तुमच्या आईबापाचा मान राखणे

तुम्ही दहा वर्षें वयाचे आहात आणि तुमची तीन वर्षांची धाकटी बहीण उंदीर मारण्याच्या विषाची बरणी उघडायचा प्रयत्न करत असतांना तुम्ही पाहत आहात. तिला बरणीतली “मिठाई” खूप हवी आहे! तुम्ही झटकण ती बरणी तिच्या हातांतून काढून घेऊन तिचा हात पोहोचणार नाही अशा एका उंच फळीवर ती ठेवता. ती खूप निराश होऊन रडायला लागते. तिला वाटते की तुम्ही तिला तिने पाहिलेली ती “मिठाई” खाऊ देत नाही म्हणून तुम्ही खरोखर फार कठोर आहात. पण तुम्ही तिच्याहून मोठे आहात आणि तुम्हाला गोष्टी अधिक चांगल्या कळतात. तुम्ही जाणता की जर तिने उंदीर विषाच्या त्या गोळ्या खाल्ल्यातर त्याचे फार गंभीर परिणाम होतील; ती खूप आजारी पडेल किंवा कदाचित ती मरण देखील पावेल.

तुमच्या आईबापाच्या आज्ञा पाळणे कधी कधी असे होऊ शकते. काही वेळां, तुम्ही लहान मुलेचअ सल्यामुळे, तुमचे आईबाप तुम्हाला सांगतात की तुम्हाला काहीतरी करायची खूप इच्छा असते ते तुम्ही करू शकणार नाही, किंवा तुम्हाला जे काहीतरी हवे असते ते ते काढून घेतात. तुम्ही उद्विग्न होतां आणि कदाचित तुमचे आईबाप क्रूर आहेत असे देखील तुम्हाला वाटते. पण तुमचे आईबाप वयाने अधिक मोठे आहेत आणि तुम्ही आहात त्याहून अधिक अनुभवी आहेत. तुम्हाला जे करावेसे वाटते किंवा जे हवे त्यातील धोके किंवा संभवणाऱ्या इजा त्यांना दिसतात. तुमच्या आईबापावर भरवसा ठेवा आणि त्यांची आज्ञा पाळा. देवाने तुम्हाला दिलेला बाप आणि आई यांचा आदर करा. संपूर्ण जगातील इतर कोणत्याही प्रौढ व्यक्तीपेक्षा ते तुम्हाला अधिक चांगले जाणतात आणि तुम्हावर अधिक प्रीती करतात. तुमच्या आईबापाची आज्ञा तत्परतेने, राजी खुशीने, प्रीती आणि आदर भावनेने पाळा; केवळ ती पाळणे तुम्हाला भाग पडते म्हणून नव्हे. देव तुमचे हृदय, तुमची इच्छा पाहतो.

पांचवी आज्ञा म्हणते, “आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील.”(निर्गम २०:१२). तसेच पौलाने लिहिले, “मुलांनों तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा; हे प्रभूला संतोषकारक आहे.” (कलसे ३:२०).

जेव्हा तुम्ही पोरसवदा वयाचे (टिनएजर्स) बनता तेव्हा तुमच्या आईबापांची आज्ञापाळणे आणि त्यांचा आदरकरणे अधिक आव्हानात्मक देखील होऊ शकते. का? आईबाप आणि मुलें यांच्यामधील जबाबदारीच्या मर्यादारेखां पोरसवदावयाच्या वर्षांमध्ये परस्परांना छेदतात. जेव्हा तुम्ही जन्माला आला तेव्हा तुमच्या आईबापांनी तुमच्यासाठी जवळजवळ सर्वकाही केले. त्यांनी तुम्हाला भरवले, तुम्हाला कपडे घातले, आणि तुमची डायपर्स बदलली. आता तुम्ही वाढून एक तरुण प्रौढव्यक्ती बनत असतांना, तुम्ही संक्रमण काळात शिरता. तुम्ही अधिकाधिक निर्णय घेता: आपला वेळ कसा घालवायचा, एकदा तुमचे लायसन्स मिळाले की गाडी कोठे चालवायची, तुमच्याशी वाईट वागणाऱ्या एका मित्राला कसे वागवायचे, तुमचे पैसे कसे खर्च करायचे, आणि नोकरीसाठी अर्ज करायचा की नाही. तुम्ही अधिकाधिक निर्णय घेणारे बनता आणि तुम्हाला प्रौढत्वात परिपक्व होऊ द्यावे म्हणून तुमचे आईबाप मागे सरतात.

संक्रमणाच्या ह्याकाळात नेहमी दोन आव्हाने पुढे येतात..

१. पोरसवदा मुलांमध्ये त्याच्या स्वतःची कर्तृत्वें प्रत्यक्षात आहेत त्याहून खूप अधिक आहेत असे मानण्याची प्रवृत्ती येते आणि त्यांना खूप अधिक स्वातंत्र्य खूप झटपट हवे असते. पुष्कळ पोरसवदा मुलांना फाजील आत्मविश्वास असतो कारण त्यांनी जीवनातील वास्तवे आणि परिणाम अजून फारशी अनुभवलेली नसतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर पोरसवदा मुलांना मोह आणि “पापाच्या विषारी” गोळ्यांशी खेळायला आणि खायला पाहिजे असते, कारण त्यांना त्याचे धोकादायक परिणाम दिसत नाहीत आणि “स्वतःची कशी काळजी घ्यायची हे मला माहित आहे” असे ते आत्मविश्वासाने म्हणतात.

२. आईबापांचा ह्याला विरोध असतो आणि म्हणून ते आपल्या पोरसवदा मुलांना खूपच कमी स्वातंत्र्य खूपच धीम्या गतीने देतात. “सहज मोकळीक देण्यातील” हा विरोध आईबापांना त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेची आणि त्यांच्या कल्याणाची जी काळजी वाटते आणि देवापुढे मुलांच्या बाबतीतील त्यांचे उत्तरदायित्वाच्या भावनेतून येत असतो.

एक पोरसवदा मूल म्हणून तुमच्या आईबापांनी तुम्हाला अधिक स्वावलंबित्व आणि स्वातंत्र्य द्यावे यासाठी तुम्ही तुमच्या आईबापांना कसे साहाय्य करू शकता? तुमच्याविषयी भरवसा निर्माण करण्याने. तुमचे माता-पितातुमच्यावर जितका अधिक भरवसा टाकतील, तितकेच तुमच्या विनंत्या मान्यकरणे आणि तुम्हाला कोणाच्याही साहाय्याविना गोष्टींकरण्यासाठी अधिक स्वातंत्र्य देणे त्यांच्या साठी सुलभ होईल. तुम्ही तुमच्या आईबापांच्या मनात तुमच्या विषयी हा भरवसा कसा घडवाल?

 • तुम्ही चुकीचे काही केले असेल तरी त्यांच्याशी प्रामाणिक राहा.
 • काहीही करण्यासाठी, किंवा जेव्हा तुमच्या योजनांत एखादा बदल होतो, तेव्हा त्यांची
  परवानगी घ्या.
 • त्यांच्यावरील तुमची प्रीती दाखवा.
 • त्यांच्याशी संवाद, संभाषणाने संपर्क ठेवा; त्यांना तत्परतेने माहिती द्या आणि चांगले श्रोते
  बना.
 • त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. देवाने त्यांना दिलेल्या जबाबदारीचा विचार करून आणि
  तुमच्यावरील त्यांची नितांत प्रीती आणि तुमच्यासाठी आणि तुमच्या कल्याणाची त्यांना
  वाटणारी काळजी यांचा विचार करा.
 • त्यांच्या अशक्तपणात आणि दोषांत देखील देवाने त्यांचे साहाय्य करावे म्हणून त्यांच्या साठी
  प्रार्थना करा.
 • तुमच्या आईबापांवर भरवसा ठेवा; स्वेच्छेने त्यांचा आदर करा आणि त्यांच्या आज्ञा पाळा.
 • हे करण्यासाठी प्रभू येशू तुमचे साहाय्य करू शकतो असा दृढ विश्वास ठेवा; ह्यासाठी देवाला
  खूप प्रार्थना करा.

हे तुम्ही करता तेव्हा, देवाच्या कृपेने, मुलें म्हणून, पोरसवदा मुलें म्हणून, पृथ्वीवरील तुमच्या सर्व दिवसात, आणि अनंतकालासाठी देखील, तुम्ही आशीर्वादित व्हाल! देवाचे वचन आणि अभिवचने खरी आहेत ह्यावर दृढ विश्वास ठेवा.

डॉ. जोएल बीके
डॉ. जोएल बीके

जोएल रॉबर्ट बीके (जन्म कलामाझू, मिशिगन येथे, डिसेंबर 9, 1952) एक अमेरिकन सुधारित पाद्री आणि धर्मशास्त्रज्ञ आहे. ते ग्रँड रॅपिड्स, मिशिगनमधील हेरिटेज रिफॉर्म्ड मंडळीचे मंत्री आहेत आणि प्युरिटन रिफॉर्म्ड थिओलॉजिकल सेमिनरीचे अध्यक्ष आहेत, जिथे ते सिस्टेमॅटिक थिओलॉजी आणि होमलेटिक्सचे प्राध्यापक देखील आहेत.