स्तोत्र १३०चे सुरुवातीचे वचन, “हे परमेश्वरा, मी शोक सागरातून तुझा धावा करत आहे” हे देवाची समक्षता गमावल्याच्या जाणिवेने एखाद्या खोलवर पिडलेल्या जीवाचा आतडी पिळवटून निघालेला धावा स्पष्टपणे चितारते. जॉन ओवेनने त्याचा सल्ला घ्यायला आलेल्या एका तरुणापुढे अशी कबुली दिली की ” देव आणि मनुष्य यांच्यामध्ये असलेला तो एक मध्यस्थ येशू ख्रिस्त ह्याविषयी वीस वर्षे केवळ बौद्धिक प्रवचनाद्वारे त्याने धर्मोपदेश केले होते परंतु या सत्याबाबत त्याला कोणतेही अनुभवजन्य ज्ञान झाले नव्हते. पण ज्यावेळी त्याला कबरेच्या तोंडाजवळ आणले गेले आणि त्याचा जीव भय आणि अंधकाराने दडपून गेला तेव्हा या सत्याचा त्याला अनुभव आला.” असे तो म्हणतो,
आत्मिक परित्याग (Spiritual Desertion) म्हणून ओळखली जाणारी ही जीवाची व्याधी आहे आणि केवळ देवाच्या मुलाला माहित असलेला हा वधस्तंभ आहे. आपला सार्वभौम देव कधी कधी, आणि त्याच्या सत्संकल्पानुसार त्याच्या लोकांना डोहात सूर मारून खोलांत जाऊ देतो (स्तोत्र ८८) ह्याचा निर्देश येथे आहे. तथापि, ह्या गोष्टीं ( डोह) कितीही खोल असल्या तरी, त्या नरकाच्या धूसर अंधाराच्या पडद्याने झाकलेल्या अगाद कुपा सारख्या खोल नाहीत; त्यांच्यात द्वेषभावना, निर्भत्सना किंवा क्रोध नाही.
नवजीवन लाभलेला आत्मा भयांधकाराच्या अथांग गर्तेत कितीही खोल बुडाला असला तरी पायाखाली उभे राहण्यासाठी त्याला नेहमीच युगांचा खडक (देव, अनंत काळाचे सामर्थ्य) सापडतोच. अपरिवर्तित लोकाना देखील अशा खोल अंधकराच्या डोहाचा अनुभव असतो तसेच देवाच्या लेकरांना असाच अनुभव येतो पण त्याचा त्यांच्या जीवनावर वेगळा परिणाम घडवून आणतो. अपरिवर्तित लोक यामुळे देवाच्या अधिक जवळ न येता हा अनुभव त्यांना देवा पासून अधिक दूर लोटतो. (प्रकटी १६:९)
पण, प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या मनात खोलवर येतो तो प्रश्न असा आहे, “ह्या भयाण, निर्जन खड्ड्यात मी का पडलो? देवाने मला शेवटी झिडकारले आहे का आणि आपले मुख माझ्यापासून दूर फिरवले आहे का? ज्यात पूर्वी आत्मा हर्ष पावत होता ती देवाची प्रीती गमावल्याची तीव्र जाणीव होत राहते (रोम ८:१५; १ पेत्र १:८). पण ह्याची खात्री बाळगा की त्याच्या पितृवत रीतीने जो हे परित्याग पाठवतो आणि त्यांची व्यवस्था ( नियंत्रण) पाहतो तो देवच आहे.
ह्या आत्मिक यातनांचे सर्वात सर्वसामान्य कारण परिवर्तन झालेल्या व्यक्तीच्या आत अस्तित्वात असलेले पाप, त्याची सत्ता आणि सदैव फसवणारे आत वसत असलेले पापाचे अवशेष. विश्वासणाऱ्याला हे कायमचे आश्वासन असेल आणि असलेच पाहिजे की एकदा पवित्र आत्म्याने शुद्धीकरणाद्वारे त्याच्या आत्म्याचे नवीकरण केले की तो ख्रिस्तामध्ये एक नवी उत्पत्ती असतो. परंतु तोच पवित्र आत्मा त्याच्या मनातून पापाचे तत्व आणि मूळ कधीही उपटून टाकत नाही; शेवटपर्यंत ते एखाद्या प्लेग रोगा सारखे चिकटून राहील. (रोम ७:२४). आत्म्याचा नागर अंतःकरणातील भ्रष्टाचाराची नवी क्षेत्रें उकरून टाकत जातो आणि पुन्हा एकदा त्यातील भ्रष्टाचार किती खोलवर पोचला आहे हे दाखवतो तसे आपण खेदाने अचंबीत होऊन जातो. जे तुम्ही आश्रयासाठी ख्रिस्ताकडे पळून आला आहात, ते तुम्ही आपली लढाई संपली आहे अशी कल्पना कधीही करत नाही.
मग, आत असलेल्या पापाच्या अपायकारक उपस्थितीचे फळ तसेच दिसणाऱ्या पापामुळे देवाबरोबर असलेल्या सहभागितेच्या जाणीवपूर्वक अभावाचे अति दुःखकारक परिणाम सोबत घेऊन येणारे उद्रेक देखील होतात. सर्वाधिक परिपक्व विश्वासणाऱ्याचा देखील हा अनुभव असू शकतो. (स्तोत्र ५१). पेत्र जसा बाहेर गेला आणि मोठया दुःखाने रडला तसा प्रभुपासून जाणूनबुजून दूर गेल्याने घडलेल्या दुःखाची गहनता कोण पूर्णपणे वर्णू शकेल?
आत्मिक परित्यागसदृश्य समय जे लोक मानसिक पिडां भोगत आहेत त्यांच्यावर देखील येतात. जेव्हा कोणत्याही दिशेला प्रकाश दिसून येत नाही अशा औदासिन्याच्या भयानक रात्रीत पुष्कळ कृपा पावलेले आत्मे बुडवले गेले आहेत. ऑक्टेव्हियूस विन्स्लोने लिहिले, पुष्कळ अंधाऱ्या, तारका नसलेल्या निबिड रात्रीत, आत्मिक जलप्रवासी मोठ्या कष्टाने समुद्रातून मार्ग काढून त्याला हव्या असणाऱ्या निवाऱ्याच्या बंदराकडे पोहोचतो.” आणि मग, मन आणि शरीर इतक्या घनिष्टपणे जोडले गेले आहेत ह्या कारणाने, आणि त्याचरीतीने क्षीण करणारा शारीरिक आजार आत्म्यावर रात्रीचा तीव्र ऋतु आणू शकतो.
तरीसुद्धा, ख्रिस्ताची सौम्यता आणि सहानुभूती विपुलपणे उपलब्ध असलेली एखादी जागा जर कोठे असेल तर ती जागा जो मानसिकयातना आणि अतितीव्र शारीरिकपीडा भोगतआहे, त्याच्या बाजूला असते. . (यशया४२:३). खूप हळुवारपणे व काळजी घेऊन तो (देव) जे लोक विषण्णतेच्या त्या अंधाऱ्याखड्ड्यात पडले आहेत त्या त्याच्यालोकांच्या जवळ येतो. आपण केवळ माती आहोत हे तो स्मरतो आणि संपूर्ण विश्वातील कोणत्याही हृदयातून वाहत नाही एवढी प्रेमदया, अनुकंपा, हळुवारपणा, आणि सहानुभूती ख्रिस्ताच्या हृदयातून वाहते. (स्तोत्र१०३:१३-14).
यशया ५०:१० हा सल्ला देते, “परमेश्वराचे भय बाळगून त्याच्या सेवकाचे ऐकणारा असा तुमच्यामध्ये कोण आहे? जो अंधारात चालतो, ज्याला प्रकाश मिळत नाही त्याने परमेश्वराच्या नामावर भाव ठेवावा, आपल्या देवाचा आश्रय करावा.” दिसणाऱ्या गोष्टींनुसार नव्हे तर सभोवती अंधार असतांनाही विश्वास ठेवून चाला.