प्रेषितांचा मतांगिकार

सर्व समर्थ देव जो पिता, आकाश आणि पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता

आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू ,
जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला,
कुमारी मरिया हिजपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगीले,
ज्याला वधस्तंभि खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरिले,
तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून पुन्हा उठला, स्वर्गात चढला,
आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे,
तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे.
त्याजविषयी मी विश्वास धरितो.

पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता,
पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याजविषयी मी विश्वास धरितो.

आमेन.

अनुक्रमणिका