बायबल वाचल्यानंतर आणि त्याचा अर्थ लावल्यानंतर, आपल्याला बायबल काय सांगत आहे आणि जे सांगत आहे त्याचा अर्थ काय आहे याची मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे. पण माझा बायबल अभ्यास एवढ्यावरच थांबत नाही. मी केवळ उपदेश मिळवण्यासाठी देवाच्या वचनाचा अभ्यास करत नाही. माझे अंतिम ध्येय हे आहे की ते माझ्याशी बोलू दे आणि मला आध्यात्मिकरित्या वाढण्यास सक्षम करू दे. त्यासाठी वैयक्तिक लागुकरण आवश्यक आहे.
बायबलचा अभ्यास तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत आपण स्वतःला विचारत नाही, “माझ्या जीवनासाठी याचा काय अर्थ आहे आणि मी ते व्यावहारिकरित्या कसे लागू करू शकतो?” आपण आपल्या वाचनातून आणि अर्थविवरण यातून मिळवलेले ज्ञान घेतले पाहिजे आणि आपल्या वैयक्तिक जीवनात लागू होणारी व्यावहारिक तत्त्वे काढली पाहिजेत.
जर आज्ञा पाळायची असेल तर आम्ही ती पाळतो. स्वीकारण्याचे अभिवचन असेल तर आम्ही दावा करतो. जर एखादा सावधानतेचा इशारा असेल तर आम्ही त्याचे पालन करतो. ही अंतिम पायरी आहे: आम्ही पवित्र शास्त्राच्या अधीन आहोत आणि ते आमचे जीवन बदलू दे. तुम्ही ही पायरी वगळल्यास, तुम्हाला तुमच्या बायबल अभ्यासाचा आनंद कधीच मिळणार नाही आणि बायबल तुमचे जीवन कधीही बदलणार नाही
ख्रिस्ती जीवनात बायबलचा अभ्यास ऐच्छिक नाही. हे सर्व विश्वासणाऱ्यांचे कर्तव्य आणि विशेषाधिकार दोन्ही आहे. जर तुम्ही नियमित, पद्धतशीर बायबल अभ्यासात गुंतलेले नसाल, तर तुम्हाला परिपक्वतेत आणण्यासाठी देव वापरत असलेल्या प्राथमिक साधनांपैकी तुम्ही एक साधन गमावत आहात (१ पेत्र २:२).