खऱ्या ख्रिस्ती विश्वासाचे पाच आधारस्तंभ!

पांच  सोला :  ओळख, पार्श्वभूमी

डॉ. किम रिडलबर्गर

थेट धर्म सुधारणेपासून आपली पूर्वजपरंपरा चालत आली आहे असा दावा करणारी पुष्कळ चर्चेस धर्मसुधारणा दिवस साजरा करतात.  रोमन चर्चने त्रस्त झालेला एक तरुण बायबल पंडित, मार्टिन लुथरने विटेनबर्ग शहरातील कासल चर्चच्या दरवाज्यावर त्याचे ९५ धर्म सिद्धांत खिळे ठोकून चिकटवले  ती पांचशे वर्षांपूर्वीची ऑक्टोबर ३१, १५१७, ही तारीख  आहे.  प्रायश्चित्ताच्या विधीबाबत रोमन मंडळींची जी समज होती त्यांना आव्हान देण्याची प्रोफेसर लूथरची इच्छा होती, आणि  त्या काळची  प्रोफेसरमंडळी  लेखी स्वरूपातील धर्म सिद्धांत (हरकती) दारावर चिकटवून त्यांवर विद्वत्तापूर्ण चर्चेची  मागणी करण्याची ही पद्धत अवलंबत असत.

जेव्हा त्याचे ९५ धर्म सिद्धांत प्रकाशित करण्यात आलेले  लूथरला दिसले तेव्हा त्याला साहजिकच खूप आश्चर्य वाटले होते.   रोमन चर्चचा स्वार्थीपणा, त्यांचा भ्रष्टाचार आणि अगणित कष्टकरी शेतमजुरांबाबत त्यांची बेपर्वाई खूपच वाढत चालली आहे असे ज्यांना वाटत होते त्यांना ह्या धर्म सिद्धान्तांनी वाचा फोडली होती.  जेव्हा बिनबाह्यांचा काळा झगा घालणारे डोमिनिकन फ्रायर योहान टेटझल, लोकांनी  केलेल्या पापांबद्दल  काल्पनिक “पर्गेटरी” (मरणानंतर यातनेद्वारे शुद्धीकरण) तील भोगण्याची मुदत अंशतः किंवा पूर्णपणे टाळण्यासाठी त्यांनी काही शमन-धन कॅथॉलिक धर्मोपदेशंकांना देण्याची पद्धत लोकांना पटवून देण्यासाठी जर्मनीत फिरले तेव्हा पुष्कळ जर्मन लोक क्रोधाने पेटून उठले.  आर्थिक परिस्थिती एवढी खालावलेली असतांना  आणि  विशेषतः  जर्मनीतील गरीब शेतमजूर लोक जे पाहायला रोमला कधीही जाऊ शकणार नाहीत  ते सेंट पीटर्स बझीलिका हे दिमाखदार, भव्य  कॅथिड्रल रोममध्ये बांधून काढण्यासाठी  ह्या विक्रीतून  मिळणारा पैसा खर्ची पडणार आहे अशा परिस्थितीत, रोमचे धर्ममार्तंड लोकांकडून शमन-धन वसूल करण्यासाठी आपला दूत पाठवायला धजतातच कसे?

जर्मन शेतमजूर रोमन चर्चचा उद्धटपणा आणि त्यांच्या गरजांबाबत चर्चची बेपर्वाई ह्याबद्दल  त्यांचा तिरस्कार करत होते, तर लूथरच्या दृष्टीने ह्या सर्व  गोष्टी काटेकोरपणे धर्मशास्त्राशी संबंधित होत्या.   जेव्हा लूथरचे धर्म सिद्धांत प्रकाशित झाले आणि जर्मनीच्या बहुतांश भागात त्यांचा फैलाव झाला,  तेव्हा लवकरच हे स्पष्ट झाले की हा वादविवाद धर्म तत्वांच्या केवळ एखाद्या सूक्ष्म मुद्याबाबत (प्रायश्चित)  नव्हता, तर त्यातून रोमन कॅथॉलिक चर्चने ज्या प्रकारचे धार्मिक अधिकार बळकावले होते त्यांना एक मूलभूत आव्हान  देण्यात येत  होते आणि त्याप्रमाणेच,  विधिसंस्कार, सत्कृत्यें, गुणावगुण, विश्वास आणि सुवार्तेचे गुणधर्म ह्यांबाबत  रोमन कॅथॉलिक चर्चची शिकवण ह्यांना देखील थेट आव्हान देण्यात येत होते. फार  काळ लोटत नाही तोच  युरोपच्या बहुतांश भागात प्रॉटेस्टंट विचारसरणीची चळवळ वेगाने फोफावून रोमन चर्चपुढे ती दूरवर  पसरणारी  पवित्र शास्त्र आधारित   एक धोक्याची सूचना म्हणून उभी ठाकली होती.  जरी  प्रॉटेस्टंट चळवळीची लवकरच लूथरवादी आणि धर्मसुधारीत शाखा अशी विभागणी झाली  तरी   प्रॉटेस्टंटांनी रोमपुढे ठेवलेल्या हरकती धर्म सुधारणेच्या “पांच सोला (घोषवाक्य)” म्हणून स्पष्टपणे ओळखल्या जाऊ लागल्या होत्या.   ह्या पांच  सोलांमधे केवळ धर्मशास्त्र, केवळ कृपा, केवळ ख्रिस्त, केवळ विश्वास आणि केवळ देवाला गौरव ह्यांचा समावेश आहे.

“जरी  प्रॉटेस्टंट चळवळीची लवकरच लूथरवादी आणि धर्मसुधारीत शाखा अशी विभागणी झाली  तरी   प्रॉटेस्टंटांनी रोमपुढे ठेवलेल्या हरकती धर्म सुधारणेच्या “पांच सोला (घोषवाक्य)” म्हणून स्पष्टपणे ओळखल्या जाऊ लागल्या होत्या.   ह्या पांच  सोलांमधे केवळ धर्मशास्त्र, केवळ कृपा, केवळ ख्रिस्त, केवळ विश्वास आणि केवळ देवाला गौरव ह्यांचा समावेश आहे.”

रोमन चर्च पवित्र शास्त्र (बायबल) हे देवाचा शब्द/वचन आहे असा विश्वास धरते ह्याबाबत प्रश्न नाही. पण बायबल हा धार्मिक   अधिकाराचा एकमेव पाया आहे असे रोम समजत नसे —  चर्चची प्रथा, परंपरा देखील रोमन चर्च मानत होतेच.  रोमन चर्च कृपा मानत होते, पण कृपा म्हणजे एक पदार्थ/द्रव्य असून धार्मिक विधींच्या माध्यमातून ती मनात ठसवली पाहिजे आणि मग मानवी इच्छेद्वारे तिला जोरकसपणे सक्रिय केले पाहिजे असा मुद्दा ते मांडतात. रोमने  ख्रिस्ताचे देवत्व आणि पापाकरिता त्याचे प्रायश्चित्त ह्या  दोन्ही गोष्टींचे झुंजार वृत्तीने समर्थन केले. पण देवाबरोबर पाप्यांचे संबंध सुयोग्य व्हावे यासाठी  मानवी सत्कृत्यांच्या गुणांची भर त्यात घातली गेलीच पाहिजे अशी रोम चर्चची शिकवण होती.  रोम चर्च असे देखील शिकवत होते की विश्वास हा एक अत्यावश्यक  ख्रिस्ती  सद्गुण  होता, पण त्या विश्वासातून देवाची मर्जी मिळवू शकतील असे (किंवा साजेसे)  ख्रिस्ती सद्गुण निर्माण करणारा एक क्रियाशील विश्वास घडून आला पाहिजे असा त्यांचा समज होता.  सैद्धांतिक दृष्टीने रोमन चर्चने  सर्व गौरव देवाला  दिले असले तरी प्रत्यक्ष आचरणात  मरीया, पोपचे पद आणि परंपरागत पोप संस्था, संतगण आणि मानवी सत्कृत्यांवर देखील रोमची धर्मशास्त्र विचारसरणी  गौरवाची उधळण करत होती.  ज्या गोष्टींनी प्रॉटेस्टंटांना १५१७ साली रोम चर्च पासून अलग केले त्या पवित्र शास्त्र, कृपा, विश्वास, ख्रिस्त आणि सर्व गौरव देवाला देणे ह्या गोष्टीं नव्हत्या. प्रॉटेस्टंट आणि कॅथॉलिक्स ह्यांमधे ती विशाल तफावत (मतभेद) घडली त्याला  प्रॉटेस्टंटांनी  “सोला” किंवा “केवळ/फक्त” ह्या एका लहानशा विशेषणाचा आग्रह धरला हे कारणीभूत झाले .  केवळ  पवित्र शास्त्र. केवळ  कृपा.  केवळ ख्रिस्त. केवळ विश्वास.  केवळ देवाला गौरव. आणि म्हणून आपण आता धर्म सुधारणेच्या  “पांच सोलां/घोषवाक्यांकडे” वळू या. 

(क्रमश: …)

Used with Permission from www.monergism.com

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.