वैवाहिक जीवनाची रहस्ये

संपूर्ण पवित्र शास्त्रात विवाहाला एक अनन्यसाधारण स्थान दिले गेले आहे: ख्रिस्ताच्या दोन प्रतिमा वाहकांना एकत्र जोडणारे, तसेच यहोवा आणि इस्रायल ह्यांच्यातील आणि त्यानंतर ख्रिस्त आणि मंडळी ह्यांच्यातील नातेसंबंध समजून घेण्यासाठी असलेली मुख्य संकल्पना म्हणून काम करणारे आणि परिणामी प्रत्येक विवाहित जोडप्याला शुभवर्तमानाप्रमाणे जीवन जगण्याची संधी देणारे असे आणखी दुसरे काय आहे? देव विवाहाद्वारे स्वतःला प्रदर्शित करतो, ह्याचा अर्थ देव विवाहाद्वारे त्याचे वैभव प्रकट करतो. म्हणून ह्या (विषयावर विचार करत असताना आपण हे सिद्ध करणार आहोत की) निबंधाचा प्रबंध असा आहे की विवाह हा देवाच्या गौरवाचे एक अद्वितीय प्रदर्शन म्हणून अस्तित्वात आहे. हे सिद्ध करण्यासाठी आणि स्पष्ट करण्यासाठी आपण अगोदर विवाहामध्ये दोन व्यक्ती देवाच्या प्रतिमेत एकत्र कशा जोडल्या जातात ते पाहणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या भागात विवाहाकडे यहोवाचा इस्राएलशी असलेला नातेसंबंध ह्या दुष्टीकोनातून कसे पाहिले जाते ह्याचा आपण शोध घेणार आहोत आणि ह्या निबंधाच्या तीसऱ्या भागात ख्रिस्त आणि मंडळीमधील नातेसंबंध प्रदर्शित करण्यासाठी विवाह कसा अस्तित्त्वात आहे ह्याचे आपण परीक्षण करणार आहोत. शेवटच्या भागात विवाह हे शुभवर्तमानाचे लघुपट कसे आहेत हे आम्ही पाहणार आहोत.
ह्या विषयातील चार भागांमधून वाहणारा प्रवाह एकच आहे: सर्व उर्जा देवाचे वैभव प्रकट करण्याच्या हेतूद्वारे प्राप्त होते. देवाचे गुणधर्म त्याच्या प्रतिमा वाहकांद्वारे प्रदर्शित केले जातात आणि जेव्हा दोघे एक होतात तेव्हा ते अधिक चांगल्याप्रकारे दिसून येतात. देवाचे गुणधर्म इस्राएलसोबतच्या त्याच्या नातेसंबंधातून दिसून येतात, ज्याद्वारे तो स्वत:ला न्यायी आणि दयाळू, एका बहकलेल्या पत्नीसाठी एक विश्वासू पती असल्याचे दाखवून देतो. आणि जेव्हा ख्रिस्ताने स्वतः मंडळीशी विवाह केला आणि तिला स्वतःपुढे निष्कलंक वधू असे सादर करण्यासाठी वधस्तंभावर आपला प्राण अर्पण केला तेव्हा त्यातून देवाचे गुणधर्म प्रदर्शित केले गेले. ती वधू एके दिवशी स्वर्गातून खाली येईल, आणि कोकरा तेज पसरवणारा, त्याच्या प्रियजनांना प्रकाश देणारा दिवा असेल.
आदाम आणि हव्वा: दोघे एक होतात. देवाने विश्व एक असे क्षेत्र म्हणून निर्माण केले ज्यामध्ये त्याला त्याच्या प्रतिमा धरकांसोबत संवाद साधता येईल. जगाची एका अंतरिक्षीय मंदिराच्या रूपात ह्या अर्थाने रचना करण्यात आली की विश्व हे देवाला ओळखण्याचे, त्याची उपासना करण्याचे आणि त्याची सेवा करण्याचे स्थान बनावे. असे अनेक संकेत मिळतात की निवासमंडप आणि मंदिर हे विश्वाचे प्रतिकात्मक सूक्ष्म जग होते आणि पवित्र शास्त्रातील अनेक विधानेही हेच सूचित करतात. उदाहरणार्थ, परमपवित्र स्थानातील कराराच्या कोशाला देवाचे “पादासन” असे संबोधले जाते (१ इतिहास २८:२; स्तोत्र. ९९:५; १३२:७). ही प्रतिमा असे सूचित करते की परमपवित्रस्थान हे देवाच्या राजासनाचा एक भाग आहे. ह्याचा अर्थ असा की जेव्हा परमेश्वर यशयाद्वारे घोषित करतो की, आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे, (यशया ६६:१) ह्यावरून पृथ्वी ही परमेश्वराचे अंतरिक्षीय मंदिर अशी चित्रित केल्याचे दिसून येते. तेव्हा असे दिसून येते की जेव्हा त्याने जग निर्माण केले तेव्हा परमेश्वराने एक अंतरिक्षीय मंदिर बांधले ज्यामध्ये त्याने त्याची प्रतिमा आणि प्रतिरूप ठेवले. हा पुढचा मुद्दा इतका मूलभूत आहे की तो आपल्या नजरेतून सुटू शकतो, परंतु त्यावर भर देणे आवश्यक आहे: परमेश्वराची प्रतिमा आणि प्रतिरूप हे परमेश्वराचे गौरव प्रकट करतात. दुसऱ्या कोणत्या देवाने आपला महिमा प्रकट करण्यासाठी रंगमंच म्हणून विश्वाची निर्मिती केली आहे?
इतर कोणत्या देवाने त्याचे प्रतिनिधित्व करतील, त्याच्या व्यक्तित्वाच्या पैलूंना मूर्त स्वरूप देतील अशा मानवांची निर्मिती केली आहे? इतर कोणत्याही देवाने आपण ज्या जगात राहतो तसे जग, किंवा आपल्यासारखे मानवतर तर निर्माण केलेलेच नाहीत, पण इतर कोणत्याही देवाने काहीही निर्माण केलेले नाही. देवाच्या प्रतिमेत आणि प्रतिरूपात मानवाची निर्मिती करण्याचे हे कौशल्य, ज्ञान, सामर्थ्य, अभियांत्रिकी क्षमता आणि भौतिक प्रभुत्व ह्यांचे आश्चर्यकारक प्रदर्शन आहे. देवाच्या सर्जनशील महिम्याचे एक उदाहरण घ्यायचे झाले तर दुसरा कोणता असा पदार्थ हाडासारखा लवचिक आणि हलका आहे, जो मोडला तरी पुन्हा जोडता येतो? आणि हाडे केवळ मानवांनाच असतात असे नाही.
मनुष्यप्राण्यांच्या बाबतीत कोणती गोष्ट गौरवशाली आहे? ते देवाची प्रतिमा आणि प्रतिरूप आहेत ह्याचा काय अर्थ होतो? पीटर जेन्ट्री ह्यांनी असा युक्तिवाद केला आहे की प्रतिमा आणि प्रतिरूपाचा संबंध उपासना आणि नातेसंबंधाशी आहे – देवाच्या उपासनेशी आणि इतर मानवांशी आणि सर्व निर्मितीशी असलेल्या संबंधाशी. मानुषप्राणी देवाची उपासना करण्याच्या त्याच्या क्षमतेमध्ये अद्वितीय आहे: इतर कोणत्या प्रजाती त्यांच्या निर्माणकर्त्याची स्तुती गाण्यासाठी संगीत वाद्ये, मधुर सूर आणि लयबद्ध कविता निर्माण करतात? तसेच मनुष्य इतर मानवांशी संबंध ठेवण्याच्या क्षमतेमध्ये देखील अद्वितीय आहे: इतर कोणत्या प्रजातींमध्ये विवाहाचा संस्कारविधी आहे? मनुष्य बुद्धिमत्ता, अध्यात्म, संवेदनशीलता आणि नैतिकता ह्या सर्व मार्गांनी देवाचा महिमा प्रदर्शित करतो, विशेषत: जेव्हा तो देवाची उपासना करतो आणि इतर मानवांशी सहभागीता करतो. तथापि, विवाह हे देवाच्या गौरवाचे एक वेगळेच प्रदर्शन आहे.
देवाने मनुष्याला एदेन बागेत काम करण्यासाठी आणि तिची निगा राखण्यासाठी ठेवले (उत्पत्ति २:१५); त्यानंतर त्याने स्त्रीला पुरुषाला मदतनीस म्हणून स्त्रीची निर्मिती केली (२:१८). जसे विवाहाच्यावेळी बाप आपल्या मुलीला मंदिराच्या प्रवेशमार्गाने वराकडे घेऊन जातो, तसे स्वत: परमेश्वरानेच स्त्रीला पुरुषाकडे आणले (२:२२), त्यानंतर मनुष्याने काव्यमयरीतीने स्त्रीशी एकता आणि तिच्यावरचा अधिकार प्रकट केला:
आता ही मात्र माझ्या हाडांतले हाड व मांसातले मांस आहे; हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनवली आहे.” (२:२३) पुरुष आणि स्त्री एकाच पदार्थापासून बनलेले आहेत आणि अशा प्रकारे देवासमोर समान आहेत ह्यावर भर देऊन ऐक्याचे विधान पहिल्या ओळीत केले आहे. जसे अगोदर देवाने जाहीर केले होते की प्रकाशाला दिवस म्हटले जाईल तसे दुसऱ्या ओळीत जेव्हा पुरुष स्त्रीला काय म्हटले जाईल, हे जाहीर करतो तेव्हा त्याठिकाणी अधिकाराचे विधान येते. (उत्पत्ति १:५). नंतर – पाप घडण्यपूर्वी, शाप मिळण्यापूर्वी, एदेन बागेतील देवाच्या उपस्थितीतून बाहेर काढून टाकण्यापूर्वी – बागेत एक सुसंवादीत ऐक्य होते जे निरनिराळ्या भूमिकांमधून कार्यरत होते: पुरुष बागेत काम करत होता आणि तिची निगा राखत होता, आणि स्त्री त्याला मदत करत होती. ह्या भूमिकांची अधिकतर एका विशिष्ट अधिकाराच्या श्रेणीत रचना केली होती. देवाच्या निर्मितीला नावे देण्यासाठी इतकेच नव्हे तर जी स्त्री देवाच्या प्रतिमेत आणि पुरुषाला मदतनीस म्हणून निर्माण केली होती तिला देखील नाव देण्यासाठी पुरुष देवाच्या जागी कार्यरत होता.
त्यानंतर उत्पत्तीचा निवेदक त्याने चित्रित केलेल्या काळाच्या सुरवातीपासून अस्तित्वात असलेले दृश्यातून एक निष्कर्ष काढतो: “ह्यास्तव पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील. आदाम व त्याची स्त्री ही दोघे नग्न होती; तरी त्यांना संकोच वाटत नसे.” (उत्पत्ति २:२४-२५). ह्या निष्कर्षावरून आदाम आणि हव्वा ह्यांच्यात काय घडले याबद्दलची निवेदकाची समज आणि ह्या घटनेचा इतरांवर परिणाम होतो हे निवेदकाच्या मनात असल्याचे आपल्याला दिसून येते. परमेश्वराने पुरुष निर्माण केला, स्त्री निर्माण केली, नंतर स्त्रीला पुरुषाकडे आणले, म्हणून पुरुषाने स्वतःला त्याच्या पालकांपासून वेगळे करावे, आपल्या पत्नीशी जडून राहावे आणि त्या दोघांनी एक व्हावे. उत्पत्ति २:२४ ह्या गोष्टीवर भर देते की, काळाच्या सुरवातीपासून अस्तित्वात असलेला हा नमुना, स्त्री आणि पुरुष ह्यांच्यात काय घडले पाहिजे ह्याचे उदाहरण आहे.
वैवाहिक जीवनात दोन व्यक्ती एकदेह होतात. संपूर्ण पवित्र शास्त्रसंबंधीच्या ईश्वरविज्ञानशास्त्राच्या स्तरावर, मनुष्य देवाच्या प्रतिमेचा आहे ह्या गोष्टीकडे पाहण्याचा हा आणखी एक मार्ग म्हणून त्याकडे पाहिले जाऊ शकते. विवाहाने एक झालेले दोघेजण देवत्वाच्या तीन व्यक्ती मुलतत्व, सामर्थ्य, वैभव आणि प्रत्येक परिपूर्णतेमध्ये समान आहेत ह्याचे एक ज्वलंत चित्र आपल्या डोळ्यापुढे उभे करतात. देवाने त्याच्या शब्दाने जग निर्माण केले आणि त्याच्या शब्दाच्या त्याच क्रियाशील सामर्थ्याने, देव घोषित करतो की जेव्हा एक स्त्री आणि पुरुष विवाहाच्या पवित्र करारात एकमेकांशी बांधले जातात तेव्हा ते दोघे एकदेह होतील.
भाषिक स्तरावर पाहता, “एक” (dj;a,) हीच हिब्रू संज्ञा “एक देह” होण्याच्या घोषणेमध्ये पुन्हा पुढील शेमामध्ये दिसून येते, “हे इस्राएला, श्रवण कर; आपला देव परमेश्वर हा अनन्य (एकच) परमेश्वर आहे.” (अनुवाद ६:४). ह्यावरून आपल्या लक्षात येते की “एक” ह्या शब्दाच्या अर्थातून एकात्मता वगळलेली नाही. देव एक त्रैक्य म्हणून अस्तित्वात आहे, एक देव जो तीन व्यक्ती आहे आणि जेव्हा देवाचे दोन प्रतिमा वाहक—एक पुरुष आणि एक स्त्री— विवाहाच्या पवित्र करारात एकदेह होण्यासाठी एकरूप होतात, तेव्हा ह्या अलौकिक तथ्याला एक महान मूर्त स्वरूप दिले जाते. विवाह देवाचे गौरव प्रकट करतो.
देवाने स्त्री आणि पुरुष ह्यांच्यावर पृथ्वी व्यापून टाकण्याचे आणि तिच्यावर सत्ता चालवण्याचे काम सोपवले (उत्पत्ति १:२८). त्यांना एदेन बागेच्या सीमांचा विस्तार करायचा होता जेणेकरून समुद्राच्या पाण्याप्रमाणे कोरड्या भूमीवर परमेश्वराचे तेज व्यापून जाईल. ( हा संदर्भ देखील पाहा: गणना १४:२१). हव्वेचे मोहात पडणे आणि आदामाचे पुरेसा विचार न करता पापात बुडणे ह्यामुळे देवाच्या सुंदर निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय निर्माण झाला. देवाने वचन दिले होते की अवज्ञा केल्यास मृत्यूची शिक्षा दिली जाईल (उत्पत्ति २:१७). पण सर्पाला दिलेल्या शापात, देवाने घोषित केले की स्त्रीची संतती सर्पाचे डोके फोडेल (उत्पत्ति ३:१५) सर्पाला दिलेली ही शिक्षा जेव्हा आदमाने ऐकली तेव्हा त्याला समजले की स्त्रीला संतती होईल, ह्याचा अर्थ त्यांना संतती होण्यासाठी ते जिवंत राहतील. अशाप्रकारे, जेव्हा त्याने आपल्या पत्नीचे नाव “हव्वा, कारण ती सर्व सजीवांची जननी होती” असे ठेवले (उत्पत्ति ३:२०), तेव्हा त्याने विश्वासाची कृती केली. आदामाने देवाच्या वचनावर म्हणजे जन्म देणार्‍या वंशजाच्या अभिवचनावर विश्वास ठेवला.
देवाने सर्पाला शाप दिला, परंतु पुरुष आणि स्त्रीला शाप देण्याऐवजी देवाने त्यांच्या भूमिका अधिक कठीण केल्या. पुरुषाला मदत करण्याची आणि पृथ्वी व्यापून टाकण्यासाठी त्याच्याबरोबर सामील होण्याची स्त्रीची भूमिका आता अधिक कठीण होणार होती कारण तिला बाळंतपणात वेदना होणार होत्या आणि काइनाला पापाने ज्या प्रकारे नियंत्रित केले त्याप्रमाणे पुरुषावर अधिकार चालवण्याची तिच्यात इच्छा निर्माण होणार होती, आणि ज्या पद्धतीने काईनाला पापावर सत्ता गाजवण्यास सांगण्यात आले होते त्याचप्रमाणे पुरुष तिच्यावर सत्ता गाजवणार होता. (हा संदर्भ देखील पाहा: उत्पत्ती ३:१६ आणि ४:७).
एदेन बागेतून बहिष्कृत केल्यामुळे, आदाम आणि हव्वेला ह्यापुढे त्या बागेच्या सीमा सगळीकडे वाढवण्याची संधी मिळाली नाही. उत्पत्ति १२:१-३ मध्ये अब्राहामाला परमेश्वराने दिलेल्या अभिवचनांद्वारे त्याने असे घोषित केले की तो अब्राहाम आणि त्याच्या संततीद्वारे उत्पत्ति ३:१४-१९ ह्या वचनातील शापांवर मात करेल. अब्राहमाची संतती केवळ शाप मागे घेणार नाही, तर गीतरत्न ७:१० मध्ये वर्णन केलेल्या सर्वात उदात्त प्रीतीप्रमाणे तो विवाहात सुसंवाद निर्माण करेल. (हा संदर्भ देखील पाहा: उत्पत्ती ३:१६). अशा प्रकारे परमेश्वराने अब्राहामाच्या कुटुंबाशी नातेसंबंध प्रस्थापित केला ज्याद्वारे त्याने कोरडी भूमी त्याच्या वैभवाने झाकण्याच्या कार्याची सुरवात केली. त्यानंतर सीनाय पर्वतावर मोशेच्या कराराच्या शुभारंभाच्या उल्लेखनीय घडामोडीद्वारे, परमेश्वराने इस्राएलशी विवाह केला.
परमेश्वर आणि इस्राएल: मोडलेला आणि पाळलेला करार
परमेश्वर आणि इस्राएल यांच्यातील कराराकडे विवाह ह्या दृष्टीकोनातून पाहण्याचे जुन्या करारातील सर्वात चांगले उदाहरण बहुतेक होशेच्या पुस्तकात आढळून येते. इस्राएल आणि परमेश्वर ह्यांच्यातील कराराच्या मानवी नातेसंबंधातील सर्वात जवळचे साम्य इस्त्राएली लोक त्यांच्या कराराच्या प्रभूबरोबर जे अगम्य घट्ट वैयक्तिक संबंध अनुभवणार होते त्यातून दिसून येते. त्यांनी केलेल्या विश्वासघाताच्या आणि मूर्तिपूजेकडे वळण्याच्या कृतीमुळे बसलेल्या धक्क्याला ते भावनिक ताण देखील देते.
संदेष्टा होशे परमेश्वराने आपल्या लोकांवर ज्या प्रकारे प्रीती केली त्याचे जिवंत उदाहरण बनला आणि हे परमेश्वराच्या प्रेरणेने घडले. होशेचे पुस्तक आपल्याला असे शिकवते की विवाह हा देव आणि त्याचे लोक ह्यांच्यातील नातेसंबंधाचे एक चित्र आहे आणि ह्या चित्रात स्त्री आणि पुरुष दोघांच्याही योगदानाचे महत्त्व काय आहे ते ते समजावून सांगते. होशेच्या बाबतीत, गोमरसोबतचा त्याचा वैयक्तिक इतिहास, इस्राएलसोबत परमेश्वराचा इतिहास लघुरूपात सादर करतो. होशेय १-३ मध्ये हे दोन्ही विषय एकत्र गुंफलेले असल्यामुळे, होशेयला इस्राएलचा इतिहास काय होता आणि इस्राएलच्या बाबतीत पुढे काय घडणार आहे हे गोमरसोबतच्या त्याच्या स्वतःच्या अनुभवांवरून लक्षात येते. जसजसे आपण पुढे जाऊ, तसतसे आपल्याला होशेय १ मधील होशेयचा गोमर सोबतचा वैयक्तिक अनुभव होशेय २ मध्ये इस्राएलच्या इतिहासाला आणि भवितव्याला लागू केल्याचे दिसून येईल; त्यानंतर होशेय ३ मध्ये थोड्या विश्रांतीनंतर त्याला पुन्हा अनुभव येतो आणि तो इस्राएलच्या भविष्याला लागू केला जातो.
होशेय १: होशेय आणि गोमर
परमेश्वराने होशेला “परमेश्वराचा त्याग करणे हे घोर जारकर्म हा देश करत असल्याकारणाने, एक जारिणी बायको करून घेण्याची आणि जारकर्माची मुले जन्माला घालण्याची सूचना केली.” (होशेय १:२). तेव्हा होशेयने गोमरसोबत विवाह केला (१:३-४), आणि परमेश्वराने तिच्या मुलामुलींची नावे इज्रेल (१:३-४), लो-रुहामा (दया न पावलेली: १:६-७) आणि लो-अम्मी (माझे लोक नव्हत: १:८-९) अशी ठेवण्यास सांगितले. माझे लोक नव्हत असे नाव दिल्यावरून परमेश्वराने ही गोष्ट स्पष्ट केली की, “तुम्ही माझे लोक नाही आणि मी तुमचा देव नाही.”
पाऊस, धान्य आणि नवा द्राक्षारस पुरवण्यासाठी बालांवर अवलंबून राहून राष्ट्राने परमेश्वराचा त्याग केल्यामुळे हे न्यायनिवाडे जाहीर करण्यात आले. परमेश्वराने ह्याला आध्यात्मिक व्यभिचार असे मानले, आणि होशेय विश्वासघातामुळे झालेल्या भावनिक विनाशाच्या हृदयद्रावक वस्तुस्थितीत जीवन जगला.
होशेयने गोमरसोबत विवाह केल्यामुळे त्याच्या मित्र आणि शेजाऱ्यांसोबतच्या त्याच्या प्रतिष्ठेवर जसा वाईट परिणाम झाला असेल तसाच वाईट परिणाम परमेश्वराने इस्राएलसारख्या अप्रभावी राष्ट्राशी विवाह केल्याला लागू होतो. जेव्हा राष्ट्र अविश्वासू ठरते तेव्हा ते वाईट परिणाम अधिक वाढतात. होशेयने जेव्हा असा विवाह केला तेव्हा त्याच्या निर्णयावर गंभीर प्रश्न तर विचारले गेलेच असतील शिवाय त्याने त्याच्या मुलांची अशी विचित्र नावे ठेवल्याने त्याचा हा गुन्हा अधिक गंभीर झाला असेल. पहिल्या जन्मलेल्या मुलाचे इज्रेल. हे विचित्र नाव होते, दुसऱ्या मुलीचे नाव धक्का देणारे होते, दया न पावलेली आणि माझे लोक नव्हत हे तिसर्‍या मुलाचे नाव प्रामुख्याने असे घोषित करत होते की, गोमर होशेयशी विश्वासू नव्हती.
ह्या नाट्यमय दाखल्यातील पात्रे ओळखणे कठीण नाही: होशेय परमेश्वराचे प्रतिनिधित्व करतो. गोमर इस्राएल राष्ट्राचे प्रतिनिधित्व करते आणि गोमेरच्या पोटी जन्मलेली मुले इस्राएल लोक आणि देव त्यांच्यावर आणणार असणाऱ्या न्यायाकडे निर्देश करतात.
इज्रेल ह्या नावाबद्दल आपण काहीही म्हणत असलो तरी (होशेय १:४; तसेच १ राजे २१ आणि २ राजे ९-१०), आपण ह्या गोष्टीची पुष्टी करू शकतो की इस्राएलच्या इतिहासात तेथे जे काही घडले ते जसे पाणी संपूर्ण समुद्र व्यापून टाकते तसे कोरड्या भूमीवर परमेश्वराचे गौरव पसरवण्यासाठी ज्या राष्ट्राला पाचारण करण्यात आले होते त्याच्याकडून जी अपेक्षा होती त्याच्याशी अजिबात सुसंगत नव्हते. दया न पावलेली हे नाव देवाची सहनशीलता संपल्याचे घोषित करते, आणि माझे लोक नव्हत ह्याचा अर्थ देखील तोच होतो. परमेश्वराने इस्राएल लोकांना नाकारले आहे. ह्या सर्व घटनांची माहिती निर्गमच्या पुस्तकातून राजांच्या द्वारे इस्राएलच्या इतिहासातून अवगत केली आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या, होशेयने ख्रिस्तपूर्व ७२१ साली इस्राएलच्या उत्तरेकडील राज्याचा अश्शूर लोकांकडून पाडाव होण्यापूर्वी ही भविष्यवाणी केली होती (१:१, ६-७). जरी त्याने यहूदावर दया होईल असे अभिवचन दिले होते (१:७), तरी दक्षिणेकडील राज्याने त्यांच्या उत्तरेकडील वंशजांना परमेश्वराने केलेल्या शासनावरून धडा घेतला नाही. यहूदाने केलेल्या व्यभिचाराला शेवटी इस्राएलाप्रमाणेच फळ मिळाले.
परमेश्वराची दया जरी संपुष्टात आली आणि इस्राएल लोकांना नाकारले गेले, तरीही परमेश्वराने इस्राएलसाठी न्यायानंतर एक आशा जाहीर केली. येणाऱ्‍या बंदिवासाच्या न्यायाद्वारे, इस्राएलला त्याच्या भूमीवर पुन्हा एकवट केले जाईल, त्याच्यावर दया केली जाईल, त्यांना “जिवंत देवाची मुले” म्हणून मान्यता दिली जाईल आणि त्यांना “इज्रेलचा दिवस महान होईल” असे प्रोत्साहन दिले जाईल (१:१०-२:१).
होशेय २: इस्रायलचा इतिहास आणि भविष्य
इस्राएलच्या मूर्तिपूजेने परमेश्वर आणि इस्राएल ह्यांचा विवाह संपुष्टात आणल्यामुळे, राष्ट्राने कराराशी केलेला विश्वासघात हा होशेय २ चा प्रमुख विषय आहे. होशेय २:२ मध्ये परमेश्वराने इस्राएलची निंदा केली:
तुम्ही आपल्या आईची चांगली कानउघाडणी करा, तिचे कान चांगले उघडा –
कारण ती माझी पत्नी नव्हे,
व मी तिचा पती नव्हे –
ती आपले शिंदळचाळे आपल्या मुखावरून,
व्यभिचाराचे प्रकार आपल्या स्तनांवरून दूर करो.

राष्ट्र इतर देवांवर अवलंबून राहिल्याने हे विधान त्या कृतीला “वेश्याव्यवसाय” आणि “व्यभिचार” मानते. राष्ट्राने आध्यात्मिकरित्या परमेश्वरासोबत केलेला करार ज्या प्रकारे मोडला आहे त्याचे हे प्रतीकात्मक वर्णन आहे. होशेय २ मध्ये आम्हाला दोन प्रकारच्या परस्परव्याप्त करणाऱ्या प्रतिमासृष्टी दिसून येतात. एकीकडे इस्त्राएलच्या व्यभिचाराची प्रतिमासृष्टी आहे, तिच्या प्रियकरांसोबत, तिची अश्लीलता आणि तिची बेकायदेशीर मुले आहेत तर दुसरीकडे, मोडलेल्या कराराच्या परिणामातून निर्माण होणारी बंदीवासाची प्रतिमासृष्टी आहे. होशेय २:३ मध्ये दोन्ही प्रकारच्या प्रतिमासृष्टी दाखवल्या आहेत जेव्हा परमेश्वर चेतावणी देतो की इस्राएलच्या व्यभिचाराच्या प्रत्युत्तरात तो “तिला वस्त्ररहित करेन.” इस्राएलला जिचा सार्वजनिकरित्या अपमान केला जाईल अशी एक निंदनीय पत्नी अशा रीतीने चित्रित करण्यात आलेले असतानाच, जेव्हा बंदिवासाचे दृश्य समोर येते तेव्हा व्यभिचारी पत्नीची लाज ह्या शब्दांद्वारे उघड केली जाते:
तिला वैराणासारखी करीन,
तिला निर्जल भूमीसारखी ठेवीन,
वेश्येला वस्त्ररहित केले जाईल आणि लाजिरवाणे केले जाईल, ह्याचा अर्थ असा आहे की आक्रमण करणार्‍या सैन्याने हे राष्ट्र उद्ध्वस्त केले जाईल, परिणामी लागवड केलेल्या शहरांचा नाश केला जाईल आणि ती उजाड राने बनतील कारण तेथील रहिवासी एकतर मारले गेले आहेत किंवा त्यांना बंदिवान करून नेण्यात आले आहे.
परमेश्वर स्वतः इस्राएलचा वेश्याव्यवसाय करण्याचा प्रयत्न हाणून पाडेल (होशेय २:४-६), परिणामी ते त्याच्याकडे परत येतील (२:७). इस्राएलला वाटते की तिच्या “प्रियकरांनी” – परदेशी दैवतांनी पाऊस पाडल्यामुळे धान्य, द्राक्षवेली आणि जैतुनाचे वृक्ष वाढले आहेत, परंतु प्रत्यक्षात देवाने त्यांना दिलेल्या भेटवस्तू त्यांनी बआलमूर्तीच्या उपासनेसाठी वापरल्या आहेत (२:८). परमेश्वराने ह्या व्यभिचारी कृत्यांसाठी इस्राएलला बंदिवासात पाठवण्याचे वचन दिले (२:९-१३), परंतु तो क्रोधीत झालेला असताना त्याला दया आठवली.
परमेश्वराने इस्राएलला “मोह” घालून वनात आणण्याची आणि “तिच्याशी प्रेमळपणे बोलण्याची” शपथ घेतली (२:१४). होशेय २:१५ मध्ये अखानाच्या पापाने चिन्हांकित केलेल्या भूमीत म्हणजे अखोरच्या खिंडीत इस्राएलच्या प्रवेशाचे वर्णन केले आहे, त्यावरून एक नवीन भूमी पादाक्रांत केल्याचे सूचित होते. (हा संदर्भ देखील पाहा: यहोशवा ७:२५-२६). “ती आपल्या तारुण्याच्या दिवसांतल्याप्रमाणे, ती मिसर देशातून निघून आली त्या दिवसांतल्याप्रमाणे, माझे बोलणे त्या ठिकाणी ऐकेल.” असे ह्या वचनात पुढे म्हटले असल्याने त्या प्रस्तावाला आणखी बळकटी मिळते (२:१५). होशेय २:१५ मधील दोन विधाने – पहिले, अखोरची खिंड ही “आशेचा दरवाजा” आहे आणि दुसरे, आणि इस्राएल लोक जेव्हा मिसर देशातून बाहेर पडले तेव्हा त्यांनी ज्या प्रकारे उत्तर दिले त्याची आठवण करून देणे – ह्या दोन्ही गोष्टी असे गृहीत धरतात की इस्राएल लोक बंदिवासात जातील आणि पुन्हा त्यांच्या देशात परत येतील. त्यांनी पूर्वी जसा त्या देशात प्रवेश केला तसाच ते पुन्हा प्रेवेश करतील आणि पूर्वी जसा त्यांनी परमेश्वराला प्रतिसाद दिला होता, तसाच प्रतिसाद ते पुन्हा देतील.
परमेश्वराला दिलेला हा प्रतिसाद सीनाय पर्वतावर इस्राएलने परमेश्वराच्या अटी ज्या पद्धतीने आनंदाने मान्य केल्या त्याची आठवण करून देतो, आणि तेथे इस्राएलने दिलेले उत्तर परमेश्वराशी इस्त्राएलच्या विवाहाला संमती असल्याचे दर्शवते. होशेय २:१६ मधील “त्या दिवशी असे होईल की तू मला ‘इशी’ (माझा पती) म्हणशील, ह्यापुढे कधी मला ‘बआली’ (माझा धनी) म्हणणार नाहीस, असे परमेश्वर म्हणतो.” ह्या वचनाने हा दृष्टिकोन अधिक दृढ होतो. ते जेव्हा मिसर देशातून बाहेर पडले तेव्हा त्यांनी जे उत्तर दिले (२:१५), ते म्हणजे, परमेश्वर त्यांचा पती असेल.
परमेश्वर त्याच्या वधूला मूर्तिपूजेपासून शुद्ध करण्याचे (होशेय २:१७), पशू, पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांपासून तिचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि आपल्या प्रियजनांसाठी सुरक्षित जागा तयार करत असताना तो युद्धाची शास्त्रसामुग्री नष्ट करेल. (२:१८). त्यानंतर होशेय २:१९-२० मध्ये परमेश्वर त्याच्या लोकांना स्वतःशी जोडण्याचा त्याचा उद्देश घोषित करतो: “मी तुला सर्वकाळासाठी आपली वाग्दत्त असे करीन, नीतीने व न्यायाने, व ममतेने व दयेने मी तुला आपली वाग्दत्त असे करीन. मी तुला निष्ठापूर्वक वाग्दत्त करीन व तू परमेश्वराला ओळखशील.” इस्राएलसोबत हा नवा करार करण्याच्या परमेश्वराने इस्राएलला दिलेल्या अभिवचनाची सुरवात ह्या खातरीने होते की हे वाग्दान सार्वकालिक असेल आणि त्याचा शेवट तो विश्वसनीय असेल ह्या खातरीने होतो. सार्वकालिक विश्वसनीयतेच्या ह्या वचनाच्या दोन्ही टोकांच्यामध्ये अशी खातरी देण्यात आली की हे वाग्दान पवित्रतेच्या दोन अटींसह (“नीतिमत्त्व आणि न्याय”) आणि दयाळूपणाच्या दोन अटींसह (“निरंतर प्रीती आणि दया”) परमेश्वराचा कठोरपणा आणि त्याचा दयाळूपणा प्रकट करेल. इस्राएल परमेश्वराला “ ओळखेल” हे शेवटचे विधान दोघे एक देह होतील अशी आत्मीयता प्रतिध्वनित करते, पण ते असेही म्हणते की इस्राएल परमेश्वराला त्याची निरंतर प्रीती आणि दया, दोषारोप काढून टाकण्यास त्याने दिलेला नकार आणि त्याची सदासर्वकाळची विश्वसनीयता ह्यावरून ओळखेल (हा संदर्भ देखील पाहा: निर्गम ३४:६-७).
हेच परमेश्वराचे गुण आहेत जे इस्राएलशी झालेल्या त्याच्या विवाहादरम्यान प्रदर्शित झाले आहेत. त्याने न्याय, सत्य आणि नीतीमत्तेचे समर्थन केले आहे आणि त्यामुळे इस्राएल आता त्याची पत्नी राहिली नाही असे म्हणण्यास तो तयार झाला आहे. जेव्हा वेश्याव्यवसाय करणाऱ्या पत्नीला ती ज्या प्रियकरांच्या नादी लागली ते वस्त्रहीन करतात, तेव्हा अशा प्रकारे बंदिवासाच्या स्वरूपात परमेश्वर न्याय करतो. आणि बंदिवासातून एक नवीन निर्गमन प्रस्थापित करण्यासाठी, एक नवी भूमी काबीज करण्यासाठी आणि परमेश्वर आणि इस्राएल ह्यांच्यामध्ये विवाहाचा एक नवा करार करण्यासाठी तो इस्राएलला बंदिवासातून परत आणण्याचे अभिवचन देतो.
परमेश्वराच्या इस्राएलशी असलेल्या नातेसंबंधासाठी विवाहाशिवाय कदाचित दुसरे कोणतेही रूपक विश्वासघातातील वेदना आणि क्षमेतील आश्चर्य प्रकट करू शकत नाही. जेव्हा व्यभिचार होतो, न्याय होतो आणि पुन्हा दया आणि क्षमा केली जाते तेव्हा विश्वासघात आणि क्षमा इतर कोणत्या मार्मिक मार्गाने प्रदर्शित केली जाऊ शकते?
होशेय ३: होशेय आणि इस्राएलचे भविष्य
विवाह हा देवाच्या गौरवासाठी अस्तित्वात आहे आणि जेव्हा होशेयने गोमरशी विवाह केला तेव्हा हे सत्य प्रदर्शित केले गेले. गोमरच्या व्यभिचाराच्या परिणामांमुळे होशेयला तिला परत विकत घेणे आवश्यक होते, जे त्याने केले (होशेय ३:१-३), आणि ह्या कृतीची तुलना परमेश्वर इस्राएलच्या बाबतीत जे काही करेल त्याच्याशी केली आहे (३:४).
खरोखर, ह्यामुळे इस्राएलला पश्चात्ताप होईल. परमेश्वराच्या गौरवासाठी न्यायाद्वारे इस्राएलचे तारण होईल; “नंतर इस्राएल लोक परततील आणि आपला देव परमेश्वर आणि आपला राजा दावीद ह्यांना शरण येतील; ते कालांतीत भीतीने कंपित होऊन परमेश्वराचा व त्याच्या चांगुलपणाचा आश्रय करतील.” (३:५). इस्राएलचे पुढील दिवसांत होणार असलेल्या उद्धारामध्ये एका नव्या तारणाचा समावेश असेल, जसे होशेने गोमरला परत विकत घेतले (३:२); एक नवे निर्गमन, जशी इस्राएलची संतती पुन्हा “देशातून निघून येतील” (१:११; तसेच निर्गम १:१० देखील पाहा); एक नवा प्रदेश काबीज करणे, जशी अखोरची खिंड आशेचे द्वार बनते (होशेय २:१५); एक नवा करार, जसा परमेश्वराने न्याय आणि दयेने सार्वकालिक विश्वसनीयतेसह त्याच्या लोकांशी वाङनिश्चय करतो (२:१९-२०) आणि इस्राएलचे लोक पश्चात्ताप करतात आणि त्यांच्या नव्या दावीदाला शरण जातात (3:5). परमेश्वर त्याच्या व्यभिचारी पत्नीला शिस्त लावण्यासाठी बंदीवासात पाठवतो, पण एका वैवाहिक आत्मीयतेचा अधिक आणि सखोल अनुभव घेण्यासाठी तो तिला परत आणील.
जेव्हा येशू येतो तेव्हा ही अभिवचने अनपेक्षितपणे पूर्ण होतात. वैवाहिक जीवनात परमेश्वराचे वैभव अनन्यसाधारणपणे कसे प्रदर्शित केले जाते ह्याचे सखोल विश्लेषण करण्यासाठी आम्ही नव्या कराराकडे वळणार आहोत.
येशू आणि ख्रिस्ती मंडळी: विवाह आणि शुभवर्तमान
पवित्र शास्त्रसंबंधीच्या ईश्वरविज्ञानशास्त्राच्या व्यापक संदर्भात विवाह म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी, आपण जुन्या कराराच्या अपेक्षेची पूर्तता म्हणून नवा करार येशूला कसे सादर करतो ह्यावर थोडक्यात विचार केला करणार आहोत. हा व्यापक संदर्भ आपल्या विचारांच्या वातावरणाच्या दाबाचे नियमन करेल जेणेकरून जेव्हा आपण विवाहाच्या अर्थाविषयी पौलाने केलेल्या टिप्पण्यांचा विचार करू तेव्हा आपल्याला अचानक खूप खोलात शिरल्याने चक्कर येणार नाही.
जुन्या कराराच्या अपेक्षांची पूर्तता
येशू स्वतःला वर म्हणवत आला हे खरोखर मनोरंजक आहे (मत्तय ९:१५). येशू आणि नव्या कराराच्या लेखकांनी त्याच्या मृत्यूकडे बंदीवासाची परिपूर्ती ह्या दृष्टीकोनातून पाहिले असे दिसते – तो क्षण जेव्हा मंदिर मोडून टाकले जाईल (योहान २:१९). त्याच बरोबर, येशू मरण पावला म्हणून त्याने “निर्गमन” (लूक ९:३१) पूर्ण केले आणि पौल असे म्हणू शकतो की “आपला वल्हांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त त्याचे आपल्यासाठी अर्पण झाले.” (१ करिंथ. ५:७). येशूमध्ये बंदीवास पूर्ण होतो, नवी निर्गमन पहाट होते आणि बंदीवासातून परतणे सुरू होते. मोशेप्रमाणे, येशूने डोंगरावर चढून देवाकडून मिळालेली शिकवण लोकांना दिली (मत्तय ५-७). यहोशवाप्रमाणेच, येशूनेही भूमीच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू केली. (उदा. मत्तय ८-१०) आणि हे काम पूर्ण करण्यासाठी एके दिवशी तो परत येईल. (प्रकटी. २१-२२).
जुन्या करारातील संदेष्ट्यांच्या आशेची पूर्तता होण्यासाठी, नव्या कराराचे लेखक येशूमध्ये जे घडले ते बंदीवासाची पूर्णता, बंदीवासातून परत येण्याची सुरुवात आणि नवे निर्गमन, नवा करार आणि नवा दावीद – म्हणजे येशू जो त्याच्या लोकांना नवे आकाश आणि नव्या पृथ्वीवर वसती करण्यासाठी नेणार आहे ह्या सर्व गोष्टींमध्ये ती पूर्तता असल्याचे सादर करतात. ह्या सर्व गोष्टींचा कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीने शेवट होईल. (प्रकटी. १९:९), जेव्हा येशू त्याच्या रक्ताने विकत घेतलेल्या वधूसोबत त्याचे नातेसंबंध पूर्ण करेल.
विवाहाचा खोल अर्थ:
पौल मंडळीमधील आत्म्याने भरलेल्या नातेसंबंधांवर विचार करत असताना (इफिस. ५:१८), तो वैवाहिक जीवनातील पती-पत्नीमधील नातेसंबंधाच्या संदर्भात कुटुंबाविषयी चर्चेला सरुवात करतो (इफिस. ५:२१-३३). त्यानंतर तो पालक आणि मुले (६:१-४) आणि गुलाम आणि मालक (६:५-९) ह्यांच्याबद्दल चर्चा करतो.
ख्रिस्त आणि मंडळीमधील नातेसंबंधाच्या नमुन्याप्रमाणे पती-पत्नीने त्यांचे वर्तन कसे ठेवावे ह्याबद्दल चर्चा केल्यानंतर (इफिस. ५:२२-३०), पौल उत्पत्ति २:२४ (इफिस. ५:३१ मध्ये) ह्या वचनाचा संदर्भ देतो आणि नंतर इफिस ५:३२-३३ मध्ये विवाहाचा अर्थ सांगतो. इफिस. ५:३१-३३ मधील पौलाचा निष्कर्ष समजून घेण्यासाठी, आपण ५:२१-३० मध्ये त्याने केलेला युक्तिवाद समजून घेतला पाहिजे.
पौल या सूचनेने सुरुवात करतो की आत्म्याने भरल्यामुळे ” ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा” (व. २१) त्यानंतर तो हे स्पष्ट करतो की पत्नींनी त्यांच्या पतींच्या अधीन राहावे (वचने २२-२४), तर पतींना त्यांच्या पत्नीसाठी प्राण अर्पण करावा (वचने २५-३०).
इफिस. ५:२२-२४ मध्ये पौल स्त्रियांनी आपल्या पतींच्या अधीन कसे राहावे हे स्पष्ट करतो (व. २२), त्यांनी असे करण्याचे कारण (व. २३), आणि नंतर स्त्रियांनी अधीन कसे राहावे हे तो पुन्हा सांगतो (व. २४). स्त्रियांनी कशाप्रकारे अधीन राहावे ह्याविषयीचे पहिले विधान एक निश्चित विधान आहे जे इफिस. ५:२१ मधील शाब्दिक कल्पना पूर्णत्वास नेते, “ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन राहा आणि ह्यामध्ये पुढील शब्दांची भर घातल्याने ती कल्पना पूर्ण होते की, “स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा.” (व. २२). हे विधान “जसे” हा एक छोट्यासा शब्द वापरून केलेल्या अनेक तुलनांपैकी पहिली तुलना आमच्या पुढे सादर करते. ही तुलना असे दाखवून देते की जशी ती स्त्री परमेश्वराच्या अधीन राहते तसे तिने तिच्या पतीच्या अधीन राहिले पाहिजे.
ह्या पवित्र अधीनतेचे कारण इफिस ५:२३ मध्ये सांगितले आहे: “कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे.” हे कारण संपूर्ण शास्त्रभागामध्ये विकसित होणार असलेल्या तुलनांमध्ये भर घालते: ख्रिस्त मंडळीसाठी जसा आहे आणि तसा पती पत्नीसाठी आहे आणि हेच विधान उलट्या क्रमाने देखील खरे आहे. पती पत्नीचे मस्तक असण्याची तुलना येथे ख्रिस्त मंडळीचा प्रमुख असण्याशी करण्यात आली आहे आणि हे ख्रिस्तसदृश्य प्रमुखत्व व. ५:२२ मध्ये स्पष्ट केलेल्या अधीन होण्याच्या कल्पनेला आधार देते. पतींचे त्यांच्या पत्नींशी कोणत्या प्रकारचे संबंध अपेक्षित आहेत हे व. ५:२३ च्या शेवटच्या भागात स्पष्ट होते जेव्हा पौल म्हणतो की ख्रिस्त “शरीराचा (मंडळीचा) तारणारा” आहे. ख्रिस्ताने आपला प्राण अर्पण करून त्याच्या शरीराचे (मंडळीचे) तारण केले आणि पौल इफिस. ५:२५-३० मध्ये त्याचे तपशीलवार वर्णन करतो. इफिस. ५:२२ मध्ये तो कल्पना मांडतो आणि ५:२३ मध्ये त्याचे कारण देतो, पौल ५:२४ मध्ये तीच संकल्पना पुन्हा सांगतो: ” तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टींत आपापल्या पतीच्या अधीन असावे.” मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन आहे तसे पत्नीने आपल्या पतीच्या अधीन राहण्यामध्ये जवळजवळ तेच सर्व घटक सामावलेले आहेत. ही सर्वसमावेशकता विस्मयकारक आहे. पौलाने पत्नींकडून ह्या सर्वसमावेशक ख्रिस्तसदृश्य दृष्टीकोनाची मागणी करण्यामागचे कारण त्याचे पुढचे म्हणणे वाचल्यावर स्पष्ट होईल. ह्या टप्प्यावर आपण हे पाहू शकतो की ते कारण काहीही असो, ते ज्याची मागणी करते त्याला ते पात्र असणे आवश्यक आहे. म्हणजेच, जर मंडळी ख्रिस्ताच्या अधीन असल्याप्रमाणे पौल पत्नींना त्यांच्या स्वतःच्या पतींच्या अधीन होण्यास सांगत असेल, तर त्यामागे कोणतातरी मोठा धोका असला पाहिजे. पत्नी जशी ख्रिस्ताच्या अधीन आहे तसे तिने आपल्या पतीच्या अधीन राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे?
पौल जेव्हा तो करत असलेली तुलना तपशीलवारपणे स्पष्ट करतो आणि विवाहाचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ह्या प्रश्नाचे उत्तर मिळायला सुरवात होते. इफिस. ५:२५ मध्ये तो लिहितो, ” पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले, तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा.” जर पत्नीचे अधीन होण्याचे कर्तव्य सर्वसमावेशक असेल, तर पतीचे प्रेम करण्याचे कर्तव्य त्याने अंतःकरणपूर्वक पार पाडले पाहिजे. पत्नीने आपल्या पतीच्या अधीन राहण्यासाठी, तिच्या स्वातंत्र्यावर पाणी सोडणे आवश्यक आहे. पतीने आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करणे आवश्यक आहे. पत्नींना अशा अधीनतेत राहायला सांगण्यामागची आणि पतींना असा त्याग करण्यास सांगण्यामागची पौलाची कारणे येथे स्पष्ट होऊ लागतात. वैवाहिक जीवनात शुभवर्तमानाप्रमाणे जीवन जगण्यातील सुंदरता – आणि जेव्हा पती आपला प्राण अर्पण करतात आणि पत्नी त्यांच्या अधीन राहतात तेव्हा हेच घडते – म्हणजे जे पती-पत्नी असे जीवन जगतात त्यांच्या जीवनात शुभवर्तमानाचे लाभ दिसून येऊ लागतात. ख्रिस्ताच्या अधीन झाल्याने, मंडळीला आज्ञाधारकपणामध्ये स्वातंत्र्य मिळते, आणि पापाच्या जाचकपणापासून मुक्ती मिळते. राजा आणि प्रेमळ पती असा जो ख्रिस्त, त्याच्या आज्ञा एक व्यापक आणि सुरक्षित जागा बनतात, ज्यामध्ये जे लोक त्याचे राज्य स्वीकारतात ते मुक्तपणे आणि निर्भयपणे चालतात.
ख्रिस्ती धर्माच्या विश्वास आणि नैतिक आवश्यकतांचे वर्णन “खेळाच्या मैदानाच्या भिंती” असे करता येईल. काही मुले समुद्रातील एका डोंगरावर वसलेल्या बेटावरच्या गवताळ मैदानावर खेळत आहेत अशी आम्ही कलपना करूया. जोपर्यंत त्या मैदानाभोवती भिंत होती तोपर्यंत ती मुले कोणताही खेळ अगदी यथेच्छपणे खेळू शकत होती आणि नर्सरीच्या वर्गात जसा गोंगाट असतो तसा गोंगाट करू शकत होती. पण भिंती कोसळल्या, आणि त्यामुळे उंच कड्याचा धोका निर्माण झाला. ते त्या कड्यावरून खाली पडले नाहीत; पण जेव्हा त्यांचे मित्र त्यांच्याकडे परत आले तेव्हा ते सर्वजण बेटाच्या मध्यभागी घाबरून एकमेकांना मिठी मारून बसले. आणि त्यांचा आनंद संपुष्टात आला.
पौल असे शिकवतो की ज्याला आपला देहस्वभाव इच्छेविरुद्ध स्वातंत्र्याचा त्याग करणे असे समजतो त्या गैरसमजापासून स्त्रियांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. साहजिकच, स्त्रियांना त्यांचे पती असे काही करायला सांगत असतील ज्यामुळे देवाचा अनादर होईल, तर अशी पापी किंवा अयोग्य गोष्ट करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पतींच्या अधीन होऊ नये. तसेच ज्या स्त्रिया स्वतः विचार करत नाहीत किंवा स्वतःची कोणतीही इच्छा बाळगत नाहीत तर, आपली इच्छाशक्ती आणि बुद्धिमत्ता आपल्या पतींवर सोडून देतात अशा स्त्रियांचा देव सन्मान करत नाही. आणि अर्थातच पतीला ख्रिस्ताइतका अधिकार नाही. तरीही, स्वातंत्र्याच्या मार्गाची सुरवात पवित्र शास्त्रामधील अधीन राहण्याच्या बिंदूपासून होते आणि अधीनतेमुळे डोंगरामधून जाणाऱ्या त्या सरळ आणि अरुंद मार्गावरील भक्कम कुंपण टिकून राहते. पौल पतींना जे करायला सांगतो ते हेच आहे. जे मरण आहे असे वाटते ते जीवनाला मार्ग देते. जसे येशूच्या मृत्यूने जीवनाचे दार उघडले गेले, तसेच पती जेव्हा त्याच्या पत्नीसाठी स्व:प्रेमाला मरतो तेव्हा त्याच्या हृदयात शुभवर्तमानाला योग्य असे जीवन निर्माण होते. ह्यामध्ये एक विस्मयकारक सहजीवन देखील आहे, कारण ज्या पत्नीला माहित आहे की आपला पती आपल्यासाठी जीव द्यायलाही तयार आहे, अशी पत्नी आनंदाने आपल्या पतीच्या अधीन होईल.
मंडळीवर ख्रिस्ताने केलेल्या आत्मत्यागी प्रीतीने मंडळीचे शोषण केले नाही, तर उलट तिची सर्वात निकडीची गरज पूर्ण केली. ख्रिस्ताने त्याला जे हवे होते ते करून मंडळीवर प्रीती केले नाही, तर मंडळीला ज्याची आवश्यकता होती ते करून केली. ख्रिस्ताने मंडळीसाठी इतर कोणतीही गोष्ट केली असती तर ती तिला इतकी लाभदायक ठरली नसती – खरोखर, इतर कोणतीही गोष्ट निरर्थक ठरली असती. ख्रिस्त जर त्याच्या वधूसाठी वधस्तंभावर गेला नसता, तर कोणतेही आभूषण, कोणतेही विशेषाधिकार, कोणताही सांसारिक रुतबा तिला नरकात जाण्यापासून रोखू शकला नसता. येशूने मंडळीसाठी आपला प्राण अर्पण केला, तिच्या पापासाठी दंड भरला आणि तिचा पित्याशी समेट घडवून आणला आणि ही मंडळीला लाभदायक अशी आत्म-त्यागी प्रीती पतींनी आपल्या पत्नीवर प्रेम करण्यासाठी एक उत्तम नमुना प्रदान करते.
इफिस. ५:२६-२७ मध्ये, पौल, ख्रिस्ताने मंडळीसाठी आपला प्राण अर्पण करण्यामधील दोन उद्देशांचा पाठपुरावा करतो. पहिला, ख्रिस्ताने मंडळीसाठी आपला प्राण दिला “ह्यासाठी की, तिला वचनाद्वारे पाण्याने धुतल्यानंतर तिचे पवित्रीकरण करावे.” हे उद्दिष्ट विधान ख्रिस्ताने आपला प्राण अर्पण केल्याने मंडळीला कोणता काय लाभ झाला ह्यावर लक्ष केंद्रित करते आणि तिला जो दर्जा मिळाला त्यासाठी ख्रिस्ताने तिला कसे तयार केले ते सांगते. ख्रिस्ताने “मंडळीचे पवित्रीकरण करण्यासाठी” तिच्यासाठी आपला प्राण अर्पण केला, ह्याचा अर्थ त्याच्या मृत्यूमुळे मंडळीला देवासाठी वेगळे केले. जणू काही मंडळी अशुद्ध अवस्थेत होती, पाप आणि मृत्यूमुळे देवापासून विभक्त झालेली होती, त्याच्या पवित्र उपस्थितीतून तिला काढून टाकण्यात आले होते, आणि शुद्ध क्षेत्रात प्रवेश करण्यास, पवित्र स्थानातून पुढे जाण्यास आणि परमपवित्र स्थानात उपासना करण्यास पात्र नव्हती. ख्रिस्ताने मंडळीला तिच्या पवित्रतेच्या नव्या स्थितीत आणण्यासाठी वचनाद्वारे पाण्याने धुवून तयार केले.
लेवी वंशाच्या अपर्णाच्या पद्धतीतून घेतलेल्या शब्दात येथे मंडळीचे मूर्त स्वरूप चित्रित केले आहे. अशुद्ध झालेल्या व्यक्तीप्रमाणे, मंडळीला शुद्ध क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी विधीनुसार धुऊन स्वच्छ करण्याची गरज होती. ख्रिस्ताने केलेले शुद्धीकरण हे अभिवचनाच्या शब्दाने पूर्ण केलेले शुद्धीकरण होते, कारण कोणतेही बाह्य अनुष्ठानिक शुद्धीकरण आवश्यक ते पूर्ण करू शकत नव्हते. विश्वासाने मंडळीचे तारण होईल आणि ख्रिस्ताने मंडळीला ज्या शब्दाने धुतले ते आवश्यक शुद्धीकरण पूर्ण करते. ख्रिस्त त्याच्या शब्दाद्वारे मंडळीमध्ये विश्वास निर्माण करतो आणि त्याच्या शब्दाद्वारे त्याने मंडळीमध्ये विश्वास निर्माण व्हावा ह्यासाठी सर्व आवश्यक गोष्टी पुरवल्या आहेत. ख्रिस्ताने शब्दाद्वारे मंडळीला स्वच्छ केले, तिला विश्वास देऊन तिची अशुद्धता दूर केली. असे केल्यावर, त्याने तिला पवित्र करू शकणारा एकमेव यज्ञ अर्पण केला: त्याने स्वतःला तिच्यासाठी दिले. अशाप्रकारे मंडळीला ह्यापुढे डेऱ्याच्या बाहेर मृतांच्या राज्यात हद्दपार केले जाणार नाही. तिला ख्रिस्ताच्या शब्दाने शुद्ध करण्यात आले आहे, ज्यामुळे तिला डेऱ्यात प्रवेश करण्याचा अधिकार मिळाला आहे. तिला त्याच्या मृत्यूने पवित्र केले गेले आहे, ज्यामुळे तिला परमपवित्र स्थानात प्रवेश मिळतो. ख्रिस्ताने केलेल्या कार्यामुळे ती पवित्र झाली आहे.
इफिस. ५:२७ मधील दुसरे उदिष्ट विधान ख्रिस्ताला मंडळीवरील त्याच्या प्रीतीचा कसा लाभ होतो ह्यावर लक्ष केंद्रित करते. त्याने आपल्या वधूसाठी आपला प्राण अर्पण केला, “गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी.” (इफिस. ५:२७). ख्रिस्ताने मंडळीसाठी केलेल्या सेवेचा त्याला नक्कीच लाभ होतो. त्याला हा लाभ होतो की त्याने आपल्या शब्दाने मंडळीला शुद्ध केल्यामुळे आणि त्याच्या मरणाने तिचे शुद्धीकरण केल्यामुळे, तो आता तिला स्वतःला सादर करू शकतो.
येथे एक विरोधाभास आहे: स्वतःचे बलिदान देऊन ख्रिस्त स्वतःसाठी एक गौरवशाली मंडळी मिळवतो. अनिष्ट मृत्यूद्वारे जे इष्ट आहे ते येशू मिळवतो. स्वार्थी लोक स्वतःसाठी ज्या गोष्टींची इच्छा करतात – चांगल्या गोष्टी ज्यांची अवास्तविकपणे आणि पापाने इच्छा केली जाते – त्याच गोष्टी येशू निस्वार्थी राहून मिळवतो. ज्या गोष्टी लोकांना निस्वार्थपणे वागण्यापासून वंचित ठेवतात, अगोदर त्यांच्या पत्नीच्या कल्याणासाठी काळजी करण्यापासून रोखतात, त्याच गोष्टींचा ख्रिस्ताला लाभ होतो कारण तो निःस्वार्थ होता. एक स्वार्थी पती वैभवशाली पत्नीकडून सेवा आणि समाधान मिळावे अशी इच्छा धरतो. आपल्या पत्नीसाठी निःस्वार्थपणे स्वतःला अर्पण करून, ख्रिस्त स्वतःसाठी अगदी तशीच (वैभवशाली) पत्नी निर्माण करतो.
परंतु असे नाही की एकट्या ख्रिस्तालाच ह्याचा लाभ होतो – मंडळीला असा पती कधीही मिळाला नसता. मंडळीला शुद्ध आणि पवित्र बनवले जाते, आणि नंतर तिला एका अशा पतीला सादर केले जाते ज्याने स्वतःला तिच्या कल्याणासाठी अत्यंत चिंतित असल्याचे दाखवून दिले आहे, जो तिच्या भल्यासाठी अत्यंत समर्पित आहे, तिच्या विश्वासासाठी सर्वात जास्त पात्र आहे. आपल्या वधूसाठी आपला प्राण अर्पण करून, येशू मंडळीला वैभवशाली, निर्दोष आणि निष्कलंक बनवतो. तो तिच्या पापाचा डाग स्वच्छ करतो. तो तिच्यासाठी त्याच्या स्वत:सारखे तेजस्वी पुनरुत्थित शरीर प्राप्त करतो. येशूच्या मृत्यूने पवित्र केलेली मंडळी, परमेश्वराच्या दृष्टीने पवित्र आणि निर्दोष अशी त्याला सादर केली जाते – ज्यांच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्यांच्याविरुद्ध सैतानाला आरोप करण्याचे कोणतेही कारण उरणार नाही.
जशी मंडळी ख्रिस्ताच्या अधीन आहे, तसे स्त्रियांनी त्यांच्या पतींच्या अधीन व्हावे असे आव्हान पौलाने केले, (इफिस. ५:२२), त्या अधीनतेचे कारण स्पष्ट केले (व. २३), नंतर अधीन होण्यासाठी पुन्हा आव्हान केले (व. २४), आणि आता ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी पतींनी आपल्या पत्नींवर प्रीती करावी असे आवाहन केल्यावर (व. २५), आणि ख्रिस्ताने असे का केले हे स्पष्ट केल्यावर (वचने २६-२७), ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली म्हणून पतींनी आपल्या पत्नीवर प्रीती करावी असे आवाहन पौल पुन्हा करतो: “त्याचप्रमाणे पतींनी आपापली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो” (व.२८). हे विधान पती-पत्नी ह्यांच्यातील एक-देह होण्याचा संदर्भ गृहीत धरते आणि तसे अपेक्षित करते जे पौल वचन ३१ मध्ये व्यक्त करतो. तेव्हा एकीकडे, पती-पत्नीमधील एक-देह होणे असे सूचित करते की जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवर प्रीती करतो, तर दुसरीकडे, ख्रिस्ताने मंडळीवर जशी प्रीती केली तशी प्रीती पतीने पत्नीवर केल्यामुळे मिळणारे आशीर्वाद हे सत्य प्रमाणित करतात की “जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवर प्रीती करतो.”
ह्या क्रियाशीलतेची पौलाच्या पुढील विधानात पुनरावृत्ती केली गेली आहे, ज्यामध्ये एक-देह होणे आणि जिला माहित आहे की ती प्रिय आहे, जिचा आपल्या पतीवर विश्वास आहे, अशी पत्नी मिळाल्याचा आनंद गृहीत धरून, पौल इफिस. ५:२९ मध्ये लिहितो, “कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही; तर तो त्याचे पालनपोषण करतो; जसे ख्रिस्तही मंडळीचे पालनपोषण करतो तसे तो करतो.” कोणीही कधीही स्वतःच्या देहाचा द्वेष करत नाही, पण जे आपल्या पत्नीशी द्वेषाने वागतात ते नकळत आपल्या देहाचा द्वेष करतात. मुर्ख मनुष्य स्वतःला आपल्या पत्नीपेक्षा उच्च करतो, तिची थट्टा करतो, तिने त्याची सेवा करावी अशी मागणी करतो आणि तिच्याविषयी अपमानास्पद शब्द बोलतो. त्यांच्या नकळत, असे मूर्ख स्वतःचा द्वेष करत असतात. ते त्यांच्या पत्नींचा अपमान करतात आणि त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो: त्यांच्या पत्नीच्या दोषांवर प्रकाश टाकल्याने त्यांच्या पत्नी कमी आकर्षक बनतात कारण त्या अधिक कडवट, अधिक निराश, अधिक घाबरलेल्या आणि अधिक संशयास्पद होतात. कडवट, निराश, भयभीत, संशयास्पद स्त्रीसह एक-देह होणे अजीबात आनंददायी नसते. मूर्ख पुरुष स्वतःचा द्वेष करतात. आणि मूर्ख पुरुषांच्या पत्नींना त्यांच्याशी द्वेषाने वागणाऱ्या पतींचा आदर करणे आणि त्यांच्या अधीन राहणे कठीण होईल. जेव्हा मूर्ख पुरुष त्यांच्या पत्नींना स्वत:ला सादर करतात तेव्हा त्यांना तेच मिळते जे त्यांनी स्वतःसाठी वाढून ठेवलेले असते: दुःख. केवळ देवाच्या सामान्य कृपेच्या विपुलतेमुळेच मूर्खांना त्यांनी ज्या पत्नींशी गैरवर्तन केला आहे त्यांच्याकडून थोडाफार आशीर्वाद मिळतो. त्यांनी स्वतःचा द्वेष केला आहे. त्याबद्दल त्यांना दुःख भोगावे लागते.
पौल इफिस येथील पतींना ही सत्ये ओळखण्यास आणि ख्रिस्त मंडळीवर जशी प्रीती करतो तशी प्रीती त्यांच्या पत्नीवर करण्यास सांगतो. तो त्यांना त्यांच्यामधील आणि त्यांच्या पत्नींमधील एक-देह होणे ओळखण्यास आणि त्यांच्या पत्नींना त्यांच्या स्वतःचे शरीर समजण्याचे आवाहन करतो – त्यांनी त्यांचा द्वेष करू नये तर त्यांचे पालनपोषण करावे व त्यांची काळजी घ्यावी. इफिस. ५:२९ ह्या वचनाच्या शेवटी पौल पुन्हा पतींनी आपल्या पत्नीवर प्रीती करण्याच्या पद्धतीची तुलना ख्रिस्ताच्या मंडळीवर प्रीती करण्याच्या पद्धतीशी करतो आणि नंतर ३० व्या वचनात तो ख्रिस्ताच्या परोपकारी वागणुकीचे कारण तो मंडळीला देतो: “कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव, [त्याच्या हाडामांसाचे आहोत] आहोत.” पौल येथे पतींना हे समजून घेण्यास सांगतो की जे विश्वासाने ख्रिस्ताशी एकरूप झाले आहेत त्यांच्याशी तो त्यांच्या पात्रतेप्रमाणे वागले नाही. द्वेषपूर्ण वागणूक मिळण्यास जर कोणी पात्र असेल, तर ते सर्वशक्तिमान देवाविरुद्ध पापी बंड करणारे आहेत. पण ते ज्याला पात्र आहे ते त्यांना देण्याऐवजी, इतकेच नव्हे तर त्यांचा द्वेष न करता, ख्रिस्ताने त्यांना आपल्या वचनाने शुद्ध केले आहे आणि त्याच्या मृत्यूद्वारे त्यांना पवित्र केले आहे, त्यांना स्वतःशी जोडले आहे, त्यांना स्वतःच्या शरीराचे अवयव बनवले आहे. नंतर तो त्यांच्याशी स्वतःच्या शरीराप्रमाणे वागतो, त्यांचे पालनपोषण करतो, त्यांची काळजी घेतो, त्यांच्यासाठी त्याग करतो, त्यांच्यावर प्रीती करतो. कोणीही मनुष्य आपल्या पत्नीला तिची प्रेमाने काळजी घेण्यास अयोग्य समजत असेल, तिच्याकडे विशेष लक्ष देण्यास किंवा तिच्यासाठी असाधारण त्याग करण्यास ती योग्य नाही असे समजत असेल, तर ख्रिस्ताने ज्या प्रकारे दुष्ट, बंडखोर आणि क्रांतिकारी लोकांवर प्रीती केली त्याकडे त्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
ख्रिस्ताने शुद्ध केले. ख्रिस्त मरण पावला. ख्रिस्ताने आपल्या वधूला निष्कलंक बनवले आणि नंतर तिला स्वतःला सादर केले. अशीच प्रीती पतींनी आपल्या पत्नीवर केली पाहिजे. इफिस. ५:२२-३० मध्ये पौलाचा युक्तिवाद हाच आहे. ह्या युक्तिवादानंतर, ज्यामध्ये पती-पत्नी, ख्रिस्त आणि मंडळी ह्यांच्यातील अनेक तुलना दिलेल्या आहेत, त्यांचा सखोल अर्थ पौलाने काढलेल्या निष्कर्षामध्ये दिसून येतो. इफिस. ५:३१-३२ हे आपल्याला पहायला मिळते: ““म्हणून पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील; आणि ती उभयता एकदेह होतील.”
32हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त व मंडळी ह्यांच्यासंबंधाने बोलतो आहे.” इफिस. ५:२९ब-३० आणि ५:३१-३२ मधील संबंध हा तो बिंदू आहे जिथे तो खोलात शिरतो. हा संबंध असा आहे की ख्रिस्ताने मंडळीवर ज्या प्रकारे प्रीती केली त्याचे वर्णन केल्यावर, पौल म्हणतो की ख्रिस्ताच्या मंडळीवरील प्रीतीमुळेच उत्पत्ति २:२४ ह्या वचनातील शब्द अस्तित्वात आहेत. ही एका घोषणा आहे की देवाने मानवांना लिंग असलेल्या व्यक्ती असे निर्माण केले, जे एक पुरुष आणि एक स्त्री असे विवाहाच्या करारात एक-देह होतील, ते दोघे ह्यासाठी एक होतील की, जगाला ख्रिस्त आणि मंडळीमधील संबंध समजण्यासाठी त्यांनी तत्सम वैशिष्ट्ये असलेल्या व्यक्ती बनावे.
एका कादंबरीकाराने युद्धासाठी राजकीय बांधणी करण्यासाठी जशी बुरुज, रणनीती, सैन्य तैनात करणे आणि वेगवेगळ्या सैनिकांची व्यक्तिमत्त्वे आणि पार्श्वभूमी ह्या गोष्टींची आवश्यकता असते तशाच गोष्टींची विवाहातही आवश्यकता असते असे विवाहाचे वर्णन केले आहे, हे सर्व ह्यासाठी की नायकाच्या धाडसी कूच करण्यामधील धैर्य पडद्यावर दिसून यावे. शौर्य आणि साहस संदर्भाशिवाय समजणार नाही. आणि विवाह हा त्या संदर्भाचा एक भाग आहे जो देव ख्रिस्ताचे शौर्य स्पष्ट करण्यासाठी निर्मितीच्या वृत्तांतात लिहितो. विवाह ह्यासाठी अस्तित्त्वात आहे की लोकांना ख्रिस्ताची त्याच्या अपात्र वधूवरची प्रीती आणि हरवलेल्या आणि निराश झालेल्याना शुद्ध करण्याची, पवित्र करण्याची आणि त्यांचे जीवन बदलून टाकण्याची त्याची क्षमता समजावी ह्यासाठी की तो त्याच्या वधूला सुंदर आणि वैभवशाली वधू म्हणून स्वतःसमोर सादर करू शकेल. आणि तो हे स्वार्थाने नव्हे तर निस्वार्थपणे, स्वाभिमानाने नव्हे तर नम्रपणे करतो, आणि त्यासाठी वधूला कोणतीही किंमत मोजावी लागत नाही, तर तो हे स्वतःच्या प्राणाची किंमत मोजून करतो.
पत्नीकडून पूर्ण समर्पण आणि पतीकडून मृत्यूपर्यंत त्यागाची प्रीती ह्या गोष्टींचे समर्थन कसे होईल ह्या वरती उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर ह्या वस्तुस्थिती देतात. शुभवर्तमानाचे चित्र म्हणून विवाह अस्तित्वात आहे ही वस्तुस्थिती मंडळीसारखी अधीनता आणि ख्रिस्तासारखे वधस्तंभ धारण करणे ह्या गोष्टींचे समर्थन करते. हे एक रहस्य आहे: वैवाहिक संबंधांमध्ये आवश्यक असलेल्या वर्तनाबद्दल बोलणे म्हणजे ख्रिस्त आणि मंडळीबद्दल बोलण्यासारखे आहे (इफिस. ५:३२). इफिस. ५:३३ मध्ये पती-पत्नीच्या नातेसंबंधाचा अर्थ पौलने मांडला आहे: “तथापि तुमच्यापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी; आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.” पौल ख्रिस्त आणि मंडळीबद्दल बोलत आहे, परंतु त्यामुळे पतींनी त्यांच्या पत्नींवर प्रीती करण्याची आणि पत्नींनी त्यांच्या पतींच्या अधीन राहण्याची गरज रद्द होत नाही. पौलाच्या ख्रिस्ताविषयी आणि मंडळीविषयी बोलण्यामुळेच अशा वर्तनाची गरज निर्माण होते.
इफिस. ५:३१-३२ मधील पौलाचे शब्द होशेय ३ सारखे जुन्या करारातील शास्त्रभाग ख्रिस्तामध्ये कसे पूर्ण होतात ह्याचा एक सखोल अर्थ प्रतिबिंबित करतात. येशू एके दिवशी त्याची मशीहाविषयक मेजवानी, कोकऱ्याच्या लग्नाची मेजवानी देईल (प्रकटी १९:७; २१:२; ९-१०; तसेच लूक २२:१६). देवाची सर्व अभिवचने त्याच्यामध्ये होय आणि आमेन आहेत (२ करिंथ. १”२०).
शुभवर्तमान आणि विवाह
तेव्हा प्रत्येक विवाह हा शुभवर्तमानाची लघुनाटिका असला पाहिजे. स्वार्थी माणसे ख्रिस्ताच्या प्रतिमेत रूपांतरित होतात आणि निस्वार्थीपणे त्यांच्या पत्नींच्या कल्याणासाठी त्यांच्या स्वतःच्या गरजा आणि इच्छा बाजूला ठेवतात तेव्हा जगाला ख्रिस्तसदृशता दिसून येते. ख्रिस्तसदृश्य पुरुष जेव्हा त्यांच्या पत्नींवर प्रीती करतात, ज्या कदाचित ख्रिस्तसदृश्य वागणूक मिळण्यास पात्र असतीलच असे नव्हे, पण ज्यांना माहित आहे की त्यांचे पती सर्वप्रथम त्यांचे कल्याण व्हावे म्हणून प्रयत्नशील आहे त्या अशा प्रीतीमुळे आत्मविश्वासू स्त्रिया बनतात. अशा स्त्रियांविषयी सर्वजण चांगले बोलतात कारण त्यांचे पती त्यांच्याबद्दल चांगले बोलतात; त्या ख्रिस्ताच्या स्वतःच्या मंडळीच्या वैभवाने तेजोमय होतात, यरुशलेमसारख्या सुंदर, ध्वज फडकवणाऱ्या सेनेसारख्या विस्मयकारक (गीत. ६:४), कारण त्यांच्यावर परिवर्तन करणाऱ्या विलक्षण प्रीतीने प्रीती केली गेली आहे.
ह्याचे नकारात्मक दिशेनेही परिणाम होतात: मूर्ख पती ख्रिस्त जो मंडळीचा वर आहे त्याचे चुकीचे प्रतिनिधित्व करतात. अधीन न राहणाऱ्या स्त्रिया मंडळीचे ख्रिस्तासोबतचे नातेसंबंध कसे असावेत ह्याविषयीची चुकीची छाप पाडतात. जसे उदारमतवादी मंडळ्यांमध्ये ख्रिस्ताचे वचन त्याच्या प्रभुत्वाची वकिली करत नाही, तसेच स्त्रिया आपल्या पतींच्या अधीन राहत नाहीत आणि विवाहाचा जो खरा उद्देश आहे त्याच्या विरुद्ध वागतात. आणि पवित्र शास्त्राला धरून नसलेला घटस्फोट असे खोटे बोलतात की नवा जन्म झालेली व्यक्ती काही कारणांनी आपला नवा जन्म गमावू शकते.

निष्कर्ष
तेव्हा, वैवाहिक जीवनाचे रहस्य हे आहे की जेव्हा मंडळी ख्रिस्ताच्या अधीन राहते, पत्नी पतीच्या अधीन राहते आणि ख्रिस्त मंडळीवर जशी प्रीती करतो आणि स्वतःला तिच्यासाठी अर्पण करतो, तशी प्रीती जेव्हा पती आपल्या पत्नीवर करतो आणि स्वतःला तिच्यासाठी समर्पित करतो, तेव्हा शुभवर्तमान गाजवले जाते. असे केल्याने केवळ मंडळीवरील ख्रिस्ताची प्रीतीच नव्हे, तर इस्राएलावरील परमेश्वराची प्रीती देखील प्रदर्शित केली जाते आणि इस्राएलवरील परमेश्वराची प्रीती, ख्रिस्ताच्या मंडळीवरील प्रीतीमध्ये पूर्णत्वास येते.
आम्ही कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीची वाट पाहत आहोत, ज्या महान विवाहाच्या दिवसासाठी जग निर्माण केले गेले. विवाह हा ख्रिस्तामध्ये देवाचे गौरव आहे. जेव्हा ख्रिस्ताने मंडळीवर जशी प्रीती केली तशी पती आपल्या पत्नीवर प्रीती करतात आणि जशी मंडळी ख्रिस्ताच्या अधीन होते तशा पत्नी आपल्या पतींच्या अधीन होतात, तेव्हा उत्पत्ति ३:१६ मधील लिंग संबंधांवरील जुन्या शापावर मात केली आहे. पित्याच्या गौरवासाठी, आत्म्याच्या सामर्थ्याने, ख्रिस्तावरील विश्वासात जगणाऱ्या विवाहित जोडप्यांना त्यांचे जीवन एदेन बागेसारखे फुललेले दिसते.
विवाह हे देवाच्या गौरवाचे अनोखे प्रदर्शन आहे. ख्रिस्त ज्या प्रकारे मरण पावला आणि त्याने ज्या प्रकारे त्याच्या लोकांचे जीवन बदलून टाकले त्याचे विवाह हे ज्वलंत चित्र आहे. आत्मा आणि वधू म्हणतात, “ये प्रभू येशू ये” (प्रकटी. २२:१२, १७, २०).

जिवंत आशा चर्च
जिवंत आशा चर्च