केवळ विश्वास (सोला फिडे)

जेव्हा आपण केवळ ख्रिस्त  (Solus Christus)ह्यावर बोलतो, तेव्हा आपण ज्या तारकाने आपल्या पापांपासून आपल्याला तारण्यासाठी गरज पडेल ती प्रत्येक गोष्ट केलेली आहे त्याच्याविषयी आपण बोलत असतो.  त्याचे  मरण  देवाच्या  पवित्र  न्यायाचे  समाधान  करते.  गतकाळातील, वर्तमान काळातील आणि भविष्यकाळातील माझ्या सर्व पापांच्या दोषाची भरपाई करण्यासाठी त्याचे मरण पुरेसे आहे. त्याचे मरण पापी लोकांचा  देवाबरोबर समेट घडवते आणि  देवाची अपार प्रीती आणि तसेच त्याचा परिपूर्ण न्याय स्पष्टपणे दाखवते.  याशिवाय, देवाच्या आज्ञांचे परिपूर्ण पालन केलेले जीवन येशू जगला  —  आदामाच्या  पतन पावलेल्या मुलांपैकी कोणीही जे  करू शकले नव्हते असे काही तरी.  पाप्यांना देवाशी समेट करण्यासाठी ज्यांची गरज पडते ती प्रत्येक गोष्ट ख्रिस्त येशूमध्ये सापडते.

पण ख्रिस्ताची ही अद्भुत कृत्यें आणि स्तुत्य गुण माझी कशी बनतात? मी काही विधी संस्कार केलेच पाहिजेत का?  मी एखादी प्रतिज्ञा/शपथ घेतली पाहिजे का? एखाद्या पवित्र स्थानाची यात्रा मी केली पाहिजे का, किंवा हे सर्व समजण्यासाठी मी एखादी आत्मशोध यात्रा करावी का?  मला माझ्यामधेच ख्रिस्त आढळेल का? पवित्र शास्त्राच्या बाहेर मला ख्रिस्त आढळेल का?

धर्म सुधारणेच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांत, ख्रिस्ताचे अद्भुत लाभ  ज्या   साधनांद्वारे माझे होऊ शकतील तो केवळ विश्वास आहे हे सांगणारे बायबलमधील पुष्कळ उतारे प्रॉटेस्टंट लोकांनी दाखवून दिले. केवळ विश्वास (सोला फिडे)  हे  जणू काही  मार्टिन  लूथरचे एखादे विचित्र, विक्षिप्त व्यक्तिगत मत होते असे नाही.  केवळ विश्वास ही नव्या कराराची स्पष्ट शिकवण आहे आणि  कायदेशीर मताच्या  (कॅनन नियम  –  ख्रिस्ती धर्म नियम) आणि रोमन चर्चची धर्मशास्त्रविषयक दुर्बोधता यांच्या अनेक थरांखाली ती करुणास्पद रीतीने पुरली गेली होती.  जेव्हा लूथरने थेट ग्रीक भाषेत लिहिलेले पौलाचे रोमकरांस पत्र  वाचले, तेव्हा जणू काही हरवून गेलेल्या आणि दीर्घकाळ विसर पडलेल्या आणि नव्यानेच पुन्हा सापडलेल्या कलाकृतीवरील  शतकानुशतके साचून राहिलेला  गाळ आणि घाण धुवून निघावी असे ते होते.

ख्रिस्ताचे स्तुत्य गुण. त्याच्या पुत्राच्या व्यक्तित्त्वात, देव आपल्या सर्व पापांची क्षमा आणि न्यायाच्या दिवशी त्याच्या अविचल नजरेपुढे तग धरून राहू शकेल असे परिपूर्ण नीतिमत्व देऊ करतो आणि माझ्यासारख्याला देखील तारेल अशी ही एक लीन परंतु मनापासून सर्वशक्तिमान व कृपाळू देवाच्या अभिवचनांवर भरवसा ठेवल्याने प्राप्त होणारी विनामूल्य देणगी आहे जी विश्वासाच्या रिक्त हाताने स्विकारली जाते.

लूथरला आता कळून आले, अगदी बिनचूकपणे, की  ख्रिस्ताचे  स्तुत्य गुण आपलेसे होण्याचा केवळ एकच मार्ग म्हणजे आपण देवाची मर्जी मिळवण्याचा प्रयत्न थांबवणे, आणि  देवाच्या अभिवचनावर केवळ भरवसा ठेवणे हा आहे.  जेव्हा मी माझ्या आत  शोधत राहणे थांबवतो, किंवा ख्रिस्त जेथे प्रकट करण्यात आला आहे त्याऐवजी इतर ठिकाणी त्याला शोधणे थांबवतो  तेव्हाच ख्रिस्ताचे तारणदायी लाभ माझे होतात. मी माझ्या स्वतःला तारण्याचा प्रयत्न करणे थांबवावे एवढेच काय ते देव मला सांगतो, आणि मग मला तारण्याच्या त्याच्या अभिवचनावर भरवसा  ठेवून, मी असा दृढ विश्वास धरतो की येशूचे जीवन आणि मरण मला माझ्या पापांपासून तारण्याकरिता खरोखरच पुरेसे आहेत.

ह्यावर विश्वास ठेवणे अमेरिकन लोकांना कठीण जाते. आम्ही चांगले लोक आहोत. आम्ही दणकट आणि समर्थ आहोत. काय करावे हे देवाने आम्हाला सांगावे हे आम्हाला पाहिजे आणि मग आम्हाला ते करू देत. त्याऐवजी, देव म्हणतो  करणे थांबवा.  माझ्यावर भरवसा ठेवा.  माझी मर्जी संपादन करण्यासाठी तुम्ही करता ते तुमचे सर्व प्रयत्न सोडून द्या,  स्वर्गात जाण्याची तुमची खटपट थांबवा, आणि विनामूल्य देणगी म्हणून मी जे  देऊ करतो ते  विश्वासाने सरळ सरळ स्वीकारा — ख्रिस्ताचे स्तुत्य गुण. त्याच्या पुत्राच्या व्यक्तित्त्वात, देव आपल्या सर्व पापांची क्षमा आणि न्यायाच्या दिवशी त्याच्या अविचल नजरेपुढे तग धरून राहू शकेल असे परिपूर्ण नीतिमत्व देऊ करतो आणि माझ्यासारख्याला देखील तारेल अशी ही एक लीन परंतु मनापासून सर्वशक्तिमान व कृपाळू देवाच्या अभिवचनांवर भरवसा ठेवल्याने प्राप्त होणारी विनामूल्य देणगी आहे जी विश्वासाच्या रिक्त हाताने स्विकारली जाते.

न्यायनिवाड्याच्या दिवशी जेव्हा मी देवासमोर उभा राहतो तेव्हा येशूचे स्तुत्य गुण मला तारण्यासाठी पुरेसे आहेत हा भरवसा ठेवण्याची कृती म्हणजे विश्वास.  केवळ विश्वास (सोला फिडे)  म्हणजे आम्ही आमची सत्कृत्यें, आमचे सदाचरण, आमचे चर्च, आमची गंभीर धर्म परायणता  किंवा अशी इतर कोणतीही गोष्ट ह्यांवर भरवसा ठेवत राहत नाही ही कबुली देण्यासाठी वापरलेली अभिव्यक्ती.  केवळ विश्वास (सोला फिडे)  म्हणजे साध्या शब्दांत, फक्त ख्रिस्तावर भरवसा ठेवणे.  ख्रिस्तात कशाचीही भर न घालता. ख्रिस्तातून काहीही वजा न करता.

Used with permission from www.monergism.com

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.