पवित्र शास्त्राची पर्याप्तता

पवित्र शास्त्राच्या पर्याप्ततेचा त्याच्या प्रेरणेशी आणि अधिकाराशी जवळचा संबंध आहे. आपण जेव्हा पवित्र शास्त्राच्या प्रेरणेबद्दल बोलतो, तेव्हा आपण ह्या वस्तुस्थितीचा संदर्भ घेतो की पवित्र शास्त्रातील विविध पुस्तकांचे मूळ देवाच्या संकल्पामध्ये आहे. पवित्र शास्त्रातील पुस्तके मानवी लेखकांच्या माध्यमातून देव जो पवित्र आत्म्या ह्याच्या प्रेरणेने लिहिली आहेत (२ तीमथ्य. ३:१६). आपण जेव्हा पवित्र शास्त्राच्या अधिकाराबद्दल बोलतो, तेव्हा आपण ह्या अर्थाने बोलतो की पवित्र आत्मा हा पवित्र शास्त्राचा दैवी लेखक असल्यामुळे, पवित्र आत्मा एकटाच देवाच्या वचनाच्या सत्यतेची आणि दैवी उत्पत्तीची साक्ष देण्यास सक्षम आहे. मंडळी पवित्र शास्त्राला त्याचा अधिकार देत नाही. उलट, पवित्र शास्त्रात देवाने आपला श्वास फुंकल्याने त्याला अगोदरच जो अधिकार प्राप्त झाला आहे, तो मंडळी केवळ ओळखू शकते.


आपण जेव्हा पवित्र शास्त्र “पुरेसे” असल्याबद्दल बोलतो तेव्हा आपण ह्या अर्थाने बोलतो की पवित्र शास्त्र आपल्याला देवाच्या संकल्पाबद्दल जे माहित असावे अशी देवाची इच्छा आहे आणि त्याच्या क्रोधापासून आम्ही आमचा बचाव कसा करून घेऊ शकतो ह्याबद्दल सर्व काही प्रकट करते. पवित्र शास्त्र एका विशिष्ट उद्देशासाठी देण्यात आले होते. पवित्र शास्त्र आपल्याला अशा सर्व गोष्टी शिकवत नाही ज्या जाणून घेण्यासाठी उपयुक्त किंवा व्यावहारिक असतील किंवा तसे करण्याच्या हेतूने ते दिलेले नाही. पापी मानवाची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी पवित्र शास्त्र दिले गेले नाही आणि जीवनातील सर्व रहस्यांची उत्तरे आपल्याला त्यात सापडणार नाहीत. गुप्त गोष्टी आपला देव परमेश्वर ह्याच्या स्वाधीन आहेत. (हा संदर्भ पाहा: अनुवाद २९:२९).


पण पवित्र शास्त्र नियमशास्त्र आणि शुभवर्तमान ह्या दोन्ही गोष्टी प्रकट करते. नियमशास्त्र म्हणजे देव आपल्याला ज्या आज्ञा देतो त्या आणि निर्गम २० (दहा आज्ञा) ह्यासारख्या शास्त्रभागात आपल्याला त्या आढळतात. शुभवर्तमान म्हणजे देव आपल्याला येशू ख्रिस्तामध्ये जे देतो ते त्याच्या नियमशास्त्राच्या मागण्या पूर्ण करते आणि पौलाने १ करिंथ. १५:१-८ ह्या वचनांमध्ये ते स्पष्ट केले आहे (अनेक उदाहरणांपैकी एक उदाहरण म्हणून). जरी नैतिक नियम सार्वत्रिक आहे – आम्ही देवाच्या प्रतिमेत निर्माण केलेले असल्यामुळे जरी तो आमच्या अंतःकरणावर लिहिलेला आहे – तरी केवळ पवित्र शास्त्रातच आम्हाला देवाचा नियम लिखित स्वरूपात आढळतो जेणेकरून देवाची इच्छा सर्वांसाठी पूर्णपणे स्पष्ट व्हावी.


सृष्टीचे सौंदर्य आणि त्यातील आश्चर्यकारक गोष्टी आपल्याला सामर्थ्याने निर्मात्याकडे निर्देशित करतात – इतक्या की आपण देवाचे अस्तित्व नाकारू शकत नाही – येशू ख्रिस्ताच्या व्यक्तीत्वातून आणि कार्याद्वारे पापी लोकांना तारण्याच्या देवाच्या कार्याची गोष्ट पर्वत शिखरांच्या सौंदर्यात किंवा समुद्रकिनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांमध्ये लिहिलेली आढळत नाही. केवळ एकाच ठिकाणी आपल्याला शुभवर्तमान सापडते ते म्हणजे लिखित स्वरूपातील देवाचे वाचन.


आपण पवित्र शास्त्राच्या पर्याप्ततेबद्दल जेव्हा बोलतो, तेव्हा आपण ह्या अर्थाने बोलतो की पवित्र शास्त्रात आपल्याला आपल्या तारणाचा वृतांत सापडतो जो एदेन बागेत आदामासोबत केलेल्या कृतींच्या करारामध्ये प्रकट होतो आणि दहा आज्ञांमध्ये, तसेच जुन्या करारात विविध प्रकारे देण्यात आलेल्या कृपेच्या करारांमध्ये आणि प्रतिबिंबांमध्ये आणि नव्या करारातील अभिवचनात आणि त्याच्या पूर्ततेत आपण येशू आपले तारण करत असताना पाहतो. तारणाची ही कथा पवित्र शास्त्रातील प्रमुख विषय असल्याने, देवाची योग्य प्रकारे उपासना कशी करावी ह्याबद्दल आपल्याला आणखी कोणती माहित असण्याची आवश्यक आहे? पापाच्या अपराधीपणापासून आणि वर्चस्वापासून मुक्त कसे व्हावे ह्याबद्दल आपल्याला आणखी कोणती माहित असणे आवश्यक आहे जी देवाने आपल्या शब्दात आधीच प्रकट केलेली नाही? शुभवर्तमानाचे स्पष्टीकरण देण्यासाठी आम्हाला मंडळीची परंपरा आवश्यक आहे का? पवित्र शास्त्रात कथितपणे समाविष्ट नसलेल्या गोष्टी प्रकट करण्यासाठी आपल्याला अतिरिक्त “पवित्र पुस्तके” किंवा “प्रकटीकरण” आवश्यक आहेत का? नक्कीच नाही.


पवित्र शास्त्रात आपल्याला देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी आणि आपले तारण होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत. ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध झालेले आणि त्याची परिपूर्ण नीतिमत्ता परिधान केलेले नीतिमान पापी ह्या नात्याने, आम्ही पवित्र देवाजवळ कृतज्ञ अंतःकरणाने आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्याची उपासना करण्यास मोकळे आहोत. परंतु आपल्याला हे माहित आहे कारण पवित्र शास्त्र आपल्याला ते प्रकट करते. आपण जेव्हा म्हणतो की “पवित्र शास्त्र पुरेसे आहे” तेव्हा आपल्याला हेच म्हणायचे असते.

Used with permission from www.monergism.com

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.