ख्रिस्ती जीवनातील पवित्र विधीसंस्कारांच्या भूमिकेची कोणतीही चर्चा बर्याच सुवार्तावादी ख्रिस्ती लोकांच्या दृष्टीने जरा “कॅथलिक” वाटत असली तरी, संपूर्ण नव्या करारामध्ये पवित्र धर्मसंस्कार खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. ह्या विषयावरील पवित्र शास्त्राच्या शिकवणीचा सारांश देताना, हेडलबर्ग कॅटेकिझम (प्र. ६५) बाप्तिस्मा आणि प्रभुभोजन ह्या दोन नव्या करारातील विधीसंस्कारांची “आम्हाला पाहण्यासाठी पवित्र चिन्हे आणि शिक्के” अशी परिभाषा करते. त्यांची स्थापना देवाने केली होती जेणेकरून आपण त्यांचा वापर केल्याने आपल्याला शुभवर्तमानातील अभिवचन अधिक स्पष्टपणे समजावे आणि त्या अभिवचनावर देवाने त्याचा शिक्का मारावा.” आणि शुभवर्तमानातील अभिवचन काय आहे? “आमच्या पापांची क्षमा करण्यासाठी आणि ख्रिस्ताच्या वधस्तंभावर पूर्ण झालेल्या एकाच यज्ञामुळे केवळ कृपेने आम्हाला अनंतकाळचे जीवन देण्याचे ते अभिवचन आहे.”
पवित्र धर्मसंस्कार ही शुभवर्तमानात देवाच्या लोकांना अभिवचन दिलेल्या देवाच्या कृपेची दृश्यमान चिन्हे आणि शिक्के आहेत. (रोम. ४:९-१२). आपण दुर्बल आणि संघर्ष करणारे पापी असल्यामुळे, हे पवित्र धर्मसंस्कार देवाने आपल्याला शुभवर्तमानाच्या प्रचाराद्वारे आधीच दिलेल्या विश्वासाची पुष्टी करण्यासाठी दिले आहेत. (हे संदर्भ पाहा: रोम. ६:३-४; १ करिंथ. ११:२३-२६). म्हणूनच शुभवर्तमानाचा प्रचार आणि पवित्र विधीसंस्कारांचे योग्य प्रशासन ह्यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. देवाने आपल्याला शुभवर्तमानात जे अभिवचन दिले आहे (पापांची क्षमा आणि अनंतकाळचे जीवन) त्याची पुढे जाऊन बाप्तिस्मा आणि प्रभूभोजनात पुष्टी केली जाते. अगोदर शुभवर्तमानाची घोषणा केली जाते, आणि नंतर जेव्हा पवित्र धर्मसंस्कार प्रशासित केले जातात तेव्हा एका अर्थाने शुभवर्तमान दृश्यमान केले जाते – म्हणूनच सुधारित ख्रिस्ती लोक सहसा पवित्र विधीसंस्कारांना “दृश्यमान शब्द” असे म्हणतात.
बाप्तिस्मा आणि प्रभुभोजन हे पवित्र धर्मसंस्कार पार पाडत असताना, पवित्र शास्त्रानुसार संपूर्ण भर देवाने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या व्यक्तीत्वामध्ये पापी लोकांसाठी काय केले ह्यावर स्पष्टपणे दिलेला आहे आणि पापी व्यक्तीच्या विश्वासाच्या बळावर किंवा एखाद्याच्या अंतःकरणाच्या शुद्धतेवर दिलेला नाही. म्हणूनच ह्या दोन पवित्र विधीसंस्कारांमध्ये देव सक्रियपणे सहभागी आहे हे आम्ही लक्षात ठेवले पाहिले, कारण तोच कृपेच्या कराराशी संबंधित अभिवचने देतो ज्याची हे पवित्र विधी संस्कार चिन्हे व शिक्के आहेत. दुसर्या शब्दात सांगायचे झाले तर, पवित्र विधीसंस्कारांमध्ये सहभागी होण्याद्वारे, जो सहभागी होतो त्याला आपल्या कृपाळू देवाने शुभवर्तमानात जे अभिवचन दिले आहे ते तो प्रात्प करतो. (त्याचा अंगीकार करतो).
बाप्तिस्मा आणि प्रभूभोजनाच्या विधीमध्ये, देव अब्राहामाला उत्पत्ति १७:७ मध्ये दिलेली तत्सम कराराची शपथ घेतो – “मी तुझा व तुझ्यामागे तुझ्या संतानाचा देव राहीन, असा निरंतरचा करार मी तुझ्याशी आणि तुझ्या पश्चात तुझ्या संतानाशी पिढ्यानपिढ्या करतो.” पवित्र विधीसंस्कारांच्या केंद्रस्थानी देवाच्या कृपेच्या कराराचे अभिवचन आहे ते असे की तो आपला देव होईल, आणि आपण त्याचे लोक होऊ – एक असे अभिवचन ज्याची आपण जेव्हा विश्वासाने ते धर्मसंस्कार प्राप्त करून घेतो तेव्हा प्रत्येक वेळी पुन्हा पुष्टी केली जाते. म्हणूनच पवित्र धर्मसंस्कार हे सुधारित धर्मनिष्ठा आणि ख्रिस्ती मंडळीच्या जीवनाचा एक आवश्यक भाग आहेत.
नव्या करारात येशूने स्थापित केलेले दोन पवित्र धर्मसंस्कार आहेत. बाप्तिस्मा हा ख्रिस्ती जीवनात प्रवेश करण्याचा धर्मसंस्कार आहे आणि त्याचे महत्त्व प्रभूने आम्हाला जी महान आज्ञा दिली त्यात आपल्याला दिसून येते. मत्तय २८:१९ मध्ये, येशू आपल्या शिष्यांना “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या” अशी आज्ञा देतो. शिष्य, वेदीपुढे जाण्याने किंवा पाळकांच्या मागे प्रार्थना म्हटल्याने नव्हे, तर बाप्तिस्मा घेतल्याने बनतात! हा पवित्र शास्त्रात दिलेला मार्ग आहे, ज्यामध्ये पश्चात्ताप करणारे पापी आणि त्यांचे कुटुंबीय येशू ख्रिस्तावर त्यांचा विश्वास जाहीरपणे घोषित करतात (प्रे. कृ. २:४१; १६:१५; १६:३१-३३). बाप्तिस्मा घेण्याचा अर्थ असा आहे की आपल्याला ख्रिस्ताबरोबर पुरले गेले आहे (रोम. ६:४), आम्ही ख्रिस्ताला परिधान केले गेले आहे (गलती. ३:२७), आणि ख्रिस्ताबरोबर आमची सुंता झाली आहे (कलस्सै. २:११-१२). बाप्तिस्मा हे आपल्या पापांची क्षमा झाली असल्याचे (प्रे. कृ. २२:१६; १ पेत्र. ३:२१) आणि आपला नवा जन्म झाला असल्याचे (तीत. ३:५) चिन्ह आणि शिक्का आहे. बाप्तिस्म्यामुळे आपल्याला अविश्वासणाऱ्यांपासून वेगळे असे चिन्हांकित केले जाते. ह्या सर्व गोष्टींचे अभिवचन आम्हाला आणि आमच्या मुलांना शुभवर्तमानात दिले आहे (प्रे. कृ. २:३८-३९).
प्रभुभोजन झाल्यानंतर, ज्या रात्री येशूला धरून देण्यात आहे त्या रात्री त्याने हा पवित्र विधी स्थापित केला. यहूदी वल्हांडण सणाला संपूर्णपणे एक नवा अर्थ प्राप्त करून दिल्यानंतर, आम्ही मत्तय २६:२६-२८ मध्ये वाचतो की “येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, “घ्या, खा, हे माझे शरीर आहे.” आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून तो त्यांना दिला व म्हटले, “तुम्ही सर्व ह्यातून प्या. हे माझे [नव्या] ‘कराराचे रक्त’ आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे.” पवित्र धर्मसंस्कार शुभवर्तमानात दिलेल्या अभिवचनाशी जोडलेले आहेत आणि त्याच्या रक्त सांडण्याद्वारे आमच्या पापांची क्षमा झाली आहे इतकेच केवळ येशू आम्हाला सांगतो असे नाही, तर येशू म्हणतो की भाकर आणि द्राक्षरसाद्वारे आपल्याला जे दिले जाते, ते त्याच्या स्वत:च्या शरीरापेक्षा आणि रक्तापेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही, तर विश्वास ठेवल्याने त्यातून त्याच्या तारणाच्या कार्याचे सर्व लाभ आपल्याला मिळू शकतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, प्रभूभोजनात, येशू भाकर आणि द्राक्षारसह्या चिन्हाद्वारे आणि शिक्क्याद्वारे स्वतःला आपल्यासाठी अर्पण करतो.
हे शब्द पौलाने करिंथकरांना लिहिलेल्या पत्रात देखील आढळतात, हे असे सूचित करतात की ख्रिस्ती मंडळीचा प्रभुभोजनाचा विधी आपल्या प्रभूच्या प्रतिष्ठापनाच्या वचनांवर आधारित होता. पौल आपल्याला सांगतो की प्रभुभोजन सार्वजनिक उपासनेसाठी ” तुम्ही उपासनेकरता एकत्र जमता तेव्हा” साजरे केले जात असे (१ करिंथ. १४:२६). ह्याचा अर्थ असा की प्रभुभोजन हे, ख्रिस्ताने स्थापित केल्याप्रमाणे, शुभवर्तमानात दिलेल्या अभिवचनाला दिलेले अनुमोदन आहे – पापांच्या क्षमेसाठी ख्रिस्ताच्या रक्तात नवा करार – आणि जेव्हा जेव्हा ख्रिस्ती मंडळी उपासनेसाठी एकत्र जमत असे तेव्हा प्रभुभोजन साजरे केले जात असे. प्रेषितांची शिकवण, प्रभुभोजन, प्रार्थना आणि पुनरुत्थित तारणाऱ्यासोबत सहभागीता ह्यावर प्रेषितीय मंडळीची उपासना केंद्रित होती हे आपल्याला प्रे. कृ. २:४२ ह्या वचनावरून समजते.
पवित्र धर्मसंस्कार, देव आम्हाला आमच्या पापांपासून तारेल ह्या शुभवर्तमानातील अभिवचनाची पुष्टी करत असल्यामुळे – देवाच्या वचनाचा प्रचार आणि सार्वजनिक उपासनेतील पवित्र विधीसंस्कारांचे प्रशासन ह्यांच्यातील दुवा दृढपणे स्थापित होतो. पवित्र शास्त्रानुसार पापी लोकांवरील त्याची कृपा घोषित करण्याची देवाची पद्धत ही त्याच्या वचनाद्वारे आहे आणि त्या अभिवचनाची पुष्टी पवित्र विधीसंस्कारांद्वारे केली जाते. शुभवर्तमानात, देव आपल्याला आपल्या पापांपासून तारण्याचे अभिवचन देतो आणि पवित्र विधीसंस्कारांमध्ये तो त्याच्या सार्वभौम पवित्र अभिवचनाची शपथ घेतो, “मी तुमचा देव आहे आणि तुम्ही माझे लोक आहात!” म्हणूनच अशक्त आणि संघर्ष करणार्या पाप्यांना त्यांचा विश्वास पुरेसा प्रबळ आहे की नाही किंवा प्रभुभोजन घेण्यासाठी त्यांनी पुरेशी वैयक्तिक पवित्रता प्राप्त केली आहे की नाही हे पाहण्यासाठी अंतःकरण तपासण्यास सांगितले जाऊ नये. त्याऐवजी, आपण स्वतःच्या बाहेर पाहणे आणि देवाच्या कृपेच्या कराराच्या अभिवचनाकडे आपली नजर वळवणे आवश्यक आहे. निराश व्यक्तीचे सांत्वन करण्याचा, विश्वास मजबूत करण्याचा आणि शंकेवर विजय मिळवण्याचा हा देवाचा मार्ग आहे. म्हणूनच जेव्हा देवाचे लोक उपासनेसाठी एकत्र येतात तेव्हा वचन आणि पवित्र धर्मसंस्कार हे दोन्ही आवश्यक घटक आहेत.