आजार व मृत्यूला चांगल्या रीतीने सामोरे जाण्याचा कल मनुष्यामध्ये स्वभावतःच नसतो. अविश्वासणारी व्यक्ती आत्ता आणि येथे ह्या “झट पट” वृत्तीने जगत असते, आणि येथील जीवनच त्याच्यासाठी सर्व काही असते. आजार आणि विपत्तीपासून, मृत्त्यूपासून देखील, मुक्त जीवनाची स्वप्ने तो पाहतो. त्याचे जीवन सुखाच्या शोधानेच भरलेले असते, आणि जर ते मिळण्यासारखे असेल तर त्याला येथेच सर्वकाळ राहायला आवडेल. म्हणून जेव्हा आजार आणि/किंवा मृत्त्यू त्यांच्याव्यर्थ सुखाच्या शोधात व्यत्त्यय आणतात तेव्हा अधार्मिक लोक रागाने आणि कडवटपणाने प्रतिसाद देतात.
आजार आणि मृत्त्यूबाबत अशा पापी भावना आणि पापी प्रतिसादांपासून ख्रिस्तीलोक मुक्त असतात हे खरोखरच खरे असते तर किती बरे होते. जेव्हा गंभीर आजार आणि मरणाची शक्यता अकस्मात आपल्या जीवनात अगांतुकपणे येतात, तेव्हा असा संघर्ष आपल्या हृदयात चालू होतो. जेव्हा दीर्घकालीन किंवा प्राणघातक व्याधीची शक्यता आपल्या जीवनाचा गतिक्रम नाट्यमय रीतीने बदलते तेव्हा दैहिकता आपले कुरूप मस्तक वर उचलते.
दैवी योजनेनुसार पाठवलेल्या पिडांप्रत अशा न शोभणाऱ्या प्रतिक्रिया विश्वासणाऱ्यासाठी एक दुःखाचे कारण बनेल कारण त्याच्या स्वर्गीय पित्याच्या ईश्वरी इच्छेला पूर्णपणे स्वाधीन होण्याची त्याच्या आतील नवीन बनलेल्या मनुष्याची इच्छा असते. जो माझ्या जीवनात त्याचा हेतू साध्य करण्यासाठी त्याच्या सार्वभौम सुज्ञतेने माझ्या मीपणाला मारत आहे त्या एका देवाला मनापासून समर्पित होण्याचा प्रार्थनामय संघर्ष ही तशी सोपी बाब नाही !
आणि तरी देखील केवळ अशी मनःपूर्वक शरणागतीच आपल्याला आजाराची वास्तविकता किंवा मरणाच्या अटळ शक्यतेला तोंड देण्याची क्षमता पुरवील. अशा संपूर्ण समर्पणाच्या शरणागतीनेच ईयोबाला हे म्हणायला बळ दिले की जो त्याचा वध करत होता आणि ज्याने त्याला व्याधींच्या भट्टीत कोंबले होते त्या देवावर तो तरी देखील दृढ विश्वास ठेवील. “तो मला ठार मारणार तरी मी त्याची आस धरीन.” (ईयोब १३:१५). ज्याने दुसऱ्या एका प्रसंगी, तो जन्मला होता त्या दिवसाला शाप दिला होता, त्या मनुष्यामध्ये देवाची कृपा बलशाली रीतीने प्रबळ होत गेली.
हे उघड आहे की केवळ देवाची आधार देऊन उचलून धरणारी कृपाच एक ख्रिस्ती म्हणून आपल्याला आजार आणि मृत्यूचा सामना करण्याचे बळ देऊ शकते. — म्हणजे, अशी ख्रिस्ती व्यक्ती जी तिच्या स्वर्गीय पित्यावर आणि त्याच्या वचनाच्या पूर्णपणे विसंबण्याजोग्या अभिवचनांवर दृढ विश्वास ठेवते. जेव्हा आपल्या वाट्याला गंभीर कसोट्या येतात तेव्हा आपण ह्या अभिवचनांचा उपयोग करणे शिकायला पाहिजे. जेव्हा कोणत्याही गोष्टीला काही अर्थ उरत नाही त्यावेळी, केवळ देवाची करारबद्ध अभिवचने आपल्यासाठी आहेत अशी ती ग्रहण करून आणि आपल्या स्वर्गीय पित्यावर दृढ विश्वास ठेवून आपण आपल्या परिस्थितींवर मात करू शकू. आपल्या भावना किंवा परिस्थितींऐवजी देवाच्या वचनांद्वारे आपण देवाची पारख करून त्याला ओळखणे शिकले पाहिजे.
अशा न डळमळणाऱ्या दृढ विश्वासाने पौल आणि सीला यांना, जेव्हा ते दारुण परिस्थितीत सापडले होते, तेव्हा देवाच्या स्तुतीची गाणी गाण्याचे बळ दिले (प्रेषित १६:२२-२४). अशा विश्वासाने युगानुयुगें अगणित विश्वासणाऱ्यांना महान कसोट्यांच्या समयांत अढळ राहण्याची क्षमता दिली. जेव्हा एका झंझावाती वादळात ख्रिस्त शिष्यांकडे आला होता तेव्हा त्याला हा महान धडा त्याच्या शिष्यांना शिकवायला पाहिजे होता. वादळ शांत करण्यापूर्वी, त्यांच्याशी बोलून प्रथम त्याने त्यांची हृदये शांत केली. त्याचा उद्देश त्यांना (आणि आपल्याला!) हे शिकवणे हा होता की अति तीव्र आणि गंभीर कसोट्यामध्ये देखील, त्यांनी परिस्थितीं ऐवजी प्रथम त्याचे वचन विचारात घ्यावे.
जेव्हा आजार आणि मरणाला तोंड द्यावे लागते तेव्हा आपण प्रार्थनापूर्वक आपलीशी करून घेतली पाहिजे अशी काही अभिवचने कोणती आहेत?
- “स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही.” (यशया ४९:१५)जेव्हा देव आपल्याला आपल्या आकलनाच्या खूप पलीकडील मार्गांनी चालवतो, तेव्हा देव त्याच्या स्वतःच्या लोकांना विसरु शकत नाही. जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची नजर नेहमीच असेल.
- “परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांस देवाच्या करणीने सर्व गोष्टीं मिळून कल्याणकारक होतात.” (रोम ८:२८). आजार आणि मरणाद्वारे देखील, देव सर्व गोष्टी जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांच्या आत्मिक हिताकरिता आणि त्यांना त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे त्यांनीबनावे म्हणून एकत्रितपणे करतो. (व २९).
जी पुष्कळ अभिवचने आपण विश्वासाने आपलीशी करुन घ्यावीत अशी आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे त्यातील हा केवळ एक लहान नमुना आहे. जेव्हा देवाची कृपा आपल्याला स्तोत्रकर्त्यासोबत हे म्हणायचे बळ देते, “मला भीती वाटेल तेव्हा मी तुझ्यावर भरवसा टाकीन. देवाच्या साहाय्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करीन; देवावर मी भरवसा ठेवला आहे.” (स्तोत्र ५६:३-४)! तेव्हा तो केवढा महान आशीर्वाद असतो. केवळ विश्वासाने (देवाची एक कृपामय देणगी) आपण आजार आणि मरणाला तोंड देऊ शकतो आणि स्तोत्र ११२:७ चे हे शब्द प्रतिध्वनीत करु शकतो : “[मी] वाईट बातमीला भिणार नाही; [माझे] मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते.”