आपण का आणि कशी प्रार्थना करतो

“प्रभुजी, आम्हाला प्रार्थना करायला शिकवा.” (लूक ११:१). शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला बोललेले हे शब्द बरेच काही उकलून दाखवतात. यहुदी धर्मगुरूंनी आपल्या शिष्यांना ही महत्वाची शिस्त शिकवण्याची प्रथा त्या दिवसांत होती. तरीही, ह्या विनंतीमध्ये केवळ यहुदी प्रथेहून काही तरी अधिक असे होते. शिष्यांनी येशूला वेगवेगळ्या वेळी प्रार्थना करतांना ऐकले होते. येशूच्या प्रार्थनांतून इतर गोष्टीं वगळतां, त्याचे पित्याशी असलेले नाते व्यक्त करणारे अनुबंध, त्याने देवाला पिता म्हणून मारलेल्या हाकेने ते नक्कीच प्रभावित होऊन हेलावून गेले होते.

प्रार्थना, प्रत्येक खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीचा सर्वात मोठा विशेषाधिकार आणि मोठे ओझे, ह्या दोन्ही गोष्टीं असतात. प्रार्थना विशेषाधिकार असते कारण प्रार्थना आपल्या जीवनात आपल्याला विभिन्न समयी लाभलेला एक सर्वात महान आनंद झाला हे आपण दाखवू शकतो. पाप, वेदना, किंवा गरज ह्यांच्या भाराखाली दबलेले असतांना देवाशी आपल्या जिवंत संबंधाची जाण होते तेव्हा तुम्ही आपल्या सर्व चिंता देवापुढे मोकळेपणाने ओतता. अशा वेळी, पनिएल येथे याकोब बोलला तसे बोलण्याची इच्छा तुम्हाला होते, “हे प्रत्यक्ष देवाचे घर, स्वर्गाचे दार आहे!” (उत्पत्ती २८:१७).

इतर वेळां एक प्रथा आणि कर्तव्य म्हणून तुम्ही प्रार्थना करता, आणि तुमच्या प्रार्थना पोकळ घोकंपट्टी आणि जवळजवळ निर्जीव, कुचकामी भुश्यासारख्या दिसतात. काही तरी चुकत आहे हे तुम्हाला कळते पण त्याविषयी काय करावे ह्याबाबत तुम्हाला पूर्ण खात्री नसते. जर तुमच्या प्रार्थना तुम्हाला दुःखाचा सुस्कारा सोडायला लावतात, तर देवावर त्याचा काय परिणाम होत असेल असा विचार तुम्हाला येतो. आपल्याला प्रार्थना एवढी कठीण गोष्ट वाटते ह्याचे एक कारण हे आहे की त्याच त्याच गोष्टींकरिता तुम्ही हुबेहूब तेच शब्द वापरता. नेहमीच प्रभूपुढे आणण्यासाठी चर्च किंवा कुटुंबातील आणीबाणीच्या प्रसंगासारख्या काही तरी नवीन गोष्टीं नक्कीच असतात. पण आपल्या बहुतेक प्रार्थना त्याच त्याच गोष्टींविषयी असतात. ते मग कंटाळवाणे आणि आत्मिकता नसलेले काहीतरी असे दिसू लागते.

प्रार्थना एवढ्या सगळ्या गोष्टीं खरेच मिळवून देते का अशी अविश्वासाची शंका देखील मनाला चाटून जाते. पेत्राला मृत्युदंड देण्याचे ठरले होते त्यापूर्वीच्या रात्री प्रभूने त्याची सुटका करावी यासाठी भरलेली प्रार्थना सभा आठवते का? जेव्हा त्यांना कळवण्यात आले की तो दाराशी उभा आहे तेव्हा ते त्या रुदा नावाच्या नोकर मुलीला म्हणाले “तुला खूळ लागले आहे”(प्रेषित १२:१५).

ह्या अडचणी आणि संघर्ष विचारात घेतां, आपण प्रार्थना का करतो हे समजून घेण्यात आपण प्रार्थना कशी करावी हे समजण्याची गुरुकिल्ली आहे हे कळणे महत्वाचे आहे. प्रार्थना करायची तरी का? ह्याचे उत्तर साधेसुधे आणि तरीही गहन आणि उत्तेजन देणारे असे आहे. एक पिता ह्या नात्याने, माझी पत्नी आणि मुलें यांनी आज काय बेत करून ठेवले आहेत हे मला आधीच माहित असते. परंतु, मी घरी येतो तेव्हा, त्यांनी त्या दिवसभरात काय केले हे मी तरी त्यांना विचारतोच. लुटूलुटू चालणाऱ्या माझ्या मुलांची बडबड ऐकून मी आनंदाने हरखून जातोच. थोड्याच दिवसांपूर्वी, मी माझ्या एका बाळाला दुचाकीवर फिरवून आणले. त्यावेळी तिला दिसलेला प्रत्येक पक्षी आणि प्राणी तिने मला दाखवला. मी मोठ्या कौतुकाने माझ्या कन्येशी संवाद साधला. कोणत्याही बापाला आपल्या मुलांशी संभाषण करणे खूप आवडते.

ख्रिस्तावरील विश्वासाने आणि त्याच्या कृपेच्या दत्तकपणाद्वारे देव तुमचा पिता बनतो (गलती ४:४-६). तुम्हाला थंडपणा किंवा दुरावा जाणवत असतो तेव्हा देखील, आपल्या बालकांशी उत्साहाने संवाद करणे ज्याला खूप आवडते असा परिपूर्ण पिता तो आहे. जगीक बाप असल्यामुळे, आपण बेचैन होतो, दमून जातो किंवा विचलित बनतो. देव जो पिता ह्याला कधीही असे अशक्तपण जाणवत नाही. (मत्तय ७:११). ख्रिस्त जो मध्यस्थ, त्याच्याद्वारे तो आपल्या प्रार्थना सुद्धा अशा शुद्ध करतो की आपण आपल्या थंडपणाने किंवा दुर्बलतेच्या भाराने दबलेले असतो तेव्हा देखील त्या सुगंधी धुपासारख्या मान्य होऊन वर पित्यापुढे सादर होतात. आपण स्वतःला ह्याचे स्मरण करून दिल्याने आपल्या प्रार्थनांकरिता मोठे साहाय्य लाभते.

प्रार्थना कशी करावी ह्याबाबत देवाने आपल्या साहाय्यासाठी अद्भुत गोष्टीं दिल्या आहेत. एखादी व्यक्ती एका दिवसात एक तासभर किंवा त्याहून अधिक काळ प्रार्थना कशी करू शकते ह्याचे कुतूहल तुम्हाला कधी वाटले का? तुम्ही ते कधीही करू शकणार नाही असे तुम्हाला वाटते म्हणून तुम्ही आत्मिक प्रवृत्तीचे नाहीत आणि दुय्यम श्रेणीचे आहात असे तुम्हाला वाटते. प्रार्थना करणे हे एक गुपित आहे असा खुद्द देवाच्या वचनाने दुजोरा मिळतो. एक पद्धत अशी आहे की स्तोत्रें विभागून त्यांचे ३० स्तोत्रांचा एक या प्रमाणे पाच गट करायचे. मग महिन्याच्या पहिल्या दिवशी, स्तोत्र १, ३१, ६१ इत्यादी. स्तोत्रें वाचा. एका वेळी एक वचन किंवा एक विचार घेऊन त्यावर प्रार्थना करायला स्वतःला उद्युक्त करा. देवाच्या वचनावर तुम्ही रात्रंदिवस मनन करत राहावे असे देवाने करावे अशी याचना करा. कदाचित त्या पांच स्तोत्रांपैकी कमीत कमी एक स्तोत्र तुम्हांमध्ये प्रार्थनेचे झरे निर्माण करील, आणि तुमचा वेळ संपण्यापूर्वी तुम्ही त्या सर्व स्तोत्रांपर्यंत पोहोचूही शकणार नाही. असे करत असतांना तुम्हाला तुमच्या प्रार्थनांमध्ये एक ताजेपणा आणि विविधता आढळून येईल. (ACTS) पुज्यभावाने करायची आराधना, पाप कबुली/निवेदन, देवाप्रत कृतज्ञता, उपकार स्तुति आणि विनम्र याचना/ विनंती ह्या चार गोष्टीं प्रार्थनेसाठी फार अद्भुत रीतीने साहाय्य करू शकतात. अति महान आणि अवर्णनीय गुणधर्म असलेल्या देवाविषयी मनन चिंतन करत त्याची आराधना करा, संपूर्ण मनापासून तुमची पापें कबूल करा, प्रांजळपणे त्याचे आभार माना, आणि तुमच्या विनम्र याचना त्याच्यापुढे मांडा. जेव्हा गरजवंत लोक रडून धावा करतात तेव्हा तो त्यांचे ऐकेल.

( इंग्रजीत शब्दांच्या आद्याक्षरांनी बनलेला शब्द म्हणजे ऍक्रोनिम ACTS दिलेला आहे आणि त्यातील घटक शब्द हे आहेत : त्यांचे भाषांतर मराठीत या शब्दांधारे केलेले आहे:

Adoration म्हणजे प्रशंसापूर्ण भक्ती
Confession पाप कबुली
Thanksgiving कृतज्ञता / आभार मानणे
Supplication विनंती / याचना

डॉ. जोएल बीके
डॉ. जोएल बीके

जोएल रॉबर्ट बीके (जन्म कलामाझू, मिशिगन येथे, डिसेंबर 9, 1952) एक अमेरिकन सुधारित पाद्री आणि धर्मशास्त्रज्ञ आहे. ते ग्रँड रॅपिड्स, मिशिगनमधील हेरिटेज रिफॉर्म्ड मंडळीचे मंत्री आहेत आणि प्युरिटन रिफॉर्म्ड थिओलॉजिकल सेमिनरीचे अध्यक्ष आहेत, जिथे ते सिस्टेमॅटिक थिओलॉजी आणि होमलेटिक्सचे प्राध्यापक देखील आहेत.