प्रभुमध्ये मुलांचे संगोपन करणे

पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे.( स्तोत्र १२७:३-५)मुलांची काळजी घेणे आणि देवाच्या मार्गांत त्यांना वाढवण्याच्या जबाबदारीसह तो त्यांना आपल्यावर सोपवतो. इफिस ६:४ म्हणते, “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” बाप आणि आई ह्या दोघांनाही देव त्यांच्या मुलांवर अधिकार देतो (निर्गम २०:१२; इफिस ६:१-२). एक संघ म्हणून हे काम करायला त्यांना सांगितलेले आहे, घराण्याचा प्रमुख बाप (इफिस ५:२३) , आणि पत्नी ही घरात त्याची मदतनीस. (उत्पत्ती २:१८; तीत २:५). त्यांनी तो अधिकार त्यांना चिडीस आणण्यासाठी नव्हे, तर त्यांच्यावर प्रीती करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांना बलवान बनवण्यासाठी, आणि त्यांना तयार करण्यासाठी, (कलसे ३:२१).वापरला पाहिजे.

भविष्यकालीन पिढ्यांसाठी प्रार्थनां करण्याद्वारे,मुलांना वाढवण्याची क्रिया, गर्भारपणापूर्वीच सुरु होते (उत्पत्ती २५:२१). गर्भात जेव्हा बालक निर्माण होते तेव्हा पतींनी त्यांच्या पत्नींची आणि पत्नींनी त्यांच्या शरीराची हळुवारपणे काळजी घेतली पाहीजे, ह्याची जाणीव ठेवून की देव कुशीत जी व्यक्ती घडवत आहे त्याची ते काळजी घेत आहेत. (स्तोत्र १३९:१३-१४)

बाप आणि आईने त्यांच्या मुलांना ज्याला बालकांना आशीर्वाद देणे आवडते त्या येशूकडे आणण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजेत. (मत्तय १९:१३-१५). ज्या साधनांनी आईबाप त्यांच्या मुलांना प्रभुमध्ये वाढवू शकतील अशी शक्तिशाली साधने देवाने त्यांना दिली आहेत. तुमच्या मुलांकरिता प्रार्थना करण्याची आम्ही नोंद करून ठेवली आहे.

तुमच्या मुलांना बायबल शिकवणे हा दुसरा एक मार्ग आहे. बायबलच्या महान उद्दिष्टांपैकी एक हे आहे की पित्यांना व मातांना त्यांच्या कुटुंबांना प्रभुमध्ये आशा ठेवून त्याचे आज्ञापालन शिकवण्यासाठी सुसज्ज करणे. (स्तोत्र ७८:५-७). ह्या कारणासाठी,आईबापांनी ही खात्री करून घेतली पाहीजे की त्यांची मुलें चांगले वाचायला शिकतील, यासाठी की ती बायबल, ख्रिस्ती धर्मतत्वांची शिकवण, आणि इतर उपयुक्त पुस्तके समजू शकतील. चर्चमधील उपासनेच्या भरीला, तुमच्या मुलांना अधिक शिकवण्याकरिता घरी तुमची नियमित कौटुंबिक उपासना ही महत्वाची वेळ असते. (ह्या विभागात ह्या विषयावर आधी दिलेला लेख पहा.) पण, आईबापांनी देवाचे वचन आणि ते आपल्याला कसे लागू होते ह्याविषयीच्या संवादांनी सर्व जीवन भरून टाकायला पाहीजे. (अनु.६:६-७).

तुमच्या मुलांना येशूकडे आणण्यासाठी एक तिसरे साधन म्हणजे त्यांना प्रेमळपणे शिस्त लावणे. मानव वंशात पाप शिरल्यापासून (रोम ५:१२), गर्विष्ठ बंडखोरी आपल्या हृदयाला बिलगून बसली आहे, पण खंबीरपणे केलेली दोषदुरुस्ती बंडखोरीला घालवून टाकील. (नीती २२:१५). बायबल ह्याला पुठ्ठयावर जोराने मारलेल्या थापटीसाठी, “छडी” हा शब्द वापरते. लोकप्रिय समजुतीच्या विरुद्ध असलेले सत्य हे आहे की, आज्ञाभंगाची चूक दुरुस्त करण्यासाठी दिलेली शारीरिक शिस्त (शिक्षा) ही क्रूर वागणूक किंवा द्वेष कृत्य नाही—खरे म्हणजे, ती प्रीतीची एक आवश्यक कृती आहे. (नीती १३:२४). देवाच्या कृपेने, थापटीची वेदना मुलांना पापाच्या परिणामांविषयी काही गोष्टीं शिकवते आणि त्या गोष्टी शेवटी त्यांचा जीव वाचवू शकतात — विशेषतः जेव्हा देवाची क्षमा आणि ख्रिस्तातील सामर्थ्य ह्यांविषयीच्या शिक्षणाची ह्याला जोड दिली जाते तेव्हा. आपल्या मुलांना शिस्त लावण्यात अपयश हे आईबापांकरिता लाज आणि दुःखाचे कारण होईल. (नीती २९:१५; १ शामू २:२२-३६). परंतु, जे रागीट आईबाप क्रोधाविष्ट होऊन शिस्त लावतात ते केवळ रागावलेली मुलें आणि भांडण तंट्यांनी भरलेले घर निर्माण करतात. (नीती. १५:१, १८; २२:२४-२५; इफिस ६:४). प्रार्थनेद्वारे,नियंत्रणात असलेल्या आत्म्याने तुम्ही जोपर्यंत शिस्त लावू शकत नाही तोपर्यंत थांबून राहा. (नीती १६:३२). शिस्त लावण्यामागचे कारण प्रीती आहे आणि तिचे ध्येय मुलाला त्याच्या स्वतःच्या भल्यासाठी नीतिमानतेचे शिक्षण देणे हे आहे. (इब्री १२:६, १०)

तुमच्या मुलांना प्रभुमध्ये वाढवण्यासाठी सुज्ञ उपदेश, सल्ला मसलत हे एक चौथे साधन आहे. तुमची मुलें वाढून मोठी होत असतांना हे विशेष महत्वाचे बनते. कोणती कार विकत घ्यावी, कोणता व्यवसाय निवडावा, कोणाशी लग्न करावे, इत्यादी पुष्कळ, कठीण निर्णय त्यांना घ्यावे लागतात. मुलांना देण्यासाठी, आईबापांकडे बहुमोल अनुभव आणि अंतरंगाचे यथार्थ ज्ञान असते. जेव्हा आई आणि बाबा म्हातारे झालेले असतात, तेव्हा देखील मुलांनी त्यांचे ऐकले पाहीजे. (नीती. २३:२२). जर तुम्ही तुमच्या मुलांचा आदर आणि स्नेह वर्षानुवर्षें मिळवला असेल, तर ते खुल्या मनाने तुमचा सल्ला ऐकतील. (नीती २३:२६).

सरते शेवटी, देवाने आईबापांना धार्मिक आदर्श बनून जीवन जगण्याचे साधन दिले आहे. हे उदाहरण अतिशय शक्तिशाली आहे. जे लोक इतरांना उपदेश करतात तसे आचरण करत नाहीत ते केवळ नरकासाठी राखून ठेवलेले अधिकाधिक ढोंगीच निर्माण करतात. (मत्तय २३:३, १८). पण जे खऱ्या धार्मिकतेत जगतात ते म्हणू शकतात : “माझ्यापासून जे तुम्ही शिकलात, जे स्वीकारलेत,व माझे जे ऐकलेत, पाहिलेत ते आचरत राहा : म्हणजे शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील. बाप आणि आई यांच्या स्मृतीतून अधिक महान राहील.” (फिल ४:९). तुमच्या मुलांसाठी सोडायला, ख्रिस्ताने रूपांतरित केलेले बाप आणि आई ह्यांच्या स्मृतींहून अधिक मोठा वारसाच नाही.

डॉ. जोएल बीके
डॉ. जोएल बीके

जोएल रॉबर्ट बीके (जन्म कलामाझू, मिशिगन येथे, डिसेंबर 9, 1952) एक अमेरिकन सुधारित पाद्री आणि धर्मशास्त्रज्ञ आहे. ते ग्रँड रॅपिड्स, मिशिगनमधील हेरिटेज रिफॉर्म्ड मंडळीचे मंत्री आहेत आणि प्युरिटन रिफॉर्म्ड थिओलॉजिकल सेमिनरीचे अध्यक्ष आहेत, जिथे ते सिस्टेमॅटिक थिओलॉजी आणि होमलेटिक्सचे प्राध्यापक देखील आहेत.