स्वत:मधील गर्वीष्टपणा संपविणे

आपणा स्वत: मधील गर्वीष्टपणा संपवण्या पेक्षा दुसऱ्या अधिक कठीण कामाची कल्पनाच आपण करू शकत नाही.आपल्यामध्ये गर्व फार कमी आहे म्हणून कठीण आहे असी नाही तर, आपण गर्वाच्या अस्तित्वाविषयी आंधळे बनलो आहोत यामुळे ते कठीण आहे. .

आपला गर्व आपल्याला गर्वीष्टपणा बद्दल आंधले करतो. सर्व पापांचा मूळ उगम गर्व आहे. ज्या पापाने इतर सर्व पापें निर्माण केली ते पहिले पाप गर्व हे होते. त्याचे प्राबल्य मानवी स्थितीमध्ये एवढे प्रभावी असते, की त्याच्या अस्तित्वाबाबत असंवेदनशील होणे सहज सोपे आहे. पण आपण देवाच्या वचनाविरुद्ध काहीही करतो किंवा तसा विचार करतो किंवा तसे बोलतो किंवा जिवंत देवाने आपल्याकडून अपेक्षिले ते करणे टाळतो त्या प्रत्येक वेळी तेथे गर्व अस्तित्वात असतो. हे कसे?
कारण जेव्हा आपण कोणत्याही रीतीने पापकरतो— नीतिमान कृत्यें न करण्याने किंवा अनीतिमान कृत्यें करण्याने —तेव्हाआपण खरे पाहतां देवाच्या ईच्छेहून आपली इच्छा अधिक उंचावतो. ह्याला गर्व म्हणतात. प्रत्येक पाप ही गर्वाचे प्रकटिकरण असते.

जरी गर्व करणे ही एक सामान्यतः घडणारी गोष्ट आहे, तरी ती घृणास्पद आहे. अंतःकरणातील गर्व हे पाप आहे (नीती.२१:४). देव पापाचा तिटकारा करतो (नीती ६:१७; ८:१३). तो प्रत्येक गर्विष्ठ मनुष्याला नक्कीच शिक्षा करील. (नीती १५:२५; १६:५). परमेश्वराचा दिवस सर्व गर्विष्ठ माणसांच्या विरुद्ध आहे, कारण केवळ परमेश्वरच उंचावल्या जाईल. (यशया २:११-१२).

इतरांमधील ह्या दुष्ट पशूला आपण कसे ठार करतो? आपण ते सहनशीलतेने , करुणापूर्वक आणि प्रितीने करतो. संयमनाने कारण आपण स्वतःच गर्वाने भरलेले असतो. करुणेने, कारण आपण हे जाणतो की देवाच्या दृष्टीने हे पाप किती घृणास्पद आहे आणि. गर्वाच्या कचाट्यात सापडल्यानंतर एखाद्याची स्थिती किती भयानक असते. प्रितीने, कारण त्या दुसऱ्या व्यक्तीने देवाच्या प्रतिमेसारखे बनलेले पाहावे अशी आपली इच्छा असते, आणि ते गर्वाच्या अगदी उलट असते.

आपण स्वतःमधील गर्व कसा संपवतो? अनेक साधनांच्या मदतीने.

पहिले, आपण येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाविषयी वारंवार विचार करण्याची गरज असते. का? कारण जी गोष्ट देवाच्या इच्छेला विरोध करते तिची खरीखुरी आणि वीट आणणारी किंमत ह्याच सर्वोत्तम जागी कळून येते. ज्याला आत्मिक आणि शारीरिक रीतीने ठोसे सहन करावे लागले तो तारक आमच्या गर्वाच्या कारणामुळे तेथे मेला. येशू ख्रिस्त आणि त्याला वधस्तंभावर खिळलेले एक ताजे दृश्य विश्वास ठेवत पाहणे हे गर्वाविरुद्ध एक खरोखर दैवी औषध आहे.

दुसरे, आपल्याला इतरांच्या मदतीची गरज आहे. गर्वाच्या आंधळे बनवण्याच्या प्रवृत्तीचा विचार करतां, आपल्यातील गर्व दाखवून देण्यासाठी देव नेहमी दुसऱ्या लोकांचा उपयोग करून घेतो असे आपणाला दिसते. त्यांनी खरडपट्टी केल्याने आपण आपला गर्व संपवतो. अर्थातच, येथे येते ती अडचण ही असते की आपल्यातील गर्व आपल्याला इतरांनी मनःपूर्वक दिलेल्या सदुपदेशाचा प्रतिकार करायला लावतो. आणि जेव्हा आपल्याला ऐकायची गरज असते तेव्हा आपल्याला प्रितीने सत्य सांगतील असे आपल्यावर पुरेशी प्रीती करणारे मित्र आपल्यापैकी फार थोड्या लोकांकडे असतात. म्हणून त्या घटकेला, आपल्याला ते दिसत नसले तरी इतर लोकांना आपल्यात जे दिसते ते स्वीकारण्यासाठी लागणाऱ्या कृपा आणि विनम्रतेसाठी प्रार्थनेची गरज असते.
तिसरे, आपल्याला देवाच्या साहाय्याची गरज असते. सर्वसमर्थासोबत भरपूर वेळ घालवल्यानंतर आपला गर्व राखून ठेवणे कठीण असते. प्रार्थनाहीनता गर्वाला पेटवून अधिकच वाढवते;परंतु प्रार्थनेत आग विझवण्याची प्रवृत्ती असते.

चौथे, गर्वाचे परिणाम फार भयंकर असतात ह्या पवित्र शास्त्रात दिलेल्या इशाऱ्यांचा गंभीरपणे विचार करण्याची आपल्याला गरज असते. ह्या विधानांवर विचार करा :

  • “गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच, पण नम्र जनांच्याठायी ज्ञान असते”. (नीती. ११:२)
  • “गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अध:पाताचे मूळ होय. गर्विष्ठांबरोबर राहून लूट
    वाटून घेण्यापेक्षा दिनांबरोबर नम्रचित्त असणे बरे” (नीती १६:१८-१९).
  • “गर्व मनुष्याला खाली उतरवतो, पण ज्याचे चित्त नम्र तो सन्मान पावतो.” (नीती २९:२३).

आपला गर्व आपल्यालाच दुखापत करतो असे नाही तर तो इतरांना सुद्धा इजा करतो. गर्व आपल्याला इतर लोकांची उद्धटपणे चेष्टा करणारे बनवतो. (नीती २१:२४). गर्विष्ठ व्यक्ती भांडण तंटे उकरून काढते (नीती १३:१०; २८:२५).

शेवटी, पौलाने करिंथकरांना पाठवलेल्या स्मरणपत्रावर आपण सखोल विचार करू या, “तुला निराळेपण कोणी दिले? आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस?” (१ करिंथ ४:७-८). आपल्या ज्या काही क्षमता, यशप्राप्ती, आपली कमाई, मालमत्ता — ह्या सर्व देणग्या आहेत. पौलाच्या ब्रीदवाक्यानुसार आपले आचरण असले पाहिजे : “आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो; त्यांच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे आणि जगाला मी वधस्तंभावर खिळलेला आहे.” (गलती ६:१४).

आपण गर्व मुळीच खपवून घायला नको. जहाल विषारी सापाच्या चुका दुरुस्त करून आपण त्याला सुधारत नाही; त्याचा शिरच्छेद करतो. गर्वाला एखाद्या भडकलेल्या वनव्या सारखा असतो, त्याला आपण पायाने तुडवून विझवून टाकण्याची गरज असते, नाहीतर मोठा भडका उडालेल्या अग्नीत आपण भस्म होऊ. जेव्हा गर्व अखेरचा विझवून टाकला जाईल तो दिवस, हे प्रभू, लवकर येऊ दे!

डॉ. जोएल बीके
डॉ. जोएल बीके

जोएल रॉबर्ट बीके (जन्म कलामाझू, मिशिगन येथे, डिसेंबर 9, 1952) एक अमेरिकन सुधारित पाद्री आणि धर्मशास्त्रज्ञ आहे. ते ग्रँड रॅपिड्स, मिशिगनमधील हेरिटेज रिफॉर्म्ड मंडळीचे मंत्री आहेत आणि प्युरिटन रिफॉर्म्ड थिओलॉजिकल सेमिनरीचे अध्यक्ष आहेत, जिथे ते सिस्टेमॅटिक थिओलॉजी आणि होमलेटिक्सचे प्राध्यापक देखील आहेत.