जिवंत आशा ट्रस्टची माहिती

जिवंत आशा ट्रस्ट
(Reg no- PTR E 6112 पुणे)

जिवंत आशा ट्रस्ट हा एक सामाजिक आणि धार्मिक ट्रस्ट आहे ज्याची स्थापना महाराष्ट्रातील चर्चना बायबलसंबंधी ठोस शिकवण देण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे जेणेकरून ते अधिक चांगल्या प्रकारे सुसज्ज होऊ शकतील आणि समाज्यातील सर्व घटकांना आशीर्वाद बनू शकतील.

या व्यतिरिक्त आम्ही विविध नेतृत्व प्रशिक्षण, क्रीडा उपक्रम आणि शैक्षणिक प्रायोजकत्वाची व्यवस्था करून युवकांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो.

महाराष्‍ट्रातील गरीब, आजारी, गरजू व अंध व्यक्तींना आम्ही गरजेनूसार मदत पूरवितो. तसेच नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्यासाठी उपलब्धते नुसार आर्थिक सहाय्य पुरवितो