आजच्या चर्चेसमध्ये, पुष्कळ तरुण लोक प्रतीकात्मक विश्वासाने नावापुरते सभासद होतात किंवा बायबलाधार नसलेले सिद्धांत आणि उपासना पद्धत स्वीकारून सुवार्तेचे सत्य सोडून देतात. ह्या अपयशाचे एक प्रमुख कारण कौटुंबिक उपासनेवर पुरेसा भर देण्याचा अभाव हे आहे.
यहोशवा २४:१४-१५ म्हणते,” तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्विकतेने व खऱ्या मनाने करा आणि महानदीपलीकडे व मिसर देशात ज्या देवांची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा; महानदीपलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहा त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवांची? “मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार”.
ह्या उताऱ्यातील तीन गोष्टींकडे लक्ष द्या : पहिली गोष्ट, यहोशवाने उपासना किंवा देवाची सेवा करणे ऐच्छिक अशी केली नाही; दुसरी गोष्ट, यहोशवाने स्वतःच्या उदाहरणाने कुटुंबांमध्ये देवाची सेवा करणे अमलात आणणे भाग पाडले; आणि तिसरी गोष्ट, १५व्या वचनातील सेवा हा शब्द एक समावेशक असा शब्द आहे आणि पवित्र शास्त्रात पुष्कळ वेळां त्याचे भाषांतर उपासना असे करण्यात आले आहे. निःसंशय प्रत्येक देवाचे भय धरणारा पती, पिता, आणि पाळकाने यहोशवाबरोबर “मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार” असे म्हटलेच पाहिजे. आम्ही एक कुटुंब म्हणून परमेश्वराचा शोध घेत राहू, त्याची उपासना करू, आणि त्याची प्रार्थना करू. आम्ही आदेश, सूचनांची भरलेले त्याचे वचन वाचू, आणि आमच्या कुटुंबात त्यातील शिकवणी विश्वासूपणे अमलात आणू”
युगानुयुगे सुवार्तेच्या सत्याद्वारे अगणित लक्षावधी लोक जिंकणाऱ्या गुणकारी शक्ती असलेल्या कौटुंबिक उपासनेचे महत्व लक्षात घेतां, देव कुटुंब प्रमुखांना जिवंत देवाची उपासना करण्यात त्यांच्या कुटुंबांचे नेतृत्व करण्यासाठी शक्य ते सर्व काही करायला सांगतो ह्याचे आपल्याला मुळीच आश्चर्य वाटायला नको. आपली कुटुंबे त्यांची निष्ठा देवाला देणे लागतात. देवाच्या मार्गांत आपल्या मुलांना चालवण्यासाठी देवाने आपल्याला एका अधिकार पदावर ठेवले आहे. (इफिस ६:४). पवित्र अधिकार परिधान केलेले असे आपण आहोत म्हणून आपल्यावर आपल्या मुलांना भविष्यसूचक दैवी संदेश शिकवण, याजकीय रदबदली, आणि राजवैभवी मार्गदर्शन पुरवण्याचे ऋण आहे.
कुटुंबाच्या प्रमुखांनो, आपण कौटुंबिक उपासना आपल्या घरात स्थापन केलीच पाहिजे. देवाला हे हवे आहे की आपण केवळ खाजगीरीतीनेच नव्हे तर करारबद्ध शरीर आणि सहभागी समाजाचे सभासद म्हणून जाहीर रीतीने, आणि कुटुंब परिवार म्हणून सामाजिक रीतीने त्याची उपासना केली पाहिजे. तुमच्या घरात देवाला सन्मान देणारी कौटुंबिक उपासना स्थापन करण्यात तुमच्या साहाय्यासाठी येथे काही सूचना दिल्या आहेत.
पवित्र शास्त्रानुसार, देवाची सेवा आज काही विशेष कौटुंबिक उपासना कृतींद्वारे पुढील तीन मार्गांनी केली पाहिजे :
(१) देवाच्या वचनातील दैनंदिन सूचना. दररोज त्याचे वचन वाचून आणि त्यातील सूचना पाळून देवाची उपासना केली पाहिजे. एक योजना आखा, विशेष प्रसंगांना विचारात घ्या, कुटुंबाला समाविष्ट करा, आणि खाजगी बायबल वाचन आणि अभ्यासाला उत्तेजन द्या. प्रश्नोत्तरांद्वारे आईबाप आणि मुलांनी परस्पर आत्मिक लाभाकरिता पवित्र सत्याविषयी दररोज चर्चा करावी. (अनु. ६:६-७). बायबलनुसार शिक्षणाकरिता, साधी सरळ अर्थाची भाषा, शुद्ध धर्मतत्व, लागूकरणात समर्पकता, आणि ममतापूर्ण पद्धतवापरा. सर्वांचे लक्ष शिक्षणाकडे आहे ह्याची खात्री करा.
(२) देवाच्या सिंहासनापुढे दररोजची प्रार्थना. यिर्मया १०:२५ म्हणते, “जी राष्ट्रें तुला ओळखीत नाहीत, ज्या जाती तुझ्या नामाचा धावा करीत नाहीत त्यांवर तू आपल्या संतापाचा मारा कर.” थॉमस ब्रूक्स म्हणाला तसे, ” आकाशातील सर्व वादळांच्या माऱ्यापुढे असुरक्षितपणे उघडे असेलेले म्हणजे प्रार्थनेविना एखादे कुटुंब हे छप्पर नसलेल्या एखाद्या घरासारखे असणे असे आहे, .”प्रार्थना करणाऱ्यांसाठी, प्रार्थना त्रोटक असावी, उथळपणा नसणारी पण साधी सरळ असावी, स्पष्ट, थेट बोला, नेहमीप्रमाणे स्वाभाविक तरी गंभीर असा, आणि विविधतेकरिता प्रयत्न करा.
(३) दररोज देवाच्या स्तुतीचे गायन म्हणणे. स्तोत्र ११८:१५ म्हणते, “उत्सवाचा व तारणाचा शब्द नीतिमानांच्या वस्तीत (किंवा घरांत) आहे; परमेश्वराचा हात पराक्रम करतो.” गाणे म्हणण्याचा हा स्पष्ट निर्देश आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो की हा आवाज नीतिमानांच्या तंबूत आहे (केवळ तो आवाज असलाच पाहिजे असेनाही). आम्ही असा सल्ला देतो की तुम्ही शुद्ध धर्म तत्वांवर आधारलेली गाणी गायली पाहिजेत, सर्वप्रथम आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, बिनचूक ईशस्तुतीची गाणी न दुर्लक्षितां, स्तोत्रें गा, तुमच्यामध्ये लहान मुलें असतील तर साधी गाणी गा, आणि मनापासून, आवडीने गा.
काही लोक कौटुंबिक उपासनेच्या नियमित वेळांबाबत हरकत घेतात. कौटुंबिक उपासना टाळण्यासाठी सबबी शोधू नका. आपण हे लक्षात ठेवू या की देव चर्च पुनरुज्जीवन येण्यासाठी बरेच वेळां कौटुंबिक प्रार्थनेच्या पुनर्स्थापनेचा उपयोग करून घेतो. कुटुंब ज्या रीतीने चालते, त्याच रीतीने चर्च चालते. कौटुंबिक उपासना घर कसे चालेल हे ठरवणारे निर्णायक वास्तविक असते.