देवाचे भय धरायला सांगणारी आणि देवाचे भय म्हणजे काय ते आपल्याला शिकवणारी खूप वचने बायबलमध्ये आहेत (अनु. ३१:१२; स्तोत्र ३३:८;१११:१०; नीती २३:१७). दोन्ही करारांच्या बाबतीत हे खरे आहे; देवाचे भय म्हणजे सध्या लागू नसणारी जुना करारातील एक कल्पना आहे अशा विचाराला कोठेही समर्थन नाही. (उदा. मत्तय १०:२८; लूक १:५०; फिल २:१२; प्रकटी १९:५). मूलतः, देवाचे भय धरणे ह्याचा अर्थ देवाप्रत नितांत आदर, प्रीती, दृढ विश्वास दाखवणे आणि केवळ देवाकरिता जगणे असा आहे. हा खऱ्या धर्माचा संपूर्ण आशय आहे (उप १२:१३). ह्याडींगटनच्या जॉन ब्राऊन ह्याने देवाचे भय ह्या शब्दांत टिपले आहे: “ख्रिस्ती लोकांचा आनंद देवाच्या प्रीतीत आहे, आणि त्याचा मुखप्रकाश त्यांचे जीवन आहे. जर देव त्यांच्याकडे पाहून स्मित करतो तेव्हा जग कपाळावर आठ्या घालते तर त्याचे त्यांना महत्व वाटत नाही, आणि जर देव नाखुशीने आठ्या घालतो परंतु जग स्मित हास्य करते तेव्हा त्याचे त्यांना महत्व नसते.”
आपल्याला अशा रीतीने उत्पन्न करण्यात आले होते की आपल्या अंतःकरणात देवाचे उचित भय होते. पण, आपले पतन झाले तेव्हा आपण देवाचे भय काढून टाकण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे अवशेष आपल्या सद्सद्विवेकबुद्धीत राहिले आहेत. पतन पावलेल्या पुष्कळ पाप्यांच्या मनात, विशेषता जेव्हा देव त्यांच्या विरोधात ऐहिक शिक्षा देतांना दिसून येतो तेव्हा, अजूनही एक विशिष्ट दहशत आणि धास्ती असते. पण ह्यांपैकी कोणत्याही गोष्टीने तारण होत नाही. रोम ३:१८ हे स्पष्ट करते की निसर्गतः आपल्या डोळ्यांपुढे देवाचे खरे भय नाही. प्रभूचे भय ही देवाच्या कृपामय करारातून त्याने दिलेली एक देणगी आहे (यिर्मया ३२:३९-४०). पवित्र आत्मा पाप्यांच्या अंतःकरणात कार्य करुन देवाचे भय बिंबवतो, ते कार्यान्वित करतो आणि त्याची जोपासना करतो. (स्तोत्र ८६:११). प्रभूचे भय “शुद्ध, सर्वकाळ टिकणारे”आहे (स्तोत्र १९:९).
तुम्ही देवाचे हे भय जाणता का?
सर्वप्रथम, खरेपणाने देवाचे भय धरणे म्हणजे तुम्ही त्याला पवित्र देव म्हणून मान द्याल आणि त्याच्याविषयी नितांत आदर बाळगाल (यशया ८:१५). देव हा देव आहे आणि आपण देव नाही. त्याचे खरेखुरे भय धरण्याकरिता हे एवढे कारण गरजेपेक्षा खूप अधिक आहे . शिवाय, त्याने सृष्टी आणि त्याचे वचन ह्या दोन्ही ठिकाणी स्वतःला सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, पवित्र, न्याय्य आणि चांगला असे प्रकट केले आहे. तो जो काही आहे आणि त्याने स्वतःला ज्या स्वरूपात प्रकट केले आहे त्या कारणास्तव त्याला सर्वोच्च आदर दिला पाहिजे. गवताचे प्रत्येक पाते देवाचे भय धरा असे आपल्याला सांगते. योग्य प्रकारे त्याचे भय धरण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येक श्वासागणिक वाढते.
.
दुसरी गोष्ट म्हणजे, देवाचे खरे भय धरण्यासाठी, त्याने आपल्याला सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याची उपासना कराल. (स्तोत्र ५:७; ८९:७; इब्री १२:२८).त्याचे भय कसे धरावे हे आपल्याला उपजतच कळते असे ढोंग आपण करू नये. पण भय कसे धरावे ह्याबाबत त्याने आपल्याला अंधारात ठेवले नाही. त्याच्या जवळ कसे जावे ह्याविषयी स्पष्टपणे आणि काटेकोरपणे बायबल आपल्याला सांगते.
तिसरी गोष्ट, देवाचे खरेपणाने भय धरणे याचा अर्थ तुम्ही पापाचा तिरस्कार कराल आणि त्यापासून दूर पळाल असा आहे. नीती ८:१३ हे स्पष्ट करते : परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्मांचा द्वेष करणे होय गर्व, अभिमान, कुमार्ग उद्दामपणाची वाणी ह्यांचा मी द्वेष करते.”
चौथी गोष्ट, देवाचे खरेपणाने भय धरणे याचा अर्थ ख्रिस्ताच्या सुवार्तेने खुल्या केलेल्या पापक्षमेत जीवन कंठणे होय. स्तोत्र १३०:४ म्हणते, “तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या हाती क्षमा आहे.” हा एका वेळेचा अनुभव नसतो; पौल शिकवतो त्याप्रमाणे, त्यामध्ये वारंवार धुतले जाण्याचा प्रयत्न करणे अंतर्भूत आहे. “तेव्हा प्रियजनहो, आपणाला ही अभिवचनें मिळाली आहेत. म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू (२ करिंथ ७:१).
पांचवी गोष्ट, देवाचे खरेपणाने भय धरणे ह्याचा अर्थ ह्या जगाच्या दृष्टीने, तुम्ही बिघडून गेला आहात आणि अंशतः नष्ट झाला आहात. आपण वाचतो की, “नोहाने आदरयुक्त भयाने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले; त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले, आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला.” (इब्री ११:७).
सहावी गोष्ट, देवाचे खरेपणाने भय धरणे ह्याचा अर्थ जे इतर लोक त्याचे भय धरतात त्यांच्याशी सहभागिता ठेवण्याची उत्कट इच्छा तुम्हाला असेल. (मलाखी ३:१६). याच्या भरीला, पुढे येणाऱ्या पिढ्यांमध्ये आणि जगभर सर्वत्र देवाचे भय पसरावे अशी तुमची इच्छा असेल. (स्तोत्र ३४:११; यहोशवा ४:२४).
शेवटी, देवाचे खरेपणाने भय धरणे ह्याचा अर्थ देवाला अधिक चांगल्या रीतीने जाणून घ्यावे अशी इच्छा तुम्हाला नेहमीच असेल. परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय (नीती. १:७). पण जेव्हा आपण योग्य रीतीने देवाचे भय धरतो तेव्हा आपल्याकडे त्या ज्ञानातील पुरेसे आहे असे आपल्याला कधीही वाटणार नाही. (नीती २:५).