सर्वसमर्थ एकच देव जो पिता आकाश आणि पृथ्वीचा, दृश्यआणि अदृश्य गोष्टींचा निर्माण कर्ता त्याजवर आम्ही (मी) विश्वास ठेवतो.
आणि एकच प्रभु येशु ख्रिस्त, जो सर्व युगांपुर्वी देवाचा एकुलता एकपुत्र, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, एकुलता एक, अनिर्मीत, पित्यासारखाच स्वभाव असणारा. ज्याच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले.आपल्यासाठी आणि आपल्या तारणासाठी तो स्वर्गातून खाली उतरला;
तो पवित्र आत्म्याद्वारे व कुमारी मरियेद्वारे देहधारी झाला व त्याला मानव करण्यात आले.पंतय पिलाताच्या अधिकाराखाली त्याला आमच्यासाठी क्रुसावर देण्यात आले; त्याने दुःख सोसले आणि त्याला पुरण्यात आले.शास्त्रानुसार तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला व स्वर्गात चढला.आणि देव जो पिता ह्याच्या उजवीकडे बसला आहे.जिवीतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास तो त्याच्या गौरवाद्वारे पुन्हा येणार आहे.
आणि आम्ही पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवतो, जो जिवनाचा प्रभु व दाता आहे,जो पित्यापासून व त्याच्या देव पुत्रापासून येतो आणि पित्याप्रमाणेव पुत्राप्रमाणेच त्याचीही भक्ती केली जाते व गौरवीला जातो,तो संदेष्ट्यांद्वारे बोलला.
आम्ही एकच पवित्र, सार्वत्रिक प्रेषितीय मंडळीवर विश्वास ठेवतो. पापांच्या क्षमेसाठी आम्ही एकाच बाप्तीस्म्याची कबुली देतो..
मृतांचे पुनरूत्थान तसेच येणाऱ्या जगामधील जिवन यांची आम्ही वाट पाहतो.
आमेन.