नोकरीच्या जागी देवाची सेवा करणे

दहाआज्ञाआपल्याला शिकवतात, “सहा दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर; कारण सहा दिवसात परमेश्वराने आकाश, व पृथ्वी, निर्माण केले”. आपले दररोजचे काम आपण कोण आहोत ते दाखवतात: जो देव त्याचे दिवस काम करण्यात घालवतो त्या देवाची प्रतिमा धारण करणारे. “त्याची कृती साक्षात मानव महिमा आहे,” असे स्तोत्रकर्ता लिहितो. “आपल्या अद्भुत कृत्यांचे स्मरण राहावे असे त्याने केले आहे” (स्तोत्र१११:३-४). त्याची अनंतता त्याची कामें आणि आपली कामें ह्यांमधील तुलनांना मर्यादा घालते. तरी ही, पवित्रशास्त्रातील त्याचे आत्म –प्रकटीकरण तो उत्पत्ती, ईश्वरी तरतूद, आणि पापविमोचनात व्यस्त असल्याचे दाखवते. देव निष्क्रिय नाही, त्याची कामे ज्या स्तुतीस व कौतुकासपात्र आहेत ती स्तुती व कौतुक स्वीकारणे एवढेच काम तो करत नाही; देवाची स्तुती आणि प्रशंसा ह्यांचे नक्कीच एक स्थान आहे, तो जे काम करतो आणि याकडे दुर्लक्ष न करीता त्याने उत्पन्न केलेल्यांनी जे काम केले पाहिजे असे अपेक्षितो.

ख्रिस्ती माणसाच्या कामाला जाण्याच्या मार्गात दोन खंदक असतात. “काम म्हणजे एक आवश्यक वाईट गोष्ट ” ह्या म्हणीत सत्याचे घटक आहेत. नोकरी/काम आवश्यक आहे. “कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये.” (२ थेस ३:१०). मानवाच्या पतनाने हे वाकडे तिकडे, कुरूप बनले आहे. “तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे”, एदेन बागेत देवाने आदामाला सांगितले, “तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील” (उत्पत्ती ३:१७, १९). कामाच्या जागी जे काटे व कुसळे असतात ते केवळ प्राकृतिक स्वभावाचे नाहीत तर त्यांमध्ये नोकरीतील धूर्त राजकारणी कावे, इतरांचा गैरफायदा घेण्याचा अन्याय्य स्वार्थीपणा आणि प्रत्येक नोकरीचा भाग असलेला कंटाळवाणा तोचतोचपणा ही देखील समाविष्ट असतात.

“नोकरीपेक्षा उपासना अधिक महत्वाची आहे” हा खंदक देखील सत्यावर आधारलेला आहे. “हे आवश्यक वाईट” कमी करण्यासाठी काही लोक आत्मिक कार्यक्रम अधिक पसंत करुन, नोकरीच्या कामात शक्य तेवढा कमी वेळ घालवतात. ही मठवासीयांची उर्मी केवळ ऐतिहासिक धार्मिक पंथातच व्यक्त होते असे नाही तर सध्या दिसून येत असलेल्या वृत्तीत देखील दिसते. येथे, कामाला काहीही आत्मिक मूल्य नसते आणि केवळ त्याच्या पूर्णतेलाच मूल्य दिले जाते. तरी देखील, येथे काही सत्य आहे. “तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्या बरोबर ह्याही सर्व गोष्टीं तुम्हाला मिळतील” (मत्तय ६:३३) हे वचन आजच्या दिवसांत अनेकदा विसरले जाते. ज्यात त्याच्या चांगुलपणासाठी आणि त्याने जे तयार केले आहे त्यासाठी देवाची उपासना केली जाते त्या विश्रांतीच्या सातव्या दिवसाचा संदर्भ समजून घेतला नाही तर आपले सहा दिवसांचे कष्ट अपरिहार्यपणे आपल्याला मूर्तिपूजेकडे घेऊन जातात.

ह्या खंदकांमध्ये, कामाचे अवमूल्यन केले जाते, पण नोकरीचा ख्रिस्ती मार्ग त्या कामाला देवाने नेमलेल्या जागी ठेवतो. खिस्ती व्यक्ती रोम ८ मधील आशादायक कण्हण्याच्या संदर्भात काम करते. आपण देवाने दिलेले व्यवसाय पुढे चालवत असतांना, त्याने कृपेने आपल्याला जेथे ठेवले आहे तेथे पुरवलेल्या अद्वितीय देणग्या वापरत असतांना, आपण “नीतिभ्रष्टतेचे दास्य” अनुभवतो. पण आपण हे सुद्धा ओळखतो की आपला व्यवसाय चालवत राहण्याद्वारेच उत्पत्ती २ पासून ते प्रकटीकरण २१ पर्यंतच्या, ज्यात राष्ट्रें आणि राजे चालतील(व २४) त्या इतिहासाच्या महान कथेत, आपण भाग घेतो. जेव्हा आपल्या मुक्ती पावलेल्या शरीरांत (रोम ८:२३) आपण आपले व्यवसाय परिपूर्ण रीतीने चालवू, तेव्हा ख्रिस्ती आशेला शारीरिक अभिव्यक्ती लाभेल.

“प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व “आपल्या सर्वकष्टांचे लाभ उपभोगावे, ही देवाची देणगी आहे” (उपदेशक३:१३) ह्याची नोंद करून कामाविषयी “आता पण अजून नाही” हा दृष्टिकोन शलमोन चांगल्यारीतीने प्रतिबिंबित करतो. आपले पाचारण “देवाचे भय धरणे व त्याच्या आज्ञापाळणे ” आहे हे ओळखून, (कामकरण्याची आज्ञा सुद्धा)आणि “देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल” हे मान्यकरून (उपदेशक१२:१३-१४) आपण ही देणगी जीवनाच्या व्यर्थतेच्या एका संदर्भात ग्रहण करतो.
जे लोक ख्रिस्तासोबत वधस्तंभावर खिळले गेलेआहेत, त्यांच्यामध्ये ख्रिस्त जगत असून, ते देहामध्ये जगतात, (गलती २:२०). येथे आपल्या कामासाठी देखील, सुखसमाधान आहे. ख्रिस्ताने केलेले परिपूर्ण आज्ञापालन, अंशतः त्याच्या पित्याच्या सुतारकामाच्या ठिकाणी केलेले पण त्याशिवाय आणखी त्याच्या सेवाकार्याच्या व्यवसायात देखील त्याने केलेले परिपूर्ण आज्ञापालन हा तो पुरावा आहे जो विचारात घेतला जाईल. ख्रिस्ताचे आज्ञापालन परिपूर्ण आहे असे मानण्यात येईल. त्याचे रक्त आपल्या उणीवांचा आणि आपल्या नोकरीच्या ठिकाणच्या पापांचा दंड भरून काढील. आणि अशारीतीने, जो देव देखील काम करतो अशा एका देवाची तो सेवा आणि उपासना करतो हे जाणून, ख्रिस्ती मनुष्य आनंदाने नोकरीला जातो.

  • देवाचा प्रतिमा धारक म्हणून तुम्हाला ज्या देणग्या दिलेल्या आहेत त्या तुमच्या कामाच्या
    ठिकाणी कशा उपयोगात आणल्या जातात?
    • तुमच्या विशिष्ट कामाच्या संदर्भात ज्या वासना तुम्हाला मोह घालतात त्या कोणत्या?
    • देहात जगणे पण आपल्या आत ख्रिस्ताला घेऊन जगणे ह्याची आपल्या कामात कशी
    अभिव्यक्ती होते?
  • नवीन पृथ्वीत आपण जे काम करू त्याच्या विचाराने आपल्या आजच्या व्यवसायाकरिता
    आपल्याला कशी प्रेरणा मिळू शकेल?
डॉ. जोएल बीके
डॉ. जोएल बीके

जोएल रॉबर्ट बीके (जन्म कलामाझू, मिशिगन येथे, डिसेंबर 9, 1952) एक अमेरिकन सुधारित पाद्री आणि धर्मशास्त्रज्ञ आहे. ते ग्रँड रॅपिड्स, मिशिगनमधील हेरिटेज रिफॉर्म्ड मंडळीचे मंत्री आहेत आणि प्युरिटन रिफॉर्म्ड थिओलॉजिकल सेमिनरीचे अध्यक्ष आहेत, जिथे ते सिस्टेमॅटिक थिओलॉजी आणि होमलेटिक्सचे प्राध्यापक देखील आहेत.