जे आपण ख्रिस्ती आहोत असा दावा करतात त्यांच्यामध्ये वाढते पाप आणि घटत जाणाऱ्या आज्ञापालनाचा समय म्हणजे कुमार्गाकडे पुन्हा वळणे. प्रत्येक पाप म्हणजे कुमार्गाकडे पुन्हा वळणे नसते. ख्रिस्ती लोकांनी पाप करणे आणि वधस्तंभी गेलेल्या ख्रिस्तावरील विश्वासाने पापांचा पश्चाताप करणे ह्या खेदजनक अखंड घटना चक्राने आपले जीवन भरलेले असेल असे अपेक्षिलेंच पाहिजे. (१ योहान १:९ — २:२). तथापि, कुमार्गाकडे परतण्यात पश्चातापाचे हे चक्र मोठ्या प्रमाणात मोडून पडते आणि आत्मिक आधार हरवला जातो. आपण जेवढा अधिक काळ कुमार्गाकडे परतणे चालू ठेवू तितका तेवढा आपण खरे ख्रिस्ती असल्याचा दावा करण्याचा आपला हक्क कमी होत जातो. (१ योहान २:३-४), कारण पश्चाताप खऱ्या ख्रिस्तित्वाच्या गाभ्यातून येत असतो. (प्रेषित २:३८; २०:२१).
ख्रिस्तापासून मागे फिरून कुमार्गाकडे जाणे ही अशी गंभीर गोष्ट आहे. ते कृत्य देवाचा अवमान करते, ख्रिस्ताची तारक म्हणून उपेक्षा करते, आत्म्याला दुखावते, देवाच्या नियमशास्त्राला पायाखाली तुडवते, आणि सुवार्तेचा दुरुपयोग करते. आणि ते पाप जितके सर्वसामान्य तेवढेच भयंकर आहे. होशेय ११:७ मध्ये माझ्या पासून दूर वळून धर्मभ्रष्ट होण्याकडे माझ्या लोकांचा कल आहे असे दुःखोद्गार देव काढतो. आपल्या सर्वांच्या हृदयात पश्चाताप टाळण्याच्या तीव्र इच्छेसारखेच पाप करण्याच्या प्रवृत्तीने घर केलेले आहे. मग देव आपल्याला होशेय, यिर्मया आणि इतर संदेष्ट्यांद्वारे कुमार्गाकडे वळण्याचा तिटकारा करण्याविषयी धोक्याचा इशारा देतो ह्याचे आश्चर्य वाटायला नको.
जेव्हा विश्वासणारे लोक स्वताला देवापासून, त्याच्या वचनापासून आणि त्याच्या मार्गांपासून दूर भरकटू देतात तेव्हा बहुतेक वेळां कुमार्गाकडे वळण्याची सुरुवात होते. आपण मग हळूहळू घसरत जातो, कधीकधी कळूनही येत नाही इतक्या सूक्ष्मपणे. एका अशक्तपणातुन दुसरे अशक्तपण पुढे येते. सर्वाधिक सामान्यपणे, कुमार्गाकडे वळण्याची सुरुवात प्रार्थनेतील थंडपणाने होते आणि पुढे देवाच्या वचनाबाबत अनास्था वाढत जाते. अंतस्थभष्ट्राचार मग बहुगुणीत होतात. जगावर अधिक प्रीती केली जाते आणि विश्वासणाऱ्यां सोबत्यांवर कमी. देवावर केंद्रीभूत असलेल्या इच्छांची जागा लवकरच मनुष्य-केंद्रित इच्छां घेतात.
कुमार्गातून कडवट परिणामांची पिकें उगवतात. त्याने देवाच्या पवित्र व आदरणीय नामाला हानी पोहोचते. ते आपल्याला आत्मिक रीतीने बधीर बनवते आणि आपला सद्सद्विवेक असंवेदंशील होतो, आणि त्याची परिणती चर्चच्या सर्वंकष ऱ्हासात होते.
तर ह्या किळसवाण्या पापाविरुद्ध — आपल्या प्रभूपुढे त्याचा उल्लेख करण्याच्या योग्यतेचे देखील नसलेले पाप —आपण कसे लढतो ?
पहिली गोष्ट, आपण प्रभूकडे परत यायला पाहिजे आणि त्याच्यापासून दूर पळणे थांबवले पाहिजे. आपण होशेय १४:१ या वचनाकडे काळजीपूवक लक्ष दिले पाहिजे, “हे इस्राएला, परमेश्वर तुझा देव याजकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस.” आपली पापी स्थिती ओळखून, आपले पूर्वीचे आज्ञापालन आठवून, आपले पाप शोधून काढून, त्याविषयी शोक करून, ते कबूल करून, आणि त्यापासून दूर पळून आपण पश्चाताप केला पाहिजे.
दुसरी गोष्ट, ख्रिस्त येशूकडे परत येण्याने आपण नीतिमत्व प्राप्त करण्यासाठी झटले पाहिजे. त्याकरिता, आपण कृपेच्या साधनांचा परिश्रमपूर्वक उपयोग केला पाहिजे. त्याचा अर्थ आपण गांभीर्याने बायबलकडे वळले पाहिजे. त्यावर केलेला बिनचूक नीतिबोध काळजीपूर्वक ऐका. तो प्रत्येक दिवशी खाजगीत वाचा. तुमच्या नियमित कौटुंबिक उपासनेत भाग घ्या. मुख्य वचनें पाठ करा आणि त्यांवर मनन करा. एक किंवा अधिक मित्रांसोबत बायबलचा सखोलपणे अभ्यास करा.
ह्याच अर्थ हा देखील आहे की तुम्हाला वाटत नसेल तेव्हाही मनापासून प्रार्थना करायला लागा. होशेय १४:२ म्हणते, “तुम्ही शब्दांनींशी परमेश्वराकडे वळा; त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर, कृपेने आमचा स्वीकार कर”.पवित्र शास्त्रातील वचनांची प्रार्थना देवाला करा. प्रार्थना सभांना उपस्थित राहा आणि त्या सभांमध्ये प्रार्थना करा. जवळच्या मित्रांबरोबर प्रार्थना करा. तुमच्या कुटुंबात आणि कुटुंबासोबत दररोज प्रार्थना करा. टोळांनी अनेक आठवड्यांत, महिन्यांत, किंवा अनेक वर्षांत देखील जी पिकें खाऊन फस्त केलीत त्यांची पवित्र आत्म्याने भरपाई करून देण्यासाठी प्रार्थना करा. (योएल २:२५).
तुमच्या आत्म्याचे हीत होण्यासाठी सुयोग्य, जडान्न देणारे ख्रिस्ती साहित्य वाचा. तुम्ही वाचत असतांना, कृपा मिळावी म्हणून खूप प्रार्थना करा — न्यायिकरणाची कृपा, पवित्रीकरणाची कृपा, अपत्य म्हणून कुटुंबात सामावण्याची कृपा, नवजीवनाची कृपा, बलवान बनवणारी कृपा आणि सार्वभौम कृपा.
दैनिंदिन नोंदी ठेवून जाब विचारण्यासाठी ठेवलेला एक भागीदार घेऊन तुमच्या वाचनाला मजबूत टेकूचा आधार द्या. जे ख्रिस्ती असतील पण ज्यांच्याशी तुम्ही व्यक्तिगत बाबींची मनमोकळी चर्चा करू शकत नाही अशा दहा किंवा वीस मित्रांहून आत्मिक मनाचे दोन मित्र तुमच्या अधिक लाभाचे ठरतील.
सर्वात महत्वाचे म्हणजे,प्रत्येक दिवशी खिस्त येशूकडे आश्रयाला जा — होय, दर दिवशी दहा वेळां. तुमचा तारक आणि प्रभू, तुमचे नीतिमत्व आणि बळ, तुमचे न्यायीकरण आणि पवित्रीकरण, तुमचा प्रार्थना करणारा आणि तुम्हासाठी आभार मानणारा मुख्य याजक, आणि तुमचा समर्थ आणि बुद्धिमान वैद्य हे सर्व तो आहे म्हणून त्याच्याकडे पळा. तुमच्यासाठी सर्व गोष्टींत सर्व काही असे त्याला होऊ द्या.
जोपर्यंत तुम्ही ख्रिस्ताशी पूर्वी जशी सहभागिता होती तशी सहभागिता पुन्हा मिळवत नाही तोपर्यंत विश्रांती घेऊ नका. आणि ह्याची खात्री असू द्या, तो तुम्हाला पुन्हा स्वीकारील. तो दुसऱ्यांदा संधी देणारा तारक आहे; साताच्या सत्तर वेळां देखील क्षमा करण्यात त्याला आनंद वाटतो.
पश्चात्तापी पाप्यांना स्वीकारणे ज्याला प्रिय आहे आणि ज्याच्याकडे जाण्याचा मार्ग खुला आहेत्या तारकाकडे स्वगृही परत या. पश्चात्तापदग्ध, कुमार्गात भरकटलेल्या उधळ्या माणसा —पित्याची वात्सल्यपूर्ण मिठी, प्रेमळ चुंबन, शब्द, आणि दयेचे अश्रू (लूक १५:२०-२४) ह्या सर्व गोष्टींसाठी घरी तुझे स्वागत आहे. तुझा देव आणि तारकाला दया करण्यात आनंद वाटतो. (मीखा ७:१८). आत्म्याच्या कृपेने, ह्या आश्चर्यकारक सत्यावर विश्वास ठेव, त्याला कवटाळ, आणि त्या सत्यानुसार जीवन जग.