योहान लिहितो, “पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे. (१ योहान १:३). इतर विश्वासणाऱ्यांशी सहभागीता ही एक सुसंधी आणि एक महत्वपूर्ण जबाबदारी आहे. त्याच्याविना, आपले जीवन निःसंशय फार एकाकी आणि तापदायक बनेल. आम्ही पापात पडल्याने आमची देवाबरोबरची सहभागीता आणि इतरांबरोबरची धार्मिक सहभागिता आम्हाला विलग केल्याने खंडित झाली आहे ;देवाच्या कृपेचे कार्य आमच्या हृदयात होण्याअगोदर , आमची सहभागीत तर “आपण “अंधाराच्या निष्फळ कर्मांचे भागीदार होतो.” (इफिस ५:११). पण जर सार्वभौम दयेने,देवाने तुम्हाला त्याच्या पुत्रात कलम करून जोडले असेल तर, तुम्ही देवाशी आणि देवाद्वारे इतरांशी सहभागीतेचा आनंद उपभोगायला सुरुवात केली आहे.
विश्वासणाऱ्यांना पवित्र शास्त्र वारंवार सहभागीतेबाबत उत्तेजन देते आणि आज्ञा करते. ह्यावरून आपण हे शिकू शकतो की सांत्वन देणाऱ्या कृपेसाठी आणि विश्वासाच्या वाढीसाठी जे सहभागीतेत श्रम घेतले जातात देव त्याला मोठी किंमत देतो. विश्वासणाऱ्यांनी एकमेकांबरोबर सहभागितेचा आनंद कसा अनुभवावा ह्याविषयी बायबल पुढे दिलेले काही व्यवहार्य मार्ग सुचवते त्यांवर मनन करा:
१. एकमेकांसोबत एकत्र सहभागीता घेतल्याने .
ख्रिस्ती लोक ज्या रीतींनी सहभागितेचा आनंद लुटू शकतात त्यातील हा प्रमुख मार्ग आहे. एकमेकांना भेटण्याचे एकत्र येणे थांबवू नका असा इशारा देवाला द्यावा लागतो हा विचार आपल्याला विनम्र बनवतो. (इब्री १०:२५). जर भविष्यकाळात ख्रिस्ती लोकांना सामूहिक उपासनेपासून दीर्घ काळ वंचित केले जात असेल, तर ते एक अति कडीन बाब बनू शकते. जेव्हा दावीद प्रभूच्या मंदीराकडे तो कसा जाऊ शकत असे हे आठवत होता तेव्हा त्याचे अंतःकरण दुःखाने कसे भरून जाई ह्याचा विचार करा. (स्तोत्र ४२:४).
२. एकमेकांबाबत एक अभिजात सद्भावना बाळगणारी मानसिकता जोपासणे आणि दर्शवणे. जेव्हा आपण अभिमानी आणि आत्मकेंद्री असतो तेव्हा आपण एकमेकांशी योग्य रीतीने सहभागीता ठेवू शकत नाही. आपण एकमेकांना नम्रता, सौम्यता आणि सहनशीलता दाखवली पाहिजे असे प्रभू आपल्याला सांगतो. (इफिस ४:१-३; ५:२१ ) हे अनेक वेळां आपल्या स्वभावाला न पटणारे असते, पण कृपाळू आत्मा सहभागितेला पोषक ठरतो.
३. एकमेकांशी पवित्र संभाषण करण्याने. पूर्वीच्या काळातील ख्रिस्ती लोक आजच्या कामात व्यस्त आणि संगणकाने व्यापलेल्या समाजापेक्षा ह्या बाबतीत अधिक चांगले होते असे दिसते. बणीयन यांनी लिहिलेली " यात्रेकरुचा प्रवास" ही कादंबरी ज्यात त्या ख्रिस्ती मनुष्याला स्वर्गीय नगराकडे जात असलेल्या सहप्रवाश्यांशी केलेल्या संभाषणाने खूप साहाय्य मिळाल्याचे अनेक प्रसंग दाखवते. अशी आत्मिकतेने भरलेली सहभागिता जे लोक जोपासतात त्यांना देव भरपूर आशीर्वाद देण्याचे अभिवचन देतो. (मलाखी ३:१६-१७).
४. एकमेकांसोबत गाणी गायल्याने. समविचारी आप्तजनांच्या सहभागितेला गाणी म्हटल्याने खूप साहाय्य होते. (कलसे ३:१६) . हे सामूहिक उपासना, कौटुंबिक उपासना, किंवा चक्क अनौपचारिक मेळाव्यात देखील होते.
५. अनीतिमानतेशी सहभागिता टाळण्याने. अधार्मिक लोकांशी सहभागिता ठेवल्याने, विश्वासणाऱ्यांतील सहभागितेला तुच्छ लेखिले जाते. विश्वासणाऱ्या लोकांना एखाद्या सरड्यासारखे भोवतालच्या लोकांप्रमाणे आपले रंग बदलणे परवडणारे नाही. अधार्मिकांशी सहभागिता न ठेवण्याबाबत बायबल विश्वासणाऱ्यांना धोक्याची पूर्वसूचना देते. (स्तोत्र १:१; इफिस ५:११; २ करिंथ ६:१-१७).
६. प्रभू भोजनाचा विधी साजरा करण्याने. प्रभू भोजनाने अनेक हेतू साध्य होतात. एक महत्वाचा उद्देश हा आहे की विश्वासणाऱ्या लोकात आत्म्याद्वारे बंधुप्रीतिने ऐक्य स्थापित होईल. (१ करिंथ १०:१७)
७. एकमेकांना उत्तेजन देण्याने आणि मदत करण्याने. कठीण अडचणी येतात ते समय आपण एकमेकांबरोबर सहभागिता राखण्यासाठी आलेली विशेष हाक समजली पाहिजे. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की जर ख्रिस्ताच्या शरारीराचा एक अवयव दुखावतो, तेव्हा इतर प्रत्येक अवयवाला ते दुःख जाणवले पाहिजे आणि त्याने त्याच्या क्षमतेनुसार मदत करण्यासाठी झटले पाहिजे (१ करिंथ १२:२६-२७; रोम १२:१५). काही वेळां उत्तेजनाचा एक शब्द किंवा सहानुभूती पुरेशी होईल. इतर वेळां, खरीखुरी मदत आणि साधन सामग्री पूरवण्याचा वाटा उचलणे ही सहभागितेची एक सुंदर दृश्य कृती असेल. (२ करिंथ ९:१२-१४).
८. एकमेकांकरिता प्रार्थना करण्याने. जेव्हा लोक प्रत्यक्ष एकत्र नसतात तेव्हा देखील लोक एकमेकांशी सहभागिता ठेवू शकतात का? पौलाने आपल्या पुष्कळ प्रवासांत आणि तो तुरुंगात असतांना देखील त्याने इतरांकरिता प्रार्थना आणि आभारप्रदर्शन करून सहभागितेचा लाभ घेतला. (२ करिंथ १:११; इफिस ६:१८). तशाच मनःप्रवृत्तीने, जे लोक छळ सोसत आहेत अशांची प्रार्थनेत आठवण ठेवून त्यांच्याशी सहभागिता वाढवायला ख्रिस्ती लोकांना सांगण्यात आले आहे. (इब्री १३:३).
तुम्ही ख्रिस्ताशी एक झाला आहात का? ख्रिस्ताशी एक झाल्याशिवाय तुम्ही ख्रिस्ताच्या लोकांपैकी कोणाशीही खरीखुरी सहभागिता राखण्यात आनंद घेऊ शकत नाही. जर तुम्ही देवाचे मूल आहात पण इतर विश्वासणाऱ्यांशी सहभागितेत शिथिल आहात, तर त्याचे कारण काय असेल ते तपासा. तुम्ही नम्र, सहनशील, आणि इतरांची सेवा करण्याची उत्कट इच्छा बाळगणारे आहात का? तुम्ही आत्मिक मैत्री जोपासता का? तुम्ही इतरांच्या भल्यासाठी आपला उपयोग व्हावा अशी इच्छा धरून कृपेची साधने प्रार्थनापूर्वक वापरता का? जेव्हा पुष्कळांची प्रीती थंड पडत चालली आहे अशा ह्या काळांत देवाशी आणि एकमेकांशी अधिक सखोल सहभागिता जोपासून तिचा आनंद अनुभवतील असे विश्वासणारे लोक देव वाढवो.