दैवी प्रतिमा वाहक

आठव्या स्तोत्रात वापरलेली भाषा लक्षात ठेऊन [“तू (मानवाला) देवदुतांपेक्षा यत्किंचित कमी केले आहेस आणि त्याला गौरव आणि सन्मानाने मुकुटमंडित केले आहेस.” व. ५], सुधारित ईश्वरविज्ञानशास्त्रज्ञ कर्नेलियस व्हॅन टीलॉन्स ह्यांनी असे घोषित केले की, एक प्राणी जितका देवासारखा होऊ शकतो तितके देवाने आदामाला त्याच्यासारखे उत्पन्न केले. आपण जेव्हा पहिल्यांदा हे शब्द ऐकतो तेव्हा ते आपल्याला धक्कादायक वाटतात. आणि तरीही जेव्हा व्हॅन टील हे दाखवून देतात की, आदाम एक प्राणी असल्यामुळे, तो कधीही दैवी होऊ शकत नाही. आदाम नेहमीच एक प्राणी असणार आहे. म्हणून, देव त्याच्या निर्मितीपेक्षा वेगळा आहे आणि आपल्या सभोवतालच्या जगाशी त्याची तुलना केली जाऊ शकत नाही, ह्या वस्तुस्थितीविषयी स्पष्ट असल्याशिवाय ख्रिस्ती मनुष्य मानवजातीच्या उत्पत्तीविषयी बोलू शकत नाही.


हे सांगून झाल्यावर, पवित्र शास्त्र आपल्याला असे सांगते की, आदामाला देवाच्या प्रतिमेत उत्पन्न करण्यात आले. (उत्पत्ती १:२६), ज्यावरून असे दिसून येते की, आदाम दैवीही नाही, किंवा काळाच्या सुरवातीपासून अस्तित्वात असलेल्या एखाद्या अनिश्चित प्रक्रियेचे फळ देखील नाही. आदाम देवाच्या एका सरळ कृतीने निर्माण करण्यात आला, ज्यामध्ये जमिनीवरील मातीपासून आदामाचे शरीर निर्माण करण्यात आले आणि जेव्हा देवाने पहिल्या मानवात आपला श्वास फुंकला तेव्हा त्याचा आत्मा निर्माण करण्यात आला (उत्पत्ती २:७). ही दैवी प्रतिमा ह्व्वेला देखील दिली गेली आहे (उत्पत्ती २:४-२४). म्हणून मानव असणे म्हणजे, स्त्री किंवा पुरुष असणे आणि आत्मिक (आत्मा) आणि भौतिक (शरीर) घटकांच्या ऐक्यामध्ये अस्तित्वात असणाऱ्या शरीर आणि आत्मा ह्या दोन्हीमध्ये देवाचे प्रतिमा वाहक होणे. देवाचे प्रतिमा वाहक बनणे म्हणजे देवाचे जे मूळ स्वरूप आहे त्याची प्रतिमा बनणे.


सर्व स्त्री-पुरुष देवाचे प्रतिमा वाहक असल्यामुळे आपण खरोखर देवासारखे आहोत आणि ज्यांना देवाचे संक्रामक गुणधर्म म्हणतात ते सर्व आमच्यामध्ये आहेत – तरीही प्राणीमात्रांच्या स्वरूपात आणि प्रमाणात. “मनुष्य”प्राणी म्हणून ह्या सर्व गोष्टी आपल्यामध्ये आहेत. हेच गुणधर्म आपल्याला “मानव” प्राणी बनवते, जे प्राण्यांच्या साम्राज्यात नैतिक आणि बुद्धीमत्तेच्या क्षमतांमध्ये वेगळे आणि श्रेष्ठ आहेत. खरे तर, देवाने पहिला मनुष्य आदाम “खूप चांगला” असल्याचे घोषित केल्यामुळे आदाम आणि हव्वा ह्यांची निर्मिती ही निर्मितीच्या वृतांताचा सर्वोच्च बिंदू असल्याचे सिद्ध होते (उत्पत्ति १:२८-३१).


आपण दैवी प्रतिमा वाहक आहोत ह्या वस्तुस्थितीचे परिणाम अनेक भिन्न पैलू असलेले आणि गहन आहेत. पहिला, निर्मिती हे प्रकट करते की आदाम हा मानवी वंशजांचा जैविक आणि सांघिक असा दोन्ही प्रमुख आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर, आदाम हा पहिला मानव होता आणि सर्व मानव त्याचे जैविक वंशज आहेत. हे थेट वंशजांच्या एकतेच्या प्रश्नाविषयी (आपल्या त्वचेचे रंग आणि शारीरिक रूपे भिन्न असूनही) आणि देवासमोर व्यक्तींच्या समानतेच्या प्रश्नाविषयी विचार करायला लावते. दुसरा, जेव्हा आदामाला बऱ्या-वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या फळ न खाण्याची आज्ञा देण्यात आली तेव्हा, आपल्या वंशाजांचा जैविक प्रमुख म्हणून, एदेन बागेतील सुरवातीच्या काळात आदामाने देवासमोर संपूर्ण मानवजातीचे प्रतिनिधित्व केले.


आदामाला त्याच्या सर्व वंशजांसाठी आणि त्यांच्या वतीने कार्य करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आदामाने एदेन बागेत जे केले, ते त्याने आमच्या वतीने, आमचा प्रतिनिधी ह्या नात्याने केले. आदामाला नीतिमान, पवित्र असे निर्माण करण्यात आले होते आणि त्याला देवाविषयीचे खरे ज्ञान होते ह्या एका वस्तुस्थितीवरून इतर अनेक जबाबदाऱ्या सूचित होतात (इफिस. ४:२४; कलस्सै. ३:१०), ह्याचा अर्थ आदाम देवासमोर नीतिमान होता. आदामाला निर्माण केले तेव्हा तो देवासमोर केवळ निर्दोषच नव्हता, तर पवित्र आणि प्रामाणिक देखील होता, देवाच्या सर्व आज्ञा पाळण्याची आणि सामाजिक जनादेश पूर्ण करण्याची नैसर्गिक क्षमता त्याच्याकडे होती (उत्पत्ति १:२८).


आदामाचे आत्मिक स्वरूप (उदाहरणार्थ, शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा जिवंत राहतो ह्या वस्तुस्थितीच्या अनुषंगाने) मानवी स्वरूपाच्या ह्या घटकावर प्रकाश टाकतो. आपले आत्मे अदृश्य, अविभाज्य आणि अमर आहेत. ह्या व्यतिरिक्त, आपण महान बौद्धिक क्षमता, तसेच योग्य-अयोग्य ठरवण्याची नैतिक क्षमता असलेले बुद्धीमान प्राणी म्हणून निर्माण केलेले आहोत (रोम. २:१२-१६). ह्यावरून असे देखील सूचित होते की सर्व स्त्री-पुरुष देवाने निर्माण केलेल्या व्यवस्थेद्वारे (सर्वसामान्य प्रकटीकरण) आणि त्याच्या वचनाद्वारे (विशेष प्रकटीकरण) केलेले प्रकटीकरण समजून घेण्यास सक्षम आहेत. सुधारित ईश्वरविज्ञानशास्त्रज्ञ बऱ्याच वर्षांपासून असा युक्तिवाद करत आले आहेत की आपली शरीरे आत्म्याचे सक्षम “अवयव” आहेत. आणि विशेषत: शरीर-आत्मा ह्या ऐक्यातून हे संक्रामक गुणधर्म प्रकट होतात.


असे मूळ नितीमत्व, पवित्रता आणि ज्ञान असलेला दैवी प्रतिमा वाहक म्हणून, आदामला देवाचा उप-शासक म्हणून सर्व सृष्टीवर प्रभुत्व देण्यात आले. देवाने केवळ सर्व काही चांगले उत्पन्न केले इतकेच नव्हे, तर त्याने त्याच्या अद्वितीय दैवी प्रतिमा-वाहकावर जगावर आणि त्याच्या सर्व प्राण्यांवर राज्य करण्याची जबाबदारी सोपवली. आदामाला अन्नासाठी सर्व वनस्पती आणि प्राणी देण्यात आले होते आणि ज्या प्राण्यांवर त्याला प्रभुत्व देण्यात आले होते त्यांची नावे देण्याचे काम त्याला देण्यात आले होते (उत्पत्ति २:१९). आदाम एक दैवी प्रतिमा वाहक असल्यामुळे तो ह्या कार्यासाठी योग्य आणि सुसज्ज होता.


मनुष्य देवदूतांपेक्षा किंचित कमी आहे असे जेव्हा स्तोत्रकर्ता म्हणतो तेव्हा त्याला हेच म्हणायचे आहे (स्तोत्र. ८:५). आदामाची निर्मिती हा देवाच्या सर्व क्रियाशील कृतीचा उच्च बिंदू होता, ती नंतर विचार करून केलेली कृती नव्हतो. दैवी-प्रतिमा वाहक ह्या नात्याने, आदामने त्याच्या निर्माणकर्त्याच्या नावाने पृथ्वीवर राज्य करायचे आणि त्याच्यावर अधिकार गाजवायचा होता. त्याच्याकडे खरी नीतिमत्ता, पवित्रता आणि ज्ञान आहे आणि त्याचे कार्य पृथ्वीवर एदेन येथे देवाच्या मंदिराची बाग विकसित करणे हे आहे. आणि तो ह्या कार्यासाठी सर्वतोपरी योग्य आहे.

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.