आज ख्रिस्ती लोकांत अस्सल, खरीखुरी खात्री आणि चिकाटी ह्या गुणांच्या फळांचा अभाव अत्यंत कमी प्रमाणात दिसून येतो. खात्री आणि चिकाटीची फळें — कृपेच्या साधनांचा परिश्रमपूर्वक उपयोग, देवाच्या इच्छेचे मनापासून केलेले आज्ञापालन, त्याच्याशी सहभागिता ठेवण्याची तीव्र इच्छा, त्याचे गौरव आणि स्वर्गाचा ध्यास, चर्चवर प्रीती, आणि आत्मिक पुनरुज्जीवना करिता मध्यस्थी — ह्या सर्व गोष्टीं क्षीण होतांना दिसत आहेत. खात्री आणि चिकाटी यांविषयीची समृद्ध, सैद्धांतिक विचारसरणी आणि त्यासोबत जोशपूर्ण, पवित्र केलेले जीवन ह्यांची आपल्याला निकराची गरज आहे.
“विश्वासाची खात्री” (Assurance of faith) म्हणजे काय आणि ” संतांचे राखले जाणे ” (Perseverance of the saints) म्हणजे काय आणि आपल्याला ती कशी मिळतील? ख्रिस्ती जीवनात खात्री आणि संतांचे राखले जाणे परस्पराला कशी सहाय्यक बनतात?
दृढ विश्वासाची खात्री म्हणजे अशी गाढ श्रद्धा की देवाच्या कृपेने, मी ख्रिस्ताच्या मालकीचा आहे, मला सर्व पापांची पूर्ण क्षमा मिळाली आहे, आणि मला अनंतकाळचे जीवन हे वतन मिळेल. (१ योहान ५:११-१३). जर मला खरी खात्री असेल तर, मी तारणासाठी ख्रिस्तावर विश्वास ठेवतो एवढेच केवळ नव्हे तर मी विश्वास ठेवतो हे मी जाणतो देखील. ह्या आत्मविश्वासपूर्वक खात्रीमधे दोषापासून मुक्ती, देवांमध्ये आनंद, आणि आपण देवाच्या कुटुंबाचे आहोत ही जाणीव समाविष्ट असते. ही खात्री ऊर्जा, चैतन्य व गतिशीलता ह्यांनी भरलेली, परिस्थितीनुसार बदलणारी, शक्ती आणि फलदायित्वात वाढणारी अशी असते.
ही खात्री पुढील गोष्टीने होते (१) देवाच्या अभिवचनांना बिलगून राहण्याने (२ करिंथ ७:१), (२) आपल्यामध्ये असलेल्या कृपेच्या खुणा आणि फळे ह्यांची पवित्र आत्म्याने केलेल्या पुष्टीने ( १ योहान ४:७, १३), (३) आपण देवाची मुलें आहोत अशी आपल्या आत्म्यासोबत पवित्र आत्म्याने दिलेल्या थेट साक्षीने (रोम ८:१६), आणि (4) देव आपल्याशी आतापर्यंत विश्वासू राहिल्याच्या असामान्य नोंदींवर अवलंबून राहण्याने ही खात्री मिळवता येते (१ थेस ५:२३-२४).
संतांचे राखले जाणे म्हणजे काय? प्रथम आपण हे विचारले पाहिजे, संत गण कोण आहेत? पुष्कळ लोक बाप्तिस्मा झालेल्या सर्व व्यक्तींना, किंवा सुवार्ता सभांमध्ये ज्यांनी ख्रिस्त स्वीकृतीचा निर्णय घेतला असेल अशा सर्व लोकांना “अनंतकालीन सुरक्षितता” देऊ इच्छीतील. पवित्र शास्त्रात केवळ ज्यांना देव त्याच्या हेतूनुसार त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याशी सहभागीतेसाठी बोलावतो आणि पवित्र आत्म्याद्वारे नवीन जीवन देतो अशी व्याख्या केलेल्या संतांचे राखले जाणे चिकाटीविषयी सांगितले आहे (यिर्मया ३२:४०; रोम ८:३०, ३७-३९; फिल १:१, ६), (कॅनन्स ऑफ डॉर्ट, फीफथ हेड, आर्टिकल १).त्रैक देवाच्या सांभाळून ठेवणाऱ्या कार्याने, (१ करिंथ १:२, ८-९), असे लोक ते ह्या जगात जगत असतात तोपर्यंत खऱ्या विश्वासात आणि विश्वासातून होणाऱ्या कार्यांत नेटाने काम करत राहतील.
काही धर्मशास्त्रवेत्ते संतांच्या संतांचे राखले जाणे ऐवजी संतांना सांभाळून सुरक्षित ठेवण्यासंबंधी बोलू इच्छितात. ह्या दोन कल्पनांमध्ये जवळचा संबंध आहे, पण त्या दोन्ही एकच नाहीत. संतांना सांभाळण्याच्या देवाच्या कृतीने संतांना नेटाने काम करता येते. तो त्यांना विश्वासात राखतो, मार्गापासून भरकटण्यापासून सांभाळतो, आणि शेवटी त्यांना परिपूर्ण करतो. (१ पेत्र १:५; यहूदा २४). देवाने आपल्यामध्ये जे कार्य सुरु केले आहे ते तो पूर्ण करील हा आत्मविश्वास आपल्यामध्ये असावा. (स्तोत्र १३८:८; फिलिप १:६; इब्री १२:२). ख्रिस्ताच्या मध्यस्थीमुळे (लूक २२:३२; योहान १७:५) आणि पवित्र आत्म्याच्या कार्यामुळे विश्वासणारे सांभाळले जातात (योहान १४:१६; १ योहान २:२७).
राखले जाणे ही, संतांनी त्यांच्या आयुष्यभर घडत असलेली कृती आहे. : ख्रिस्ताला तारक म्हणून कबुली देत राहणे (रोम १०:९), कृपेची फळे धारण करणे (योहान १५:१६), शेवटपर्यंत टिकून राहणे (मत्तय १०:२२; इब्री १०:२८, २९). खरे विश्वासणारे लोक तारणासोबत येणाऱ्या गोष्टीं चिकाटीने करत राहतात (इब्री ६:९). देव त्यांना उत्तरदायित्व नसणारा एखादा यंत्रमानव असे वागवत नाही, पण नीतिमान प्रतिनिधी मानतो, असे ए.डब्ल्यू. पिंक म्हणतात; पवित्रीकरणात विश्वासणारे लोक कृतिशील असतात (फिल २:१२). ते स्वतःला पापापासून दूर ठेवतात (१ योहान ५:१८). ते स्वतःला देवाच्या प्रीतीत ठेवतात (यहूदा २१). त्यांच्यापुढे नेमलेली शर्यत ते धीराने धावून पूर्ण करतात (इब्री १२:१). अशाप्रकारे ते राखले जातात आणि ह्या कामी त्यांना पवित्र आत्मा साहाय्य करतो.
“विश्वासाची खात्री” (Assurance of faith) आणि ” संतांचे राखले जाणे ” ह्यांत परस्पर संबंध कसा आहे? तो संबंध पुढील प्रमाणे आहे “विश्वासाची खात्री” , विश्वासणाऱ्याला देवाच्या कृपेवर आणि सुवार्तेत त्याने दिलेल्या अभिवचनांवर विसंबून राहण्याकरीता प्रथम उत्तेजन देते; आणि दुसरी गोष्ट, ख्रिस्ती जीवन जगण्याकरिता ह्या गोष्टींद्वारे एक शक्तिशाली प्रेरक असे उत्तेजन देते. संतांचे राखले जान्याने खात्रीचा मार्ग उघडला जातो. जर एखादा मनुष्य संतांचे राखले जाणे यावर विश्वास ठेवत नाही तर आपण स्वर्गाला जाऊ अशी खात्री त्याला होऊ शकत नाही. तो कृपेच्या सवलतीच्या स्थितीत असतो पण आपण त्या स्थितीत कायम राहू की कसे हे जाणून घेण्याचा कोणताही मार्ग त्याच्याकडे नसतो. अशा रीतीने, खात्रीपूर्वकता संतांचे राखले जाणे या तत्वप्रणालीला एकनिष्टपणे जोडलेली असते. जे लोक विश्वासातून उद्भवणारी कृत्यें नेटाने करत राहतात ते काही काळानंतर उच्च पातळीची खात्री प्राप्त होते.