स्व: नकार / आत्मत्याग

स्व:नकार हे ख्रिस्ताच्या अनुयायांचे एक निश्चित असे लक्षण असते. प्रभू येशू लूक ९:२३मध्ये म्हणतो, ” जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.” आत्मत्याग ही पूर्णपणे आवश्यक गरज आहे: जर आत्मत्याग नसेल तर ख्रिस्ताचे अनुयायी होता येत नाही. आत्मत्याग एवढी महत्वाची गोष्ट असल्यामुळे, आत्मत्याग म्हणजे नक्की काय आणि तो कसा करावा हे समजून घेणे महत्वाचे आहे.

ख्रिस्ती आत्मत्याग म्हणजे काय? ख्रिस्तावर पूर्णपणे विश्वास ठेवणे आणि त्याच्या वचनाच्या आज्ञापालनास विरोध करणारे काहीही आपल्या जीवनात असेल त्याचा नकार करावा अशी हक्काची मागणी ख्रिस्त करतो. थॉमस वॉटसन दाखवतो त्यानुसार, असे प्रसंग येतात जेव्हा ख्रिस्ती व्यक्तीने त्याची भूक, सुखसोयी, पैसा, यांचा नकार आणि स्वतःच्या जिवाला जे हवे आहे त्याचा देखील त्याग केला पाहिजे. तरीही, आत्मत्यागाचे मर्मस्थल काय आहे? महान धर्मोपदेशक एबेनेझर अर्स्कीन आणि जेम्स फिशर, हे त्यांच्या असेम्ब्लीज शॉर्टर कॅटेकिझम एक्सप्लेन्ड मध्ये आत्मत्यागाचे एक सुलभ आणि बिनचूक वर्णन देतात. विशेषतः तीन गोष्टीं सोडून देणे असे आत्मत्यागाचे वर्णन ते करतात.

सोडून द्यायची पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची सुजाणता/शहाणपण. “देवाच्या वचनात प्रकट केलेल्या सुज्ञतेशी तुलना केल्यानंतर आपल्याला आपले स्वतःचे दुराचारी विचार, ज्ञान केवळ मूर्खपणाच आहे हे जेव्हा पाहायला भाग पाडण्यात येते तेव्हा आपण आपले स्वतःचे शहाणपणावर अवलंबून राहणे सोडून देतो. (१ करिंथ ३:१९).

सोडून द्यायची दुसरी गोष्ट म्हणजे स्व:ताची ईच्छा . “जेव्हा देवाचे नीतिनियम आपले अंतःकरण व जीवनाचा एकमेव नियम बनतो (स्तोत्र ११९:१०५) आणि आपणासाठी देवाची इच्छा हीच सर्वोत्तम अशी पूर्ण मूक संमती आपण दिलेली असते तेव्हा स्व:ताची ईच्छा सोडून दिली जाते . (रोम ८:२८).”

सोडून देण्याची तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःचे नीतिमत्व. हे स्वनितिमत्व सोडून देण्याद्वारे, “देवाच्या नीतिमत्वापुढे आपण नमतो, किंवा अनंतकालीन जीवनाकरिता आपण केलेली कळकळीची विनंती समग्र रीतीने आणि पूर्णपणे ख्रिस्ताने, जामीन म्हणून, आपल्या जागी आणि आपल्या ऐवजी केलेले देवाचे प्रशंसनीय आज्ञापालन आणि संतुष्टीकरण ह्यांवर स्थापित करतो. (फिल. ३:८-९).

आपण आत्मत्याग कसा आचरणात आणतो? स्वतःचे शहाणपण, स्व:ताची ईच्छा , आणि स्वतःचे नीतिमत्व सोडून देऊन आपण देवाच्या कृपेने आत्मत्याग करण्याचा कसून प्रयत्न करत असतांना, तीन सत्यें लक्षात ठेवणे फायदेशीर असते.

पहिले, आपण केवळ आत्म्याच्या सामर्थ्यानेच आत्मत्याग करतो ह्याचे आपण स्मरण ठेवतो तेव्हा आपल्याला साहाय्य मिळते. पवित्र आत्म्याच्या नवजीवन देण्याच्या सामर्थ्याने तो आपल्याला आपल्या स्वतःच्या ज्ञानाचा मूर्खपणा आणि नीतिमत्वाचा अभाव दाखवतो. (रोम ८:७; २ करिंथ ५:१७; कलसे ३:१०). आपली सुज्ञता ख्रिस्त येशू ह्या व्यक्तीत आणि त्याच्या कार्यात असल्याचे तो उलगडून दाखवतो. (ईयोब ३३; १ करिंथ १:२४; इब्री १:१-३). आपल्यामध्ये कार्य करून आत्मत्याग करण्याची इच्छा तो निर्माण करतो (फिल २:१३) आणि ख्रिस्ताचे नीतिमत्व आपल्याला लागू करतो (रोम ३:२१-२६; गलती ५:५). आत्मत्याग करण्यात आपल्याला आलेल्या अपयशाने आशा सोडण्याचा मोह जेव्हा आपल्याला होतो तेव्हा आपल्या उत्तेजनासाठी ख्रिस्ताच्या आत्म्याचे खात्रीशीर बळ आपल्याकडे असते.

दुसरी गोष्ट, आपल्याला प्रार्थनेत साहाय्य लाभते. आपण स्वतःचे शहाणपण, स्व:ताची ईच्छा , आणि स्वतःचे नीतिमत्व सोडावे अशी हक्काची मागणी प्रार्थना करते. “आमच्या स्वर्गातील पित्या”ला प्रार्थना करून, त्याचे नाम “पवित्र मानल्या जावो” अशी उघड कबुली बोलून, आणि “आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव” अशी प्रार्थना करण्यासाठी, आपण आपले शहाणपण बाजूला सारून त्याच्या सुज्ञतेवर विश्वास ठेवण्याची गरज असते. याशिवाय, जेव्हा “जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो” असे आपण विनवतो, आणि जेव्हा आपण हे कबूल करतो की “राज्य, सामर्थ्य, आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत तेव्हा स्व:ताची ईच्छाला वाव राहत नाही. शेवटी, जेव्हा आपण खरेपणाने “आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यांस ऋण सोडले आहे तशी तू आम्हास आमची ऋणे सोड” असे मागतो तेव्हा स्वतःला नीतिमान आहोत असे समजणे अशक्य आहे. (मत्तय ६:९-१३). जेव्हा तुम्ही आत्मत्याग करण्यासाठी धडपड करत असतां, विशेषतः नेहमीच्या सवयीने ज्या पापाशी तुम्ही लढा देत असतां, तेव्हा प्रार्थना करा; देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देईल आणि त्याच्या सुज्ञतेने, त्याच्या इच्छेने आणि त्याच्या नीतिमत्वाने तुम्ही बलवान व्हाल.

तिसरी गोष्ट, जर आपण स्वतःला नाकारू इच्छितो, तर आपण ख्रिस्तावर दृष्टी केंद्रित केली पाहिजे. जर आपण एखादे काम का करत आहोत ह्याचे कारण विसरलो तर. कोणतेही काम करणे अवघड व कठीण असते, आत्मत्यागासाठी तेच तत्व खरे ठरते. आपण जर आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत नसू तर आपल्याकडे बळ नसणार. (इब्री १२:२). याशिवाय, योहान १५:४ मध्ये आपला प्रभू म्हणतो, “तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्यावाचून त्याला आपल्याआपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही देता येणार नाही,” आणि योहान १५:५मध्ये, “माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही.” त्याला अनुसरण्याच्या संदर्भात येशू आपल्याला आत्मत्याग करायला सांगतो हे आपण कधीही विसरू नये : “जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा (लूक ९:२३).

डॉ. जोएल बीके
डॉ. जोएल बीके

जोएल रॉबर्ट बीके (जन्म कलामाझू, मिशिगन येथे, डिसेंबर 9, 1952) एक अमेरिकन सुधारित पाद्री आणि धर्मशास्त्रज्ञ आहे. ते ग्रँड रॅपिड्स, मिशिगनमधील हेरिटेज रिफॉर्म्ड मंडळीचे मंत्री आहेत आणि प्युरिटन रिफॉर्म्ड थिओलॉजिकल सेमिनरीचे अध्यक्ष आहेत, जिथे ते सिस्टेमॅटिक थिओलॉजी आणि होमलेटिक्सचे प्राध्यापक देखील आहेत.