आपल्या विश्वासाचे समर्थन करणे

“विश्वासाचे संरक्षण करणे” ही धर्म तत्व समर्थनाची एक व्याख्या आहे. परंतु, विश्वासाचे संरक्षण करणे ही एक केवळ तात्विक कसरत नसते तर प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीची ती जबाबदारी आहे. विश्वासाचे संरक्षण केवळ त्याचा अभ्यास करून थांबायचे नाही तर प्रत्यक्ष जीवन जगून करायचे आहे . हे कसे करता येईल ? १ पेत्र ३:१५मध्ये आपण वाचतो, “तर ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना; आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भिडस्तपणे द्या.”

पहिलीगोष्ट, जेव्हा आपण प्रभूचा आपल्या अंतःकरणात आदर करतो तेव्हा आपण आपल्या विश्वासाचे संरक्षण करतो. आपण लोक आणि कल्पनांना जितके घाबरतो आणि त्यांचा आदर करतो त्याहून अधिक आपण प्रभूला भिऊन त्याचा आदर केलाच पाहिजे. पुरुष आणि स्त्रियांच्या शब्दांहून प्रभूच्या शब्दांना अधिक महत्व आहे. बायबल म्हणते, “प्रभूचे वचन सर्वकाळ टिकते” (१पेत्र१:२५). आपल्या प्रभूची सुवार्ता जेव्हा आपली जीवने बदलते आणि मग आपले नातेसंबंध आणि समाज, तेव्हा आपण आपल्या विश्वासाचे संरक्षण करत असतो. विल्यम एडगरने दाखवले त्यानुसार, आपल्या संस्कृतीचे अंतरंग समजण्याच्या कुवतीमुळे नव्हे तर नेहमीच ताजीतवानी आणि शक्तिशाली असलेल्या सुवार्ता संदेशाच्या शुभवार्तेमूळे धर्मतत्व समर्थन आपल्यासाठी प्रत्येक दिवशी समयोचित आणि समर्पक आहे. पवित्रशास्त्राचे आज्ञापालन करत जगणे मग आपल्या विश्वासाच्या संरक्षणार्थ जगणे बनते.

दुसरी गोष्ट, आशा धरून जगण्याने आपण आपल्या विश्वासाचे संरक्षण करत जगू शकतो. छळ सोसत असलेल्या आणि पांगलेल्या लोकांना लिहीत असतांना, पेत्राने हे गृहीत धरले होते की ख्रिस्ती समजले गेलेले लोक अशा रीतीने अशी आशा धरून जगतील की लोक ते कसे आणि का असे विचारतील. आज ही आशा बहुतांश जग जे आत्मसहाय्य आणि नैराश्य बाळगून जगते त्याच्या उलट असल्याचे दिसते, कारण आशा मानवी बदलात दिसून येत नाही. ही आशा जो विश्वास त्याच्यासोबत एका महान वतनाचे अभिवचन घेऊन येतो त्या ख्रिस्ताच्या प्रकटीकरणात आणि पुनरुत्थानात ठेवलेला निश्चित असा दृढ विश्वास झाला आहे, ख्रिस्ती लोक हर्षाने म्हणू शकतात, “आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला” (१ पेत्र १:३). एक ख्रिस्ती म्हणून जगणे ह्याचा अर्थ काय आहे ह्याच्या केंद्रस्थानी ही आशा असते.

तिसरीगोष्ट, जेव्हा आपण उत्तर द्यायला तयार असतो तेव्हा आपल्या विश्वासाचे संरक्षण करत आपण जगत असतो. ज्यांच्याशी आपण संभाषण करत असतो किंवा विशेषेकरून आपल्याला आशा का आहे हे विचारणारे लोक ते असतील, त्यांना आपण उत्तर देत असू. आपल्याला नेहमीच वाटते की ह्यासाठी आपल्याला तत्वज्ञान, संस्कृती, आणि इतर धर्मांचा खूप अभ्यास करावा लागेल, आणि हे असे ज्ञान शक्य आणि उपयुक्त असते. पण तुम्ही तुमच्या विश्वासाचे संरक्षण करणे सुरु करण्यापूर्वी तुम्हाला त्याची गरज नसते; पेत्र म्हणतो तुमच्या आशेसाठी उत्तर द्यायला तयार व्हा, तुमच्या ज्ञानासाठी नव्हे (१पेत्र१:१३)! पण आपण इतरांशी संवाद करत जगत आहोत का? जेथे आपली आशा (पवित्रशास्त्राने सांगितल्यानुसार) प्रकाशाने तळपत बाहेर दिसून येईल तेथे, आपण उत्पत्ती, नैतिकता, इच्छा, सौंदर्य, नातेसंबंध, आईबाप होणे, आणि अनंतकालिकत्व ह्या विषयांवर इतरांशी बोलत आहोत का? तुम्ही प्रश्नांची उत्तरें द्यायला तयार आहात का : तुम्ही कशावर विश्वास ठेवता? त्यावर तुम्ही का विश्वास ठेवता?

चौथी गोष्ट, जेव्हा आपण लीनपणे आणि भय धरून, किंवा सौम्यपणे आणि प्रतिष्ठेने जगतो तेव्हा आपण आपल्या विश्वासाचे संरक्षण करतो. आपण स्वतःचे संरक्षण करत असतांना, इतरांवर हल्ला करायला सुरुवात करणे सोपे असते. काही कल्पनांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेऊन हल्ला करण्यासाठी काही वाव असू शकतो(२ करिंथ १०:५), पण आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण स्वतःचे संरक्षण करत नाही; आपल्याला ख्रिस्तामध्ये जी आशा आहे तिचे आपण संरक्षण करत आहोत. हे काम निरागस, आदरपूर्ण वृत्ती आणि स्वच्छ मनाने केले पाहिजे. आपण सर्व वैरभाव, लबाडी, ढोंग, असूया आणि निंदानालस्ती छळ आणि तिरस्काराच्या संदर्भात देखील काढून दूर करायला पाहिजे(१ पेत्र २:१), पण, आपल्या विश्वासाचे संरक्षण करत असतांना, आपण ह्यारीतीने जीवन जगले पाहिजे. (१ पेत्र २:१३-१९). “कारण तुम्ही चांगले करून दुःख सोसणे, हे वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा बरे आहे.” (१ पेत्र ३:१७).

ह्या चारही गोष्टींकरिता, आपल्याला आपल्यामध्ये पवित्र आत्म्याच्या देणगीची गरज आहे, यासाठी की आपण प्रभूला मान देऊ शकू आणि आशेने जगू (रोम १५:१३), आणि तसेच त्याने आपल्यामधून कार्य करावे यासाठी की आपण उचित रीतीने जगून आपल्या विश्वासाचे संरक्षण करू. (योहान १५:२६). म्हणून, तुम्ही विश्वासाचे संरक्षण कसे करावे ह्याचा विचार करता तेव्हा, इतरांच्या जीवना ऐवजी तुमच्या स्वतःच्या जीवनाविषयी विचार करा : तुमचे जीवन देवाला सन्मान देत आहे का? तुमचे जीवन आशेने प्रकाशित होत आहे का? तुमचे जीवन इतरांना तुमच्याकडे खेचून जवळ आणत आहे का? तुमचे जीवन सौम्यपणा आणि प्रतिष्ठेने जगले जात आहे का?

डॉ. जोएल बीके
डॉ. जोएल बीके

जोएल रॉबर्ट बीके (जन्म कलामाझू, मिशिगन येथे, डिसेंबर 9, 1952) एक अमेरिकन सुधारित पाद्री आणि धर्मशास्त्रज्ञ आहे. ते ग्रँड रॅपिड्स, मिशिगनमधील हेरिटेज रिफॉर्म्ड मंडळीचे मंत्री आहेत आणि प्युरिटन रिफॉर्म्ड थिओलॉजिकल सेमिनरीचे अध्यक्ष आहेत, जिथे ते सिस्टेमॅटिक थिओलॉजी आणि होमलेटिक्सचे प्राध्यापक देखील आहेत.