जगिकतेपासून दूर पळणे

देवाच्या अधीन नसणारी तर त्याऐवजी देवाविरुद्ध असणारी विचारसरणी आणि जीवनचर्या जेव्हा मी आत्मसात करून तिच्यात रममाण होतो तेव्हा ती जगिकता असते. जगिकता ती आहे जिला प्रेषित योहान “देहाची वासना, डोळ्यांची वासना आणि संसाराविषयीची फुशारकी” म्हणतो. (१ योहान २:१६). जीवनातील आपल्या अनुभवांमध्ये जगिक विचारसरणी आणि जगिक प्रभाव आणि जगिक दबाव ह्यांच्याशी आपली नेहमीच गाठ पडत असते. आपल्या आत्म्यांत प्रवेश मिळवणे हा जगिकतेचा उद्देश असतो आणि, खेदाने म्हणावे लागते की बहुतेक वेळां ती आत शिरतेच.

जगिकतेपासून दूर पळा असे बायबल आपल्याला शिकवते. पळून जाणे म्हणजे शक्य तितके दूर आणि शक्य तितक्या वेगाने पळून जाणे. योहान ख्रिस्ती लोकांना लिहितो, “जगावर प्रीती करू नका.” (१ योहान २:१५). रोम १२:२मध्ये, पौल कळकळीने सांगतो, “ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका.” दोन्हींचा अर्थ हा आहे की आपण अशा रीतीने जगायचे आहे की विचार करण्याचे आणि जगण्याचे सैतानाने प्रभावित केलेले सर्व मार्ग आपण झिडकारायचे आहेत . त्याचा अर्थ जगिकतेपासून पळून जाणे असा आहे.

तर आपण ते कसे करू?
पहिली गोष्ट म्हणजे, आपल्या मनाचे नवीकरण करायचा प्रयत्न आपण करू या. रोम १२:२मध्ये पौललिहितो, ‘”या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.” जर आपण ह्या जगाबरोबर समरूप असे होणार नाही पण खरेखुरे रूपांतरित होणार आहोत, तर मग आपल्याला पवित्र आत्म्याने आशीर्वादित करून आपल्याला दिलेल्या देवाच्या वचनाशी संपर्क व त्यामधील व्यग्रता ह्यांद्वारे मनाचे नवीकरण अनुभवावे लागेल.. जर आपण जगिकतेपासून दूर पळून जाऊ इच्छितो, तर आपण पवित्र शास्त्राचे काळजीपूर्वक आणि प्रार्थनापूर्वक वाचन आणि श्रवण अधिक परिश्रमपूर्वक केले पाहिजे.

हा मुद्दा आधीच आपल्याकरिता एक चाचणी होऊ शकते. जर आपण मनाचे नवीणीकरण करत नाही, तर आपण फार जगिक आहोत असे संभवते. आपण ह्या पायाभूत आणि मूलभूत मुद्द्याने सुरवात करू या: “तुमच्या मनाच्या नवीकरणाने”. म्हणून बायबल उघडा. ते लक्ष देऊन आणि प्रार्थनापूर्वक वाचा. त्यावरील ऊपदेश लक्ष देऊन ऐका. त्यावर सतत मनन करा आणि इतरांशी त्यावर चर्चा करा. ही सुरुवात आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे, जगिकतेपासून दूर पळण्यासाठी, आपण देवाच्या इच्छेनुसार वागायला वचनबद्ध होऊ या. १ योहान २मध्ये योहान ह्या विषयी लिहितो. वचन १७मध्ये तो हा मुख्य मुद्दा दाखवतो की “जग आणि त्याची वासना ही नाहीशी होत आहेत”. आणि मग योहान म्हणतो, “देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” जे लोक जगावर प्रीती करतात आणि जे जगावर प्रीती करत नाहीत त्यांच्यातील परस्पर विरोध योहान दाखवत आहे. जे जगावर प्रीती करत नाहीत ते देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारे असतात. धार्मिकांची खूण आणि देवभीरूपणाचा मार्ग ही दोन्ही येथे दाखवली आहेत. जेव्हा आपण प्रभूचे हर्षाने, कृतज्ञापूर्वक आज्ञापालन करतो, तेव्हा आपल्यावर जगाची सत्ता नाही हे आपल्याला दिसून येते.

ही देखील एक चाचणीच आहे. देवाच्या आज्ञा पाळणे हे तुमचे उद्दिष्ट आहे का? ह्याने जगिकतेपासून दूर पळण्यासाठी तुम्हाला साहाय्य होणार नाही का?

विचारात घेण्यासाठी एक तिसरा मुद्दा आहे. योहान पित्याच्या प्रीतीविषयी बोलतो. १ योहान २:१५मध्ये, तो लिहितो, “जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही.” जर तुम्ही जगावर प्रीती करता तर तुम्ही पित्यावर प्रीती करत नाही. आणि त्याचा अर्थ हा आहे की तुम्ही त्याची प्रीती जाणत नाही आणि तुम्ही त्याला प्रीती दाखवत नाही. पण जर पवित्र आत्म्याद्वारे पित्याने तुमच्या अंतःकरणात ओतलेली प्रीती तुम्ही जाणता, आणि त्याला प्रीती देखील दाखवता, तर तुम्ही जगावर प्रीती कशी करू शकता? काहीशी तशीच मांडणी ठेवून पण शब्द बदलून, हा मजकूर असा होईल, “जर कोणी मनुष्य पित्यावर प्रीती करतो, तर जगाची प्रीती त्याच्यामध्ये नाही”. ती असूच शकत नाही!

आता ही देखील एक चाचणीच आहे. कदाचित ही अंतिम चाचणी असू शकेल. तुम्ही पित्यावर प्रीती करत नसलात तर तुम्ही जगिकतेपासून दूर पळू शकत नाही. पण मग, ख्रिस्ती लोक पित्यावर प्रीती कसे करू शकत नाहीत? विशेषेकरून त्याचा स्वतःचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त ह्यांच्या द्वारे तो
“ करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव,” नाही का? (२ करिंथ १:३). आणि तो हे सर्व आपल्यासारख्या अपात्र पाप्यांसाठी देखील नाही का? म्हणून, आपण जगावर प्रीती करू नये. ते आपल्यासाठी काय करू शकते? आणि शिवाय, जग नाहीसे होत आहे. (१ योहान २:१७). आपण जगावर प्रीती करणार नाही, पण आपण सर्वस्वी मनोहर पित्यावर त्याच्या सर्वस्वी गौरवशाली पुत्रासह, आणि सार्वकालिक आशीर्वादित पवित्र आत्म्यासह प्रीती करू या. आपण त्या त्रैक देवावर प्रीती करू या — आत्म्याच्या कृपेने खरोखर प्रीती करू या. जगिकतेपासून दूर पळून जाण्याचा तो मार्ग आहे.

डॉ. जोएल बीके
डॉ. जोएल बीके

जोएल रॉबर्ट बीके (जन्म कलामाझू, मिशिगन येथे, डिसेंबर 9, 1952) एक अमेरिकन सुधारित पाद्री आणि धर्मशास्त्रज्ञ आहे. ते ग्रँड रॅपिड्स, मिशिगनमधील हेरिटेज रिफॉर्म्ड मंडळीचे मंत्री आहेत आणि प्युरिटन रिफॉर्म्ड थिओलॉजिकल सेमिनरीचे अध्यक्ष आहेत, जिथे ते सिस्टेमॅटिक थिओलॉजी आणि होमलेटिक्सचे प्राध्यापक देखील आहेत.