कुटुंब व्यवस्थेसाठी देवाच्या परिपूर्ण योजनेत पुरुष आणि स्त्रियांची उत्पत्ती आणि तसेच त्यांचे परस्परांशी संबंध कसे असावे ह्या गोष्टींचा समावेश आहे. आपण परिपूर्ण असे उत्पन्न केले गेले होतो; खेदाची गोष्ट की पापाने ते बदलून टाकले. पण देवाने त्याच्या दयेने, आपल्याला विवाह हे सुखलोकातील एक रत्न, बहाल केले. (उत्पत्ती २:१८-२५). वधुवर प्रीती करणे, तिचे पालन पोषण करणे, आणि ख्रिस्त चर्चसाठी करतो तसे स्वतःला तिच्याकरिता देऊन टाकणे हे जे पतीने केले पाहिजे असे सांगण्यात आले आहे, त्याला आपल्या पतीचा आदर करणे आणि त्याच्या आधीन असणे हे जे पत्नीला सांगण्यात आले याची पुरवणी जोडली आहे. एकत्रितपणे, ते एक संघ बनले आहेत. तो घराचा प्रमुख आहे, पुरवठा करणारा आणि सुरक्षित ठेवणारा (इफिस ५:२३). ती सोबत त्याच्या बाजूला आहे, घराच्या चाकाचा केंद्रबिंदू. या बाबतीत तपशील बदलतात, पण देवाची योजना शाश्वत, चिरंतन असते. तिला झिडकारण्यात आपल्याला धोका संभवतो, पण जेव्हा आपण ती योजना अनुसरतो तेव्हा आपण आशीर्वादित होऊ.
धार्मिक पत्नीच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित केल्यावर, पहिला आशीर्वाद तेव्हा येतो जेव्हा आपण समाधानीवृत्तीने ह्या योजनेच्या अधीन राहतो, देवाच्या सुज्ञतेवर दृढ विश्वास ठेवतो (नीती३:५-६), हे मानहानीकारक आहे असा जो ढोल स्त्रीवादी लोक बडवतात त्याविरुद्ध भक्कमपणे उभे राहतो, आणि त्याऐवजी देवाच्या इच्छेच्या मर्यादेत राहणे पसंत करतो, आणि आणखी अधिक आशीर्वादांची अपेक्षा करतो.
जेव्हा धार्मिक पत्नी देवावर सर्वाधिक प्रीती करते आणि त्याचे वचन तिच्या अंतःकरणावर लिहिलेले असते आणि तिच्या जीवनात ते दिसून येते तेव्हा ती आशीर्वादित होते. देवाबरोबर एकटीने वेळ घालवून आणि वाचनाने ती तिच्यामध्ये अजूनही जगत असलेल्या पापाशी लढते. (इफिस ६:१७-१८). तिचे चालणे आणि तिचे बोलणे डोंगरावरील प्रकाश आणि पृथ्वीच्या मिठासारखे आहे. त्याच्यासोबत चालण्याने तिच्या पतीशी सुसंवाद राखून चालणे तिला शक्य होते.
जेव्हा धार्मिक पत्नी तिच्या पतीशी एकनिष्ठ असते तेव्हा ती आशीर्वादित होते. ती तिच्या पतीला मनापासून तिचे प्रेम, ममता, वचनबद्धता,आणि विशेष लक्ष देते. (तीत २:४) पतीचे स्नायू सैल पडत असले, शरीराचा घेर वाढत असला, केस पांढरे होऊ लागले, त्यांचे जीवन कंटाळवाणे होत असले तरी ती कोणत्याही मोहाला बळी पडत नाही. ती एखादी नवी पाककृती शोधत नाही, पण तिच्याजवळ आधीच असलेल्या मिश्रणाच्या घटकांत चमचमीत मसाला घालून तिच्या पतीबरोबरच्या नातेसंबंधांत तिची ऊर्जा ओतले.
एक धार्मिक पत्नी होण्याची इच्छा धरणारी अविवाहित स्त्री : प्रार्थना कर आणि सुज्ञतेने निवड कर. कोणी तरी मूर्ख, स्वार्थी, रागीट, किंवा अपक्व अशा माणसाशी नव्हे तर ज्याच्याविषयी तू आदर बाळगू शकतेस त्याच्याशी विवाह कर. तुझ्या व्यक्तित्वातील सर्व गुणांसाठी तुझ्यावर जो प्रीती करतो अशा धार्मिक पुरुषाशी विवाह कर. स्पर्जनने आपल्याला सल्ला दिला की लग्नापूर्वी आपले डोळे सताड उघडे ठेवा, आणि लग्नानंतर अर्धे मिटलेले. म्हणून विवाहित स्त्रीने तिच्या पतीच्या उपयुक्त गुणविशेषांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्याचा चीड आणणारा विक्षिप्तपणा कमी करून त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. (नीती.१०:१२; १ पेत्र ४:८). इतरांनी आपणाविषयी असाच विचार ठेवावा असे तुम्हाला हवे आहे, नाही का?
तुमच्या पतीविषयी आदर बाळगा (इफिस ५:३३). पतीबद्दलचा तुमचा आदर तुमच्या हृदयात सुरु होतो आणि तुमच्या आवाजातील सूर, चेहेऱ्याचे भाव, ममता (किंवा तिचा अभाव), आणि शब्दांतून वाहून बाहेर पडतो. तुमच्याकडून त्याच्या कामाचे कौतुक आणि त्याच्या उपजत कलागुणांची प्रशंसा व्हावी अशी त्याची उत्कट इच्छा असते. तुम्ही त्याच्या कोपराच्या वर तुमचा हात घातला की स्वाभाविकपणे तो जसा आपले स्नायू ताणून दाखवतो, तसाच तो तुम्ही त्याच्या गुणविशेषांची स्तुती करता तेव्हा ते गुणविशेष ताणून दाखवतो.
त्याचा दिवस कसा गेला हे विचारून त्याच्या जगात शिरा. त्याच्याशी जोडलेले असे राहा. नैसर्गिक आणि आत्मिक गोष्टींबाबत तुमच्या हृदयातील अंतस्थविचार आणि भावना व्यक्त करा. प्रणयाराधन आणि सलगी सुरु ठेवा. एकमेकाच्या भेटीसाठी वेळ काढा. तुम्हाला शक्य असेल तितकी आपली प्रकृती ठणठणीत ठेवा आणि स्वतःला आकर्षक बनवा. आणि नेहमीच प्रेमळ, ममताळू राहा. तुमच्या विवाहाचे सुयोग्य पालनपोषण करून त्याचे जतन करा; ते मोलवान आहे.
जेव्हा धार्मिक पत्नी तिच्या पतीच्या अधीन असते तेव्हा देखील ती आशीर्वादित असते. (इफिस ५:२२, २४). पती आणि पत्नी संघाची तुलना एखाद्या सेवक नेतृत्व कॉर्पोरेशनच्या प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटशी केली जाऊ शकते. त्यासमान मूल्य असलेल्या व्यक्ती आहेत, आणि मुलें आणि कर्मचारी देखील तशीच आहेत, पण कोणी तरी प्रमुख असावाच लागतो. जी कुटुंबाच्या हितासाठी सर्व निर्णय घेतात ती पती आणि पत्नी सर्वोत्तम स्नेही असलेच पाहिजेत. जेव्हा ते सहमत होऊ शकत नाहीत तेव्हा पतीचा निर्णय अंतिम असतो. (इफिस ५:२३)
काही पुरुषांचा आदर करणे आणि त्यांच्या अधीन राहणे कठीण असते; त्यांच्या पत्नींना त्यांच्या वर्तणुकीहून अधिक उंच पातळीवर जाऊन देवाच्या आज्ञापालनाचा राज मार्ग घेण्याचे आव्हान स्वीकारावे लागते. (१ पेत्र ३:१-२). अशा पत्नीला घराच्या प्रवेशद्वारापाशी धूळ झटकण्यासाठी ठेवलेली चटई समजू नये, ती पाप करणे किंवा पाप मंजूर करणार नाही पण ती तिची कणखर प्रीती कार्यान्वित करू शकते. अविचल धैर्यासाठी प्रार्थना करण्याची तिला गरज भासेल. ती अशी आशा धरते आणि प्रार्थना करते की तिच्या उदाहरणाने तो (पती) पवित्र केला जाईल. (१ करिंथ ७:१०-१७).
जेव्हा धार्मिक पत्नी विवाहासाठी देवाची योजना अनुसरते, तेव्हा आशीर्वाद तिच्या मागोमाग येतील, आणि तिच्या भोवतालचे लोक देखील आशीर्वादित होतील.