ख्रिस्ताशी संयुक्त होणे, हे निःसंशयपणे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तिचा एक सर्वाधिक अलौकिक आशीर्वाद आणि मिळालेली सुसंधी आहे. जेव्हा पवित्र आत्मा एखाद्या पाप्याला आदामापासून छेदून वेगळे करतो आणि ख्रिस्तात त्याचे कलम करतो तेव्हा नवीन जन्माच्या वेळी पवित्र आत्मा हे एैक्य घडवून आणत असतो. तेव्हा पवित्र आत्मा ख्रिस्त आणि पापी व्यक्ति मध्ये एक आत्मिक एैक्य घडवतो, हे ऐक्य कधीही भंग पावत नाही, रद्द होत नाही आणि हे अनंतकाल टिकून राहणारे आहे. ह्या कृतीतून, देव आणि आदाम ह्यांमधे जो करारबद्ध नातेसंबंध आदामाच्या पतनापूर्वी होता तो नातेसंबंध देव आणि पापी व्यक्ति यांमध्ये पवित्र आत्मा पुनर्स्थापित करतो. जरी ह्या एैक्याचे मुलतत्व हुबेहूब मूळ करारातील एैक्या सारखेच आहे तरी त्यांतील एक फरक अर्थपूर्ण आहे : देव आणि आदाम ह्यांमधील करारबद्ध अनुबंध तुटू शकतो हे सिद्ध झाले आहे कारण तो देवाच्या बाह्यरूप व्यक्तित्वातून स्थापला गेला होता. पण जेव्हा पवित्र आत्मा एका पापी व्यक्तिला ख्रिस्ताशी जोडतो, तेव्हा हे संयुक्त होणे देवाच्या अंतर्यामातून होते. हे संयुक्त होणे त्रैक देवाच्या द्वितीय व्यक्तीमध्ये, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्थापित केलेले आहे. जेव्हा एखादी पापी व्यक्ती ख्रिस्ताशी संयुक्त बनते, तेव्हा ती व्यक्ती त्रैक देवाशी अनंतकाळात कधीही न तुटणाऱ्या एका कराराने संयुक्त केली जाते. ख्रिस्ताचे दैवी स्वभावगुण आणि मानवी स्वभावगुण छेदून वेगळे करणे हे जसे अशक्य आहे, तसेच देव आणि त्याचे लोक यामधील ख्रिस्तामध्ये स्थापन केलेला करारनामा कधीही नाहीसा करता येत नाही. म्हणूनच, पौल निर्भयपणे विश्वासणाऱ्यांना लिहू शकला की “ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला कोणतीही गोष्ट विभक्त करू शकणार नाही.” (रोम ८:३९).
जेव्हा आपण म्हणतो की विश्वासणारे लोक ख्रिस्ताशी विश्वासाने जोडले जातात तेव्हा त्यातून हेच सर्व सूचित केलेले असते. पण, आपल्याला जर हे आशीर्वादित लाभ उपभोगायचे असतील तर हे गौरवी वास्तविक सत्य आपल्याकरिता एक अनुभव देखील बनले पाहिजे. हे एैक्याचे उद्दिष्ट नविन जन्माच्या वेळी स्थापित होते , पण वास्तविकरीतीने ख्रिस्ताशी हे एैक्य कृतिशील विश्वासानेच स्थापित होते आणि सुस्थितीत राखले जाते. केवळ विश्वासानेच विश्वासणाऱ्याला ह्या एैक्याची जाणीव होते आणि त्याचे लाभ तो अनुभवू शकतो. जरी देवाच्या बाजूने ह्या एैक्यात खंड पडत नाही, तरी विश्वासणाऱ्याच्या बाजूने ह्या एैक्याची जाणीव आणि आनंद विश्वासणाऱ्याच्या क्रियाशील विश्वासावर अवलंबून आहे. विश्वासणारा त्याचा विश्वास जेवढा अधिक सक्रिय करील, तेवढा त्याच्या ख्रिस्ताशी एैक्याची जाणीव आणि सुख तो उपभोगू शकेल. म्हणून, ह्या एैक्यावर जेवढ्या प्रमानात विश्वास ठेवला जाईल तेवढ्याच प्रमाणात या एैक्याचा आनंद उपभोगणे शक्य होईल. योहान १५मध्ये, येशू त्याच्या लोकांना त्याच्या मध्ये राहण्यासाठी प्रितीने विनवतो, “तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हांमध्ये राहीन ….. मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात, जो माझ्याकडे राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो, तो पुष्कळ फळ देतो. (योहान १५:४-५).
ख्रिस्त हे पुष्कळवेळा स्पष्ट करतो की विश्वासणाऱ्यांनी ह्या एैक्याच्या पूर्ण जाणीवेत आणि सुखानंदात राहावे ही त्याची इच्छा आहे. म्हणून हे आवश्यक आहे की विश्वासणाऱ्यांनी प्रत्येक दिवशी नव्याने प्रभू येशू ख्रिस्तावर आणि त्याने पूर्ण केलेल्या कार्यावर विश्वास व्यक्त करून जीवन जगावे. आपण भावनिक न होता हा विश्वास टिकून ठेवण्याची वेळ जीवनात येईल. याप्रकारे देवाची लेकरे जीवनात मधुर व कोमल अनुभव नसतानासुद्धा आनंद करतात. काही वेळा आपण ख्रिस्ताशी संयुक्त आहोत असे आपल्याला वाटत नाही, पण तरी सुद्धा आपण ख्रिस्ताशी सयुंक्त आहोत हे सत्य आपण विश्वासाने कवटाळतो. जेव्हा आपण भावनिक होवून नव्हे तर अधिकाधिक विश्वासाने जीवन जगतो तेव्हा तो केवढा मोठा आशीर्वाद असतो! “विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे” (इब्री. ११:१).
ह्या मोलवान ख्रिस्ताबरोबर तुम्ही संयुक्त झाला आहात की नाही याची तुम्हाला खात्री आहे का? जर तुम्ही संयुक्त झाला आहात तर कोणताही विरोध न करता तुम्ही ख्रिस्ताकडे ओढले जाल, त्याला विश्वासाने तुम्ही मिठी माराल, उत्तरोत्तर त्याच्यासारखे बनू लागाल आणि त्याच्याशी झालेल्या तुमच्या एैक्याविषयी अधिकाधिक आत्मविश्वासपूर्ण व्हाल. जर हे काही प्रमाणात तुमच्या जीवनाचे वर्णन असेल, तर ख्रिस्ताकडे येत राहणे आणि त्याच्यामध्ये राहणे चालू ठेवा. हे करण्याने, ख्रिस्ताशी तुमच्या वस्तुनिष्ठ एैक्यातून तुम्ही अधिक आनंद उपभोगाल, आणि त्यानुसार, “म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच (रोम ८:१)” हे पौल लिहितो तेव्हा त्याला काय म्हणायचे आहे हे तुम्हाला अधिकाधिक कळून येईल.