प्रभूच्या दिवशी जेव्हा ख्रिस्ती लोक उपासनेकरिता जमतात, तेव्हा फार मोठ्या प्रमाणावर, ते ख्रिस्ताच्या शरीरातील एका सर्वाधिक अर्थपूर्ण आणि परिणामकारक कार्यक्रमात भाग घेत असतात. उपासना हा विश्वासणाऱ्याचा ज्वलंत आंतरिक ओढ असलेला सर्वोच्च पेशा आहे. उपासना, ख्रिस्ती शिष्यत्वाच्या मुकुटावरील बहुमोल मुकुटमणी आहे. उपासना हे ख्रिस्त येशू, तो उत्तम मेंढपाळ, ज्यात त्याच्या मेंढरांना पौष्टिक अन्नाने भरवतो असे ते हिरवेगार कुरण आहे. ह्या सध्याच्या दुष्ट युगात, येणाऱ्या युगाचे सामर्थ्य ज्यामधून प्रसृत केले जाईल तो गतिमान आत्मिक संदर्भ म्हणजे उपासना होय.( इब्री ६:५; गलती १:४). खरोखर, देवाचे वचन, धार्मिक विधी, आणि प्रार्थना ह्यांद्वारे देव गौरवल्या जातो आणि विश्वासाद्वारे त्याची मुलें ख्रिस्तामधील मुक्तीचे लाभ कृतज्ञतेने ग्रहण करतात. (वेस्टमिन्स्टर लार्जर कॅटेकिझम Q.१५४).म्हणून, प्रभूच्या दिवशी आपण सामूहिक उपासना समजून घेऊन स्वतःला त्यात वाहून घेणे सर्वोच्च महत्वाचे आहे.
सुरुवातीच्या ख्रिस्ती लोकांनी त्यांच्या जीवनात जाहीर उपासनांना प्राधान्य दिले. लूक कळवतो की “ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत.” (प्रेषित २:४२). प्रत्येक कृतिपूर्वी वापरलेले नियामक उपपद लक्षात घ्या; ह्यातून हे दिसते की ही जाहीरपणे केलीली सामूहिक उपासना होती. चर्चच्या त्या सुरवातीच्या दिवसांत कोणत्या गोष्टीं उपासनेत समाविष्ट होते ? देवाचे वचन, धार्मिक विधी, आणि प्रार्थना (मत्तय २८:१८-२०शी ताडून पहा).
बायबलाधारीत उपासनेसाठी देवाच्या वचनांचे निष्ठापूर्वक वाचन आणि नीतिबोध आवश्यक आहेत. पौल तिमथ्याला लिहितो, “मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण ह्याकडे लक्ष ठेव.” (१ तिमथ्य :१३).) नंतर, “वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर” अशी त्याच्यावर जबाबदारी टाकतो. (२ तिमथ्य ४:२). सर्व पास्टर्स आणि चर्चेस ह्यांना हेच करायला सांगण्यात आले आहे, यामध्ये कोणताही अपवाद नाही , उपासनेमध्ये जेव्हा ख्रिस्ताचे जिवंत वचन वाचले जाते, आणि विशेषतः जेव्हा त्यावर बोध करण्यात येतो तेव्हा ख्रिस्ताची वधू आपल्या जिवलगाची वाणी ऐकते. (रोम १०:१७; इब्री ४:१२). ख्रिस्त परत येईपर्यंत देवाचे जे खात्रीशीर वचन आहे त्या बायबलकडे काळजीपूर्वक लक्ष देणे शहाणपणाचे ठरेल. (२ पेत्र १:१९-२१; १ तिमथ्य ३:१६-१७).
प्रश्न हा आहे, प्रिय विश्वासणाऱ्या, की तू लक्ष देऊन ऐकत आहेस का? तू विनम्र आणि शिकवता येण्यासारखे अंतःकरण घेऊन प्रभूच्या दिवसाच्या उपासनेला जातोस का? प्युरिटन जॉर्ज स्वीनॉकांनी असे भाष्य केले की “चर्चमधील सर्वच ख्रिस्ताचे वचन ऐकतात पण वचनातील ख्रिस्त फार थोडके ऐकतात.” जेव्हा सार्वजनिक रीतीने देवाचे वचन ऐकण्यास, त्याच्यावर विश्वास ठेवण्यास आणी त्याच्या सर्वश्रेष्ठ गुण वैशिष्टयात आनंद करण्यासाठी, प्रेमळ वचन ऐकण्यासाठी व पिता या नात्याने आज्ञा स्वीकारण्यासाठी त्याच्यावर अवलंबून असलेली त्याची लेकरे उपासनेत एकत्र येतात तेव्हा देवाला जे गौरव प्राप्त होते तितके इतर दुसऱ्या काशानेही होत नाही. याशिवाय, ख्रिस्ताच्या चर्चसाठी दुसऱ्या कशानेही अधिक मोठे आत्मिक आशीर्वाद पूरवले जात नाहीत. (वेस्टमिन्स्टर लार्जर कॅटेकिझम, Q.१५५ शी तुलना करा)
बाप्तिस्मा आणि प्रभू भोजन हे धार्मिक विधी देखील बायबलाधारीत उपासनेचे अविभाज्य घटक आहेत. ख्रिस्तामध्ये पूर्तता झालेल्या कराराच्या अभिवचनांची ती चिन्हें आणि मोहोर अशी आहेत. बाप्तिस्म्याचे जल हे शुद्ध करणारे ख्रिस्ताचे रक्त आणि पवित्र आत्म्याने घडवलेले नवजीवन दर्शवते. (प्रेषित २२:१६); तीत ३:५), सहभागितेतिल भाकर व द्राक्षरस ख्रिस्ताचे मोडलेले शरीर आणि वाहिलेले त्याचे रक्त व्यक्त करते — आपल्या ऐवजी ज्याने देवाचा क्रोध स्वतःवर घेतला तो निष्पाप कोकरा (मत्तय २६:२६-२८). ह्या दृश्य चिन्हें व मोहोर यांद्वारे पवित्र आत्मा आपल्याला शक्तिशाली रीतीने हे आश्वासन देतो की देव आपल्याला ख्रिस्ताने क्रुसावर केलेल्या त्या एका अर्पणाप्रित्यर्थ मुक्तपणे पापांची क्षमा आणि अनंतकालीन जीवन बहाल करतो” (हायडेलबर्ग कॅटेकिझम, Q. ६६).
वचनाच्या प्रवचनाद्वारे देव विश्वास उत्पन्न करतो आणि पोषण करून वाढवतो आणि धार्मिक विधींमध्ये तो त्याला दृढपणे शाबीत करतो. प्रार्थना ही बायबलाधारीत उपासनेचा तिसरा तडजोड नसणारा पैलू हा चर्चने सुवार्तेला दिलेला विनम्र आणि कृतज्ञ प्रतिसाद असतो. (स्तोत्र १०३:१-५). चर्च सेवकाने किंवा वडिलांनी चालवलेली उपासनेतील प्रार्थना ही चर्चने देवाच्या सार्वभौम ऐश्वर्य आणि कृपेला (बोलून किंवा गाऊन) दिलेला मनःपूर्वक प्रतिसाद असतो.
प्रभूच्या दिवशीची उपासना हे सामान्य दर्जाचे साधेसुधेकाम नसते. एका अलौकिक रीतीने, बायबलाधारीत उपासना देवाचे गौरव करते आणि विश्वासणाऱ्याला पवित्र देखील करते. म्हणून, स्वर्गीय हेतूने नेमलेल्या ” आत्मिक उपासना घोषित होणारया दिवशी ” एकनिष्ठेने मनाची तयारी करून आणि चांगल्याची अपेक्षा धरून उपासनेला उपस्थित राहा. (इब्री १०:२५). उत्सुक असलेले आणि प्रभूचे नाम उंचावण्यास आणि तुमचा स्वर्गीय पिता ख्रिस्तामध्ये तुम्हाला देऊ इच्छितो ते सर्व आत्मिक लाभ आनंदाने ग्रहण करायला तयार असलेले मन घेऊन या.