बहुसंख्यांक अमेरिकन लोकांना जसे मानवी स्वभावाचे चित्र वाटते त्याहून बायबल आधारित चित्र प्रचंड प्रमाणात वेगळे आहे. आपण आपणा स्वतःला आणि आपल्या शेजाऱ्यांना मूलभूतपणे चांगले लोक मानतो. अमेरिकन लोक ह्या नात्याने, आपण उदबोधन प्रकाशाच्या निर्झरातून (एन्लायटनमेंट तत्वज्ञान) खूप काही ग्रहण करून घेतले आहे. उदबोधनाने (एन्लायटनमेंट) संपूर्ण भूतकाळापासून — मानवी परंपरा, अधिकार व्यवस्था व रचना, आणि स्वीकारलेली ठाम धार्मिक मतें यांपासून आपली सुटका केली आहे, इमॅन्यूएल कांट ह्या जर्मन तत्ववेत्त्याच्या सुप्रसिद्ध म्हणीचा अर्थ हा आहे की आपण स्वतः शुद्ध तर्कशक्तीचा वापर केल्याने आपल्या आतील सत्य सापडणे शक्य आहे. कांटचे हे सुभाषित (ते न जाणताच) स्वीकारले गेले असल्यामुळे, विशेषतः आता अंतःकरणाशी जोडून टाकलेल्या आणि चर्चचे अधिकार, किंवा पवित्र शास्त्र अशासारख्या कोणत्याही बाह्यात्कारी गोष्टीपासून पूर्णपणे काडीमोड केलेल्या धर्माची गोष्ट येते तेव्हा—अमेरिकन लोक मानवी स्वभाव, आणि सत्य शोधून काढण्याची स्वत्वामधील शक्ती ह्याबाबतीत विश्वास बसणार नाही इतके आशावादी बनले आहेत की त्यांच्या मतानुसार पवित्र शास्त्र आपली जागा भावनेला देते. तर्कशक्तीपासून विश्वासाने काडीमोड घेतला आहे. गंभीर धार्मिकता आता अध्यात्मिकता झाली आहे.
एका बाजूला, एकमेकांशी तुलना करून लोक चांगले आहेत असे आपण म्हणतो तेव्हा त्यात एक तुलनात्मक, सापेक्ष असा अर्थ असतो, तर दुसऱ्या बाजूला, बायबल असे चित्र दाखवते की पुरुष आणि स्त्रियां पवित्र, दैवी प्रतिमा धारक आहेत. उत्पन्न केलेला प्राणिमात्र प्रत्येक दृष्टीने देवासारखा जितका होऊ शकेल तितका. पण खेदपूर्ण रीतीने ते पापात पडले आहेत, म्हणून देवाची गौरवशाली प्रतिमा एका विद्रुप झालेल्या रूपात शिल्लक राहते. पापात मरून पडलेले, आणि तारले जाण्याची गरज असलेले पापी लोक असे मानव जातीचे वर्णन बायबल करते. बायबल आपल्याला सांगते की संपूर्ण मानव जातीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देवाने त्या पहिल्या पुरुषाला निवडले होते, म्हणून स्वतःच्या पापाबद्दल दोषी असण्याच्या भरीला आपण आदामाचे वंशज म्हणून आदामाच्या पापासाठी देखील दोषी आहोत. जेव्हा आपण मूळ पापाविषयी बोलतो तेव्हा आपला हा आशय असतो. आपण ज्या भयानक आपत्तीत जन्मलो आहोत त्यापासून वाचण्यासाठी आपल्याजवळ करण्यासारखे अजिबात काहीही नाही. आपण हरवले गेलो आहोत. आपण बंडखोर आहोत. कांटने रंगवलेले आपले आशावादी चित्र आपण पसंत करतो, पण त्याचे एकच कारण हे आहे की बायबलमध्ये वर्णन केलेले पतन पावलेल्या मानवी स्थितीचे एकूण वर्णन आपण पूर्णपणे झिडकारतो.
केवळ कृपा (सोला ग्रेशिया) ह्या शब्दसमूहातून आम्ही हे समजतो की जे पापी लोक पापात मरून पडले आहेत, आणि जे तारणाला पात्र नाहीत, किंवा तारले जाण्याची ज्यांना इच्छा नाही, त्यांच्या अंतःकरणात देव कार्य करतो. मेलेले लोक स्वतःला पुनर्जीवित करू शकत नाहीत, किंवा स्वतःला तारण्यासाठी देखील काहीही करू शकत नाहीत. पण देव आपल्याला ख्रिस्तात जिवंत करू शकतो आणि तो जिवंत करतो, आणि त्या क्षणापासून पुढे आपल्या पापांच्या दोषापासून आपल्याला तारण्याच्या त्याच्या अद्भुत अभिवचनांवर आपण भरवसा ठेवू शकतो, आणि मग त्याला गौरव देणारी जीवने जगण्याची इच्छा आपण धरतो.
मानव जात हा पतन पावलेल्या आणि पुन्हा उठू न शकणाऱ्या बंडखोरांचा एक वंश आहे असे धर्म सुधारणेचे प्रॉटेस्टंट लोक समजत असत. आपली परिस्थिती अतिशय भयानक आहे. आपण देवासमोर दोषी आहोत. दुसऱ्याच्या सहाय्याविना आपण देवाकडे येऊ शकत नाही. आपण पाप करतो, कारण पाप करणे आपल्याला आवडते. आणि जेव्हा आपल्या कठीण परिस्थिति विषयी बायबल आपल्याला सांगते, तेव्हा आपल्याला ते आवडत नाही. खरे म्हणजे, आपल्याला चीड येते.
आता कृपाळू देवाचा प्रवेश होतो. केवळ कृपा (सोला ग्रेशिया ) ही अशी संकल्पना आहे ज्यामध्ये देव, त्याच्या कृपेतून, आदामाच्या पतन पावलेल्या वंशजांवर करुणा करतो, आणि आपल्या तारणासाठी ज्याची गरज आहे तेवढेच केवळ पुरवत नाही — येशू ख्रिस्ताचे तारणदायी कार्य — तर आपण अद्याप पापी असतांना आणि उघडपणे त्याच्याविरुद्ध बंड करत असतांना, देव तरी देखील आपल्याकडे सुवार्तेद्वारे येतो, आपला अध्यात्मिक नवा जन्म घडवतो, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याचे पाचारण करतो आणि मग आपल्या पापांची क्षमा करतो, आणि एक विनामूल्य देणगी म्हणून येशू ख्रिस्ताचे परिपूर्ण नितीमत्व आपल्या हिशेबी लावतो. देव हे करतो कारण तो कृपाळू आहे, आपण त्याला पात्र आहोत म्हणून नव्हे.
केवळ कृपा (सोला ग्रेशिया) ह्या शब्दसमूहातून आम्ही हे समजतो की जे पापी लोक पापात मरून पडले आहेत, आणि जे तारणाला पात्र नाहीत, किंवा तारले जाण्याची ज्यांना इच्छा नाही, त्यांच्या अंतःकरणात देव कार्य करतो. मेलेले लोक स्वतःला पुनर्जीवित करू शकत नाहीत, किंवा स्वतःला तारण्यासाठी देखील काहीही करू शकत नाहीत. पण देव आपल्याला ख्रिस्तात जिवंत करू शकतो आणि तो जिवंत करतो, आणि त्या क्षणापासून पुढे आपल्या पापांच्या दोषापासून आपल्याला तारण्याच्या त्याच्या अद्भुत अभिवचनांवर आपण भरवसा ठेवू शकतो, आणि मग त्याला गौरव देणारी जीवने जगण्याची इच्छा आपण धरतो.
Used with Permission from www.monergism.com