देवाच्या गौरवासाठी जगणे

केवढे उदात्त ध्येय आहे हे! ह्यापेक्षा अधिक उच्च काय असू शकेल? तरी, जो कोणी कधी तरी जगला असेल त्याचे हेच प्रमुख उद्दिष्ट आहे. देवाच्या नामाला जे सर्व गौरवाचे श्रेय देणे लागते त्यासाठी तो पात्र आहे. (स्तोत्र २९:२). तो स्वतःच म्हणतो: “मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील.”(यशया ४३:२१). जे देवाचे गौरव अनंत काळ करत आहेत ते स्वर्गातील देवदूत आणि गौरवीत केले गेलेले संत सर्वात आनंदी लोक आहेत. पौलाने हे अशा शब्दांत सांगितले: “कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात; म्हणून तुम्ही आपल्या शरीरात देवाचा गौरव करा.” (१ करिंथ ६:२०).

पहिली गोष्ट, आपण ख्रिस्ताद्वारे मुक्त केलेले असले पाहिजे. स्वभावतःच, आपण देवाच्या गौरवाला उणे पडतो; खरे म्हणजे आपण त्याचे (गौरवाचे) शत्रू आहोत. (रोम १:२१-२३; ३:२३). आपण देवाचे योग्य रीतीने गौरव केले नाही म्हणून आपण सार्वकालिक लज्जेला पात्र आहोत. आपली पाप मुक्ती झालीच पाहिजे. आपल्याकडून होणारी पापाची सेवा संपलीच पाहिजे, आणि आपल्याला पाप दंड आणि पापाच्या सामर्थ्यापासून बंधमुक्त करण्यासाठी ख्रिस्ताचे रक्त आणि त्याची नीतिमानता आपल्याला लावली गेलीच पाहिजे. (गलती ३:१३-१४; ५:२४). देवाला निश्चितपणे गौरवीत केलेले परिपूर्ण जीवन तो जगला; त्याने कॅलवरी येथे खंडणीची पूर्ण किंमत भरली. तुम्ही त्याच्या मोलवान रक्ताने मुक्त झाला आहात का? ह्या महान मुक्तिदात्याविना तुम्ही हरवलेला आहात आणि तुम्ही ज्या उद्देशाने निर्माण केला गेला होतात तो उद्देश तुम्ही कधीही साध्य करु शकणार नाही.

दुसरी गोष्ट, आपण आपल्या देहाने देवाचे गौरव केलेच पाहिजे. करिंथ येथील चर्चमधील पुष्कळ लोक त्यांच्या पूर्वीच्या दैहिक पापांकडे वळत होते. शरीर जारकर्मासाठी नाही (१ करिंथ ६:१३), पण ते प्रभू करिता आहे. “तुमचे शरीर हे पवित्र आत्म्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? (१ करिंथ ६:१९). आपल्या शरीरांना मोठी प्रतिष्ठा आहे. ती एखादी कचरापेटी नाही. ती पवित्र आत्म्याची मंदिरे आहेत. म्हणून तुमच्या शरीरात देवाला गौरवीत करा.

येशूने केले तसे, आपण आपले नेत्र योग्य रीतीने वापरु या, येशूने लोकसमुदायाला पाहिले तेव्हा त्याचे मन कळवळ्याने भरुन गेले. जगाच्या आवाजांपासून आपले कान दुसरीकडे वळू द्या आणि देवाचे वचन व धार्मिक लोकांचा उपदेश ऐकण्यासाठी त्यांचा उपयोग करा, जरी ती एक खरडपट्टी असली तरी. आपण आपले ओठ कुटाळक्यां करण्यासाठी नव्हे तर प्रार्थना करण्यासाठी, प्रभू येशूविषयी बोलण्यासाठी, आणि दुखी कष्टी लोकांच्या सांत्वनासाठी त्यांच्याशी बोलायला वापरु या. आपण आपले हात चोरी करण्यासाठी नव्हे तर परिश्रम करण्यासाठी, आणि इतरांच्या भल्यासाठी त्यांना देता यावे म्हणून वापरु या. (इफिस ४:२८). आपण आपले पाय देवाच्या घरी जाण्यासाठी, त्याच्या मार्गात चालण्यासाठी, आणि प्रभू येशूच्या पावलावर पाय ठेवून त्याला अनुसरण्यासाठी वापरु या. (१ पेत्र २:२१).

तिसरी गोष्ट, आपण आपल्या आत्म्यात देवाचे गौरव केले पाहिजे. आपण देवाविषयी उच्च विचार करु या, त्याचे वचन वाचू, आणि त्याच्या इच्छेच्या अधीन होऊ या. आपण अब्रामाविषयी बोलण्यात आले होते तसे, त्याच्यावर दृढ विश्वास ठेवू या: ”तो विश्वासात बळकट होता…. देवाला गौरव देत होता” (रोम ४:२०). जसे दाविदाने त्याचे पाप आणि देवाचे न्यायित्व मान्य केले तसे आपण आपली पापे कबूल करुन देवाला गौरव देऊ या (स्तोत्र ५१). पावित्र्याच्या जीवनाने आपण देवाला गौरव देऊ या, त्याच्या पुत्राच्या प्रतीमेनुसार बनून, स्वतःला नाकारुन, आणि आपला वधस्तंभ उचलून. जसा तो कुष्ठरोगी येशूचे आभार मानण्यासाठी त्याच्याकडे परत गेला तसे आपण देवाला कृतज्ञ राहून त्याला गौरव देऊ या. (लूक १७:१८). ही आपली अध्यात्मिक सेवा आहे, होय ना? (रोम १२:१).

त्याने तुम्हाला त्याच्या मोलवान रक्ताने विकत घेतले आहे, म्हणून तुमच्या शरीरात आणि आत्म्यात त्याचे गौरव करा. जेव्हा खाणे आणि पिण्यासारख्या सामान्य कृतीं केवळ सामान्य कृतीच राहतात ते किती खेदजनक असते. देणग्या देणाऱ्याला सन्मान न देता सारे फस्त करवयाचे, नोहाच्या दिवसांत ते अशाच रीतीने जगले. पण पौल म्हणतो की प्रत्येक गोष्ट देवाच्या गौरवासाठी करणे हे देवाच्या मुलांचे खास लक्षण असले पाहिजे. (१ करिंथ १०:३१).

ह्याचे गुपित काय? देवाची अनुकूल समक्षता. कसोटीच्या वेळी देवाचे गौरव करणे हे योसेफाच्या जीवनाचे गुपित होते. तो त्याच्या आईबापापासून दूर होता, वचनदत्त भूमीपासून दूर होता, पण प्रभू त्याच्यापासून दूर नव्हता.देव त्याच्या बरोबर होता. (उत्पत्ती ३९:२). त्याने प्रभूची सहभागिता आणि निकटपणा अनुभवला. प्रभूची सहभागिता, ह्याहून कमी असलेल्या गोष्टींनी आपले समाधान होईल का?

“जे काम तू मला करायला दिले ते पुरे करुन मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे.” हे जो म्हणू शकला त्या देवापासून आलेल्या तारकाकडे आपण पाहू या. (योहान १७:४). तुमच्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून तो त्याचा आत्मा देतो :”तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी माझे साहाय्य कर”.

डॉ. जोएल बीके
डॉ. जोएल बीके

जोएल रॉबर्ट बीके (जन्म कलामाझू, मिशिगन येथे, डिसेंबर 9, 1952) एक अमेरिकन सुधारित पाद्री आणि धर्मशास्त्रज्ञ आहे. ते ग्रँड रॅपिड्स, मिशिगनमधील हेरिटेज रिफॉर्म्ड मंडळीचे मंत्री आहेत आणि प्युरिटन रिफॉर्म्ड थिओलॉजिकल सेमिनरीचे अध्यक्ष आहेत, जिथे ते सिस्टेमॅटिक थिओलॉजी आणि होमलेटिक्सचे प्राध्यापक देखील आहेत.