निर्मितीपासून देवाबद्दल बरेच काही जाणून घेता येते. आम्हाला माहित आहे की देव सार्वकालिक, सर्वशक्तिमान आणि चांगला आहे (हा संदर्भ पाहा: रोम. १:२०). तरीही, निसर्गातून (सामान्य प्रकटीकरण) आपण देवाबद्दल जे काही शिकतो, ते नेहमीच मर्यादित स्वरुपात निर्माण केलेल्या गोष्टींद्वारे झालेले मर्यादित प्रकटीकरण असणार आहे. ह्याव्यतिरिक्त, मानवाच्या पापी स्वभावामुळे असे प्रकटीकरण अपरिहार्यपणे दूषित असणार आहे (रोम. १:२१-२५). म्हणून, पापी लोक निसर्गाद्वारे देवाबद्दल जे काही शिकतात ते पूर्णपणे विकृत केले जाते आणि विपरीतपणे, सर्व प्रकारच्या खोट्या धर्माचा आणि मूर्तिपूजेचा आधार बनते – रोम. १:१८-३२ मध्ये प्रेषित पौलाने विकसित केलेला प्रमुख विषय. जॉन कॅल्विनने पापी स्त्री-पुरुषांची मने “मूर्तीचे कारखाने” असतात (इन्स्टीट्युट, एल.११.८) असे म्हंटले ते अगदी बरोबर होते.
मानवाची पापी जिज्ञासा अनेकदा मर्यादित स्त्री-पुरुषांना देव खरा कसा आहे ह्या अपरिचित गोष्टीबद्दल अनुमान काढण्यास प्रवृत्त करत असल्याने, हे स्वतःला स्मरण करून देणे महत्त्वाचे आहे की देव येशू ख्रिस्ताच्या व्यक्ती आणि कार्याद्वारे त्याच्या शब्दात (म्हणजे पवित्र शास्त्रात) स्वतःला प्रकट करण्याची कृपा करतो. देवाच्या वचनात, आपल्याला देवाचे अनेक दैवी “गुण” (किंवा परिपूर्णता) आढळतात. म्हणून, देवाच्या अपरिचित व्यक्तीमत्वाबद्दल अनुमान करण्याऐवजी, आम्ही देवाची उपासना आणि सेवा केली पाहिजे जो त्याच्या वचनाद्वारे स्वतःला प्रकट करतो.
ह्यापैकी काही दैवी परिपूर्णता केवळ देवामध्येच आढळतात आणि आपण देवाच्या प्रतिमेत निर्माण केलेले असल्यामुळे इतर काही दैवी परिपूर्णता मनुष्यामध्ये देखील आढळतात ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी ख्रिस्ती ईश्वरविज्ञानशास्त्रज्ञांनी फार वर्षे संघर्ष केला आहे.
अगोदर उल्लेख केलेले गुणधर्म हे केवळ देवामध्ये आढळणारे “असंक्रामक” गुणधर्म म्हणून ओळखले जातात कारण हे विशिष्ट गुणधर्म देव त्याच्या मर्यादित प्राणीमात्रांना देऊ शकत नाही. नंतर उल्लेख केलेले गुणधर्म “संक्रामक” गुणधर्म म्हणून ओळखले जातात कारण हे गुणधर्म प्रत्यक्षात मानवाला दिले जाऊ शकतात, तरी केवळ मानवाला देवाच्या प्रतीरुपात निर्माण केलेले असल्यामुळेच, परंतु निर्मितीच्या मर्यादांमुळे मर्यादित प्रमाणात दिले जातात. आपल्याला जेव्हा हे दैवी गुणधर्म मिळतात, तेव्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की ह्या अशा परिपूर्णता आहेत ज्या केवळ देवाकडेच आहेत आणि त्या आपल्याला देवाच्या दैवी अस्तित्वाबद्दल खूप काही प्रकट करतात.
आपण जेव्हा देवाच्या अगम्य गुणधर्मांबद्दल बोलतो तेव्हा देवाच्या साधेपणासारख्या गोष्टींचे विचार आपल्या मनात येऊ शकतात (देव हा अमर्यादित आत्मा आहे आणि तो वेगवेगळ्या भागांची बेरीज नाही – हा संदर्भ पाहा: योहान ४:२४). देव “साधा” (भागांनी बनलेले नाही तर एक साधे अस्तित्व) असल्यामुळे त्याचे गुणधर्म त्याच्या अस्तित्वाप्रमाणेच आहेत असे म्हणता येईल. देव स्वयं-अस्तित्व देखील आहे (एसीयटी म्हणजे स्वयं-उत्पन्न होण्याची गुणवत्ता किंवा स्थिती). तो कोणत्याही अर्थाने त्याच्या अस्तित्वासाठी, त्याच्या गौरवासाठी किंवा त्याच्या उद्देशांसाठी इतर कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नाही. आपण देवाला “सार्वकालिक” असेही म्हणू शकतो. तोच केवळ आरंभ किंवा अंत नसलेला आहे. देव आता आहे, देव नेहमी होता, देव सदैव राहील.
ह्या गुणधर्मांपैकी अनेकांबद्दल ख्रिस्ती लोक “प्रतिवादात्मक किंवा नकारात्मक” दृष्टीकोनातून बोलतात. म्हणजेच, देवाविषयी खरोखर काही जाणून घेण्यासाठी त्याच्या स्वतःला प्रकट करण्यावर अवलंबून असल्यामुळे, एक अमर्यादित आणि सार्वकालिक देव खरोखर कसा “आहे” हे सांगण्यासाठी संघर्ष करण्यापेक्षा, देव कसा “नाही” हे सांगणे आपल्यासाठी खूप सोपे (आणि सुरक्षित) आहे. कारण हे असे गुणधर्म आहेत ज्यांच्याशी प्रत्येक ख्रिस्ती मनुष्य परिचित आहे.
देव “अमर” आहे असे म्हटले जाते कारण तो आपल्यासारखा “नश्वर” नाही. देव सार्वकालिक आहे हे सांगण्याचा हा दुसरा मार्ग आहे. तो आपल्याप्रमाणे जगत नाही किंवा मरत नाही – तो स्वतःच जीवन आहे. देव “अदृश्य” आहे असे देखील आपण म्हणू शकतो कारण तो (आपल्यापेक्षा भिन्न) शुद्ध आत्मा आहे आणि मानवी डोळ्यांना दिसत नाही. पण ह्याचा अर्थ असाही होतो की देव सर्व सृष्टी त्याच्या परिपूर्णतेने भरतो. आपण देवाला त्याच्या व्यक्तित्वानुसार किंवा उद्देशांनुसार “अपरिवर्तनीय” असेही म्हणता येईल कारण तो कधीही बदलत नाही. तसेच आपण देवाला “अगम्य” असेही म्हणू शकतो. जरी देवत्वातील व्यक्तींवर त्याच्या प्राणीमात्रांच्या कृतींचा परिणाम होत असला, तरी त्याच्या प्राणीमात्रांप्र्माणे त्याने निर्माण केलेल्या जगापासून तो स्वतंत्र आहे आणि त्याचे दैवी व्यक्तित्व दुःखसहन किंवा उत्कट भावना ह्यासारख्या बाह्य प्रभावांच्या अधीन नाही. उदाहरणार्थ, आपल्याला हे माहित आहे की देव आपल्यावर प्रीती करतो कारण त्याचा पुत्र येशू ह्याने आपल्या पापांसाठी दु:ख भोगले आणि आपला प्राण अर्पण केला (१ योहान ४:१०).
तथाकथित संक्रामक गुणधर्मांचा उल्लेख करणे देखील महत्त्वाचे आहे. ह्या परिपूर्णतेमध्ये अशा गुणधर्मांचा समावेश आहे ज्याची सुरुवात “ओम्नी” म्हणजे “सगळीकडे” किंवा “सर्वात जास्त” किंवा “सर्वतोपरी” ह्या उपसर्गाने होते जेणेकरुन देवाच्या संपूर्ण परिपूर्ण गुणधर्मांच्या तुलनेत आपण प्राणीमात्र ह्या नात्याने आपल्याकडे किती प्रमाणात हे गुणधर्म आहेत ह्यातील फरक आपल्या लक्षात यावा. ह्यात “सर्वज्ञ”, “सर्वसमर्थ”, “सार्वभौम” तसेच ज्याला ओम्नी हा उपसर्ग लावलेला नाही अशा इतर गुणधर्मात चांगुलपणा, प्रीती, दया, पवित्रता, नीतिमत्व, आणि इर्षा ह्या गुणधर्मांचा समावेश आहे.
आपले ज्ञान मर्यादित आणि तुटपुंजे असल्यामुळे (कारण आपण मर्यादित आणि सीमित प्राणी आहोत), देव सर्वज्ञ आहे – तो सर्व काही जाणतो. जरी आपण मानवी सामर्थ आणि स्वातंत्र्य उपभोगतो तरी, केवळ देवच सर्वशक्तिमान आहे आणि म्हणूनच सर्व गोष्टींवर सार्वभौम आहे. आपण जरी काळ आणि जागा दोन्ही व्यापत असलो तरी, देव अंतरिक्षातील आणि पार्थिव अशा सर्व मर्यादा ओलांडतो. तो एकटाच सर्वव्यापी आहे. स्त्री-पुरुष देवाच्या प्रतिमेत उत्पन्न केलेले असल्यामुळे चांगुलपणा, प्रेम, दया इ. दाखवू शकतात, परंतु ज्याप्रमाणे हे गुणधर्म देवामध्ये अमर्याद आणि अगणित प्रमाणात दिसून येतात, तसे ते तितक्या प्रमाणात आपल्यामध्ये दिसून येत नाहीत.
देवाने आपल्या वचनात स्वतःला अशा प्रकारे प्रकट केले असल्याने, आपण ह्या दैवी परिपूर्णतेचे अनुमान लावण्याचा प्रयत्न करू नये किंवा जेव्हा ते आपल्या मानवी मर्यादा उघड करते तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नये. ह्या उलट, आपण अशा अद्भुत परिपूर्णतेद्वारे स्वतःला प्रकट करणार्या देवाची उपासना आणि आराधना केली पाहिजे.
Used with permission from www.monergism.com