आदरातिथ्य दाखवणे

उत्पत्ती १८मध्ये, अब्राहाम त्याच्या तंबूत बसलेला आहे आणि त्याला तीन अपरिचित माणसे येतांना दिसतात. त्यांना भेटायला तो धावत जातो, आणि जेवायला थांबा असे त्यांना म्हणतो. मग तो अन्न तयार करण्यासाठी घाईघाईने जातो आणि ते त्याची वाट पाहत थांबतात. शेवटी अब्राहामाला कळून येते की त्याचे पाहुणे खुद्द प्रभू आणि दोन देवदूत आहेत.इब्री १३:२ म्हणते, :अतिथीप्रेमाचा विसर पडू देऊ नका; कारण तेणेकरून कित्येकांनी देवदूतांचे आतिथ्य नकळत केले आहे.” उर्वरित पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे; अब्राहामाने येथे जे केले ते आपल्या स्वतःच्या अतिथी प्रेमाचरणासाठी एक उत्तम नमुना आहे.

पहिली गोष्ट, ख्रिस्ती आदरातिथ्य म्हणजे अपरिचित लोकांचे आपल्या घरांत स्वागत करणे, यासाठी की आपण त्यांची सेवा करू शकू, मग ते अविश्वासणारेअसोत की विश्वासणारेअसोत. मित्रमंडळी आणि कुटुंबांना घरात घेणे हे अतिथीप्रेम नाही —ती सहभागिता आहे, आणि अर्थातच तिने देखील आपल्या जीवनांत महत्वाची भूमिका पार पाडली पाहिजे.पण बायबलानुसार, अतिथीप्रेम म्हणजे अपरिचितांना प्रेमाने वागवणे; त्या शब्दाचा अर्थ आहे तो हा, आणि आपण संपूर्ण बायबलमध्ये देवाचे लोक जे करतांना पाहतो ते हेच. (उत्पत्ती १९:१-३; यहोशवा २:४; रूथ २:८-१०; शास्ते १९:२०; प्रेषित १६:१५, ३४ पहा). जेव्हा ते जेवायलाबसले तेव्हा अब्राहामाला ते लोक कोण होते हे माहित नव्हते. तुम्ही आत्ताच कोणाला तरी भेटलात किंवा तुम्ही एखाद्याला खरेच चांगले ओळखत नव्हता तरी तुम्ही त्याला तुमच्या घरात यायचे आमंत्रण दिले अशी शेवटची वेळ कोणती होती? तुम्ही अतिथीप्रेम दाखवले ती तीच शेवटची वेळ होती.

दुसरी गोष्ट, ख्रिस्ती अतिथीप्रेम त्याग भावनेतून येते. अब्राहाम वीस लिटर्सहून अधिक आटा एक अख्खेवासरू घालून ते जेवण तयार करतो —पुरातन काळातीलबाल्कन राष्ट्रें इत्यादी भागात हे मोलवान अन्न पदार्थ होते! जरी तो एक श्रीमंत मनुष्य होता, तरी ह्या अतिथीप्रेमासाठी त्याला बरीच किंमत मोजावी लागली होती. आपल्याला देखील अतिथीप्रेमाचा खर्च उचलावा लागेल, आपला वेळ, पैसे, प्रयत्न, किंवा इतर काही मार्गाने. देवाने दिलेली अतिथीप्रेम दाखवण्याची आज्ञा पाळण्यासाठी देव तरतूद करील असा दृढ विश्वास ठेवायला तुम्ही तयार आहात का?

तिसरी गोष्ट, ख्रिस्ती अतिथीप्रेम गैरसोयीचे असते. जरी आपल्याला एखादी पशू मारून, त्याला स्वच्छ करणे, आणि शिजवणे ह्या गोष्टी कराव्या लागणे संभवत नाही, तरी त्यात बरेच काम करावे लागते, आणि त्या कामात पती, पत्नी आणि मुलांनी हातभार लावायचा असतो. वेळापत्रक ठरवणे, योजना करणे आणि जेवण तयार करणे, संभाषण सुरु ठेवणे, भोजनपात्रें धुणे, आणि आपण इतरांवर प्रीती करत असतांना स्व ला मरणे ह्या गोष्टींचा बहुतेक वेळां अंतर्भाव होतो. अतिथीप्रेम सोयीस्कर नसते, पण देवाने आपल्याला करायला सांगितलेले असे ते काही तरी असते. जर ते असे आहे तर मग आपण ते अब्राहामासारखे स्वेच्छेने केले पाहिजे, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. आपण कुरकुर न करता आदरातिथ्य करू शकतो का (१ पेत्र ४:९)?

चौथी गोष्ट, ख्रिस्ती अतिथीप्रेम आशीर्वाद आणते. पवित्र शास्त्र आज्ञापालनाचा संबंध आत्मिक आशीर्वादाशी जोडते. हे जितके इतर बायबल आज्ञांच्या बाबतीत सत्य आहे तितकेच ते अतिथीप्रेमाच्या बाबतीत खरे आहे. ज्यांची सेवा करण्यात येते त्यांना ते आशीर्वाद देते, आणि जे सेवा करत आहेत त्यांना ते आशीर्वाद देते. इब्री १३:२ आपल्याला अब्राहामाच्या अनुभवाचे स्मरण करून देत आपण अतिथीप्रेम आचरणात आणावे यासाठी उत्तेजन देते; त्याने नकळत देवदूतांचे आदरातिथ्य केले! कॅल्व्हिन भाष्य करतो, “जर कोणी अशी हरकत घेतो की देवदूतांचे आदरातिथ्य करणे ही एक अपूर्व, वेगळी अशी घटना आहे, तर माझ्याकडे एक उत्तर तयार आहे, आणि ते हे की आपण केवळ देवदूतच नव्हे तर जेव्हा आपण त्याच्या नावात गरीब लोकांना अतिथीप्रेम देतो तेव्हा आपण खुद्द ख्रिस्ताचे आदरातिथ्य करतो. जर आपण ह्या बंधूंतील सर्वात कनिष्ठ बंधूंची सेवा करतो तर आपण त्याची (ख्रिस्ताची) सेवा केली आहे.” तुमच्या अनंतकालीन हितासाठी देव तुमच्या अतिथीप्रेमाला आशीर्वाद देईल असे तुम्हाला वाटते का?

देव त्याच्या लोकांपैकी काही लोकांनाच देतो अशी अतिथीप्रेम ही देणगी नाही. हे खरे आहे की एखाद्या वडिलाच्या स्वभावात आवश्यक म्हणून जोर दिलेला हा एक स्वभावगुण आहे (१ तिमथ्य ३:२; तीत १:८) पण, ही प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी एक आज्ञा देखील आहे —कोणी देणगी-प्राप्त आहे का, समाजातील त्याचे स्थान, आर्थिक विशेषाधिकार, किंवा मनोवृत्ती ह्या गोष्टीं विचारात न घेता सर्वांसाठी. रोम १२:१३ म्हणते “पवित्रजनांच्या गरजांभागवा. आतिथ्य करण्यात तत्पर असा.” जेव्हा हे देवावरील प्रितीने आणि आपल्या शेजाऱ्यावरील प्रितीने करण्यात येते तेव्हा देवाला हर्ष होतो आणि देव ते आशीर्वादित करतो. —आणि ते अपरिचित व्यक्तीला आशीर्वादित करील. अतिथी प्रेमाचे आचरण हा क्षमता विकसित करण्याचा व बायबलमधील आज्ञांचे कृतद्न्य पालन जोपासण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे

जर तुम्ही एक ख्रिस्ती व्यक्ती आहात, तर देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राच्या सुवार्तेद्वारे स्वागत करून कृपेने तुम्हाला त्याच्या स्वतःशी समेट झालेल्या सहभागितेत आणले आहे. जरी तुम्ही एक अपरिचित व्यक्ती आणि एक शत्रू होता, तरी तो त्याच्या स्वर्गीय घरात तुमचे स्वागत करील असा दिवस येत आहे. आज तुमच्या जीवनात तुम्हाला अपरिचित असलेल्या लोकांना ख्रिस्ताची प्रीती तुम्ही कशी दाखवू शकता?

डॉ. जोएल बीके
डॉ. जोएल बीके

जोएल रॉबर्ट बीके (जन्म कलामाझू, मिशिगन येथे, डिसेंबर 9, 1952) एक अमेरिकन सुधारित पाद्री आणि धर्मशास्त्रज्ञ आहे. ते ग्रँड रॅपिड्स, मिशिगनमधील हेरिटेज रिफॉर्म्ड मंडळीचे मंत्री आहेत आणि प्युरिटन रिफॉर्म्ड थिओलॉजिकल सेमिनरीचे अध्यक्ष आहेत, जिथे ते सिस्टेमॅटिक थिओलॉजी आणि होमलेटिक्सचे प्राध्यापक देखील आहेत.