ख्रिस्तसदृष्य पतीची भूमिका करणे

पतींनी, कसे वागावे ह्यावर लिहिलेले लांबलचक लेख पुरुषांना आवडत नाहीत — विशेषतः, आपण आपल्या पत्नीला कसे वागवले पाहिजे ह्यावरील लेख — म्हणून आता येथे इफिस ५ आधारित आपली कर्तव्यें, त्यांचा नमुना आणि त्यांचे आचरण यांचा गोषवारा देत आहोत.

आपला आदर्श उदाहरण ख्रिस्त आहे. लग्नाकरिता आपला मूलभूत नीतिनियम हा आहे, “पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळींवर प्रीती केली तशी तुम्हीही आपआपल्या पत्नीवर प्रीती करा” (इफिस ५:२५अ) . ख्रिस्ताचा त्याच्या वधुवर प्रीती करण्याचा आदर्श अनुसरून, आपल्यापैकी प्रत्येकाने त्याच्या पत्नीवर ह्या मार्गांनी प्रीती करायची आहे:
१. अगदी पूर्णपणे. ख्रिस्त “स्वतःला” त्याच्या वधुकरीता देतो — त्याचे संपूर्ण स्वत्व (व.२५). तो काहीही राखून ठेवत नाही. अर्थात त्याने जे केले आहे (कालवरी विचारात घ्या), जे करत आहे (तो स्वर्गात सतत करत असलेल्या मध्यस्थीचा विचार करा), आणि जे करील (त्याच्या दुसऱ्या येण्याविषयी विचार करा). आपल्याला देखील आपण स्वतःला आमूलाग्र रीतीने, पूर्णपणे, अस्सल प्रितीने आपल्या स्वताला पत्नींना द्यावे असे सांगण्यात आले आहे.

२. वस्तुस्थितीनुसार आणि हेतुपुरस्सर. चर्चवर डाग, सुरकुत्या असल्या तरी ख्रिस्त चर्चवर प्रीती करत राहतो, यासाठी की त्या महान दिवशी तो मंडळीला त्याची परिपूर्ण वधू अशी त्याच्या पित्यापुढे सादर करू शकेल.(वव २६-२७). आपली प्रीती ही (आपल्या पत्नी देखील आपल्यासारख्याच पापी आहेत हे स्मरून) खरीखुरी आणि हेतुपुरस्सर (त्यांच्या पावित्र्यासाठी) केलेली अशी दोन्ही गुण असलेली प्रीती असली पाहिजे.

३. त्यागबुद्धीने. ख्रिस्त अनेक त्याग करून व खर्ची पडून त्याच्या वधूचे पालनपोषण करतो आणि तिच्याविषयीच्या प्रीती भावना मनात जतन करतो. (वव २८-२९). तशाच रीतीने आपण पती आपल्या पत्नींना आपण आपल्या शरीराची काळजीपूर्ण निगा राखतो तशीच त्याग सोसून व खर्ची पडून त्यांच्यावर प्रीती केलीच पाहिजे. जर तुमच्या डोळ्यात काही तरी गेले तर तुम्ही ताबडतोब हळुवार रीतीने त्याकडे लक्ष देता. तुमच्या पत्नीला काही दुखत असेल तेव्हा तिची तशी काळजी घेता का?

आपण हा आदर्श कित्ता कसा अनुसरावा?
एक व्यक्ती म्हणून तुमच्या पत्नीत तुम्हाला खूप आवड, रस, कुतूहलह, रुची, गोडी असली पाहिजे. तिच्या सर्व गोष्टींबाबत काळजी घ्या. तिने तो दिवस कसा घालवला आणि मुलें त्या दिवशी कशी वागलीत हे तिला विचारा. तिची स्वप्ने, तिला वाटणारी भीती, आणि नैराश्य इत्यादीविषयी तिची विचारपूस करा. ती सांगेल ते लक्षपूर्वक ऐकून घ्या म्हणजे ती आणखी मोकळेपणाने अधिक सांगेल.

तुमच्या पत्नीकरिता खाजगीत आणि तिच्या सोबत तुम्ही प्रार्थना करा. तिच्या गरजां देवापुढे मांडा. तिच्या आत्मिक वाढीकरिता आणि तिच्या शारीरिक आणि भावनिक अडचणींच्या निवारणासाठी कळकळीने प्रार्थना करा देवाच्या कृपेच्या सिंहासनापुढे तिच्या वतीने तुम्ही दाखवलेले बळ आणि तुमची कोमलता तिला प्रत्येकक्षात अनुभवू द्या.

तुमच्या पत्नीवर मुक्तपणे भरपूर प्रीती करा. तिच्या दोषांसह, ती जशी आहे तशी त्या पत्नीवर प्रीती करा. तिला संतुष्ट करा (१ करिंथ ७:३३). तिचा आदर करा, तिला सन्मान द्या, आणि तिला कोमलपणे वागवा. (१ पेत्र ३:७). प्रत्येक दिवशी तुम्ही तिच्यावर किती खूप प्रीती करता ते तिला सांगा. तिच्यावर ममता, आपलेपणाचा वर्षाव करा. देवाने तुम्हाला दिलेली खास देणगी मानून तुमच्या हृदयात तिला जतन करा.

तिच्यावर प्रशंसेची रास तयार करत राहा. तुम्हाला ती किती सुंदर आणि अद्भुत दिसते हे तिला सांगा. तुमच्या प्रशंसोद्गारात, जवळीक, सलगी, नेमके आणि अचूक शब्द, सृजनशीलता, असली पाहिजे आणि गोड शब्द पुन्हापुन्हा बोला. तिचा प्रेमळपणा, तिचे स्मित, तिचा पोशाख, तिचे केस आणि तिच्या हजार इतर गोष्टींची प्रशंसा करा. प्रीती आणि ममतेने भरलेल्या आवाजात, प्रीती साठवलेल्या नेत्रांत, आणि प्रेमावेगाने मिठी मारणाऱ्या बाहूंनी तिची प्रशंसा करा. इतर लोकांच्या उपस्थितीत तिची स्तुती करा (नीती.३१:२८). तुमच्या मुलांना तिच्याविषयी कधीही अनादरानें बोलू देऊ नका.

तुमच्या पत्नीला काय आवडते ते जाणून घ्या. दोघांनी एकत्र चालणे तिला आवडते का? तिच्यासोबत चाला. बाहेर जेवायचे का ? तिला बाहेर घेऊन जा. शक्य होईल तितके, तिला जे काही आवडते त्यात तुमची आवडही वाढवा. दोघांमध्ये सामाईक मित्रमंडळी आणि आवडी निवडी वाढवा. दोघांनीही करण्यासारख्या जितक्या अधिक गोष्टीं तुम्हाला आढळतील, तितके तुमचे वैवाहिक जीवन अधिक सुखी होईल.

तुमच्या पत्नीला बायबलानुसार हळुवार, स्पष्ट सेवक नेतृत्व पुरवा, निर्दय हुकूमशाही नव्हे. ख्रिस्त तुमचा नमुना म्हणून पुढे ठेवून, तिची सेवा करण्याचा आनंद घ्या. (मत्तय २०:२५-२६). तुमची पत्नी आणि मुलांचा आत्मिक पुढारी व्हा. घरात पिता-मेंढपाळ, एक सौम्य, प्रेमळ महामानव बनून राहा.

पुरुष आणि स्त्रियांमधील भिन्नता कधीही विसरू नका; तुमच्या पत्नीला आणि ती जशी आहे तिला प्रतिसाद देणे जाणण्यात निपुण व्हा. तुमच्या पत्नीशी तुमची जी मैत्री आहे तिच्याहून तुमच्या इतर कोणत्याही नातेसंबंधाला अधिक प्राधान्य देऊ नका. लहानसहान गोष्टींवरून तिच्यावर कधीही टीका करू नका; मोठ्या गोष्टींचे म्हणाल तर, खूप हळुवारपणे आणि प्रीतीपूर्ण रीतीने, आणि योग्य वेळी, आणि योग्य वातावरणात त्याविषयी बोला. तुमच्या पत्नीला इतर लोकांच्या तुलनेत कधीही प्रतिकूल प्रकाशात दाखवू नका, किंवा इतर लोकांसमोर तिच्यावर टीका करू नका. तुमच्या पत्नीला पुरेसे स्वातंत्र्य द्यायला विसरू नका म्हणजे नीतिसूत्रे ३१च्या स्त्रीची, स्वतःची एक नवीन आवृत्ती होण्यासाठी ती झटेल. तिला गुदमरवून टाकू नका किंवा तिच्या व्यक्तिमत्वाला आवर घालू नका. एक सौजन्यशील सज्जन गृहस्थ असणे कधीही थांबवू नका.

शेवटी हे स्मरणात ठेवा : जर तुम्ही आणि तुमची पत्नी ही दोघेही देवाला प्रथम स्थान, एकमेकाला दुसरे, आणि तुम्हा स्वतःला तिसरे स्थान, देता तर एका खऱ्याखुऱ्या आशीर्वादित वैवाहिक जीवनाची शाश्वती तुम्हाकडे असेल.

डॉ. जोएल बीके
डॉ. जोएल बीके

जोएल रॉबर्ट बीके (जन्म कलामाझू, मिशिगन येथे, डिसेंबर 9, 1952) एक अमेरिकन सुधारित पाद्री आणि धर्मशास्त्रज्ञ आहे. ते ग्रँड रॅपिड्स, मिशिगनमधील हेरिटेज रिफॉर्म्ड मंडळीचे मंत्री आहेत आणि प्युरिटन रिफॉर्म्ड थिओलॉजिकल सेमिनरीचे अध्यक्ष आहेत, जिथे ते सिस्टेमॅटिक थिओलॉजी आणि होमलेटिक्सचे प्राध्यापक देखील आहेत.