फुरसतीच्या वेळेचा चांगला उपयोग करणे

अधिकतम लोकांकडे कधीही फुरसतीचा वेळ नसतो. त्याच्या मोकळ्या समयात त्यांना हवे ते करायला पुरेसे पैसे मिळवण्यासाठी ते नोकरी/कामाकडे एक आवश्यक वाईट गोष्ट अशा दृष्टीने पाहतात. ते जगतात ते त्यांच्या मौजमजेच्या संध्या, शनिवार -रविवार साप्ताहिक रजा आणि वार्षिक सुट्यांच्या मजेसाठीच. क्रीडा आणि मनोरंजन उद्योगांना हे लोक फार प्रिय असतात. आणि मग इतर काही असे लोक आहेत की ज्यांना ते काम करत नसतात तेव्हा आपण दोषी आहोत असे वाटते. काही झाले तरी, देवाचे वचन म्हणते, आपल्याला सहा दिवस “श्रम” करायचे आहेत आणि त्यातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करायचा आहे (निर्गम २०:९; इफिस ५:१६). ह्या ध्रुवांच्या मध्ये असणाऱ्या वर्णपटात तुम्ही कोठे आहात? ह्या टोकाच्या दोन्ही दोन्ही भूमिकांपैकी एकही बायबलनुसार नाही. काम हे एखादे आवश्यक वाईट नाही तर ते देवाने दिलेले पाचारण आहे (उत्पत्ती २:१५); फुरसतीचा वेळ सैतानाकडून येत नाही, पण ती देवाने दिलेली एक देणगी आहे (उपदेशक ३:१३; ५:१८-१९:९-९).

फुरसतीच्या वेळेचा एक हेतू शारीरिक, मानसिक आणि आत्मिक रीतीने थकवा घालवून ताजे तवाने बनणे असतो. त्याच कारणासाठी आणि त्याला जाणून घेणे सुरुकरण्यासाठी देवाने आपल्याला विश्रांतीचा एक साप्ताहिक दिवस दिला.प्रभू येशू पृथ्वीवर असतांना, त्याला माहित होते की त्याला आणि त्याच्या शिष्यांना विश्रांतीसाठी आणखी काही समयांची गरज होती. सेवाकार्याने थकून गेल्यानंतर आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या मरणाची व्यथित करणारी बातमी ऐकल्यानंतर, त्याने त्याच्या शिष्यांना म्हटले,”….तुम्ही रानात एकांती चला आणि थोडा विसावा घ्या” (मार्क ६:३१). विसाव्याच्या वेळांमुळे कामकरण्यासाठी आपण अधिक चांगल्यारीतीने सज्ज बनतो.. प्युरिटन्स म्हणत असत तसे, जो कोणी विसावा घेण्यासाठी वेळ घेत नाही तो आपल्या कोयत्याला धारलावण्यासाठी न थांबणाऱ्या कापणीकरणाऱ्यासारखा आहे आणि शेवटी त्याची उत्पादन क्षमता कमी होते.

फुरसतीच्या वेळेचा दुसरा एक हेतू असतो आणि तो म्हणजे इतरांशी मैत्रीपूर्णबंध अधिक मजबूत करणे. ज्यांनी एकमेकांशी नेहमी बोलण्यासाठी वेळ काढला त्या देवाचे भय धरणाऱ्या लोकांवर देवाने त्याचा आशीर्वाद घोषित केला. (“परमेश्वराचे भय धरणारे लोक नेहमी एकमेकांस बोलले” त्यांच्यावर देवाने आशीर्वाद घोषित केला. (मलाखी३:१६). आपल्या मोकळ्यावेळेत, कुटुंबीयमंडळी, मित्रमंडळी, आणि चर्च बरोबरचे अनुबंध अधिक मजबूत करता येतात. आणि इतर लोक आपल्या फुरसतीच्या वेळेत आशीर्वादित होतात.

आणखी एक हेतू देवाच्या देणग्यांचा आनंद उपभोगणे हा आहे. (१ तिमथ्य ६:१७ब) . देव त्याच्या सृष्टीतील अद्भुत वैविध्य आणि कौशल्यपूर्ण सौंदर्य ह्यांतून त्याचे गौरव दाखवतो. आपण त्याला कृतज्ञ राहत उपभोग घ्यावा म्हणून तो आपल्याला अन्न, विवाह, आणि इतर गोष्टीं देतो. (१ तिमथ्य ४:४-५).

ह्या हेतूंनी आपले कार्यक्रम नियंत्रित केले गेले पाहिजेत. त्यांच्याशी संघर्ष करणाऱ्या गोष्टींविरुद्ध दक्ष राहा. स्वार्थीपणा हा एक धोका आहे. मोकळा वेळ (फुरसत) म्हणजे “माझा वेळ” ज्यांत मी मला जे काही करायची इच्छा आहे ते करायला स्वतंत्र आहे, असे बरेच वेळां समजण्यात येते. (लूक १२:१६-२१) जणू काही त्या तासांत, सर्वात महत्वाचे म्हणजे देवावर प्रीती करणे आणि माझ्या स्वतासारखीच माझ्या शेजाऱ्यावर प्रीती करणे हा देवाचा आदेश मला लागू होत नाही. म्हणून तुमचा मोकळा वेळ इतरांच्या लाभाकरिता वापरा.

वेळ घालवणाऱ्या गोष्टींना कोणत्याही लाभाशिवाय वेळ घालवू देणे हा आणखी एक धोका आहे. मनोरंजन/करमणूक आणि खेळ क्रीडा आपल्याला शारीरिक व्यायाम पुरवतात आणि सांघिक काम शिकवतात, पण जेव्हा आपण त्यांनी पछाडले जातो तेव्हा मूर्ती सारख्याबनून त्या आपला वेळ लुबाडून घेतात. सामाजिक माध्यमे, इंटरनेट सर्फिंग, कॉम्पुटर गेम्स, आणि ऑन-लाईन करमणूक आपली वाचवलेली मिनिटे आणि तास देखील खाऊन फस्त करतात. खूप काम असलेल्या दिवशी देखील देवाच्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी , कदाचित एखाद्या ऍपच्या मदतीने किंवा तुमच्या खुर्चीच्या बाजूला ठेवलेल्या एखाद्या पुस्तकाच्या मदतीने वाचवलेल्या क्षणांचा उपयोग करा.

आपल्याला काहीही “करावे लागत” नसते तेव्हा आपण जे करतो त्यातून पुष्कळ वेळां आपल्या हृदयाचे अग्रक्रम आणि पसंतीच्या गोष्टीं उघड होतात. तुम्ही तुमच्या वेळेचा उपयोग करत असतांना तुमचे हृदय हीच तुमची सर्वात मोठी समस्या असते हे तुम्हाला कळून आले नाही का? देवापुढे आपले पाप कबूल करायला आपल्याकडे काय हे कारण ! आपल्याला ख्रिस्ताचे शुद्ध करणारे रक्त आणि त्याला काम करण्यासाठी आणि विसाव्यासाठी मिळालेल्या वेळेचा ज्याने नेहमीच सदुपयोग केला त्या तारकाचे नीतिमान पांघरूण, ह्यांची केवढी गरज आहे. आपल्याला आपली प्रीती, ममता वरील (स्वर्गीय) गोष्टींवर ठेवायला पुढे नेणाऱ्या त्याच्या उल्हसित करणाऱ्या कृपेसाठी आणि इतरांकरिता खरी प्रीती आपल्यात असावी यासाठी आपण झटू या.

देवाची कृपा आपल्याला त्याच्याप्रत कृतज्ञता बाळगून त्याच्या देणग्यांचा उपभोग घेण्याची क्षमता पुरवते, फावल्या वेळेचा सदुपयोग करण्याची क्षमता देते,आणि सर्वश्रेष्ठ मनोरंजनाचा आनंद लुटण्याची क्षमता देते. प्युरिटन आयझ्याक अँब्रोजने लिहिले, “आत्मचिंतनाने आत्म्याचे मनोरंजन होते” (किंवा विचार करून काही करण्याचे ठरवण्याने आत्मिक उत्साहवर्धन होते, किंवा विचार मंथन म्हणजेच आत्मिक दृष्टीने ताजेतवाने बनणे). मग त्याने Looking Unto Jesus( येशूकडे दृष्टी लावणे ) हा मोठा ग्रंथ लिहायला घेतला (तो वाचावा ही आमची शिफारस आहे). फुरसतीच्या वेळेचे इतर उपयोग महत्वाचे असले तरी, त्यातील सर्वाधिक आशीर्वादित कृती प्रभूचा शोध घेणे आणि त्याच्यामध्ये आनंद पावणे हीच आहे. देवाने विसाव्याचा एक साप्ताहिक दिवस दिला त्याचे हेच कारण आहे. जरी आपण शब्बाथ म्हणजे “फुरसतीचा वेळ” असे मानत नसू, तरी ती “कोणी जेव्हा काम करत नसतो तेव्हाची वेळ” असते. त्या दिवसावर लक्ष ठेवा, तो आत्मिक गोष्टींना समर्पित करा, त्या दिवसावर देव जी कृपेची साधने देतो त्यांचे जतन करा, आणि ख्रिस्तात विसावा शोधा. त्याची कृपा ह्या साप्ताहिक “विसाव्याच्या दिवसाला” फुरसतीच्या दिवसाचा प्रमुख भाग बनवते आणि तुम्ही तुमचे वाचवलेले क्षण आणि मोकळे दिवस कसे घालवता ते प्रभावित करते.

Image by rawpixel.com on Freepik

डॉ. जोएल बीके
डॉ. जोएल बीके

जोएल रॉबर्ट बीके (जन्म कलामाझू, मिशिगन येथे, डिसेंबर 9, 1952) एक अमेरिकन सुधारित पाद्री आणि धर्मशास्त्रज्ञ आहे. ते ग्रँड रॅपिड्स, मिशिगनमधील हेरिटेज रिफॉर्म्ड मंडळीचे मंत्री आहेत आणि प्युरिटन रिफॉर्म्ड थिओलॉजिकल सेमिनरीचे अध्यक्ष आहेत, जिथे ते सिस्टेमॅटिक थिओलॉजी आणि होमलेटिक्सचे प्राध्यापक देखील आहेत.