जॉन कॅल्व्हिन एकदा म्हणाले की धर्म संस्था ज्यावर गोल फिरते, ती मुख्य बिजागरी नीतिमानता आहे. कॅल्व्हिनच्या मतानुसार, “, जो सत्कृत्यांद्वारे नीतिमत्व मिळते या विचारातून बाहेर आला आहे, जो विश्वासाद्वारे ख्रिस्ताची नीतिमानता घट्ट धरतो, आणि नीतिमानता परिधान करितो, असा देवाच्या दृष्टीने पापी म्हणून नव्हे तर नीतिमान मनुष्य असा दिसून येतो, तो मनुष्य विश्वासाने नीतिमान केला जातो. “नीतिमानतेच्या ह्या व्याख्येचे प्रतिध्वनी आपल्याला हायडेलबर्ग कॅटेकिझमच्या प्रभूचा दिवस २३ ह्यामध्ये ऐकू येतो. ” माझ्यामुळे देव पूर्ण समाधान पावला आहे , ख्रिस्ताचे नीतिमत्व आणि पावित्र्य…जणूकाही माझ्यामध्ये कोणतेही पाप नव्हते किंवा मी कधीही पाप केले नाही , …. जणू काही ख्रिस्ताने माझ्याकरिता संपादन केलेले ते सर्व आज्ञापालन मीच मिळवले आहे, असे गणण्यात येते तेव्हा ते नितीमत्व देव माझ्या हिशेबी जमा करण्या विषयी बोलते.
“नीतिमान ठरवले जाण्याची शिकवण कितीही गौरवशाली असली तरी, संबंधित अशी आणखी दुसरी एक अधिक गौरवशाली शिकवण आहे : जे विश्वासाद्वारे नीतिमान ठरवले गेले आहेत ते देवाद्वारे त्याच्या कुटुंबाचे सभासद म्हणून दत्तक देखील घेतले जातात. नीतिमान केले जाण्याहून हा आशीर्वाद अधिक मोठा असण्याचे कारण काय आहे? नीतिमान केले जाण्यापेक्षा दत्तकपणामुळे आपण देवाशी आणखी अधिक समृद्ध नातेसंबंधात येतो. नीतिमान ठरले जाण्याचा संबंध देवाबरोबर आपल्या कायदेशीर नातेसंबंधांशी असतो. नीतिमान ठरवण्याच्या प्रक्रियेत, एक न्यायाधीश या नात्याने देव जो पापी मनुष्य ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला नियमशास्त्राच्या मागण्यांपासून बंधमुक्त करतो कारण त्या मागण्या दुसऱ्या एका जामीनदाराने त्याच्यासाठी पूर्ण केल्या आहेत. परंतु, दत्तकपणामुळे, देव केवळ क्रोधशमन झालेला एक देवच नसतो तर तो आपल्याशी समेट केलेला पिता देखील असतो.
ख्रिस्ती धर्माची ही सर्वश्रेष्ठ चांगली गोष्ट आहे. “पहा,” प्रेषित योहान म्हणतो, “आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रितिदान दिले आहे पहा”(१ योहान ३:१).
ह्या अधिक श्रेष्ठ आशीर्वादाचा त्याच्या समृद्ध रूपांतील अनुभव आपल्याला वारंवार का मिळत नाही? पुत्रत्वाचे विशेषाधिकार विश्वासणारे लोक अधिक संख्येने उपभोगायला हवे तसे ते का उपभोगत नाहीत? जॉन न्यूटनसोबत पुष्कळ लोकांना पुढील शब्द बोलण्यास का कठीण जाते :
“हा मुद्दा समजून घ्यायला मी आसुसलो आहे;
पुष्कळदां हा विचार मला अस्वस्थ करतो;
मी प्रभूवर प्रीती करतो की नाही;
मी त्याचा आहे की मी त्याचा नाही?
अशा दुख:साठी सबळ कारणे आहेत. देवाचे सर्व लोक जीवनात कधीतरी भय आणि शंकानी काही वेळ अस्थिर होतात.
जेव्हा पवित्र देवासमोर आपण कोण आणि काय आहोत हे त्यांना कळते, तेव्हा आपणा स्वतःकरिता असे महान आशीर्वाद स्वीकारणे त्यांना कठीण जाते. ज्यांच्या जीवनात कृपेच्या आवश्यक खुणा दिसतात तरी असे पुष्कळ लोक आहेत की ते “अब्बा, बापा!” म्हणायला कचरतात. जेव्हा “त्यांच्या मार्गावर शांतीची नदी वाहते” तेव्हा ते ख्रिस्त त्यांची एकमेव आशा आणि आश्रय आहे असा विश्वास धरत असतील तरीही जेव्हा हवी तितकी त्यांच्या पुत्रत्वाची पूर्ण खात्री त्यांना नसते अशा प्रसंगातून देखील ते जाऊ शकतात. मी हे तुमच्या स्थितीचे वर्णन करत आहे का? देव तुमचा पिता आहे अशा पूर्ण खात्रीने देवाकडे जाण्याच्या धैर्याचा अभाव तुम्हाकडे पुष्कळदां असतो का? मग तुम्ही काय करता?
तुम्ही तुमचे मन ह्या सत्यावर खिळून ठेवले पाहिजे: देवाची मुलें ख्रिस्ताप्रित्यर्थ कृपेने दत्तक घेतले जातात. आपले पुत्रत्व ख्रिस्ताच्या पुत्रत्वातून जन्म घेते ! आपल्यासाठी पुत्रत्वाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्याने हे केले आहे ह्यावरते आधारलेले आहे. विशिष्ट काळासाठी तो देवाकडून नाकारला गेला होता आणि त्याच्या पित्याच्या प्रीतीपासून असा वंचित झाला होता की आरोळी मारून तो बोलला, “माझ्या देवा” — माझ्या बापा नव्हे, पण माझ्या देवा — तू माझा त्याग का केलास?” हे त्याने केले यासाठी की “देवाने आपल्याला स्वीकारावे आणि आपल्याला कधीही त्यागू नये” (प्रभू भोजनाचा विधी चालवण्याकरिता दिलेली पद्धत )
देवाने केलेला तारणाचा मार्ग किती अद्भुत आहे! देवाच्या वचनाची ही अद्भुत सत्यें जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुमच्या अंतःकरणात उकळी फुटत नाही का? (लूक २४:३२)? तुम्ही त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवता हे सत्य तुम्ही नाकारत नाही, तरी तुम्ही अजूनही देवाला तुमचा पिता म्हणायला घाबरता का? तुमच्या पित्याची इच्छा आहे की तुम्ही त्याला त्याच्या कायदेशीर हक्काच्या नावाने हाक मारावी. जेव्हा उधळ्या पुत्र त्याच्या बापाच्या घरी पश्चात्तापदग्ध अंतःकरणाने परतला तेव्हा त्या घराचा दरवाजा त्याच्यासाठी बंद असेल अशी भीती त्याला नक्कीच वाटली असावी. स्वर्गाविरुद्ध आणि त्याच्या बापाविरुद्ध त्याने पाप केले असल्यामुळे, एक पुत्र म्हणून त्या घरात त्याचे स्वागत होण्याची आशा तो धरू शकत नव्हता. पण त्याच्या बापाकडे त्याच्यासाठी इतर योजना होत्या. हे दृश्य मनात चित्रित करा: बाप त्याच्या खूप दिवसांपासून हरवलेल्या पुत्राकडे धावत जात आहे, तो पुत्राला कडकडून मिठी मारतो आणि भावनावेगाने त्याचे चुंबन घेतो, मग सर्वोत्कृष्ट झगा, अंगठी, जोडा (पादत्राण) आणि मेजवानी — आणि हे सारे एका अशा पुत्रासाठी जो मेला होता पण पुन्हा जिवंत होऊन आला होता.