सुवार्तेविषयी योग्य विचारसरणी करण्याने सुवार्तेनुसार योग्य जीवनचर्या निर्माण होते. जोशपूर्ण ख्रिस्तित्व एखाद्या मानसिक पोकळीत राहत नसते; आपण देवाविषयी, ख्रिस्तांविषयी, आणि आपणास्वतःविषयी योग्य विचार केलाच पाहिजे.
पुष्कळ मार्गानी, आपण आपणा विषयी जो विचार करतो ही गोष्ट, सुवार्ते विषयी जे सत्य आहे असे आपण जाणतो आणि ते सत्य आपण दैनंदिन जीवनाला कसे लागू करतो यांना जोडणारी एक कडी असते. सोप्या भाषेत सांगायचे तर, आपण स्वताला कसे मानतो ते आपल्या पवित्रीकरणसाठी अतिशय महत्वाचे आहे, आपल्या रोजच्या अनुभवात दिसणारा सुवार्तेचा तो परिणाम आहे. खेदजनक सत्य हे आहे की आपल्या पापाविरुद्ध लढाईत बहुतेक वेळ आपण आपले स्वतःचे सर्वात दुष्ट शत्रू झालेले असतो. आपल्या आत एक अति भयंकर लढाई जुंपलेली असते.
रोम ६, हा ईश्वरविद्यान आणि पवित्रीकरणाची कार्यपद्धती ह्या विषयीचा सर्वोच्च पातळीचा शास्त्रभाग आहे. अर्थपूर्ण रीतीने, पौल त्या कार्यपद्धतीतील तीन पायऱ्यांची रूपरेषा दाखवतो: काय जाणून घ्यावे, काय ओळखून घ्यावे, आणि कसे वागावे. आपल्याला त्याचे मरण व पुनरुत्थान ह्या दोहोंच्या संदर्भात; ख्रिस्ताशी आपला संयोग जाणून घ्यायचा आहे, ख्रिस्ताशी संयोग हा आपल्या जीवनाचा उगम आहे (v 3-10) .(वव ३-१०). आपल्यावर सत्ता गाजवू न देता आणि आणि पापाच्या अधिपत्यापुढे शरणागती न पत्करतां आपल्याला आपली वागणूक ठेवायची आहे. (व १२-१३). जे आपण जमजून घ्यायचे आहे ते ह्या दोन गोष्टीं एकत्र आणते: “तसे तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःस पापाला मेलेले खरे, पण देवाप्रीत्यर्थ जिवंत झालेले असे माना” (व ११). स्वतःला पाहून समजण्याची क्षमता किंवा आपण स्वतःला कसे समजतो हे ज्ञान आपण जे जाणतो त्यातून येते आणि त्याची परिणती आपल्या वागणुकीत होते. योग्य विचारसारणीतून योग्य जीवनशैली उपजते.
“जाणणे” हे सर्वाधिक सूचक असे क्रियापद आहे. ह्या शब्दातून आपला इंग्रजी शब्द “तर्कशास्त्र” आला आहे, आणि ग्रीक भाषेतील ह्या शब्दाचा अर्थ “हिशेबात धरणे”, “विचारात घेणे”, किंवा “एखादी गोष्ट सत्य आहे असे समजणे” असा आहे. ज्यावर विश्वास ठेवला आहे त्याचे महत्वपूर्ण ग्रहण करणे ह्यावर ह्या शब्दाने जोर दिला जातो. ख्रिस्ती व्यक्तीने जे आकलन करून घ्यायचे आहे त्यावरच त्याने विश्वास ठेवायचा आहे: ख्रिस्ता बरोबर झालेल्या ऐक्यामुळे पापाला मेलेले असणे. (व ८). आपण ह्या सत्याची व्यक्तिगत समर्पकता स्वीकारलीच पाहिजे. आपण आपले स्थान निश्चिती आणि कायदेशीरपणे ख्रिस्तामध्ये आहोत ही स्थिती आपण प्रत्यक्षपणे अनुभवत आहोत असे आपण समजले पाहिजे. विश्वासणाऱ्याने आपण काय आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्तात आपले काय स्थान आहे हे कधीही दृष्टीआड करू नये किंवा विसरून जावू नये. अतिशय ठळक अशी ही गोष्ट आहे की पवित्रीकरणाच्या प्रक्रियेकरिता महत्वाचा असलेला हा शब्द “जाणणे” नीतिमान ठरवल्या जाण्याच्या सिद्धांताच्या बाबतीत देखील वापरलेला दिसतो (रोम ४:३-४) . परंतु, एक फरक आहे. नीतिमान ठरवण्याच्या प्रक्रियेत त्या क्रियापदाचा कर्ता करता देव आहे. तो ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताची गुणसंपन्नता पाहतो आणि ख्रिस्तावर विश्वासणाऱ्या त्या पापी व्यक्तीला तोपापापासून कायदेशीरपणे मुक्त झाला आहे, यापुढे कोणत्याही दंड किंवा शिक्षेस पात्र नाही,आणि निःसंशय ख्रिस्ताच्या नीतिमत्वाची वस्त्रें धारण केलेला असे समजतो (जाणतो). पवित्रीकरणात संत हा त्या क्रियापदाचा कर्ता असतो. आपण ख्रिस्ताच्या त्याच प्रायश्चित्ताची गुणसंपन्नता पाहतो आणि आपण आता पापाच्या सत्ताधिकारापासून मुक्त झालो आहोत असे मानतो (जाणतो). आपण वचन९-१०मध्ये ख्रिस्तांविषयी काय जाणतो (त्याचे पुनरुत्थानाचे सत्य (ऐतिहासिकघटना ) उफराटी करता येण्याची अशक्यता, मरणापासून मिळवलेली बंधमुक्ती, देवाप्रत त्याचे जगणे) त्याची तुलना आपण आपणा स्वताबद्दल जे समजतो (जाणतो) (आपले पापाला मरणे आणि देवासाठी जगणे ) ह्याच्याशी करा. ख्रिस्तांविषयी जे खरे आहे, त्यावर आपणास्वतःसाठी आपण हक्क सांगतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, देव आपल्याला ख्रिस्तात जसे समजतो तसेच आपण आपणा स्वताला समजायचे आहे.
तर मग, आपण आपणा स्वताला जसे पाहतो, ते सुवार्तेविषयी विचार करणे आणि सुवार्तेच्या वास्तवात जगणे ह्याहून अधिक काही नाही. ख्रिस्तात, आपण त्याचे मरण आणि त्याचे पुनरुत्थान ह्या दोन्ही गोष्टीत संयुक्त झालेले असे आहोत. (व ५). देव आपल्याला जसे समजतो तसे आपण
आपणा स्वतःला समजणे ह्याचा अर्थ हा आहे की जेव्हा ख्रिस्त मेला तेव्हा आपण मेलो हे ज्ञान आपण आपल्या अखंड अनुभवाचे प्रमुख, स्थायी अंग समजले पाहिजे. आपण आपल्या अनुभवात, त्याच्या पाप करण्याच्या प्रवृत्तीसह “जुन्या मनुष्याला” ठार करणे हा वधस्तंभाचा हेतू प्रमुख स्थानी मानला पाहिजे. आपल्याला पाप करायला भाग पाडणाऱ्या नैसर्गिक कलापासून मुक्त करते ते ख्रिस्तात आपल्यासाठी असणारे नवीन जीवन हे देखील आपल्या अनुभवाचा भाग असलाच पाहिजे.
आपणा स्वतःला ख्रिस्ताशी ऐक्य झालेल्या स्थितीत आहोत असे मानणे हेच पवित्रीकरण आणि पापावर विजय मिळवण्याचे गुपित आहे. वधस्तंभाच्या सावलीत पाप आपली आकर्षकता गमावते. ख्रिस्त आपल्यासाठी मेला आणि आपण त्याच्यासोबत मेलो हे आपल्याला कळल्यानंतर पाप आकर्षक कसे असू शकते? निश्चितच आपण स्वतःला ज्या पातळीचे समजले पाहिजे त्यापेक्षा अधिक उच्च पातळीचे समजू नये, पण “देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने” स्वतःला मानले पाहिजे. (रोम १२:३). आपण विश्वासानेच आपणा स्वतःला ख्रिस्तात पाहतो. त्यालाच योग्य विचार करणे म्हणतात.