लहान मुलांना वाढवण्यासाठी पवित्र शास्त्रीय शहाणपण.

विनीत ससाने ऑगस्ट २८, २०२४

शिष्यत्त्व शिकण्यात आणि इतरांना शिकवण्यात आपण ज्या मूलभूत वचनाचा वापर करतो ते म्हणजे १ करिंथ १०:३१; “म्हणून तुम्ही खाता, किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.” पौल म्हणतो की खाणे—पिण्यासारख्या दैनंदिन जीवनातील सर्व गोष्टी देवाच्या गौरवासाठी कराव्यात. मग पालकांनी देवाच्या गौरवासाठी बायबलच्या शहाणपणाचा उपयोग पालकत्व करताना किती विशेषकरून केला पाहिजे!

विश्वासणाऱ्या पालकांच्या जीवनात मुले विशेषकरून अतिशय मोठा आशीर्वाद आहेत. आपल्यावर प्रभाव टाकण्यासाठी जगाने काहीही सांगितले तरीसुद्धा, ती (मूले) ओझे नसून प्रभूकडून मिळालेला आशीर्वाद आणि वतनभाग आहेत. (स्तोत्र. १२७:३-५). देवाने त्यांना आपल्या देखरेखीखाली साधारण दोन दशकांसाठी ठेवलेले आहे, ते लवकरच मोठे होणार आहेत, आणि ही वर्षे लवकरच उडून जातील. त्यानंतर कदाचित आपल्या घरातून स्वतःचे आयुष्य जगण्यासाठी ते बाहेर जातील. त्यांना आपल्या छताखाली आणि अधिकाराखाली ठेवण्याची ही वर्षे पुन्हा कधीही परत येणार नाहीत. म्हणूनच, प्रत्येक दिवसाचा योग्य उपयोग करत, देवाच्या शहाणपणानुसार आपले पालकत्व करणे आवश्यक आहे.

आपल्या मुलांच्या तारणाची हमी देणारे असे कोणतेही झटपट उपाय उपलब्ध नाही. मुलांना वाढवण्यासाठी देवाकडील शहाणपण वापरून, विश्वासूपणे आणि सपशेल देवाववरच अवलंबून राहण्यासाठी त्याने पालकांना पाचारण केले आहे (स्तोत्र १२७ :१). तथापि, नम्रपणे अवलंबून राहण्यासोबतच आपल्याला मंडळीच्या इतिहासात आणि पवित्र शास्त्रात देवाच्या व्यवहाराकडे पाहताना त्याच्या कार्यावर देखील विश्वास ठेवला पाहिजे. देव विश्वासणाऱ्या कुटुंबामध्ये आणि कुटुंबांद्वारे अशा प्रकारे कार्य करीत आहे की, “..एक पिढी परमेश्वराची स्तुत्य कृत्ये पुढच्या पिढीला सांगेल.” (स्तोत्र ७८:४) ही वचने एकत्र पाहिल्यास आपण असा निष्कर्ष काढू शकतो की, विश्वासणारे पालक या नात्याने अतिशय नम्रपणे देवाच्या शहाणपणाचा उपयोग करू आणि आपल्या मुलांच्या जीवनात अद्भूत कार्य करण्यासाठी परमेश्वराला आशा ठेवू.

पालकत्वामध्ये वापरता येतील अशा बायबलमधील शहाणपणाच्या काही मौल्यवान गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत.

पालकत्वामध्ये बायबलमधील शहाणपणाचा पहिला मोती म्हणजे मुलांना देवाचे वचन शिकवणे (एका संदेष्ट्यासारखी सेवा).आपण आपल्या मंडळ्यांमधील सर्व संडेस्कूल शिक्षकांबाबत कृतज्ञ असले पाहिजे कारण ते स्वतः चांगली तयारी करतात आणि आपल्या मुलांना पवित्र शास्त्रातील अद्भूत धडे शिकवतात. परंतु, दुर्दैवाने, आपल्या मुलांना पवित्र शास्त्र शिकवण्यासाठी त्यांच्यावरच जास्त अवलंबून राहिले जाते.मुलांना परमेश्वराचे वचन औपचारिक आणि अनौपचारिकरित्या शिकवण्याची प्राथमिक जबाबदारी ही पालकांची आहे (अनुवाद ६:१-२०).

आपली मुले आपल्या सोबत राहतात तेव्हा, देव जो कधीही खोटे बोलत नाही, त्याचे सत्य शिकवण्यास आणि स्पष्ट करून सांगण्याची संधी मिळाल्याबद्दल आपण उत्सूक असले पाहिजे. आपल्याला त्यांना बायबलसंबंधित दृष्टिकोन देणे आवश्यक आहे; अन्यथा, जग त्यांना आपल्या दृष्टिकोनाने प्रभावित करण्यासाठी तयार आहे. मुले लहान (पाच वर्षाच्या आत) असतात तेव्हा पवित्र शास्त्रातील संपूर्णतः शुभवर्तमानाने भरलेल्या गोष्टी त्यांच्या आई-वडीलांनी वाचून दाखवली तर ती ऐकण्यात त्यांना आनंद होतो. मुले ६ ते १२ वयाचे होतात तेव्हा, मुलांसाठी वेस्टमिन्स्टरची प्रश्नोत्तरावली आणि मुलांसाठी बॅप्टिस्ट प्रश्नोत्तरावलीं, ह्या प्रमाणेच उत्तम प्रश्नोत्तरांवर कृती करण्यास आणि त्याचा स्वीकार करण्यास ते मानसिकरित्या सुदृढ होतात.

तुमचा दृष्टीकोण काहीही असूद्या, परंतु ख्रिस्त येशूमध्ये प्रकट करण्यात आलेली त्याची स्वतंत्रतेची प्रीती, त्याची महानता आणि गौरव ह्याविषयी ऐकण्यासाठी पवित्र शास्त्रात प्रकट केलेल्या देवाभोवती एकत्र यावे हेच मूख्य ध्येय असावे. देवाचे वचन हेच सर्वोच्च अधिकार आहे आणि त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक गोष्टीला एक वेगळा आकार मिळतो, हा अनुभव मुलांसाठी अद्भूत आहे. आपल्या मुलांना रविवारच्या शाळेत (संडे स्कूलमध्ये) घेऊन येणे आणि वचन ऐकावे म्हणून त्यांना प्रोत्साहन देणे हा विश्वासणाऱ्या कुटुंबाचा एक भाग असल्याबद्दल त्यांना मिळालेला बहुमानच आहे, हे देखील लक्षात ठेवूया (१ करिंथ. ७:१). देवाने मंडळीच्या संपूर्ण इतिहासात मुलांच्या जीवनामध्ये शुभवर्तमानाचा प्रचार करण्यासाठी संतांच्या सामूहिक सभांचा अद्भुत रीतीने उपयोग केला आहे.देवाचे वचन अधिकार आहे आणि त्याद्वारे कुटुंबातील प्रत्येक गोष्टीला आकार दिला जातो, असा अनुभव घेणे, कुटुंबातील प्रत्येक गोष्टींबाबत देवाचाच सर्वोच्च अधिकार आहे ह्याकडे पाहणे मुलांसाठी हा एक अद्भूत अनुभव आहे.

बायबलमधील शहाणपणाचा दुसरा मोती म्हणजे, आपल्या मुलांसाठी आणि मुलांसोबत दररोज प्रार्थना करणे. (सेवेवतील एखाद्या याजकाप्रमाणे).प्रार्थना अद्भूत आहे, येशूच्या रक्ताने—आपल्या सर्व गरजांसाठी उपकारस्तुतीसह आपल्या स्वर्गीय पित्या जवळ जाण्यासाठी आपल्याला मिळालेली सुसंधी आहे (फिली. ४:६). आपल्या आई-वडीलांना सर्वसमर्थ देवापुढे स्वतःच्या दुर्बळतेबाबत कबूली देतांना आणि त्याच्या कृपेसाठी धन्यवाद व्यक्त करताना पाहणे, हा मुलांसाठी  किती अद्भूत असा आशीर्वाद आहे.आपल्या जीवनातील पुष्कळ आव्हानांसाठी आपल्याला देवाची कृपा आणि दयेची नितांत अशी आवश्यकता आहे.ह्या कुटील आणि विकृत पिढीमध्ये आपल्या लेकरांना वाढवणे हे एक मोठ्ठे आव्हान आहे. देवहीन जगातील भ्रष्ट मोहांचा त्यांच्यावर प्रभाव पडू नये म्हणून त्यांना दूर ठेवण्यासाठी आपल्याला देवाच्या मदतीची खुप गरज आहे हे आपण नित्य मान्य केले पाहिजे. आपण आपल्या मुलांच्या शारीरिक स्वस्थतेसाठी मोठ-मोठे त्याग करत असताना आपण त्यांच्या तारणासाठी, आध्यात्मिक प्रौढतेसाठी त्याच प्रकारे श्रम घेतले पाहिजे  (रोम. १०:१).

देवाने विश्वासाच्या महान पुरुषांना आणि स्त्रियांना तयार करण्यासाठी आणि त्यांचा उपयोग करण्यासाठी त्यांच्या आई-वडीलांच्या प्रार्थनांचे कशा प्रकारे उत्तर दिले,  ह्याबाबत मंडळीच्या संपूर्ण इतिहासामध्ये पुष्कळ अशी अद्भूत उदाहरणे आहेत. मोनीका, ऑगस्टीनची आई, जॉन व्हेस्लीचे आई-वडील, आणि स्पर्जन ह्यांची आई, ही सर्व केवळ काही उदाहरणे आहेत ज्यामध्ये आपल्या मुलांसाठी प्रार्थना केल्यावर देवाने कशा प्रकारे त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर दिले ते दाखवतात.

आपल्या मुलांना सल्लामसलत देत राहणे आणि शिस्त लावणे चालूच ठेवणे हा बायबलमधील शहाणपणाचा तिसरा मोती आहे. (एका राजासारखी सेवा).इफिसकरांस पत्र ६:४, आत्म्याने भरलेल्या पित्यांना त्यांच्या मुलांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवण्याची सूचना देते. देवाच्या आत्म्याने भरलेले असणे हे देवाच्या वचनाने भरपूर असण्याशी संबंधित आहे (कलस्सै ३:१५, १६). म्हणूनच, आपल्या मुलांना दिले जाणारे प्रशिक्षण आणि शिस्त लावणे हे सर्वकाही दैवी आणि प्रेमळ वृत्तीने, तसेच खात्रीशीरपणे झाले पाहिजे.  

पालकांनी आपल्या मुलांचा रागाच्या भरात कोणत्याही प्रकारे शारीरिक छळ करू नये, ह्यावर भर देणे अतिशय महत्त्वाचे आहे. परंतु आज समस्या हि आहे कि लहान मुलांना नियमित छडीची शिक्षा दिली जात नसल्यामुले लहान मुलांचे हृदये अधिक आणि अधिक कठीण व उद्धट होत आहेत. (नीति. १३:२४). कान उघाडणी करणे म्हणजे, विशेषतः त्यांचे पाप आणि त्यांनी निवडलेल्या पापमय मार्गाच्या परिणामांबाबत देवाचे सत्य अतिशय सौम्यतेने मुलांच्या मनावर बिंबवने होय. मुलांच्या जीवनामध्ये त्यांना देवाला संतोषविणाऱ्या मार्गावर स्थिर राहण्याचे प्रोत्साहन मिळण्याकरिता शिस्त लावणे ज्याचा उद्देश सुधारणा घडवून आणणे आहे आणि त्यासाठी काही वेळा चुकांबद्दल शिक्षा करण्यासाठी काठीचा उपयोग करणे गरजेचे आहे. हे प्रशिक्षण आणि कान उघडणी ‘देवाची’ आहे हे लक्षात ठेवा. नैतिकतेच्या आपल्या स्वतःच्या कल्पना किंवा आपल्या पारंपारिक कल्पना नव्हे, तर तोच (देवच) ह्या सर्वांचा केंद्रबिंदु आहे. तरीसुद्धा, त्यांचे अपराधीपण हाताळताना आपण त्यांना शुभवर्तमानातील आशा दाखवावी आणि ज्याची कृपा खरोखर आपल्याला दैवीरितीने प्रशिक्षित करते आणि बदलून टाकते त्या ख्रिस्तावर भरंवसा ठेवण्यास त्यांना मदत करावी.

बायबलमधील शहाणपणाचा चौथा मोती म्हणजे, त्यांच्या समोर ‘ख्रिस्ताला सर्वोच्च मानणारे जीवन,’ जगून दाखवणे.पौल आपल्या जिवनाच्या अंत समयामध्ये तिमथ्याला सांगतो, (२ तीमथ्य ३:१०-११) “तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशिलता, प्रीती, धीर, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे, ही ओळखून आहेस; मला अंत्युखियात, इकुन्यात व लुस्त्रात जे काही झाले ते व मी जो छळ सहन केला तो तू ओळखून आहेस; त्या सर्वांतून प्रभूने मला सोडवले.” इतर अनेक गोष्टींसारखेच, पालकत्वात “शिकवले जाण्यापेक्षा पाहून शिकणे” अधिक प्रभावी ठरते. मुले पाणी शोषून घेणाऱ्या स्पंज सारखी असतात, आपल्या संपूर्ण दैनंदिन जीवनातून ते पुष्कळ गोष्टी आत्मसात करतात. ती आपल्या कृती, प्रतिक्रिया, मनोवृत्ती आणि विश्वास यांचे बारकाईने निरीक्षण करतात आणि त्याचा त्यांच्यावर परिणाम होतो.आपण खरोखर देवावर प्रीती करतो काय आणि देवच आपल्या जिवनाचा केंद्र बिंदू आहे काय हे पाहण्यासाठी आपली मुले आपल्यावर लक्ष ठेवत असतात.

आपण मंडळीत जातो, पवित्र शास्त्र वाचन करतो, आणि तेथे शिकलेल्या गोष्टी खरोखरीने आपल्या जिवनात अमुलाग्र बदल घडवून आणतात की नाही ह्याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असते. हे विचार करण्यासारखे गंभीर सत्य आहे. तथापि, आपल्यासाठी, पालकांसाठी, शुद्ध करणारे वचन आणि आत्म्यामध्ये आपल्याला एक आशा आहे. आपण पालक म्हणून मुलांमध्ये केलेल्या सेवाकार्याचा देवाने उपयोग करावा आणि आपली मुले ख्रिस्त आणि त्याच्या गौरवाकडे आकर्षित केली जावी ह्याकरिता,  देवाच्या कृपने, आपण नम्र, वधस्तंभ केंद्रीत, आणि कृपेने भरलेले पालक असले पाहिजे.

प्रश्नोत्तरावली (ख्रिस्ती विश्वासाची पवित्र शास्त्रीय मार्गदर्शन प्रश्न आणि उत्तरे अशा प्रकारामध्ये) आणि कौटुंबिक उपासना चालवणे ह्यासाठी मदतगार ठरतील असे काही ऑनलाईन संसाधने उपलब्ध आहेत:

 वय 3 ते 5

  1. मुलांसाठी बॅप्टिस्ट प्रश्नोत्तरावली –

https://www.fairviewbaptistchurch.ca/wpcontent/uploads/2020/04/The-Baptist-Catechism-for-Children.pdf

  • लेकरांची प्रश्नोत्तरावली –

 वय 6 ते 12

  1. वेस्टमिन्स्टरची त्रोटक प्रश्नोत्तरावली –

https://prts.edu/wp-content/uploads/2013/09/Shorter_Catechism.pdf

  • प्युरिटन प्रश्नोत्तरावली, चार्ल स्पर्जन –

पालकांसाठी

  1. जोएल बीक ह्यांचे कौंटुंबीक उपासना
  • जे. सी. रायल ह्यांचे पालकांचे कर्तव्य –

https://www.chapellibrary.org/book/dopa/duties-of-parents-the

Vineet Sasane
Vineet Sasane