ख्रिस्ताकडे येणे

मानवाचे पापात पतन झाल्यापासून, आपल्यापुढे येत राहिलेला मोठा प्रश्न हा होता : ” पाप्यांना देवाकडे पुन्हा परत कसे आणता येईल ?” आदाम आणि हवा यांना त्यांच्या पापाबद्दल देवाने एदेन बागे बाहेर हुसकून लावले, पण आपण देवाकडे आणि त्या देवाच्या बागेकडे ख्रिस्ताद्वारे परत जाऊ शकतो. (प्रकटी २२:१-२). म्हणून योहान निक्षून सांगतो, “आत्मा व वधू म्हणतात, ये, ऐकणाराही म्हणो ये आणि तान्हेला येवो, ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो (वचन १७). मानवाला देवापासून दूर पाठवण्यात आले होते, पण आता येशू ख्रिस्ताद्वारे त्याला देवाकडे आणण्यात आले आहे. जो प्रश्न उरतो तो आहे : तुम्ही आणि मी ख्रिस्ताकडे कसे येतो?

ख्रिस्ताकडे येणे ह्याचा अर्थ काय आहे? चुकीच्या दृष्टिकोनांची रेलचेल झाली आहे, उदा. आपल्या स्वतःच्या कुवतीनुसार ख्रिस्तांबाबत निर्णय घेणे, मूक प्रार्थनेदरम्यान आपला हात वर करणे, पाप्यांची प्रार्थना म्हणणे, वेदीकडे बोलावण्यात आल्यानंतर पुढे चालत जाणे, बाप्तिस्मा घेणे, प्रभू भोजन घेणे, काहीविशिष्ट विशिष्ट सत्यांशी मनातल्या मनात सहमत होणे, गूढ गोष्टींची अनुभूती घेणे, किंवा चमत्कार पाहणे.

ख्रिस्ताकडे येण्याची सुरुवात देवाच्या पाचारणाने होते. जे लोक सुवार्ता ऐकतात त्या सर्वांना पश्चाताप करून ख्रिस्तावर दृढ विश्वास ठेवा ही देवाची आज्ञा आहे. माणसांच्या तारणासाठी सुवार्ता ख्रिस्ताला सादर करते. पौलाने म्हटले, “आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो…देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असा ख्रिस्त”. (१ करिंथ १:२३-२४). देवाच्या पुत्राचे मरण आणि पुनरुत्थान हे पाप्यांना तारण्याकरिता शक्तिशाली आहे. ख्रिस्त म्हणतो, “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. (मत्तय ११:२८). जेव्हा एखादा पापी मनुष्य ख्रिस्ताकडे येण्याचे नाकारतो, तेव्हा सर्व दोष त्याच्यावर लादला जातो. येशूने म्हटले, “तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हाला इच्छा होत नाही.” (योहान ५:४०)


तथापि, देव केवळ एक सार्वत्रिक पाचारण देण्यापेक्षा खूप अधिक असे काही करतो. तो एक प्रभावी पाचारण देखील करितो त्यामुळे पापी लोक ख्रिस्ताकडे आकर्षिले जातात. प्रभू येशूने म्हटले, “पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही.” (योहान ६:३७). आपण एवढे आंधळे आणि पापात मेलेले आहोत (इफिस २:१; २ करिंथ ४:४) की आपण (ख्रिस्ताकडे) येऊ शकत नाही आणि येणारही नाही, पण देवाला सर्व गोष्टीं शक्य आहेत. (मत्तय १९:२६; योहान ६:४४; इफिस २:५).पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ख्रिस्त स्वत: सुवार्तेद्वारे पाप्याला सादर होतो तेव्हा आपण प्रभावीपणे विश्वासाच्याद्वारे त्याच्याकडे ओढले गेल्याने ख्रिस्ताकडे येतो. अशा विश्वासात आत्मपरीत्याग असतो कारण आपल्या स्वतःचे काहीही नीतिमत्व नाही हे आपल्याला दिसते (फिल ३:९), ख्रिस्तावर आणि त्याने क्रुसावर वाहलेल्या रक्तावर आम्ही विसंबून असताना (रोम ३:२५) आम्ही आमच्या सर्व आत्मिक गरजासाठी योग्य उपाय असा ख्रिस्त स्वीकारतो व जीवनात त्याचे अवलंबण करतो.(योहान १:१२). जर आपण आपणा स्वतःला पापी, न्यायदंडास पात्र असलेले, देवाचे पवित्र नियम मोडणारे अशा रूपात पाहतो, तरच आपल्या पापापासून तारण व्हावे यासाठी ख्रिस्ताकडे येऊ शकतो. (रोम ३:१९-२०).

सुवार्तेमध्ये तारणाकरिता तुमची एकमात्र आशा म्हणून ज्याला सादर करण्यात आले आहे त्या ख्रिस्ताकडे तुम्ही आत्म्याच्या कृपेने, विश्वास ठेवून वळला आहात का? त्याच्याकडे आल्याचे हे एक खात्रीशीर चिन्ह आहे! हे घडले असेल तर, देवाला गौरव द्या, कारण पवित्र आत्म्याच्या कार्याविना कोणीही ख्रिस्ताकडे येऊ शकत नाही (१ करिंथ १२:३). आत्मा जीवन देतो आणि देहापासून लाभ होत नाही (योहान ६:६३). पित्याच्या आत्म्याने तुम्हाला येशू ख्रिस्तावर दृढ विश्वास देऊन आशीर्वादित केले आहे म्हणून त्याची स्तुती करा.


जर तुम्ही ख्रिस्ताकडे आलेला नाही, तर मग का आला नाहीत? कोणत्याही गोष्टीचा अडथळा तुमच्या मार्गात येऊ देऊ नका. बायबल वाचा आणि जी प्रवचनें ख्रिस्ताची साक्ष देतात ती ऐका. मित्रमंडळीला तुम्हाला चुकीच्या मार्गाने नेऊ देऊ नका. चर्चमधील लोकांच्या पापांच्या कारणाने सार्वकालिक जीवनापासून तुम्ही स्वतःला वंचित होऊ देऊ नका. जर तुम्ही याआधीच हे केले नसेल तर, एखाद्या उचित धर्म शिक्षणातून ख्रिस्तित्वाची मूलतत्त्वें जाणून घ्या. अश्रद्धेला चिकटून राहू नका किंवा आपले अंतःकरण कठीण करू नका. ह्या जगावर प्रीती करणे थांबवा. तुमच्या पापांना बिलगून राहणे सोडा. देव तुम्हाला कधीही नरकात टाकणार नाही असा मूर्खपणाचा विचार करू नका. उलटपक्षी ख्रिस्ताच्या कृपेपेक्षा तुमची पापें अधिक मोठी आहेत असा विचार करण्याइतपत अहंकारी बनू नका. पाप्यांतील सर्वाधिक वाईट व्यक्तीला देखील ख्रिस्त तारू शकतो. उशीर करू नका. आज स्वतःला लीन करा, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने धावा करा. जे त्याच्याकडे येतात त्या सर्वांना तारण्याइतका तो समर्थ आहे.

Used with permission from Reformation Heritage Study Bible.

डॉ. जोएल बीके
डॉ. जोएल बीके

जोएल रॉबर्ट बीके (जन्म कलामाझू, मिशिगन येथे, डिसेंबर 9, 1952) एक अमेरिकन सुधारित पाद्री आणि धर्मशास्त्रज्ञ आहे. ते ग्रँड रॅपिड्स, मिशिगनमधील हेरिटेज रिफॉर्म्ड मंडळीचे मंत्री आहेत आणि प्युरिटन रिफॉर्म्ड थिओलॉजिकल सेमिनरीचे अध्यक्ष आहेत, जिथे ते सिस्टेमॅटिक थिओलॉजी आणि होमलेटिक्सचे प्राध्यापक देखील आहेत.