असे निर्धोकपणे म्हणता येते की ज्यांची काळजी प्रेषित वाहत होते त्यांनी पवित्र जीवन जगावे ही त्यांना वाटणारी प्रमुख चिंता होती. (१ थेस ५:२३; १ पेत्र १:१५; १ योहान १:५-६). पवित्रीकरण हे एवढ्या निर्णायक महत्वाचे आहे की ज्या विश्वासणाऱ्यांना ते हवेसे वाटत नाही ते त्यांच्या आत्म्याची धोकादायक स्थिती दर्शवतात, कारण पावित्र्यावाचून कोणीही प्रभूला पाहू शकणार नाही (इब्री १२:१४). एक पवित्र केलेले जीवन कसे जगावे हे समजून घ्यायला ख्रिस्ती मनुष्याने सर्वोच्च प्राधान्य दिलेच पाहिजे. आपण पवित्र कसे केले जातो?
पहिलीगोष्ट, जो लोकांना पापापासून तारतो त्या त्रैक देवाला ओळखून आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. साध्या शब्दांत सांगायचे तर, पवित्रीकरण म्हणजे आपला देव आणि पित्याच्या गुण साधर्म्यात आपली वाढ होणे. ख्रिस्ताच्या प्रतिमेशी जुळण्याने आपण अपरिहार्यपणे अधिक वाढत देवासारखे बनतो. ज्याद्वारे ख्रिस्ताचे लोक तारले जाऊन पवित्र होण्यासाठी सक्षम केले जातात, त्या, क्रुसावर पूर्ण केलेल्या ख्रिस्ताच्या कार्यावर दृढ विश्वास ठेवून सुरुवात केली पाहिजेत. त्याचे जीवन आणि मरण यावाचून, नीतिमान ठरवले जाणे घडणार नाही आणि म्हणून पवित्रीकरण घडणार नाही. पवित्र आत्मा आपल्याला जिवंत करून, आपणामध्ये वस्ती करतो आणि आपल्याला पवित्र
करतो , देवाच्या गोष्टींकरिता आपल्याला अंतःकरण देतो, आपल्या अंतःकरणाला देवाचे वचन लागू करतो, आणि आपल्या जीवनांत त्याचे फळ निर्माण करतो. त्रैक देवा शिवाय, आपल्या सर्वांना आपली पापे व अपराध यांत मेलेल्या स्थितीत, सैतान, जग, आणि आपल्या आतमध्ये राहत असलेले पाप ह्या तीनपदरी शत्रूच्या मुठीत सोडून दिले जाईल.(इफिस २:१-२).
दुसरी गोष्ट, देवाच्या वचनातून आणि नेमकेपणाने दहा आज्ञांतून, पावित्र्याविषयी जे सारे आपण जाणणे गरजेचे आहे ते देवाने आपल्याला दिलेले आहे असा दृढ विश्वास आपण ठेवला पाहिजे. आपण ज्याबाबत पश्चाताप केला पाहिजे तसेच आपण जे आज्ञापालन केले पाहिजे —- आपण जे करणे, विचारात घेणे, आणि ज्या भावना अनुभवणे थांबवले पाहिजे आणि जे करणे, विचारात घेणे आणि अनुभवणे सुरु केले पाहिजे हे सर्व बायबलमध्ये समाविष्ट केलेले आहे. (यशया १:१६-१७; रोम १३:१२; इफिस ४:२२, २४).
तिसरी गोष्ट. देवाच्या मुलांच्या जीवनात पवित्रीकरण घडण्याकरिता लागणारे सर्व सामर्थ्य त्याने दिलेले आहे ह्याची पूर्ण खात्री आपण बाळगली पाहिजे. इफिस १:१६-२०मध्ये, पौल प्रार्थना करतो की त्यांनी देवाला ओळखावे, आशा धरावी, त्यांच्या वतनाच्या वैभवाची समृद्धी जाणावी, आणि विश्वासणाऱ्यांप्रत देवाच्या सामर्थ्याची थोरवी त्यांनी ओळखावी. मग, ज्या सामर्थ्याने येशूला मेलेल्यातून जिवंत करून उठवले होते आणि “खुद्द देवाच्या उजव्या हाताला स्वर्गीय स्थानांत बसवले आहे” ते हेच महान सामर्थ्य आहे हे तो स्पष्ट करू लागतो. (इफिस १:१७-२०).
चौथी गोष्ट. पावित्र्या संबंधातील दोन मोठ्या चुकांबाबत आपण दक्ष असले पाहिजे : कायदेशीरतावाद (Legalism). (नियम/कायद्याचा किस काढणे ) आणि उदारमतवाद(Liberalism). कायदेशीरतावाद आपल्या सत्कृत्यांचे श्रेय आणि आपल्या नियमांची सुजाणता यांची भर देवाच्या वचनात घालते, पण असे करण्याने ख्रिस्त, स्वातंत्र्य, आशा, आज्ञापालन, कृपा आणि प्रीती ह्या सर्व गोष्टीं नष्ट होतात (गलती ५:१-७). उदारमतवाद ख्रिस्तामधील आपल्या स्वातंत्र्याचे पापाकरिता एक संधी असे विकृत रूपांतर करून सोडतो, आणि त्यातून पुढे लैंगिक अनैतिकता, खोटी उपासना, नातेसंबंधात भांडणे, आणि आत्मसंयमाचा अभाव निर्माण होतात. (गलती ५:१३, १९-२१).
शेवटी, आपण देहस्वभाव वधस्तंभावर खिळतराहिले पाहीजे आणि आत्म्याच्या सामर्थ्याने जगत राहिले पाहिजे. (गलती ५:२४-२५). देहस्वभाव वधस्तंभावर खिळणे म्हणजे सक्रियपणे पाप करणे टाळणे आणि पापाचा अधिकाधिक तिरस्कार निर्माण करणे. दुसरे काहीही न करता केवळ ख्रिस्तसदृष्य कोणतीही प्रतिमा नष्ट करणे हाच उद्योग पाप करू इच्छित असते. म्हणून, पश्चाताप करणे ही सातत्याने मिळालेली कृपा आहे त्यात वारंवार पापकबुली करणे, क्षमेसाठी प्रार्थना करणे, आणि पापापासून मागे वळणे हे अपेक्षित आहे. आत्म्यात जगणे म्हणजे पावित्र्यात वाढणे. त्याचा अर्थ ख्रिस्तासारखे अधिकाधिक होत राहणे असा आहे. आत्म्याचे फळ म्हणजे देहस्वभावाच्या कृत्यांच्या पूर्णपणे विरुद्ध असलेल्या कृपा वाढणे . (गलती ५:२२-२३).
प्रीती ही व्यभिचार, द्वेष, भांडण, आणि हेवा यांचा समूळ नाश करील. मलिनता, दारूची नशा, आणि मौजमजा यांविरुद्ध संयम हे एक शक्तिशाली शस्त्र आहे; म्हणजेच खुनशीपणा विरुद्ध लीनता आणि क्रोधा विरुद्ध चांगुलपण. मानवी अंतःकरणातून उद्भवू शकत नाहीत अशा ह्या कृपा आहेत. पवित्र आत्मा मनुष्याच्या आत वस्तीकरून राहण्याचे हे थेट परिणाम आहेत. ख्रिस्ती लोक कृपेचे स्वीकारकर्ते आहेत, तरी प्रभूवर दृढ विश्वास ठेवण्याच्या आणि आपल्या जीवनात अशी विपूल फल निष्पत्ती होण्याकरिता कृपा हे साधन वापरणारे आज्ञा पालनासाठी पूर्णपणे जबाबदार आहेत.
अशा रीतीने, आपल्याला असणारी त्रैक देवाची, त्याच्या पवित्र वचनाची, आणि त्याच्या सामर्थ्यवान हाताची तीव्र गरज आपण समजू शकतो, म्हणजे तो दयाळूपणे आपल्याला कायदेशीरतावाद (Legalism) आणि उदारमतवादाच्या (Liberalism) धोकादायक खडकापासून दूर सुरक्षित ठेवून पवित्रीकरणाच्या कृपेत पुढे नेईल — सर्व काही देवाच्या गौरवासाठी.