्वभावाचे मरणे आणि नवीन स्वभाव जिवंत होणे. (रोम ६:१-११; २ करिंथ ५:७; २ करिंथ ५:१७; इफिस ४:२२-२४; कलसे ३:५-१०.)
९२. प्रश्न: जुन्या स्वभावाचे मरणे म्हणजे काय?
उत्तर- आपण आपल्या पापाने देवाला दुखावले आहे म्हणून मनपूर्वक शोक करणे आणि पापाबद्दल अधिकाधिक तिटकारा, घृणा वाटणे आणि त्यापासून दूर पळणे. (स्तोत्र ५१, ३, ४, १७; योएल २:१२, १३; रोम ८:१२, १३; २ करिंथ ७:१०.)
९०. प्रश्न: नव्या स्वभावाचे जिवंत होणे म्हणजे काय?
उत्तर- ख्रिस्ताद्वारे देवाच्या ठायी एक मनपूर्वक आनंद, (स्तोत्र ५१:८, १२; यशया ५७:१५; रोम ५:१; १४:१७.) आणि सर्व सत्कृत्यांत प्रीती व देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्याचा हर्ष अनुभवणे हा त्याचा अर्थ आहे. (रोम ६:१०, ११; गलती २:२०.)
९१. प्रश्न: पण सत्कृत्यें म्हणजे काय?
उत्तर- केवळ जी देवाच्या नियमांनुसार(लेवीय १८:४; १ शमुवेल १५:२२; इफिस २:१०.) व त्याच्या गौरवाकरिता (१ करिंथ १०:३१) खऱ्या विश्वासातून (योहान १५:५; रोम १४:२३; इब्री ११:६.) केली जातात आणि ती आपल्या स्वतःच्या मतावर किंवा मनुष्याच्या नीतिवचनानुसार नसतात. (अनुवाद १२:३२; यशया २९:१३; यहेज २०:१८, १९; मत्तय १५:७-९.)
ते दहा शब्द (आज्ञा)
प्रभूचा दिवस ३४
९२. प्रश्न: प्रभूचा नियम (आज्ञा) काय आहेत?
उत्तर- देव हे सर्व शब्द बोलला: ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून बाहेर आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे.
१. माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत.
२. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व खालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंव त्यांची सेवा करू नको; कारण मी तुझा देव परमेश्वर इर्ष्यावान देव आहे; जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना तिसऱ्याचौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो. आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारों पिढ्यांवर मी दया करतो.
३. तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेऊ नको, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही.
४. शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. सहा दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर; पण सातवा दिवस तुझा देव परमेश्वर ह्याचा शब्बाथ आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको; तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी तुझी गुरेढोरे व तुझ्या वेशीच्या आंत असलेला उपरी ह्यांनीही करू नये. कारण सहा दिवसांत परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्वकाही निर्माण केले आणि सातव्या दिवशी विसांवा घेतला; म्हणून परमेश्वराने शब्बाथ दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला.
५. आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील.
६. खून करू नको.
७. व्यभिचार करू नको.
८. चोरी करू नको.
९. आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको.
१०. आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नको, आपल्या शेजाऱ्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू ह्यांचा लोभ धरू नको. (निर्गम २०:१-१७; अनुवाद ५:६-२१.)
९६. प्रश्न: ह्या आज्ञांची विभागणी कशी करण्यात आली आहे?
उत्तर- दोन भागांत. पहिला भाग देवाच्या संबंधात आपण कसे जगावे हे आपल्याला शिकवतो; दुसरा भाग आपल्या शेजाऱ्याप्रत आपली काय कर्तव्यें आहेत हे सांगतो. (मत्तय २२:३७-४०.)
९७. प्रश्न: पहिल्या आज्ञेतून देव कोणती गोष्ट अपेक्षित करतो?
उत्तर- हे की माझ्या प्रत्यक्ष तारणासाठी मी सर्व मूर्तिपूजा, (१ करिंथ ६:९, १०; १०:५-१४; १ योहान ५:२१.) जादूटोणा, अंधश्रद्धा, (लेवीय १९:३१; अनुवाद १८:९-१२.) आणि संतांची किंवा इतर प्राण्यांची (मत्तय ४:१०; प्रकटी १९:१०; २२:८, ९.) प्रार्थना टाळावी आणि त्यांपासून दूर पळावे. त्याशिवाय हे की मी केवळ एका खऱ्या देवाला योग्यपणे जाणून घ्यावे, (योहान १७:३.) केवळ त्याच्यावरच भरवसा ठेवावा, (यिर्मया १७:५, ७.) संपूर्ण विनम्रतेने (१पेत्र ५:५, ६.) व धीर धरून (रोम ५:३, ४; १ करिंथ १०:१०; फिल २:१४; कलसे १:११; इब्री १०:३६.) त्याच्याच अधीन राहावे, सर्व चांगल्या गोष्टींची अपेक्षा (स्तोत्र १०४:२७, २८; यशया ४५:७; याकोब १:१७.) केवळ त्याच्याकडूनच करावी, आणि त्याच्यावर माझ्या सर्व अंतःकरणाने प्रीती (अनुवाद ६:५; (मत्तय २२:३७). करावी, त्याचे भय धरावे, (अनुवाद ६:२; स्तोत्र १११:१०; नीती.१:७; ९:१०; मत्तय १०:२८; १ पेत्र १:१७.), आणि त्याला मान द्यावा. (अनुवाद ६:१३; (मत्तय ४:१०); अनुवाद १०:२०.). थोडक्यात हे की त्याच्या इच्छेविरुद्ध किंचितशी देखील गोष्ट करण्याऐवजी मी सर्व सृष्टीतील सर्व प्राण्यांचा त्याग करण्यास तयार असावे. (मत्तय ५:२९, ३०; १०:३७-३९; प्रेषित ५:२९.)
९५. प्रश्न: मूर्तिपूजा म्हणजे काय?
उत्तर-मूर्तिपूजा म्हणजे त्याच्या वचनातून ज्याने स्वतःला प्रकट केले त्या एकाच खऱ्या देवाऐवजी, किंवा त्याच्या भरीला इतर, ज्यावर आपण विश्वास ठेवू इच्छितो असे दुसरे काहीतरी जवळ बाळगणे किंवा नवीन शोध लावून बनवणे. (१ इतिहास १६:२६; गलती ४:८, ९; इफिस ५:५; फिल ३:१९.)
प्रभूचा दिवस ३५
९६. प्रश्न: दुसऱ्या आज्ञेत देव कोणती गोष्ट करायला हक्काने सांगतो?
उत्तर- आपण कोणत्याही प्रकारे देवाची प्रतिमा बनवायची नाही, (अनुवाद ४:१५-१९; यशया ४०:१८-२५; प्रेषित १७:२९; रोम १:२३.) किंवा त्याने त्याच्या वचनात (लेवीय १०:१-७; अनुवाद १२:३०;१ शमुवेल १५:२२, २३; मत्तय १५:९; योहान ४:२३, २४.) सांगितलेल्या रितीऐवजी दुसऱ्या कोणत्याही रीतीने त्याची उपासना करायची नाही.
९७ . प्रश्न: मग आपण कोणतीही प्रतिमा मुळीच करायची नाही का?
उत्तर- दृश्य स्वरूपात कोणत्याही रीतीने देवाचे चित्र काढता येणे शक्य नाही आणि काढू नये. निर्मितीची चित्रे काढता येतील पण त्यांची उपासना करण्याच्या हेतूने किंवा त्यांच्या द्वारे देवाची उपासना करण्यासाठी चित्रे काढायला देव प्रतिबंध करतो. (निर्गम ३४:१३, १४, १७; गणना ३३:५२;२ राजे १८:४, ५; यशया ४०:२५.)
९८ . प्रश्न: पण धर्मगुरू नसलेल्या “सामान्य लोकांसाठी पुस्तके” ह्या रूपांत प्रतिमा म्हणून यांना परवानगी देण्यात येणार नाही का?
उत्तर- नाही, कारण आपण देवाहून अधिक सुज्ञ, बुद्धिमान बनू नये. त्याच्या लोकांनी शिक्षण घ्यावे ही त्याची इच्छा आहे पण मठ्ठ प्रतिमांच्या (यिर्मया १०:८; हबकुक २:१८-२०.) साह्याने नव्हे तर त्याच्या वचनाच्या जिवंत उपदेशांद्वारे. देण्यात यावे. (रोम १०:१४, १५, १७; २ तिमथ्य ३:१६, १७; २ पेत्र १:१९)
प्रभूचा दिवस ३६
९९. प्रश्न: तिसऱ्या आज्ञेत काय सांगितले आहे?
उत्तर- शिव्याशापाने, (लेवीय २४:१०-१७.) खोट्या साक्षीने, (लेवीय १९:१२.) किंवा अनावश्यक आणा भाका घेऊन (मत्तय ५:३७; याकोब ५:१२.) देवाचे नाव अनादरपूर्वक घेऊ नये किंवा त्या नावाचा पावित्र्यभंग होईल अशा रीतीने ते वापरू नये आणि इतरांकडून ते होत असतांना त्रयस्थपणे शांत उभे राहून अशा भयंकर पापांचे वाटेकरी होऊ नये. (लेवीय ५:१;नीती. २९:२४.) त्या ऐवजी, आपण देवाचे पवित्र नाव केवळ पूर्ण भय आणि आदरासहितच वापरले पाहिजे, (स्तोत्र ९९:१-५; यशया ४५:२३; यिर्मया ४:२.) यासाठी की आपण योग्यपणे त्याला स्वीकृती कबुली (मत्तय १०:३२, ३३; रोम १०:९, १०.) द्यावी, त्याचा धावा करावा (स्तोत्र ५०:१४, १५; १ तिमथ्य २:८.) आणि आपल्या सर्व शब्दांनी आणि कृत्यांनी (स्तोत्र २:२४; कलसे ३:१७; १ तिमथ्य ६:१.) त्याची स्तुती करावी.
१००. प्रश्न: शिव्याशाप देऊन देवाच्या नावाची निंदा करणे हे एवढे घोर पाप आहे का की जे लोक त्याच्या नावाची निंदा होऊ देतात आणि त्यांना शक्य असेल तितका प्रतिबंध करत नाही त्यांच्यावर देखील देव रागावतो?
उत्तर- नक्कीच, (लेवीय ५:१.) कारण देवाच्या नावाची निंदा करण्याने देवाचा क्रोध जितका भडकतो त्याहून जास्त दुसऱ्या कशानेही भडकत नाही. त्याच कारणासाठी त्याने त्या पापाला मृत्युदंड फर्मावला आहे. (लेवीय २४:१६.)
प्रभूचा दिवस ३७
१०१. प्रश्न: पण धार्मिक रीतीने आपण देवाच्या नावाने शपथ घ्यावी का?
उत्तर- होय, जेव्हा सरकार प्रजेकडून तशी मागणी करते किंवा जेव्हा देवाच्या गौरवासाठी आणि आपल्या शेजाऱ्याच्या हितासाठी निष्ठा व सत्य जोपासण्याची गरज असते तेव्हा. अशी शपथ घेण्याला देवाच्या वचनाचा आधार (अनुवाद ६:१३; १०:२०;यिर्मया ४:१,२; इब्री ६:१६.) आहे आणि म्हणून जुन्या आणि नव्या करारात संतजनांनी तसे योग्य रीतीने केले आहे (उत्पत्ती २१:२४; ३१:५३; यहोश ९:१५; १शमुवेल २४:२२; १राजे १;२९, ३०;रोम १:९; २करिंथ १:२३.)
१०२. प्रश्न: आपण देखील संतजनांच्या नावाने किंवा इतर निर्मितीच्या नावाने शपथ घ्यावी का?
उत्तर- नाही. एक कायदेशीर शपथ म्हणजे जो अंतःकरण जाणतो त्या देवाला सत्याचा साक्षीदार होण्याची आणि जर मी खोटी शपथ घेत असेल तर मला शिक्षा करण्याची विनवणी असते. (रोम ९:१; २ करिंथ १:२३.)कोणतीही निर्मिती अशा सन्मानाला पात्र नाही. (मत्तय ५:३४-३७; २३:१६-२२; याकोब ५:१२.)
प्रभूचा दिवस ३८
१०६. प्रश्न: चौथ्या आज्ञेत देव काय करायला सांगतो?
उत्तर- एक, हे की सुवार्ता आणि संप्रदायाचे सेवाकार्य चालू ठेवले पाहिजे अनुवाद ६:४-९; २०-२५; १ करिंथ ९:१३, १४; २ तिमथ्य २:२; ३:१३-१७ तीत १:५.) आणि, विश्रांतीच्या दिवशी देवाचे वचन ऐकण्यासाठी (रोम १०:१४-१७; १ करिंथ १४:२६-३३; १ तिमथ्य ४:१३.) देवाच्या चर्चला (अनुवाद १२:२-१२; स्तोत्र ४०:९, १०; ६८:२६; प्रेषित २:४२-४७; इब्री १०:२३-२५.) गेले पाहिजे, विधिसंस्कार पाळले पाहिजेत (१ करिंथ ११:२३, २४.), जाहीरपणे प्रभूला विनवणी केली पाहिजे, (कलसे ३:१६; १ तिमथ्य २:१.) आणि गरिबांसाठी ख्रिस्ती दानधर्म केला पाहिजे. (स्तोत्र ५०:१४; १ करिंथ १६:२; २ करिंथ ८ आणि ९.) दोन, हे की माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मी माझ्या कुकर्मांपासून विश्रांती घेतली पाहिजे. प्रभूला त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे माझ्यामध्ये कार्य करू दिले पाहिजे, आणि अशा रीतीने ह्या जीवनात अनंतकालीन शब्बाथाची सुरुवात केली पाहिजे. (यशया ६६:२३; इब्री ४:९-११.)
प्रभूचा दिवस ३९
१०५. प्रश्न: सहाव्या आज्ञेत देवाने काय करायला सांगितले आहे?
उत्तर- मी विचारांनी, शब्दांनी, किंवा हातवाऱ्यांनी, आणि प्रत्यक्ष कृत्यांनी तर त्याहूनही खूप कमी प्रमाणात, थेट व्यक्तिगत रीतीने किंवा दुसऱ्या कोणाद्वारे (उत्पत्ती ९:६; लेवीय १९:१७, १८;मत्तय ५:२१, २२; २६:५२.)माझ्या शेजाऱ्याचा उपमर्द करू नये, द्वेष करू नये, त्याला इजा करू नये किंवा ठार मारू नये; त्या ऐवजी मी सूडभावना बाजूला सारावी. (नीती २५:२१, २२; मत्तय १८:३५; रोम १२:१९; इफिस ४:२६.) शिवाय, मी माझ्या स्वतःला इजा करू नये किंवा बेपर्वाईने धोक्यात आणू नये. (मत्तय ४:७; २६:५२; रोम १३:११-१४.) कारण खुनाचा प्रतिबंध करण्यासाठी देखील सरकार तलवार धारण करते. (उत्पत्ती ९:६; निर्गम २१:१४; रोम १३:४)
१०६. प्रश्न: पण ह्या आज्ञेत केवळ खून करण्याविषयीच सांगिले आहे का?
उत्तर- खुनाला प्रतिबंध करून देव आपल्याला हे शिकवतो की तो हेवाभाव, द्वेष,राग आणि सूड घेण्याची इच्छा यांसारख्या खुनाचे मूळ असलेल्या गोष्टींचा तिरस्कार करतो, (नीती १४:३०; रोम १:२९; १२:१९; गलती ५:१९-३१; याकोब १:२०; १ योहान २:९-११.) आणि हे की ह्या सर्व गोष्टींना देव खुनासमान लेखतो. (१ योहान ३:१५.)
१०७. प्रश्न: मग आपण आपल्या शेजाऱ्याला अशा कोणत्याही रीतीने ठार न करणे एवढे पुरेसे आहे का?
उत्तर- नाही. जेव्हा देव मत्सर, द्वेष आणि राग ह्यांची निर्भत्सना करतो तेव्हा तो आपल्याला ही आज्ञा देखील देतो की आपण आपल्या शेजाऱ्यांवर आपणा स्वतःसारखी प्रीती करावी, (मत्तय ७:१२; २२:३९; रोम १२:१०.) सहनशीलता, धीर, शांती, सौम्यता, दया आणि स्नेहभाग ठेवावा (मत्तय ५:५; लूक ६:३६; रोम १२:१०, १८; गलती ६:१,२; इफिस ४:२; कलसे ३:१२; १पेत्र ३:८.) आपल्याला शक्य असेल तेवढे त्याचे हानीपासून रक्षण करावे, आणि आपल्या शत्रूंचे देखील हीत पाहावे. (निर्गम २३:४,५; मत्तय ५:४४, ४५; रोम १२:२०.)
प्रभूचा दिवस ४१
१०८. प्रश्न: सातवी आज्ञा आपल्याला काय शिकवते?
उत्तर- सातवी आज्ञा आपल्याला असे शिकवते की सर्व लैंगिक मलिनता देवाने शापित केली आहे. (लेवीय १८:३०; इफिस ५:३-५.) म्हणून आपल्याला त्या मलिनतेचा मनापासून तिटकारा वाटला पाहिजे (यहूदा २२, २३.) आणि आपण पवित्र विवाह मर्यादां पाळून निर्मल आणि शिस्तबद्ध जीवन जगले पाहिजे. (१ करिंथ ७:१-९; १ थेसल ४:३-८; इब्री १३:४.)
१०९. प्रश्न: ह्या आज्ञेमध्ये देव केवळ व्यभिचार आणि तशीच जी लज्जास्पद पापें आहे ह्याहून अधिक कशालाही प्रतिबंध करत नाही का?
उत्तर- ज्याअर्थी आपण, शरीर आणि जीव, ही पवित्र आत्म्याची मंदिरे आहोत त्याअर्थी ही देवाची इच्छा आहे की आपण स्वतःला शुद्ध आणि पवित्र ठेवावे. म्हणून तो सर्व अनैतिक कृत्यें, हातवारे, शब्द, विचार, इच्छा, (मत्तय ५:२७-२९; १करिंथ ६:१८-२०; इफिस ५:३, ४.) आणि जे जे काही आपल्याला लैंगिक मलिनतेकडे ओढून वश करते त्या सर्व गोष्टींना देव प्रतिबंध घालतो. (१ करिंथ १५:३३; इफिस ५:१८.)
प्रभूचा दिवस ४२
११०. प्रश्न: आठव्या आज्ञेत देवाने कशावर प्रतिबंध घातला आहे?
उत्तर- देव केवळ उघड उघड चोरी (निर्गम २२:१:१; १ करिंथ ५:९; १०; ६:९, १०.) आणि लुटारूपणा ह्यांनाच प्रतिबंध घालतो असे नाही तर खोटी वजन-मापें, फसवी दुकानदारी आणि बनावट चलन, अयोग्य व्याज आकारणे, अशा दुष्ट क्लुप्त्यांना देखील देव मज्जाव करतो. (अनुवाद २५:१३-१६; स्तोत्र १५:५; नीती ११:१; १२:२२; यहेज ४५:९-१२; लूक ६:३५.) आपण आपल्या शेजाऱ्याकडून जबरदस्तीने किंवा आपला हक्क दाखवून कोणत्याही रीतीने फसवणूक करून पैसे उकळू नये. (मीखा ६:९-११;लूक ३:१४; याकोब ५:१-६.) या शिवाय, देव सर्व लोभ, हाव, लालसांना प्रतिबंध करतो (लूक १२:१५; इफिस ५:५) आणि त्याने दिलेल्या सर्व दानांचा गैरउपयोग करणे किंवा उधळपट्टी करणे ह्या गोष्टींना तो प्रतिबंध घालतो, (नीती २१:२०; २३:२०, २१; लूक १६:१०-१३.)
१११. प्रश्न: ह्या आज्ञेतून देवाला तुमच्याकडून काय पाहिजे आहे?
उत्तर- जेथे जेथे मला शक्य आहे आणि मी करू शकतो आणि मी केले पाहिजे तेथे मी माझ्या शेजाऱ्याचे हीत जपले पाहिजे, मला इतरांनी जसे वागवावे असे मला वाटते तसे मी त्यांच्याशी वागावे, आणि विश्वासूपणे काम करावे यासाठी की गरजवंतांना मी काही देऊ शकावे. (यशया ५८:५; मत्तय ७:१२; गळती ६:९, १०; इफिस ४:२८.)
प्रभूचा दिवस ४३
११२. प्रश्न: नवव्या आज्ञेत काय सांगितले आहे?
उत्तर- मी कोणाविरुद्धही खोटी साक्ष देऊ नये, कोणाच्याही शब्दांचा विपर्यास करू नये, टवाळकी करू नये किंवा निंदा करू नये, किंवा अविचाराने आणि ऐकून न घेता कोणाचीही निर्भत्सना करू नये किंवा निर्भत्सनेत भाग घेऊ नये.(स्तोत्र १५; नीती १९:५, ९; २१:२८; मत्तय ७:१; लूक ६:३७; रोम १:२८-३२.) त्या ऐवजी ज्या विरुद्ध देवाच्या प्रचंड क्रोधाची शिक्षा आहे (लेवीय १९:११, १२; नीती १२:२२; १३:५; योहान ८:४४; प्रकटी २१:८.) ती सैतानाची स्वतःची कामे, म्हणजे लबाडी आणि फसवणूक, मी टाळलीच पाहिजेत. न्यायालयात आणि इतरत्र सगळीकडे मी सत्यावर प्रीती केली पाहिजे, (१ करिंथ १३:६; इफिस ४:२५) सत्य बोलले पाहिजे आणि सत्य प्रामाणिकपणे कबूल केले पाहिजे, आणि माझ्या शेजाऱ्याची इभ्रत आणि प्रतिष्ठेचे शक्य असेल तेवढे रक्षण करून ती वाढवली पाहिजे. (१ पेत्र ३:८, ९, ४:८.)
प्रभूचा दिवस ४४
११३. प्रश्न: दहावी आज्ञा आपल्याला काय करायला सांगते?
उत्तर- देवाच्या आज्ञांपैकी कोणत्याही आज्ञेला प्रतिकूल असलेला अगदी किरकोळ विचार किंवा इच्छा देखील आपल्या अंतःकरणात कधीही येऊ नये. त्या ऐवजी आपल्या संपूर्ण अंतःकरणाने आपण सर्व पापाचा आत्यंतिक तिरस्कार केला पाहिजे आणि सर्व नीतिमानतेमध्ये आपल्याला हर्ष लाभला पाहिजे. (स्तोत्र १९:७-१४; १३९:२३, २४; रोम ७:७, ८.)
११४. प्रश्न: पण परिवर्तनाने देवाकडे आलेले लोक ह्या आज्ञा परिपूर्णपणे पाळू शकतात का?
उत्तर- नाही. ह्या जीवनात अत्यंत पवित्र लोकांना देखील अल्पसे आज्ञापालन करून सुरुवात करावी लागते. (उपदेशक ७:२०; रोम ७:१४, १५; १ करिंथ १३:९; १ योहान १:८.) असे असले तरी, ते मोठा गंभीर संकल्प करून केवळ काही आज्ञांच नव्हे तर सर्वच आज्ञांनुसार जगण्याचा प्रयत्न करतात. (स्तोत्र १:१, २; रोम ७:२२-२५; फिलिप ३:१२-१६.)
११५. प्रश्न: जर ह्या जीवनात कोणीही त्या दहा आज्ञा परिपूर्णपणे पाळू शकत नाही, तर देव त्यांवर एवढी काटेकोर प्रवचने, उपदेश का करायला लावतो?
उत्तर- पहिले कारण, आपल्या सर्व आयुष्यात आपल्याला आपल्या पापी स्वभावाविषयी अधिकाधिक जाणीव होत जावी, आणि म्हणून आपल्या पापांची क्षमा आणि ख्रिस्तामधील नीतिमत्व मिळवण्यासाठी आपण झटावे. (स्तोत्र ३२:५; रोम ३:१९-२६; ७:७, २४, २५; १योहान १:९) दुसरे कारण, हे आहे की पवित्र आत्म्याच्या कृपेसाठी देवाला प्रार्थना करत असतांना, हे आयुष्य संपल्यानंतर आपण परिपूर्णतेचे आपले ध्येय गाठेपर्यंत अधिकाधिक नूतनीकरणाने देवाच्या प्रतिमेसारखे होण्यासाठी झटणे आपण कधीही थांबवू नये. (१ करिंथ ९:२४; फिलिप ३:१२-१४; १ योहान ३:१-३.)
प्रार्थना
प्रभूचा दिवस ४५
११६. प्रश्न: प्रार्थना करणे ख्रिस्ती लोकांसाठी का जरुरीचे आहे?
उत्तर – कारण देवाला आपल्याकडून जी कृतज्ञता हवी आहे तिचा प्रार्थना हा सर्वात महत्वाचा भाग आहे. (स्तोत्र ५०:१४, १५; ११६:१२-१९; १ थेस ५:१६-१८.) शिवाय, देव त्याची कृपा आणि त्याचा पवित्र आत्मा ह्यांसाठी जे लोक अखंडपणे आणि मनःपूर्वक उत्कटतेने विनवणी करतात आणि त्यांसाठी त्याचे आभार मानतात, केवळ त्यांनाच देव ही दानें देईल. (मत्तय ७:७, ८; लूक ११:९-१३.)
११७. प्रश्न: देवाला संतुष्ट करील आणि तो ती मान्य करील असे प्रार्थनेत काय आहे?
उत्तर –एक, ज्याने स्वतःला त्याच्या वचनामध्ये प्रकट केले आहे आणि आम्हाला सर्व गोष्टींसाठी प्रार्थना करायची आज्ञा दिली आहे,१ त्या केवळ एकाच खऱ्या देवाची प्रार्थना आपण आपल्या अंतःकरणापासून केली पाहिजे. (स्तोत्र १४५:१८-२०; योहान ४:२२-२४; रोम ८:२६-२७; याकोब १:५; 1 योहान ५:१४,१५, प्रकटी १९:१०.) दोन, आपण आपली गरज आणि दैन्यावस्था पूर्ण तपशिलांसह जाणून घेतली पाहिजे, यासाठी की आपण देवासमोर नम्र होऊन राहावे. २ इतिहास ७:१४; २०:१२; स्तोत्र २:११;३४:१८; ६२:८; यशया ६६:२; प्रकटी ४;) तीन, आपण ह्या पक्क्या पायावर विसंबून राहिले पाहिजे की, जरी आपण त्या पात्रतेचे नाही तरी त्याने त्याच्या वचनात अभिवचन दिल्याप्रमाणे आपला प्रभू ख्रिस्त याच्या प्रित्यर्थ देव निश्चितच आपली प्रार्थना ऐकेल. (दानी.९:१७-१९; मत्तय ७:८; योहान १४:१३, १४; १६:२३; रोम१०:१३; याकोब १:६.)
११८. प्रश्न: देवाने आपण त्याच्याकडून काय मागावे अशी आज्ञा केली आहे?
उत्तर- आपला प्रभू ख्रिस्त ह्याने स्वतः आम्हाला शिकवलेल्या प्रार्थनेत ज्या गोष्टीं समाविष्ट केल्या आहेत त्या आपल्या शरीर आणि प्राण यांसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टीं मागाव्या. (मत्तय ६:३३; याकोब १:१७)
११९. प्रश्न: प्रभूची प्रार्थना काय आहे?
उत्तर- हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यांस ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हांस सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत; आमेन (मत्तय ६:९-१३; लूक ११:२-४.)
प्रभूचा दिवस ४६
१२०. प्रश्न: देवाला आम्ही पिता म्हणून संबोधावे अशी आज्ञा ख्रिस्ताने आम्हाला का दिली?
उत्तर- प्रार्थनेच्या सुरुवातीलाच आमच्या प्रार्थनेला पायाभूत असलेला देवाबाबत बालसुलभ पूज्यभाव आणि श्रद्धा आमच्यामध्ये जागवावी म्हणून : ख्रिस्ताद्वारे देव आमचा पिता झाला आहे आणि आमचे पिते आपल्याला जगिक गोष्टीं देणे जेवढे नाकारतात त्यांपेक्षा खूप कमी प्रमाणात आमचा स्वर्गीय पिता आपण विश्वासाने त्याला जे मागतो ते नाकारील. (मत्तय ७:९-११;लूक १:११-१३.)
१२१. प्रश्न: “स्वर्गातील” असे शब्द येथे का घातले आहेत?
उत्तर- हे शब्द आपल्याला असे शिकवतात की देवाचे स्वर्गीय वैभव, त्याचे ऐश्वर्य यांचा आपण जगिक दृष्टींनी विचार करू नये आणि त्याच्या सर्वसमर्थ शक्तीद्वारे आपल्या शरीराला (यिर्मया २३:२३, २४; प्रेषित १७:२४, २५.) व प्राणाला (मत्तय ६:२५-३४; रोम ८:३१, ३२.) लागणाऱ्या सर्व गोष्टीं प्राप्त होतील अशी अपेक्षा ठेवावी.
प्रभूचा दिवस ४७
१२२. प्रश्न: सर्वात पहिली याचिका काय आहे?
उत्तर- तुझे नाव पवित्र मानले जावो. त्याचा अर्थ: सर्वप्रथम आम्ही तुला योग्यपणे जाणून घेऊ, (यिर्मया ९:२३, २४; ३१:३३,३४; मत्तय १६:१७; योहान १७:३; आम्ही तुला पवित्र मानून, तुझे गौरव करू, आणि ज्यांमध्ये तुझे सर्वसमर्थ सामर्थ्य, सुज्ञता, चांगुलपण, नीतिमत्व, दया, आणि सत्य प्रकट होतात त्या तुझ्या सर्व कृत्यांमध्ये तुझी स्तुती करू असे होऊ दे. ( निर्गम ३४:५-८; स्तोत्र १४५; यिर्मया ३२:१६-२०; लुक१:४६-५५, ६८-७५; रोम ११:३३-३६) आम्ही आमचे संपूर्ण जीवन –आमचे विचार, शब्द, आणि कृतीमध्ये असे जगू की आमच्यामुळे तुझ्या नावाची निंदा होणार नाही तर त्याचा आदर व स्तुती होईल असेही होऊ दे. (स्तोत्र ११५:१; मत्तय ५:१६.)
प्रभूचा दिवस ४८
१२३. प्रश्न: दुसरी याचिका काय आहे?
उत्तर- तुझे राज्य येवो. त्याचा अर्थ: तुझे वचन आणि तुझ्या आत्म्याने आमच्यावर असे राज्य कर की आम्ही तुझ्या अधिकाधिक अधीन राहू. (स्तोत्र ११९:५, १०५;१४३:१०; मत्तय ६:३३.) तुझे चर्च जपून ठेव आणि ते वाढव. (स्तोत्र ५१:१८; १२२:६-९; मत्तय १६:१८; प्रेषित २:४२-४७.) सैतानाची कामे, तुझ्याविरुद्ध उठणारी प्रत्येक शक्ती, आणि तुझ्या पवित्र वचनाविरुद्ध असणारे प्रत्येक कारस्थान (रोम १६:२०; १ योहान ३:८.) नष्ट कर. जेथे तूच सर्व काही (रोम ८:२२, २३; १ करिंथ १५:२८; प्रकटी २२:१७, २०.) असशील त्या तुझ्या राज्याचे पूर्णत्व येत नाही तोपर्यंत हे सर्व कर.
प्रभूचा दिवस ४९
१२४. प्रश्न: तिसरी याचिका काय आहे?
उत्तर- जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. त्याचा अर्थ: आम्ही आणि सर्व लोक आपली स्वतःची इच्छा नाकारावी, आणि काहीही कुरकुर न करता, तुझ्या इच्छेचे पालन करावे, असे होऊ दे कारण केवळ तेच चांगले आहे. (मत्तय ७:२१; १६:२४-२६; लूक २२:४२; रोम १२:१, २; तीत २:११, १२.) आणि असेही होऊ दे की प्रत्येक जण त्याच्या कार्यक्षेत्रातील व त्याच्या पाचारणाशी व निगडित असलेली कर्तव्यें (१ करिंथ ७:१७-२४; इफिस ६:५-९.) स्वर्गातील दुतांप्रमाणे राजीखुशीने आणि विश्वसनीयतेने पार पाडतील. (स्तोत्र १०३:२०, २१.)
प्रभूचा दिवस ५०
१२५. प्रश्न: चौथी याचिका काय आहे?
उत्तर- आमची रोजची भाकर आज आम्हास दे. त्याचा अर्थ: आमच्या सर्व शारीरिक गरजां भागव (स्तोत्र १०४:२७-३०; १४५:१५;१६; मत्तय ६:२५-३४.) यासाठी की सर्व चांगल्या गोष्टींचा एकमेव झरा केवळ तूच आहेस (प्रेषित १४:१७; १७:२५; याकोब १:१७.) आणि आम्ही जी तजवीज आणि मेहनत करतो ती आणि तुझी दानें देखील, तुझ्या आशिर्वादाशिवाय आमचे काहीही भले करू शकत नाहीत (अनुवाद ८:३; स्तोत्र ३७:१६; १२७:१,२; १ करिंथ १५:५८.) हे सत्य आम्ही मान्य करावे. म्हणून आम्ही सर्व निर्मितीवरील आमचा भरवसा काढून टाकून केवळ तुझ्यावर भरवसा ठेवावा असे होऊ दे. (स्तोत्र ५५:२२; ६२; १४६; यिर्मया ११७:५-८; इब्री १३:५, ६.)
प्रभूचा दिवस ५१
१२६. प्रश्न: पांचवी याचिका काय आहे?
उत्तर- जसे आम्ही आपल्या ऋण्यांस ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड. त्याचा अर्थ: ख्रिस्ताच्या रक्ताप्रित्यर्थ, आम्हा दुर्दैवी पाप्यांवर आम्ही केलेले कोणतेही नीतिभ्रष्ट अपराध, दोष आणि आम्हाला अजूनही घट्ट पकडणारी दुष्टता ह्यांचा दोषारोप ठेवू नको (स्तोत्र ५१:१-७; १४३:२; रोम ८:१; १ योहान २:१, २.) कारण आम्हाला देखील आम्हामध्ये तुझ्या कृपेचा पुरावा दिसत असल्यामुळे आम्ही पूर्ण मनाने आमच्या शेजाऱ्याला क्षमा करण्याचा निर्धार केला आहे.(मत्तय ६:१४, १५;१८:२१-३५.)
प्रभूचा दिवस ५२
१२७. प्रश्न: सहावी याचिका काय आहे?
उत्तर- आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव. ह्याचा अर्थ; आम्ही स्वतः इतके अशक्त आहोत की आम्ही एक क्षणभर देखील उभे राहू शकत नाही. (स्तोत्र १०३:१४-१६; योहान १५:१-५.) शिवाय, आमचे शत्रू बनून राहण्याची शपथ घेतलेले – सैतान, (२ करिंथ ११:१४; इफिस ६:१०-१३; १ पेत्र ५:८.) जग, (योहान १५:१८-२१.) आणि आमचा स्वतःचा देह (रोम ७:२३; गलती ५:१७.)आम्हावर हल्ला करणें थांबवत नाही. म्हणून, आम्ही ह्या आत्मिकयुद्धात (मत्तय १०:१९, २०; २६:४१; मार्क १३:३३; रोम ५:३-५.) पराभूत होऊन जाऊ नये तर आम्हाला शेवटी पूर्ण विजय (१ करिंथ १०:१३; १ थेस ३:१३; ५:२३.) मिळेपर्यंत ठामपणे आमच्या शत्रूंचा निरंतर प्रतिकार करावा यासाठी तू आम्हाला उचलून धरून तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने बलवान कर.
१२८. प्रश्न: तुम्ही तुमची प्रार्थना कशी समाप्त करता?
उत्तर- कारण राज्य आणि सामर्थ्य आणि गौरव सर्वकाळ तुझी आहेत; ह्याचा अर्थ: आम्ही तुझ्याकडे हे सारे काही मागतो कारण, आमचा राजा ह्या नात्याने तुला सर्व गोष्टींवर जो (रोम १०:११-१३; २ पेत्र २:९) अधिकार आहे त्याद्वारे तू सर्व चांगले ते आम्हाला देण्यास इच्छुक आणि समर्थ आहेस, आणि कारण आम्हाला नव्हे तर तुझ्या पवित्र नावाला सर्व गौरव सर्व काळ मिळावे. (स्तोत्र ११५:१; यिर्मया ३३:८, ९; योहान १४:१३.)
१२९. प्रश्न: आमेन ह्या शब्दाचा अर्थ काय आहे?
उत्तर- आमेन ह्याचा अर्थ: ते सत्य आणि निश्चित असे आहे. मला हे देवापासून पाहिजे ही माझी प्रार्थना मला माझ्या अंतःकरणात वाटते त्याहून खूप खूप अधिक निश्चितपणे त्याने ऐकली आहे. (यशया ६५:२४; २ करिंथ १:२०; २ तिमथ्य २:१३.)
बाप्तिस्मा प्रश्नोतरे
७१. प्रश्न: तान्ह्या बालकांचा देखील बाप्तिस्मा केला पाहिजे का?
उत्तर- नाही, कारण देवाच्या संपूर्ण पुस्तकात (पवित्र शास्त्रात) तसे आचार किंवा प्रघातांबाबत कोणताही आदेश किंवा पूर्वोदाहरण नाही.
७२. प्रश्न: पवित्र शास्त्र तान्ह्या मुलांच्या बाप्तिस्म्याला प्रतिबंध करते का?
उत्तर- जे लिखित स्वरूपात आहे त्याहून अधिक बुद्धिमान आपण स्वतःला समजत नाही तोपर्यंत, विश्वासणाऱ्यांचाच बाप्तिस्मा करावा असे जे पवित्र शास्त्रातील दैवी कौल फर्मावतात ते पुरेसे आहे आणि आपण ते मानले पाहिजे. नादाब आणि अबीहूला अपरिचित अग्नी नेण्याची परवानगी नाकारण्यात आली नव्हती, तरी देखील तसे केल्याने त्यांनी आपणावर देवाचा क्रोध ओढवला, कारण त्यांनी वेदीपासून अग्नी न्यावा अशी आज्ञा त्यांना देण्यात आली होती. ( मत्तय. २८:१८, १९; मार्क १६:१६; लेवीय ९:२४, १०:१६.)
७३. प्रश्न: ज्याअर्थी नियमशास्त्रानुसार अब्राहामाच्या तान्ह्या संततीची सुंता करण्यात आली होती, त्याअर्थी, विश्वासणाऱ्यांच्या तान्ह्या बालकांचा बाप्तिस्मा केला जाऊ नये का?
उत्तर- नाही. अब्राहामाने त्याच्या तान्ह्या वंशजांची सुंता करावी अशी आज्ञा त्याला देण्यात आली होती, पण सुवार्तेवर विश्वासणाऱ्यांना आपल्या तान्ह्या मुलांचा बाप्तिस्मा करावा अशी आज्ञा देण्यात आली नाही. (उत्पत्ती १७:९-१२.).
७४. प्रश्न: काही लोक जसे म्हणतात, जर विश्वासणाऱ्यांची तान्ही मुले त्यांच्या आईबापासमवेत कृपेच्या करारात अंतर्भूत आहेत, तर जशी नियमशास्त्रानुसार अब्राहामाच्या संततीतील तान्ह्या बालकांची सुंता करण्यात आली होती त्याप्रमाणे सुवार्तेवर विश्वासणाऱ्यांच्या तान्हया बालकांचा बाप्तिस्मा का होऊ नये?
उत्तर- विश्वासणाऱ्यांची तान्ही मुले कृपेच्या कराराखाली असणे ह्याचा अर्थ एक तर असा असला पाहिजे की कृपेचा करार संपूर्णतः पूर्णांशाने विचारात घेतला आहे, आणि जर असे असेल तर मग ही तान्ही बालकें त्या करारापासून सर्वथैव पूर्ण आणि अंतिम रीतीने ढळणारच नाहीत. पण सर्वांचे तारण झालेच पाहिजे ( यिर्मया ३२:३८-४०; योहान १०:२८), किंवा, त्याचा सशर्त अर्थ असा घेतला पाहिजे की, जेव्हा ती बालकें प्रौढत्वाच्या वयात येतात, तेव्हा खरा विश्वास, प्रीती आणि जीवनाच्या पावित्र्यासह ती देवाच्या कृपेच्या कराराला बिलगून राहतात व त्या कराराच्या खास विशेषाधिकारांच्या लाभांसाठी पात्र ठरतात. असा जर त्यांचा समज असेल, तर मग मी हे विचारतो की अविश्वासणाऱ्यांच्या ता मुलांहून अधिक असा कोणता आत्मिक विशेषाधिकार विश्वासणाऱ्यांच्या तान्ह्या बालकांना मिळतो, कारण त्यांना देखील प्रौढत्वासाठी वर्षे काढावी लागतात, आणि खरा विश्वास व प्रीती यांद्वारे देवाच्या कराराचा लाभार्थी व्हावे लागते? माझा त्यांना आणखी हा सवाल आहे की कराराचे शिक्कामोर्तब जेवढे विश्वासणाऱ्यांच्या मुलांच्या मालकीचे आहे तेवढेच ते अविश्वासणाऱ्यांच्या मुलांचे नाही का, आणि त्यांचा तो हक्क तर अधिकच आहे, कारण अविश्वासणाऱ्यांची काही तान्ही मुले देवाच्या करारात राहतात, आणि विश्वासणाऱ्यांची काही तान्ही मुले करारात राहत नाहीत; आणि ह्याचे वारंवार पुष्कळ धार्मिक आईबापांना मोठे दुःख असते. ( यशया ५६:३-८; प्रेषित १०:३४-३५; योहान ३:१६). जरी लोट हा अब्राहाम, एक विश्वासणारा, याचा जवळचा नातेवाईक होता, आणि कृपेच्या करारात देखील होता तरी लोटाने त्याची स्वतःची किंवा त्याच्या तान्ह्या बालकांची सुंता करून घेण्याची जरुरी नव्हती, कारण सुंता अब्राहाम आणि त्याचे कुटुंब एवढ्यापर्यंतच मर्यादित होती. म्हणून, समजा विश्वासणाऱ्यांची सर्व तान्ही मुलें अगदी पूर्णपणे कृपेच्या करारात असली तरी सुवार्तेच्या विश्वासणाऱ्यांनी त्यांच्या तान्ह्या बालकांचा बाप्तिस्मा करू नये. आणखी पुढे त्याच नियमाने, आपण तान्ह्या बालकांना प्रभूच्या मेजाकडे देखील आणू नये कारण बाप्तिस्मा देण्यासाठी आणि प्रभूच्या भोजनात भाग घेण्यासाठी लागणाऱ्या अर्हता सारख्याच, समान आहेत.
अब्राहामाची केलेल्या कराराचे दोन भाग होते हे आपण लक्षात ठेवलेच पाहिजे. :
पहिला, आत्मिक भाग, ज्यात देव एका विशिष्ठ रीतीने अब्राहाम व त्याच्या सर्व आत्मिक वंशजांचा, ज्यांनी विश्वासणाऱ्यांचा पिता अब्राहामाने ठेवला तसा विश्वास ठेवला त्यांचा देव होऊन राहण्याचे अभिवचन देतो, मग त्यांची सुंता झालेली असो वा नसो. हे ह्यातून दर्शवले गेले की देवाने त्यांना ते अब्राहामाचे संतान नव्हते, विधर्मी, सुंता न झालेले असे होते तरी त्याचे लोक म्हणून स्वीकारले आणि जसा, अब्राहामाचा विश्वास त्याच्या सुंतेपूर्वी त्याचे नीतिमत्व असे गणले गेले होते, तसेच ह्या लोकांचा विश्वास त्यांचे नीतिमत्व असे गणले जावे. (उत्पत्ती १७:१९, २१; उत्पत्ती २१:१०; गलती ४:३०; प्रेषित २:३९; रोम ९:७-८; गलती ३:१६, २८-२९.;रोम ४:९-१४.)
दुसरा भाग, ह्या अभिवचनात ऐहिक हीत, फायदा सांगितला होता : म्हणून देवाने अभिवचन दिले की अब्राहामाच्या संतानाने कनान देशाच्या भूमीचा उपभोग घ्यावा, आणि बाहेरून दिसू शकणारे भरपूर आशीर्वाद उपभोगावे, आणि ह्या अभिवचनावर सुंतेचे शिक्कामोर्तब केले. विधर्मीयांच्या सर्व राष्ट्रांपासून, जे तोपर्यंत अद्याप अब्राहामाचे आत्मिक वंशज झाले नव्हते त्या यहुदी लोकांचे वेगळेपण दाखवणारे ते एक खास गुणवैशिष्ठ्य देखील होते : पण जेव्हा विधर्मी लोक विश्वास ठेवू लागले, आणि विश्वासाने यहुदी लोकांप्रमाणेच देवाचे लोक बनले, तेव्हा ते वेगळेपण दाखवणारे गुणवैशिष्ट्य संपुष्टात आले. देवाची मुले असण्याचे गुणवैशिष्ठ्य आता ख्रिस्तावर विश्वास आणि अंतःकरणाची सुंता हे बनले आहे.
विश्वासणाऱ्यांच्या तान्ह्या मुलांच्या बाप्तिस्म्यासाठी जी काही कारणे सांगण्यात येतील, पहिले म्हणजे, ती विश्वासणाऱ्यांची मुलें आहेत, दुसरे, ते करारात आहेत, किंवा तिसरे, विश्वासणाऱ्या अब्राहामाच्या तान्ह्या बालकांची सुंता झाली होती; ह्या सर्वांचा काहीही फायदा नाही, कारण सुंता अब्राहामाच्या कुटुंबापर्यंतच मर्यादित होती आणि जरी विश्वासणारे असले तरी इतर सर्व लोक वगळण्यात आले होते. सुंता एका विशिष्ठ दिवसापुरती मर्यादित होती, आठवा दिवस, आणि कोणतीही कारणे असोत, सुंता त्या दिवसाच्या पूर्वी किंवा नंतर केली जात नसे. सुंता फक्त नर मुलाची होत असे आणि मुलींची सुंता होत नसे; जर सुंतेचे स्थान बाप्तिस्म्याने घेतले असेल, आणि नियमशास्त्रानुसार सुंता जर सुवार्तेच्या कराराची मोहोर असेल तर नर मुलांना सोडून इतर कोणाचाही बाप्तिस्मा केला जाऊ शकणार नाही. कारण केवळ नर मुलांचीच सुंता होत असे. पण जसे नियमशास्त्र सुंता नियंत्रित करत असे तसे आता सुवार्ता बाप्तिस्मा नियंत्रित करते, आणि कोणत्या समयी, कोणत्या व्यक्तींना आणि कोणत्या अटींसहित बाप्तिस्मा द्यायचा हे सर्वस्वी नियम देणाऱ्यावर अवलंबून आहे. मग, पवित्र शास्त्रात जे घोषित केले आहे त्याकडे लक्ष देण्यातच आपले हीत आहे.(उत्पत्ती १२:६-७; १३:१५-१७; १५:१६,१८; १७:८-११: योहान १:१२; रोम २:२८-२९; फील ३:३; गलती ३:२६-२८. प्रेषित ३:२२)