टीका कोणालाही आवडत नाही. संवेदनशील सद्सद्विवेक असणाऱ्या ख्रिस्ती लोकांना टीका हाताळणे अधिकच कठीण जाते. टीका पेलायला साहाय्य होण्यासाठी, नऊ मार्ग येथे देत आहोत.
प्रथम, टीका अपरिहार्य आहे हे माना. जर तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता त्याचा द्वेष करणाऱ्या एखाद्या प्रतिकूल जगात एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून राहत असाल, तर तुम्ही टिकेपासून सुटू शकत नाही. येशूने म्हटले की जगाने जसा त्याचा द्वेष केला तसाच ते आपला द्वेष करील. (योहान १५:१८; १ योहान ३:१). लूक ६:२६मध्ये त्यानेही भर घातली, “जेव्हा सर्व लोक तुम्हाला बरे म्हणतील, तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार!”.
दुसरी गोष्ट, टीकेचा मूळउगम विचारात घ्या. जरी तुम्ही प्रत्येक टीका गंभीरपणे घेतली पाहिजे, तरी देखील स्वतःला हे विचारणे योग्य ठरेल : माझ्यावर टीका करणारा कोण आहे? माझा टीकाकार मित्र आहे की शत्रू, एक परिपक्व विश्वासणारा की एक निर्ढावलेला अविश्वासू, एक तीव्र टिकाकुशल व्यक्ती आहे की कदाचित एक काठावरचा चर्च सभासद? जर तुमचा टीकाकार बुद्धिमान म्हणून ओळखला जातो, तर त्याने तुमचे सकारात्मक मूल्यमापन करावे यासाठी त्याला उत्तेजन दिले पाहिजे.
तिसरी गोष्ट, टीकेसाठी पकडलेला क्षण आणि प्रार्थना ह्यावर विचार करा. ज्यातून टीका करण्यात आली आहे ती भौतिक स्थिती, टीकेसाठी निवडलेली वेळ, आणि एकूण परिस्थिती विचारात घेतल्यास ती टीका उपयुक्त आहे की कसे हे ठरवण्यात मदत होईल. एक सर्वसाधारण नियम असा ठेवा की प्रार्थना करण्यासाठी, विचार करण्यासाठी, आणि सल्ला मसलतीसाठी कमीत कमी चोवीस तास उलटून जाईपर्यंत त्या टीकेला प्रतिसाद देऊ नका.
चौथी गोष्ट, आपल्या स्वतःचा विचार करा. आपण स्वतःला उंचावण्यापासून रोखण्यासाठी पवित्र आत्मा आपल्या टीकाकारांचा उपयोग करून घेतो. म्हणून टीकेच्या संभाव्य हल्ल्यापासून असुरक्षीत असे स्वतःला ठेवा. असे म्हणायला घाबरू नका, “माझी चूक झाली; मला तुम्ही क्षमा कराल का?” तुमच्या टीकाकारांकडून तुम्ही बहुमोल सत्यें शिकू शकता ह्याबद्दल कृतज्ञ राहा. आपल्या सर्वात चांगल्या मित्रांपैकी काही लोक ते आहेत जे आपल्याशी प्रेमळपणे, उघडपणे आणि बुद्धी वापरून आपल्याशी असहमती दाखवतात. “मित्राने केलेले घाय खऱ्या प्रेमाचे आहेत” (नीती. २७:६).
पांचवी गोष्ट, टीकेतील मजकूर विचारात घ्या. प्रामाणिकपणे स्वतःला विचारा: मला स्वतःची सुधारणा करण्यासाठी साहाय्यकारी ठरेल असे माझे टीकाकार काय म्हणत आहेत? ह्या विशिष्ट टीकेत सत्याचा असा गाभा आहे का, जो, मी माझ्यात काही बदल केलेत, तर मला अधिक धार्मिक बनवील? जर टीकाकार विधायक असे काहीतरी म्हणतात, तर ते आत्मसात करा, तुमचा दोष कबूल करा, आत्मसमीक्षेत पुढाकार घ्या, अंतःकरणपूर्वक क्षमायाचना करा, अधिक चांगले होण्यासाठी बदल घडवून आणा, आणि पुढे चला. दोन्ही परिस्थितीत, पुढे चला — आंतरिक कडवटपणा मनात ठेवू नका. देवाच्या लढाया लढा, तुमची स्वतःची नव्हे, आणि तुम्हाला कळून येईल की तो तुमची लढाई लढेल.(रोम १२:१९).
सहावी गोष्ट, पवित्र शास्त्रावर विचार करा. इफिस ६:१० सारखे शास्त्रभाग पाठ करा आणि त्यांवर मनन करा: प्रभुमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा,” तसेच रोम १२:१० : “बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा”. जेव्हा टीकाकार हल्ला करतात आणि तुम्हाला देवाचे मार्ग समजून येत नाहीत, तेव्हा येशूच्या योहान १३:७मधील शब्दांवर दृढ विश्वास ठेवा : “मी करतो ते तुला आता कळत नाही; ते तुला पुढे कळेल.”
सातवी गोष्ट ख्रिस्ताचा विचार करा. सर्वांत महत्वाचे म्हणजे, टीका वाढत असतांना येशूकडे दृष्टी लावा. इब्री १२:३ सांगते, “ज्याने आपणाविरुद्ध परकीयांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा.” पेत्र अधिक तपशील देतो: “कारण ख्रिस्तानेंहि तुमच्यासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवरपाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुमच्याकरता कित्ता घालून दिला आहे; त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही; दुःख भोगत असता त्याने धमकावले नाही; तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवूनदिले.”
आठवी गोष्ट, प्रीतीविचारात घ्या. तुमच्या टीकाकारावर प्रीती करा. त्याला समजण्याचा प्रयत्न करा. त्याची टीका घेऊन तो थेट तुमच्याकडे आला याबद्दल त्याचे आभार माना. तुमची काही हानी झाली असेल त्याबद्दल क्षमा करायला तयार असा. तुमच्या टीकाकारासाठी प्रार्थना करा आणि शक्य असेल तर, तुमच्या टीकाकारासह प्रार्थना करा — प्रामाणिकपणे आणि विनयशीलतेने. प्रीती अडवणारे काहीही असेल ते काढून टाका. पेत्र लिहितो त्यानुसार, “म्हणून सर्व दुष्टपणा, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे सोडून” (१ पेत्र २:१) हे जेव्हा तुम्ही करता, तेव्हा तुम्हाला आढळेल की तुमच्या स्वतःच्या जखमा अधिक त्वरेने भरून येतील.
नववी गोष्ट, अनंतकाळाचा विचार करा. हे लक्षात ठेवा की खरे विश्वासणारे म्हणून आपल्यावर केलेली सर्व टीका तात्पुरती असते. आपला विश्वासू तारक आपल्यासाठी यार्देनेच्या पलीकडच्या बाजूला वाट पाहात असणार आहे. तो आपल्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसुन टाकील आणि आपल्या भावाहून अधिक जवळ चिकटून राहणारा तो मित्र असल्याचे सिद्ध करील. सर्व चुकीच्या गोष्टीं बदलून योग्य करण्यात येतील. तेथे आपले विश्वासणारे टीकाकार आपल्याला प्रेमाने मिठीत घेतील आणि आपण त्यांना भेट देवू . आपल्याला हे समजूनयेईल की आपल्याला येथे पृथ्वीवर मिळालेली सर्व टीका आपल्याला इम्मानुएलच्या देशासाठी तयार करण्यासाठी आपल्या कुंभाराच्या हाताने वापरण्यात आली होती. आपण हे पूर्णपणे पाहू की आपली वाट पाहात असलेल्या गौरवाच्या भाराच्या तुलनेत ह्या सर्व टीका केवळ एक तात्कालिक व हलके फुलके संकट होते.