जेव्हा आपण म्हणतो की आमचे तारण देवाच्या कृपेतून येते, तेव्हा आपल्याला हे म्हणायचे असते की आपले तारण देवामध्ये असलेल्या काही चांगुलपणातून सुरु होते, आमच्यात असलेल्या काही चांगुलपणातून ते सुरु होते आणि आम्हाला तारण-पात्र बनवते म्हणून नव्हे. जर आपण पतन पावलेल्या पाप्यांचा वंश आहोत, तर आम्हाला तारकाची गरज आहे, जो येऊन आम्ही स्वतः जे करू शकत नाही ते तो करू शकेल असा तारक. अपराधी पापी लोक एखाद्या न्यायालयात स्वतःला “निर्दोषी” जाहीर करून मग त्यांनी स्वतःला “निर्दोष ” ठरवले ह्या कारणाने सर्व आरोपांतून मुक्त झाल्यासारखे न्यायालय सोडून निघून जाऊ शकत नाहीत. एक ज्युरी (न्यायालयातील पंच गण) आणि एक न्यायाधीश ह्यांनी प्रथम एक निकाल दिला पाहिजे. आदामाचे वंशज म्हणून, तो निकाल आधीच आला आहे — आरोपाच्या सर्व मुद्द्यांवर आपण दोषी आहोत. जर आपल्याला तारावे अशी देवाची इच्छा असेल तर मग आपल्याकडे एक तारक असलाच पाहिजे. आणि ह्या तारकाने आपल्याला अशा रीतीने तारले पाहिजे की देवाच्या पवित्र न्यायाच्या मागण्या पूर्ण होतील. आणि तरीही पाप्यांवर असलेली देवाची अमर्याद प्रीती त्यातून दाखवली गेली पाहिजे.
“जे लोक येशूवर भरवसा ठेवतात ते देवाकडून, देवापासून वाचवले जातात. ख्रिस्ताच्या आज्ञापालनात देव आपल्याला परिपूर्ण नीतिमत्व पुरवतो, आणि त्याच्या मरणात देव आपल्याला सर्व पापाबद्दल एकदाचेच (अखेरचे) बलिदान पुरवतो. दुसरा कोणताही तारक नाहीच . केवळ ख्रिस्त “
माझ्यापेक्षा एका अधिक सुज्ञ व्यक्तीने एकदा म्हटले होते तसे, “कृपेला एक चेहरा असतो.” देवाची कृपा येशू ख्रिस्त ही व्यक्ती आणि त्याचे कार्य ह्यातून प्रकट झाली आहे. आकाशाखालील प्रत्येक वंश आणि भाषा बोलणाऱ्या, आदामाच्या पतन पावलेल्या वंशातील अफाट जनसमूहाला तारण्याची देवाची इच्छा होती म्हणून देवाने येशू ख्रिस्ताला (पवित्र त्रैक्यातील दुसरी व्यक्ती) एक खरेखुरे मानवी रूप धारण करून व चमत्कारपूर्ण रीतीने पवित्र आत्म्याद्वारे गर्भधारणेतून आणि एका कुमारिकेच्या उदरी जन्म घेऊन पृथ्वीवर पाठवले. पहिला आदाम जे करण्यात अपयशी झाला होता ते करण्यासाठी येशू आला. देवाच्या सर्व आज्ञांचे पालन करून, पापविरहित राहण्यासाठी, कोणीतरी यायलाच हवे होते. आपल्या पापांविरुद्ध असलेला देवाचा क्रोध आणि संताप बाजूला सारण्यासाठी जो आत्मबलिदान पुरवतो तो येशू आहे.
ह्याच कारणामुळे, येशू हा खराखुरा मनुष्य आणि तरीही तो ‘पापविरहीत जन्मलेला मनुष्य आहे. ह्याच कारणामुळे आपल्या संपूर्ण जीवन काळात येशूने स्वतःला नम्र केले आणि आम्हामध्ये राहून दुःख सहन केले, आणि विचारांनी, शब्दांनी, आणि कृतींनी देवाच्या सर्व आज्ञांचे पूर्णपणे पालन केले. आणि म्हणूनच, येशू त्याच्या शिष्यांना सांगत राहिला की त्याला यरुशलेमला जाऊन, तेथे दुःखसहन करून मेलेच पाहिजे — ज्या गोष्टीपासून येशूला परावृत्त करण्याचा प्रयत्न त्याचे शिष्य करत राहिले होते.
पण उत्तम शुक्रवारच्या दिवशी, रोमी लोकांच्या हातांनी येशू शेवटी मरण पावलाच, आणि ते का घडले ते तंतोतंत नेमकेपणाने बायबल सांगते. जेव्हा येशू क्रुसावर मेला तेव्हा त्याच्या स्वतःच्या देहात तो आमच्या पापांवर असलेला देवाचा क्रोध वाहून नेत होता. त्याचे शेवटचे शब्द, “पूर्ण झाले आहे” हे दाखवतात की येशू त्याच्या लोकांसाठी, न्यायाच्या दिवशी त्यांना तारण्यासाठी तो मेला, त्या मरणावर जे सर्व भरवसा ठेवतात त्यांच्यासाठी, तो मरण पावला. मनुष्यांच्या पुत्रांनी देवाचे पुत्र आणि कन्या बनावे यासाठी देवाचा पुत्र मनुष्याचा एक पुत्र बनला हे खरेच नवलांचे नवल आहे.
पण एक मेलेला तारक हा तारक नसतो. तो केवळ एक दावेदार असतो. म्हणून तिसऱ्या दिवशी, ईस्टर रविवारी, देवाने येशूला मेलेल्यातून जिवंत करून उठवले. देवाचा हेतू — आपल्या पापाच्या दोषाबद्दल किंमत भरून देवाच्या पवित्र न्यायाचे समाधान होणे — येशूच्या बलिदानाने साध्य झाला एवढाच ह्याचा अर्थ होत नाही, तर त्या रिकाम्या कबरेचा असाही अर्थ होतो की देवाने मरणावर आणि कबरेवर विजय मिळवला आणि आदामाच्या पापी आज्ञाभंगाचे परिणाम नष्ट केले.
येशू मेला आणि पुन्हा जिवंत होऊन उठला, त्याप्रमाणेच, शेवटच्या दिवशी जे देवाचे लोक न्यायाच्या दिवशी वाचवले जातील आणि सदासर्वकाळ जिवंत राहण्यासाठी अमर असे उठवले जातील त्यांना तेच अभिवचन देण्यात आले आहे. जेव्हा प्रोटेस्टंट लोक केवळ ख्रिस्त (सोलस ख्रिस्टस) हे ठाम विधान करतात, तेव्हा आपण हे ठामपणे म्हणतो की एखाद्या पाप्याच्या तारणासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट येशू ख्रिस्ताने पूर्णपणे करून ठेवली आहे. जे लोक येशूवर भरवसा ठेवतात ते देवाकडून, देवापासून वाचवले जातात. ख्रिस्ताच्या आज्ञापालनात देव आपल्याला परिपूर्ण नीतिमत्व पुरवतो, आणि त्याच्या मरणात देव आपल्याला सर्व पापाबद्दल एकदाचेच (अखेरचे) बलिदान पुरवतो. दुसरा कोणताही तारक नाहीच . केवळ ख्रिस्त (सोलस ख्रिस्टस !)
Used with permission from www.monergism.com