सी.एस. लुईस असे म्हणायला आवडत असे, “देवाला पदार्थ आवडतो. त्यानेच त्याचा शोध लावला आहे.” जरी लोकांचे ह्या महत्त्वपूर्ण ईश्वरविज्ञानविषयक संबंधाकडे सहज दुर्लक्ष होऊ शकते, तरी देवाविषयीची ख्रिस्ती शिकवण निर्मितीला अनुरूप अशा ख्रिस्ती शिकवणीची याचना करते. देसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या गोष्टींसह निर्मितीचा अनुक्रम कसा समजून घ्यावा ह्यावर विचार करत असताना तीन महत्त्वाचे घटक समोर येतात.


पहिला, पवित्र शास्त्र ह्या गोष्टीची पुष्टी करते की देवाने सर्व काही निर्माण केले आहे. आता अस्तित्वात असलेली कोणतीही गोष्ट देवाने निर्माण केली ह्या वस्तुस्थितीशिवाय अस्तित्वात नाही. म्हणून विशिष्ट गोष्टी अस्तित्वात याव्यात ह्या देवाने दिलेल्या सार्वकालिक आज्ञेवर सर्व गोष्टींचे अस्तित्व अवलंबून आहे. निर्मितीच्या ख्रिस्ती सिद्धांताचे दुसरे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे देवाने सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत, म्हणून देव सर्व निर्मित गोष्टी आणि प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. ही गोष्ट पवित्र शास्त्राच्या अगदी सुरुवातीच्या घोषणेवरून स्पष्ट होते – “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली” (उत्पत्ति १:१). निर्मिती हा देवाचा भाग नाही (पॅन्थेइझम – एक अशी शिकवण जी देवाला विश्वासमान मानते किंवा विश्वाला देवाचे प्रकटीकरण मानते.), किंवा निर्मिती देवामध्ये समाविष्ट नाही (पॅनेथीझम – एक असा विश्वास किंवा शिकवण की देव विश्वापेक्षा महान आहे आणि त्यात अंतर्भूत आणि व्याप्त आहे.) ही वस्तुस्थिती ख्रिस्ती धर्माला इतर धर्मांपासून – विशेषत: पूर्वेकडील किंवा ग्रीक तत्त्वज्ञानातील द्वैतवादी वारसा असलेल्या धर्मांपासून वेगळे करते. जो तिसरा पैलू विचारात घेण्यासारखा आहे तो म्हणजे सर्व गोष्टी निर्माण केल्यावर, देवाने त्या “चांगल्या” आहेत असे म्हटले, ज्याची उत्पत्ति १ च्या निर्मितीच्या सात दिवसांमध्ये पुनरावृत्ती होताना दिसून येते. ही तीन तथ्ये केवळ निर्मितीच्या विशिष्ट ख्रिस्ती शिकवणीची मांडणीच करतात असे नाही, तर त्या शिकवणी विरुद्ध असलेल्या समकालीन मतांचा परखडपणे विरोध देखील करतात.


देवाने जेव्हा सर्व गोष्टी निर्माण केल्या, तेव्हा त्याने त्याच्या क्रियाशील शब्दाच्या पूर्ण सामर्थ्याने (इब्री. ११:३) शून्यातून (क्रिएशन एक्स नायहिलो , म्हणजे शून्यातून निर्मिती) सर्वकाही निर्माण केले. निर्मितीचा वृतांत आपल्याला वारंवार आठवण करून देतो की “देव बोलला” आणि तसे झाले (उत्पत्ति १). सूर्य, चंद्र, तारे, समुद्र, जमीन आणि आकाश ह्यापासून, तर निर्माण केलेली क्षेत्रे व्यापून टाकणाऱ्या विविध प्राण्यांपर्यंत, सर्व गोष्टी देवाने निर्माण केल्या आहेत आणि त्यांना अस्तित्वात आणले आहे. “सर्व गोष्टीं” मध्ये आपल्याला दिसणाऱ्या गोष्टींचा (म्हणजे, आपण ज्या दृश्यमान जगामध्ये राहतो ते), तसेच ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत (म्हणजे देवदूत आणि अदृश्य जग) अशा गोष्टींचा समावेश होतो. अदृश्य जग जरी दिसत नसले, तरी ते अस्तित्वात आहे ही वस्तुस्थिती आहे आणि ते देखील देवाने निर्माण केले आहे आणि आत्मिक प्राण्यांनी व्यापून टाकले आहे जे त्याच्या आज्ञा पाळतात. (म्हणजे देवदूत).


निर्मितीविषयीची ख्रिस्ती शिकवण देवाने आपले विश्व सार्वकालिक पदार्थांनी बनवले, किंवा तेथे सार्वकालिक आणि आदर्श स्वरूपाचे एक क्षेत्र होते ज्यामध्ये स्वर्गीय आत्मिक जगाच्या तुलनेत त्याच्या अंगभूत त्रुटी आणि अपुरेपणाचे संकेत म्हणून पदार्थ सहभागी झाले होते (उदा. प्लॅटो), हे मत असंभव असल्याचे सांगते. ह्या उलट, निर्मितीची ख्रिस्ती शिकवण असा आग्रह धरते की सर्व गोष्टी अस्तित्वात येण्यापूर्वी, देव त्याच्या निर्मितीपासून पूर्णपणे मुक्त आणि स्वतंत्र होता. येथे देखील, निर्मितीबद्दलच्या ख्रिस्ती दृष्टिकोनाचे महत्त्वपूर्ण परिणाम दिसून येतात. कोणतेही सार्वकालिक मानवी आत्मे अस्तित्वात नाहीत, किंवा आपण आपल्या जन्मापूर्वी अस्तित्वात नव्हतो. आपण कोणत्याही अर्थाने “दैवी” नाही. तरीसुद्धा निर्मितीच्या वृत्तांतात, देवाने पहिला मनुष्य आदाम, ज्याला जमीनीवरील मातीपासून निर्माण केले गेले आणि नंतर स्वतः देवाने जीवनाचा श्वास त्याच्यात फुंकला (उत्पत्ति २:७) त्याला देवाने आशीर्वाद दिला.


ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे की जेव्हा आपण देवाने सर्व गोष्टी निर्माण केल्याबद्दल बोलतो तेव्हा आपण केवळ पित्याच्याच नव्हे तर त्रैक देवाच्या संदर्भात बोलत असतो. पवित्र शास्त्र देवत्वाच्या तीनही व्यक्तींना (पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा) निर्मितीच्या कार्याचे श्रेय देते. पवित्र शास्त्रात जरी वारंवार पित्याने सर्व गोष्टी निर्माण केल्याबद्दल सांगितले असले (उदा. उत्पत्ति १:१; नेहेम्या ९:५-६; स्तोत्र ३३:६), तरी सर्व गोष्टींच्या निर्मितीच्या संदर्भात पुत्र आणि पवित्र आत्म्याचा देखील उल्लेख केला आहे. योहानकृत शुभवर्त्नामानाच्या प्रस्तावनेत (योहान १:१-१४), योहान ह्या गोष्टीची पुष्टी करतो की पुत्राने (येशूने) सर्व गोष्टी निर्माण केल्या (योहान १:३). तसेच प्रेषित पौल (कलस्सै. १:१६) मध्ये, आणि इब्रीलोकास पत्राचा लेखक (१:२) देखील ह्या गोष्टीची पुष्टी करतात. आणि मग निर्मितीच्या अहवालात, आपण वाचतो की, “आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता.” त्रैक देवाने सर्व काही निर्माण केले आहे.


ह्या गोष्टी लक्षात ठेवल्याने आपल्या सभोवतालच्या मूर्तिपूजक विचारसरणीमुळे होणारे नुकसान काही प्रमाणात टाळण्यास मदत होईल. निर्मितीची (दृश्य आणि अदृश्य गोष्टीची) ख्रिस्ती शिकवण आपल्याला आठवण करून देते की निर्माणकर्त्याला निर्माण केलेल्या सर्व गोष्टींपासून वेगळे केले पाहिजे आणि आत्मा आणि पदार्थ ह्यांच्यातील सामान्य द्वैतवाद सैद्धांतिकदृष्ट्या दोषपूर्ण आहे. पदार्थ हा केवळ भौतिक आहे म्हणून तो स्वाभाविकपणे वाईट किंवा सदोष नसतो. निर्मितीचा अहवाल स्पष्ट आहे की जेव्हा देवाने सर्व गोष्टी शून्यातून निर्माण केल्या तेव्हा त्याने त्या “चांगल्या” आहेत असे त्याने म्हटले. आणि जरी देवाच्या विरुद्ध मानवजातीच्या सामूहिक बंडामुळे आपल्या सभोवतालचे जग कण्हत असले तरी (रोम. ८:१८-२४), आपण हे विसरून चालणार नाही की, युगाच्या समाप्तीला जेव्हा आपल्या प्रभुचे दुसरे आगमन होईल तेव्हा तो त्याने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे नवीकरण करेल त्यात आकाश आणि पृथ्वीचाही समावेश असेल. (२ पेत्र. ३:१-१३).


देवाला पदार्थ आवडतो. त्यानेच त्याचा शोध लावला आहे इतकेच नव्हे तर तो स्वर्ग आणि पृथ्वीचे नवीकरण करेल आणि त्यांना आपल्या सार्वकालिक घरासाठी योग्य बनवेल.

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.