आपण एका वाढत्या नकारात्मक संस्कृतीत जगत आहोत, जिच्यात आपल्या मनात महापुरासारख्या घुसणाऱ्या आणि आपली मने व्यापणाऱ्या सर्व नैराश्यजनक आणि खिन्न करणाऱ्या घटनांत आपण ओढले जाणे सोपे आहे.
पण, प्रेषित पौल ह्या वादळाच्या मध्यात आपण देवाच्या शांतीचा आनंदाचा अनुभव घ्यावा असे सुचवितो. आपल्या मनासाठी एक पर्यायी प्रसार माध्यम प्रकार सांगतो. तो लिहितो: बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय , जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याचे मनन करा. (फिल ४:८)
अपरिहार्यपणे, एक पतन पावलेले जग ज्या वाईट बातम्यांनी भरून टाकले जाते, त्यापासून अवास्तविकपणे वेगळे होता यावे ह्यासाठी हा युक्तिवाद केला नाही . असे नाही तर , हा लेखी हुकूम आहे, हे अधिकार पत्र आहे, ही एक मागणी सुद्धा आहे , की आमच्या प्रसार माध्यम निवडीत सध्या जे वाईट, असभ्य आणि अगडबंब आणि निराशाजनक आणि ग्राम्य आहे त्याला अनुकूल असलेल्या असंतुलनाऐवजी जे प्रेरणात्मक आणि नैतिक दृष्टया चांगले त्याला अनुकूल असणारे एक हेतुपुरस्सर संतुलित प्रसार माध्यम आपण निवडले पाहिजे. एका पौष्टिक प्रसार माध्यम आहारासाठी, पौलाच्या “फूड पिरॅमिड” मध्ये सहा प्रमुख गट आहेत :
१. खरे पाहिजे , खोटे नाही: राजनीतीच्या वर्णपटाच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूच्या, खोट्या गोष्टीं, विपर्यस्त वर्णने, असमतोलता आणि विद्रूपीकरण ऐकणे टाळा. “दुसऱ्या संघाच्या लबाड्या” उघड्यावर आणण्यात जे पत्रकार त्यांचा अधिकतम वेळ घालवतात त्याच्यापासून सावध राहा. त्याऐवजी, सर्वाधिक सत्यवक्ता, समतोल, आणि रास्त बातम्या शोधा. जेथे कोठे सत्य दिसेल आणि कोणीही सत्य बोलत असला तरी त्यातील सत्यावर मेजवानी झोडा. आपल्या भोवती घाण पसरावणाऱ्यांऐवजी, सत्य सांगणाऱ्यांना जमवा.
२. उदात्त पाहिजे, नीच नाही : जीवनाची ओंगळ आणि गलिच्छ बाजू प्रकाशित करण्याची माध्यमांची प्रवृत्ती असते. त्यांचे वार्ताहर आणि “सूत्रें” (बातम्या पुरवणारे)समाजाच्या गलिच्छ घाणपाण्याच्या गटारांवरच लक्ष केंद्रित करत असतात. “स्वतःला असे करू नका!” पौलाने त्यांना सांगितले. “तुमच्या जीवनात जे नीच असेल ते कचरापेटीत टाका, जे उदात्त ते जोपासा. उदात्त म्हणजे वैभवशाली, भय-आदर निर्माण करणारे, योग्यताप्राप्त आणि नीतिमत्ता उंचावणारे: जे शूर लोकांना उंचावते, जे आदरपूर्ण दबदबा प्रेरित करते, आणि जे भक्तिभाव निर्माण करते असे प्रसार माध्यम शोधा.
३. योग्य पाहिजे, चुकीचे नाही : जेव्हा पौल म्हणतो की आपण “न्याय्य” काय आहे ह्याचा विचार केला पाहिजे करतो, तेव्हा त्याला देवाचे नियम व त्यांचा गुणवत्ता दर्जा हे म्हणायचे असते — जीवनाच्या सर्व अंगांत योग्य वर्तणूक. पौल आपल्याला विनवतो की आपण योग्य वागणूक, धाडसी कृतीं, परिश्रम करणारे आईबाप, प्रेमळ पिते, ममताळू मातां, आदराने वागणारी मुलें, आनंदी कुटुंबे, हळुवारपणे सुश्रुषा करणारे, प्रामाणिक कर्मचारी, सचोटीने वागणारे धनी, वगैरे शोधून काढावी आणि साजरी करावी.
४. शुद्ध पाहिजे, शिसारी आणणारे किंवा घाणेरडे नाही : ज्यात ख्रिस्ती विवाह साजरा केलेला दाखवला आहे किंवा एक सुरळीत चालत असलेले कुटुंब जीवन दाखवले आहे असा चित्रपट तुम्ही शेवटी केव्हा पाहिला होता? अनैतिकता, दुराचार, भांडण आणि खून हे आज सगळीकडे दिसून येतात. प्रकाशझोत आनंदी आणि धार्मिक नातेसंबंधांवर, आणि दीर्घ एकनिष्ठतेचे विवाह ह्यांवर पाडण्यासाठी पावले उचला. जे धार्मिक तरुण लोक अश्लील गोष्टीं पाहत नाहीत, सदभिरुची सोडलेले कपडे वापरत नाहीत, जे त्यांची मने काबूत ठेवतात, आणि जे स्वतःला विवाहाकरिता शुद्ध राखतात त्यांच्याबाबत आनंद करा.
५. सुंदर पाहिजे, कुरुपता नाही : “ज्या गोष्टी प्रशंसनीय आहेत ” हे शब्द” जे काही आकर्षक आणि मन भावणारे”, प्रशंसा व प्रीती घडवणारे त्याचे वर्णन करतात. जेव्हा आपणापैकी पुष्कळ जण आज वेगवेगळ्या आकाराच्या लहानमोठ्या पोलाद आणि काँक्रीटच्या खोक्यांत राहतात, तेव्हा आपल्याला शेजारच्या आसमंतात, सौंदर्य आढळणे बरेच वेळां फार कठीण असते. आपल्याला शहराबाहेर जाण्याची, आश्चर्यकारक पर्वत पाहायची, जंगलाचा सुगंध लुटायची, ताजी आणि पौष्टिक फळें खायची, आणि पक्षी गातात ती अद्भुत गाणी ऐकायची गरज असते. तुमच्या विविध ज्ञानेंद्रियांद्वारे हे सौंदर्यप्राशन वाढवा.
६. प्रशंसा करणे, तक्रार करणे नाही : पौल म्हणत होता, “विध्वंसक गोष्टीं ऐवजी विधायक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. “किती भयंकर” अशा शब्दांऐवजी तूम्हाला आणि इतरांना “वाह, छान!” म्हणायला लावणाऱ्या गोष्टींवर मेजवानी झोडा. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत गाडीत फिरत असता तेव्हा ज्या गोष्टींतून लोक चांगले दिसून येतात की ज्यांत लोक वाईट दिसतात ते विषय तुम्ही सुचवता? ज्या ऐकून लोकांना देवाची आणि इतरांची स्तुती करावीशी वाटेल अशा गोष्टीं तुम्ही सांगता की ज्यामुळे लोक देवाविषयी साशंक होतील आणि इतरांना दोष लावतील अशा?
पौल ह्या सहा गटांच्या सारांशात जसे मांडतो तसे, “जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. (व ८). पौलासाठी ही केवळ एक सिद्धांताची तात्विक बाजू नव्हती; तो त्यांच्या स्मरणात असलेल्या पौलाच्या गोष्टीं त्यांनी आठवाव्या असे विनवतो : “माझ्यापासून जे काही तुम्ही शिकलात, जे स्वीकारलेत व पाहिलेत ते आचरत राहा :म्हणजे शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील.” (फिल ४:९). तो म्हणतो की जर तुम्ही मी जसा विचार करतो तसा विचार कराल, तर तुमच्या मनातील भय, चिंता, खिन्नता आणि काळजी जाऊन तेथे ईश्वरी शांती येईल.
Image by Freepik