केवळ शास्त्रलेख (सोला स्क्रिपचरा)

ज्याला प्रॉटेस्टंट धर्म सुधारणेचे एक औपचारिक तत्व म्हटले जाते, — ते चर्च नव्हे, धार्मिक परंपरा नव्हे, व्यक्तिगत अनुभव नव्हे— तर केवळ पवित्र शस्त्र (बायबल) हे  ख्रिस्ती विश्वास आणि आचरण ह्यांकरिता एकमेव अधिकारस्थान आहे हे ठाम जाहीर विधान आहे.

केवळ शास्त्रलेख (बायबल) हे सत्य तत्व  गृहीत धरते की देव मानवी ज्ञान व अनुभूती यांच्या पलीकडे आणि मानवी ज्ञानाच्या  आवाक्याबाहेर आहे आणि  जोपर्यंत देव स्वतःला प्रकट करत नाही तोपर्यंत तो आपल्या नेत्रांपासून पूर्णपणे दडलेला असा असतो, आणि तो दोन मार्गांनी स्वतःला प्रकट करतो. त्यातील पहिला मार्ग म्हणजे निसर्गाचे पुस्तक (शिस्तबद्ध सृष्टी क्रम).  आपण पापी आणि पतनशील आहोत ह्या कारणाने, देव निसर्गाद्वारे  सर्वांना जे  प्रकटीकरण देतो त्याचा विपर्यास आपण करतो. आपण नैसर्गिक प्रकटीकरणाचे वीरुपीकरण खोटा धर्म आणि मूर्तिपूजेत करून  सोडतो.

देव कृपावंत आहे आणि त्याच्या लोकांना त्यांच्या पापापासून तारावे ही त्याची इच्छा आहे म्हणून त्यांना  पापापासून सोडवायला देव त्याची उच्च पातळी सोडून केवळ सृष्टीतच नव्हे तर इतिहासात देखील स्वतःला प्रकट करण्यासाठी जणू काही खाली वाकतो.  त्याने केलेल्या आणि आपल्याला पवित्र शास्त्रात लिहिलेल्या दिसतात त्या मुक्तीच्या महान आणि महाप्रतापी कृत्यांतून आणि त्यासोबत आपण ह्या घटना कशा समजून घेतल्या पाहिजेत ह्या स्पष्टीकरणातून देव हे साध्य करतो.  सृष्टीतील देवाचे प्रकटीकरण बिनचूकपणे कसे समजून घ्यावे ह्यासाठी देखील  शास्त्रलेख आपल्याला साहाय्य करते.

बायबल (लिखित स्वरूपातील देवाचे वचन) मानवाच्या पापाची फक्त वाईट बातमी घेऊन आपल्यापुढे उभी ठाकते  एवढेच केवळ नव्हे तर बायबलमध्ये (आणि केवळ बालबलमध्येच) आपल्याला सुवार्तेची चांगली बातमी देखील आढळते.  सुवार्तेमध्ये, आपल्या पापापासून तारण्याकरिता देवाने येशू ख्रिस्त ह्या व्यक्तीमध्ये ज्या गोष्टीं केल्या आहेत त्या आपल्याला कळतात. ह्यामध्ये ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थान सामावलेले आहेच,  पण दहा आज्ञांमधून देवाने  आपल्यावर ज्या मागण्या लादल्या आहेत त्यांचे त्याने केलेले परिपूर्ण आज्ञापालन देखील त्यांत आहे.   आपल्याला ही उत्तम बातमी सृष्टीत दिसून येत नाही. आपल्या स्वतःच्या जीवात्म्यात ही सुवार्ता आपल्याला आढळू शकत नाही, आणि आपल्याला ती जगाच्या धर्मांमध्ये गवसत नाही.  

आपण एकट्याने, कोणाच्याही साहाय्याविना, ही सुवार्ता शोधून काढू शकत नाही म्हणून देव कृपाळूपणे ती पवित्र शास्त्राच्या शब्दांतून आपल्याला प्रकट करतो.  खरोखर, खुद्द शास्त्रलेख ते ज्यातून निर्माण झाले त्या प्रेरणेविषयी आपण होऊन साक्ष देते  (“… पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला.  सर्व शास्त्रलेख “ईश्वरप्रेरित आहे.” )  धर्म सुधारणेची पापकबुली आपल्याला बायबल स्वतःविषयी जे जाहीरपणे सांगते त्याचे स्मरण करून देते, आणि मग धर्म शास्त्रात देवाची आपल्या जीवनाविषयी काय इच्छा आणि हेतू आहे हे कळण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट देऊन ठेवते  आणि त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या तारणदायी कार्याविषयीच्या ज्ञानाचा कधीही न चुकणारा स्रोत पुरवते.

“बायबल (लिखित स्वरूपातील देवाचे वचन) मानवाच्या पापाची फक्त वाईट बातमी घेऊन आपल्यापुढे उभी ठाकते  एवढेच केवळ नव्हे तर बायबलमध्ये (आणि केवळ बालबलमध्येच) आपल्याला सुवार्तेची चांगली बातमी देखील आढळते.”

आपले पाप आणि आपले तारण ह्याविषयी देवाने त्याच्या वचनात प्रत्येक गोष्ट आपल्याला प्रकट केलेली आहे म्हणून  प्रॉटेस्टंट लोकांना कधीही चूक न करू शकणारे चर्च, कधीही न चुकू शकणारे चर्च अधिकारी (पोपने अधिकृत केलेले), किंवा सतत येत राहणारे प्रकटीकरण  (पेंटेकॉस्टल पंथात सांगतात तसे) यांची गरज भासत नाही.  येशू विषयी आणि त्याच्या व्यक्तित्वाविषयी आणि त्याच्या कार्याविषयी आपल्याला आधीच माहित नसलेले असे देवाने त्याच्या वचनातून काय गाळले असण्याची शक्यता आहे?  अर्थात, काहीही मुळीच गाळले नाही.

बायबल आपल्याला जीवनाविषयी प्रत्येक गोष्ट सांगत नस्ले तरी (आणि पुष्कळ लोकांचा असा गैरसमज आहे की बायबल म्हणजे विश्वाच्या रहस्यांची गुरुकिल्ली आहे, किंवा आयुष्याचे मॅन्युअल  आहे किंवा  ईसापच्या नीतिकथांसारख्या  चिरंतन सत्याचे एक पुस्तक आहे), आपल्याला आपल्या पापांपासून तारण्यासाठी देवाने जे काही केले आहे त्याविषयी बायबल नक्कीच सांगते.  आणि आपण जेव्हा “सोला  स्क्रिपचरा” चा (केवळ शास्त्रलेख) उल्लेख करतो तेव्हा आपल्याला हेच  म्हणायचे असते.  देवाच्या लिखित वचनाव्यतिरिक्त देवाची कृपा आणि सुवार्तेच्या उत्तम बातमीचा कधीही न चुकणारा  इतर कोणताही स्रोत नाही.

Used with permission from www.monergism,com

डॉ. किम रिडलबर्गर
डॉ. किम रिडलबर्गर

डॉ. किम रिडलबर्गर हे वेस्टमिन्स्टर सेमिनरी कॅलिफोर्निया येथे क्रमबद्ध ईश्वरविज्ञान ह्या विषयाचे विजिटिंग प्रोफेसर आहेत आणि कॅलिफोर्निया येथील अनाहिम,येथे क्राइस्ट रिफॉर्म्ड मंडळीचे निव्रुत्त पास्टर आहेत. ते अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, ज्यात अ केस फॉर एमिलेनिलिझम: युगान्तपरीज्ञान समजून घेणे आणि द मॅन ऑफ सिन : ख्रिस्तविरोधी बद्दलचे सत्य उघड करणे.