ख्रिस्ती आजी/आजोबा असणे

आजी/आजोबा होण्यात विशेषाधिकार आणि जबाबदारी ह्या दोन्ही गोष्टी येतात. जरी पवित्र शास्त्रात “आजी” हा शब्द फक्त एकदाच, म्हणजे लोईस, तीमथ्याच्या आजीसाठी वापरला आहे, (२ तिमथ्य १:५), तरी देव आजी/आजोबांकडून जे अपेक्षितो ते त्याच्या वचनात तो आपल्याला सांगतोच. त्यांची जीवनें पुढे येणाऱ्या पिढ्यांना आशीर्वादित करू शकतात.

आजी/आजोबा होण्याच्या आधीच आपण त्या भूमिका पार पाडतो. आपण ज्या रीतीने आपल्या मुलांना वाढवतो त्याने आपली नातवंडे आपण करू त्या इतर कोणत्याही गोष्टींहून अधिक प्रभावित होतात. प्रारंभी, आईबाप त्यांच्या स्वतःच्या मुलांच्या पलीकडचा विचार करत नाहीत, पण देव करतो. “येणाऱ्या पिढ्या “, “तिसरी आणि चौथी पिढी”, आणि “मुलांची मुलें” अशा संदर्भांनी जुना करार भरला आहे. देव पिढयांद्वारे कार्य करतो आणि त्याच्या नामाच्या भयात आपल्या मुलांना वाढवायला सांगतो (स्तोत्र ७८:१-८).

नातवंडांकरिता देवाची स्तुती करून आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करून आपण आजी/आजोबाची भूमिका करतो . भावी आजी/आजोबा म्हणून, माझ्या पत्नीला आणि मला आमच्या कुटुंबाचे सातत्य आणि आमच्या जीवनात असलेली देवाची समक्षता ह्यांविषयी फार मोठे आश्चर्य वाटले. देवाने आमच्या मुलांच्या विवाहानंतर आमच्या मुलांना त्यांची अपत्यें देऊन त्यांच्या विवाहांवर आशीर्वादाचे मुकुटमणी चढवले आणि आम्हाला नातवंडे दिलीत ह्याचा मोठा आनंद आम्हाला लाभला. आईबाप म्हणून आणि आजी/आजोबा म्हणून ज्या जबाबदाऱ्या आहेत, जे दडलेले धोके आहेत त्यांच्या जाणिवेने आम्हाला प्रार्थनेकडे वळवले.

म्यॅथ्यू हेनरीचे वडील फिलिप हेनरीबाबत असे म्हटले जाते : त्याला आठ वर्षांच्या काळात, चोवीस नातवंडे झालीत; त्याच्या मुलांपैकी प्रत्येकाला काही मुलें असे; त्यांच्याविषयी तो नेहमी देवाचा धन्यवाद करत असे ….. तो असे लिहितो, आता मी माझ्या मुलांची मुलें पाहिली आहेत; मला इस्राएलवर शांती सुद्धा बघू देत; आणि मग मी म्हणेन, प्रभू आता तुझ्या सेवकाला निघून येऊ दे जेव्हा त्याने त्याच्या दोन नातवंडांना एकत्र चेस्टर येथे, जाहीरपणे, बाप्तिस्मा दिला, आणि उत्पत्ती ३३:५वर धर्मोपदेश दिला तेव्हा काही लोकांवर त्याचा खूप परिणाम झाला :ही तुझ्या सेवकाला देवाने दिली ती मुलें आहेत.”

आपल्या जीवनात देवाचे भय धरण्याचे उदाहरण बनून आपण आजी/आजोबाची भूमिका पार पाडतो. आमच्या आजी/आजोबांनी प्रार्थना, वाचन, आणि स्तोत्रे गाऊन, आणि आम्हाला उत्तेजन आणि शिकवण देऊन त्यांच्या विश्वासाची साक्ष दिल्याचे माझ्या पत्नीला आणि मला स्पष्टपणे आठवते. पौल तीमथ्याची आजी लोईस आणि त्याची आई युनिके यांच्याविषयी,त्यांच्या निष्कपट विश्वासाकडे (खोटेपणाची पुसटशी शक्यता नसलेला विश्वास) निर्देश करत, असे म्हणतो. ढोंगी मनुष्याचे तोंड आणि त्याचे हृदय ह्यांमधील संबंध तुटून गेलेला असतो, आणि जरी मुलें ते स्पष्टपणे सांगू शकत नसली तरी त्यांना त्याची नेहमीच झटकन जाणीव होते. तीमथ्याचा खुद्द पिता परराष्ट्रीय होता ही परिस्थिती असून देखील, लोईस आणि युनिकेने तीमथ्याला पवित्र शास्त्र शिकवले. तुमचे स्वतःचे हृदय व जीवन ह्यांसाठी पवित्रशास्त्राचे खरे महत्व तुम्ही जाणत असल्यामुळे, तुमची मुले आणि नातवंडांनी देवाच्या त्याच वचनाखाली यावे अशी तुम्ही इच्छा असेल. आपल्यापैकी कोणीही हृदयें उघडून पाहू शकत नाही. पवित्र आत्मा त्यांना तारणाविषयी सर्व ज्ञान द्यायला जो समर्थ आहे त्या शिक्षकाकडे आणू शकतो. (२ तिमथ्य ३:१५).

आपल्या नातवंडांशी नातेसंबंध जोपासून आपण आजी/आजोबाची भूमिका निभावतो. प्रत्येक नातवंडाबरोबर चांगली ओळख करून घ्यायची आणि त्याच्या पातळीवर त्याच्याशी संवाद करण्याची आपल्याला गरज असते. आपल्या मुलांना “जीवन मार्गात” चालणे शिकवा असे बायबल आईबापांना सांगते (अनु.६:७). आपण प्रत्येक नातवंडाचा भरवसा मिळवण्याची गरज असते. त्यांना ज्या नवीन गोष्टीं कळल्या त्यांविषयी आपल्याला सांगणे आणि त्या दाखवणे लहान मुलांना फार आवडते, आणि आपण स्वतः देवाच्या वचनाच्या प्रकाशात आणि त्याच्या विश्वासूपणा विषयी आपणजे शिकलो ते त्यांना सांगू शकतो. ही मुले स्वतः आजी/आजोबा होत नाहीत तोपर्यंत देवाच्या आशिर्वादासह ह्या गोष्टीं सदैव त्यांच्या सोबत राहोत, आणि त्याच्या आशीर्वादाने, ते त्या गोष्टीं त्यांच्या स्वतःच्या नातवंडांना सांगतील असे होवो.

पवित्र शास्त्राच्या दीर्घ पल्ल्याच्या आकलनाचा दृष्टिकोन आपण आजी/आजोबांनी आपल्या नातवंडांवर भक्कमपणे बिंबवला पाहिजे. बायबलमध्ये याकोब त्याच्या नातवंडांना, एफ्राईम आणि मनश्शे, आशीर्वाद देत असल्याचे एक मनोहर दृश्य दिलेले आहे (उत्पत्ती ४७:९-२२). योसेफाने त्याच्या स्वतःच्या मुलांवर एका धार्मिक आजोबाचा आशीर्वाद किती प्रेमळपणे मागितला ते पहा. याकोबाने ज्या रीतींनी त्याचा आशीर्वाद व्यक्त केला त्यांचा ठसा एफ्राईम आणि मनश्शेवर आणि त्यांच्या वंशावळीत निश्चितपणे दिसून आला असेल. आजी/आजोबांनी आईबापांहून अधिक संख्येने जीवनातील उंच सखल भाग (दऱ्या खोरी) पार केलेले असतात, आणि प्रभूच्या विश्वासूपणाचा त्यांचा अनुभव एका अधिक लांब पल्ल्याच्या द्रूष्टीकोनाला उत्तेजन, आव्हान, आणि चालना देऊ शकतो.

आजी/आजोबा भूमिका पार पाडण्यातील आपल्या उणिवांवर प्रभू मात करो आणि विश्वासूपणे आणि फलद्रूप होऊन ही आजीआजोबांची भूमिका पारपाडण्यासाठी आम्हाला त्याची कृपा
आम्हाला पुरवो.

डॉ. जोएल बीके
डॉ. जोएल बीके

जोएल रॉबर्ट बीके (जन्म कलामाझू, मिशिगन येथे, डिसेंबर 9, 1952) एक अमेरिकन सुधारित पाद्री आणि धर्मशास्त्रज्ञ आहे. ते ग्रँड रॅपिड्स, मिशिगनमधील हेरिटेज रिफॉर्म्ड मंडळीचे मंत्री आहेत आणि प्युरिटन रिफॉर्म्ड थिओलॉजिकल सेमिनरीचे अध्यक्ष आहेत, जिथे ते सिस्टेमॅटिक थिओलॉजी आणि होमलेटिक्सचे प्राध्यापक देखील आहेत.