अनुवाद ६:४-५ म्हणते, “हे इस्राएला, श्रवण कर; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे; तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर.” आपला देव आणि महान देवाने आपल्याला सांगितले की ही सर्वात पहिली आणि सर्वात मोठी आज्ञा आहे. (मार्क १२:२९). इतर सर्व देवांपासून वळून आपण आपली एकमेव निष्ठा प्रभूवर ठेवली पाहिजे असे अनुवाद ६ आपल्याला आपल्याला सांगते, तो एकच केवळ देव आहे आणि दुसरा कोणीही नाही. (अनुवाद ४:३९). प्रीती आपण देवाला बिलगून राहायला प्रवृत्त करते कारण तो आपले जीवन आहे (अनु. ३०:२०). ऑगस्टीनने म्हटले आहे, “तू आम्हाला तुझ्या स्वतःकरिता निर्माण केले आहेस, आणि तुझ्यात विश्राम पावत नाही तोपर्यंत आमचे हृदय अस्वस्थ आहे.”
तुम्ही जे सारे काही आहात त्यानिशी देवावर प्रीती करा. काही लोकांच्या दृष्टीने प्रीती म्हणजे कोणीतरी तुम्हाला दिलेली केवळ एक चांगली भावना असते. ममत्वाची वीण असलेल्या इच्छेची निवड म्हणजे प्रीती असे इतर लोकांना वाटते. पवित्र शास्त्र स्पष्ट करते की प्रीती मनुष्याच्या एखाद्या विशिष्ट भागापुरती सिमीत करता येत नाही, तर तिचा पगडा मनुष्याच्या संपूर्ण आंतरिक जीवन आणि बाह्यात्कारी कृतीवर असतोच : पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने” “मन” आणि “जीव” हेशब्द विचार, भावना, हेतू, आणि इच्छा ह्यांकडे निर्देश करतात. “शक्तीने ” ही संज्ञा सामान्यतः “फार” “खूप” अर्थ असलेल्या क्रियाविशेषणासारखी वापरली आहे, पण एक नाम म्हणून त्याचा अर्थ “बळ” किंवा “ऊर्जा” असा होतो. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे. (अनुवाद ५:१०; ७:९)
प्रीती हृदय आणि मनात सुरु होते पण त्यातून पुढे कृती निष्पन्न होते; ती आपल्याला योशीयासारखे,उत्सुक आणि देवाची सेवा करण्यात व्यग्र बनवते,. (२ राजे २३:२५). विल्हेमस अ ब्रॅकेल लिहितो, “प्रीती ही देवाच्या दिशेने हृदयाने केलेली गोड चाल आहे —पवित्र आत्म्याने विश्वासणाऱ्यांच्या हृदयात घातलेली —ज्यामुळे ते, देवाशी संयोगाच्या कारणाने आणि त्याच्या परिपूर्णतां विचारात घेऊन, देवांमध्ये राहण्याचा आनंद उपभोगतात, आणि देवाच्या इच्छेच्या हर्षपूर्ण स्वीकृतीने, त्याच्या सेवेसाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करतात.”
ह्या आज्ञेतील मुख्य शब्द “सर्व” हा आहे. तुमचे शरीर व जिवाच्या प्रत्येक कृतीचे देवाला केलेले भक्तिपूर्ण समर्पण हवे आहे तो यामध्ये काहीच कमी असेल तर स्वीकारणार नाही. देव म्हणजे तुमच्या यादीतील एक नोंद, किंवा तुमच्या यादीत सर्वोच्च अग्रक्रम देवाला देणे पुरेसे नाही. तुमची यादीच देवाच्या मालकीची झाली पाहिजे, आणि त्या यादीतील प्रत्येक ओळीवर त्याचे नाव असले पाहिजे. ऑगस्टीनने लिहिले, “तुझ्यासह कोणत्याही गोष्टीवर जो प्रीती करतो, पण तुझ्याप्रीत्यर्थ प्रीती करत नाही, तो तुझ्यावर खूपच कमी प्रीती करतो.”
हा नियमशास्त्र किती विनम्र करून सोडणारे आहे! कॅल्विन म्हणाला, “येथे जी परिपूर्णता असली पाहिजे असे सांगितले आहे ती आपण नियमाशस्त्रा काटेकोरपणे करायच्या पालनापासून किती दूर आहोत हे पुरेशा स्पष्टपणे दाखवते.” आपण आपणा स्वतःवरच प्रीती करतो, पण सर्वोत्कृष्ट ख्रिस्ती लोक देवावर अपरिपूर्णतेने प्रीती करतात, आणि दुष्ट लोक त्याचा द्वेष करतात.
आपल्या पूर्ण मनाने आपण देवावर कशी प्रीती करू शकतो?
प्रथम, “प्रभू तुझा देव परमेश्वर ” ह्याची सुवार्ता गच्च धरून ठेवा. (अनु. ६:५). केवळ एक उत्पन्नकर्ता आणि नियमकर्ता मानलेल्या संपूर्ण, निखालस देवावर प्रीती करण्याचा प्रयत्न करू नका. तर कराराचा देव, तारणाचा देव म्हणून त्याच्यावर प्रीती करा. आपल्या पापांबद्दल ख्रिस्ताने घेतलेल्या मरणात त्याची प्रीती सर्वश्रेष्ठ रीतीने प्रकाशते. (रोम ५:८), आणि आपली प्रीती ही तर त्याच्या गौरवशाली कृपेला आत्म्याने घडवून आणलेला आपला निव्वळ प्रतिसाद असतो. (१ योहान ४:९-१०, १३, १९). नियमशास्त्र प्रीती करण्याची आज्ञा करते, पण केवळ येशू ख्रिस्ताची सुवार्ता प्रीती निर्माण करते. ब्रॅकेल म्हणतो, “पृथ्वीवरील विश्वासणारे लोक त्याच्यावर प्रीती करतात,त्यांची मनें त्याचा ध्यास घेतात, आणि तो त्यांच्या प्रीतीच्या आवेगाचा केंद्रबिंदू असतो…..त्यांचे सारे मागणे, धावा करणे आणि विलाप करणे येशूसाठीअसते. “
दुसरी गोष्ट, पवित्र शास्त्रावर खूप मनन करा म्हणजे “हे शब्द तुझ्या हृदयात ठसतील” (अनु ६:६). प्रत्येक दिवशी तुम्ही बायबलमध्ये वाचलेले सत्य किंवा पाळकाने देवाच्या वचनातून सांगितलेले आपल्या स्वतःशी पुन्हा बोला—आणि तुमचे हृदय प्रीती करण्यासाठी हेलावले जात नाही तोपर्यंत आपणा स्वतःला तो संदेश देत राहा. ह्या जगाच्या देवांच्या खोट्या गोष्टीं व मोहांवर ईश्वरी औषध म्हणून देवाचे शब्द तुमच्या हृदयात जपून ठेवा. (अनु.११:१६-१८).
तिसरी गोष्ट,” तुझ्या मुलांना” कौटुंबिक उपासनेत, देवाचे वचन “शिकव” (अनु ६:७). “शिकव” ह्या शब्दाचा मूळ अर्थ धार लावून तीक्ष्ण करणे असा आहे: आपण आपल्या कुटुंबाच्या जीवनाच्या पृष्ठभागाला देवाच्या वचनाचा केवळ स्पर्श होऊ देऊ नये तर मर्मभेदक लागूकरणाने ते वचन आत खोलवर शिरू द्यावे. प्रत्येक दिवशी तुमच्या कुटुंबासोबत बायबल वाचा, त्याचा अर्थ आणि लागूकरण ह्यावर चर्चा करा, आणि मग दिवसभर त्याविषयी बोलत जा.
तुमच्या सर्व शक्तीने देवावर प्रीती करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे पवित्र आत्म्याने तुम्हाला आशीर्वादित केलेल्या कृपेच्या साधनांद्वारे तुमच्या सर्व जीवनात ख्रिस्ताचे वचन आणणे हा होय.