स्तोत्रकर्ता म्हणतो, “नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवतो.” (स्तोत्र ३४:१९). देव आपल्या लोकांना क्लेशांपासून सूट देण्याने त्यांना अविश्वासणाऱ्यांतून वेगळे उठून दिसावे असे करत नाही. तो सर्व गोष्टीं — त्यांच्या यातना देखील — त्यांच्या आत्मिक हिताकरिता आणि अनंतकालीन मुक्तीकरिता कल्याणकारक बनवतो (रोम ८:२८). पण क्लेशांच्या परिस्थितीत आपण उचितरितीने देवाच्या अधीन राहण्याची खात्री करुन देण्यासाठी त्यांना कसा प्रतिसाद दिला पाहिजे? केवळ छळाचाच नव्हे तर दुःख, एखादा अपघात, शारीरिक आजार, औदासिन्य, बेकारी, ताणलेले कौटुंबिक नातेसंबंध, सत्तेचा दुरुपयोग, किंवा दुसरी कोणतीही हलाखी या सर्वांचा विचार करा. ह्यांपैकी कोणतीही गोष्ट आपल्याला सतावून सोडू शकते आणि आपण विचारू, “हे असे का?”
प्रत्येक गोष्टींकरिता देवाकडे त्याचा सार्वभौम हेतू असतो. देव जे काहीही करत असतो, त्याबाबत नम्रपणे असे विचारणेच अधिक चांगले असते : प्रभू, मी काय केले पाहिजे? ह्या गोष्टीने माझे भले व्हावे आणि तुला मान सन्मान मिळावा म्हणून मी कसा प्रतिसाद द्यावा?
ह्याला बायबलचे उत्तर ही मनुष्याच्या आंतरिक सामर्थ्यात असलेली “हे कसे करावे” ची एखादी विस्तृत यादी नसते तर,ते फक्त एवढेच म्हणते “विश्वासाने”. विश्वास आपण स्वतःला देवाकडे सोपवा असे आपल्याला सांगतो. विश्वास विविध मार्गांनी कार्यान्वित केला जातो, पण क्लेशांना प्रत्येकउचित प्रतिसाद विश्वासातच खोलवर रुजलेला असतो.
इब्री ११ अध्यायात हे उत्तम प्रकारे स्पष्ट करण्यात आले आहे. इब्री ख्रिस्ती लोकांनी एका प्रतिकूल संस्कृतीतील सर्व प्रकारच्या यातना भोगल्या होत्या. ख्रिस्ती म्हणून नेटाने पुढे चालायला उत्तेजन देण्यासाठी, प्रेषिताने जुना करारातील संतांची उदाहरणे दाखवली. येथे आपल्याला त्यांच्या क्लेशांचा एक विस्तीर्ण वर्णपट दिसतो. आपण येथे काही मोजक्याच नमुन्यांची यादी देऊ शकतो:
- जलप्रलयाच्या आधीच्या वाईट समयांत जीवन जगणे हनोख कसे सोसू शकला (इब्री ११:५)? आपल्या नास्तिक (अश्रद्ध) समाजाच्या दुष्ट संस्कृतीत तुम्ही आत्मिक दृष्टीने कसे टिकून राहू शकता? हनोख जगला त्याच रीतीने. देवावर दृढ विश्वास तुमच्या दैनंदिन जिवनक्रमाचा जिवंत भाग असलाच पाहिजे. देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण? (रोम ८:३१)
- प्रभू अब्रामाला कोठे नेत होता हे माहित नसतांना, आपली जन्मभूमी तो कशी सोडू शकला (इब्री ११:८)? देव तुम्हाला एका अपरिचित वाटेवरून घेऊन जात आहे का? तुम्ही चिंता कशी टाळू शकता? अब्रामाने टाळली तशी : “जो ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो” त्या प्रभूवरील विश्वासाने. (यशया ४८:१७). • फारोच्या दुष्ट हुकूमाऐवजी, मोशेचे आईबाप देवाची आज्ञा कशी पाळू शकले (इब्री ११:२३)? तान्ह्या बालकांना मारून टाकणाऱ्या संस्कृतीच्या दुराचारी प्रथेविरुद्ध आपण कसे उभे राहू शकतो आणि मनुष्याऐवजी देवाची आज्ञा पाळू शकतो? जो सार्वभौम राजांचा राजा आहे त्या प्रभूवरींल केवळ विश्वासानेच.
- “देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे, आणि इजिप्तची धनसंपत्ती आणि भोगविलासांच्या मोहाचा प्रतिकार करणे मोशे कसा निवडू शकला (इब्री ११:२५). त्याच रीतीने योसेफ एका कुकर्म करण्याचा मोह घालणाऱ्या स्त्रीपासून पळून गेला. इजिप्तमध्ये ज्याचे नाव ते विसरले नाहीत त्या प्रभूवरील विश्वासाने.(उत्पत्ती ३९:९). विश्वासाने,”ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे” त्यांना मिसर देशाचे बहुमोल खजिने आणि तेथील सुख चैनीपेक्षा अधिक मोलाचे वाटले आणि “जो अदृश्य आहे त्याला त्यांनी पाहिले. (इब्री ११:२७).
इब्री ११ आणखी असा उल्लेख करते की विश्वासणाऱ्यांपुढे इतर धोके होते (इब्री ११:२७-३०). त्यांनी “सिंहाची तोंडे बंद केली,अग्नीची शक्ती नाहीशी केली …..” (इब्री ११:३३ फफ). कसे? ह्या विश्वासणाऱ्यांकडे उत्कृष्ट दर्जाच्या शक्तीं नव्हत्या (याकोब ५:१७). हे निव्वळ विश्वासाने घडले. खुद्द विश्वासच शारीरिक किंवा मनोवैज्ञानिक शक्तीचा एखाद्या “जादुई औषध ” आहे असे नाही. मानवीदृष्टीने अशक्त असतांना,विश्वासाने त्यांच्या जीवाला ख्रिस्ताशी जोडले (२ करिंथ १२:१०). त्याच्या पुत्राप्रीत्यर्थ, देव सर्व गोष्टीं त्यांच्या हितासाठी ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवतो (इफिस १:२२). शिवाय, तो विश्वासणाऱ्यांना गौरवासाठी त्यांची तयारी करून आणि त्यांचा सांभाळ करून नवे करतो आणि पवित्र करतो. विश्वास त्यांना जय मिळवणाऱ्या एकाशी (विजेत्यांशी) जोडतो (१ योहान ५:४-५). म्हणून ते “ख्रिस्ताद्वारे सर्व काही” सहन करू शकतात. (फिल.४:१३).
जर तुम्ही पीडा भोगत आहात पण तरीही एक अविश्वासणारा आहात, तर तुम्हाला मोठा धोका आहे. तुमच्या ऐहिक पीडा अनंतकालीन पिडांची नांदी आहे. तुमची पीडा तुम्ही पश्चाताप करावा आणि विश्वास ठेवावा यासाठी तुम्हाला बोलावत आहे. विश्वासणाऱ्यांसाठी, पीडा हे विश्वासात नेटाने टिकून राहण्यासाठी दिलेली हाक देखील आहे. तुमच्या संघर्षात अविश्वासाने अडखळून जाऊ नका. “तुमच्यापैकी कोणी दुःख भोगत आहे काय? त्याने प्रार्थना करावी” (याकोब ५:१३). तुझ्या संकटसमयी प्रभूचा धावा कर. (स्तोत्र ५०:१५). हे विश्वासणाऱ्या, ह्याचे स्मरण कर की ख्रिस्ताचे देखील “हाल हाल करण्यात आले होते” (यशया ५३:७). “आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत राहणे चालू ठेव; जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला.” (इब्री १२:२) ज्याने वधस्तंभाच्या बदली मुकुट मिळवला त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवणे हा क्लेशांशी यशस्वी लढा देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.